Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!

| आमदार सुनिल टिंगरे यांनी केली होती मागणी

Bhakti Shakti Statue | PMC | पुणे : लोहगांव परिसरातील (Lohgaon Pune) भक्ती शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा (Bhakti Shakti Purskar) बसवला जाणार आहे. अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत याचे सगळे काम केले जाणार आहे. दरम्यान याबाबत आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर (PMC City Improvement Committee) ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार या ठिकाणी बसवले जाणारे  शिल्प अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत देण्यात येणार असून सदर शिल्प लोहगाव येथील भक्ती शक्ती चौक बस स्टॉप चौकामध्ये बसविण्यात येणार आहे.  तसेच पुतळ्याची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती संबंधित संस्था करणार आहे. सदर शिल्पाचे काम शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी यांचेकडून डोणजे पुणे येथे तयार करण्यात येणार आहे. (PMC Pune News)

असा असेल पुतळा
१) पुतळयाची उंची : १० ते १२ फुट
२) पुतळयाचे वजन : ३००० ते ३५०० किलो
३) पुतळयाचे माध्यम ब्रांझ
४) पुतळ्याचा बेस ९ फुट व रुंदी ७ फुट

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

Categories
Breaking News PMC social पुणे

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

| क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. ऐवजी 15 मी रुंदीचा केला जाणार

Old Pune New DP | मान्य विकास आराखड्यामध्ये (Pune Devlopment Plan)पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र यामुळे काही मिळकती बाधित होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी हा रस्ता 15 मी करण्याची मागणी केली होती. यावर राज्य सरकारने महापालिकेचा (PMC Pune) अभिप्राय मागवला होता. त्यानुसार महापालिकेने 15 मी रस्ता करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे.  (Pune Municipal Corporation)

अर्जदार श्री. दिलीप जोशी व इतर यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित केल्याने या रस्त्यावरील सन १७७४ साली बांधलेले वारसा यादीमध्ये असलेले पुण्यातील पुरातन लक्ष्मी नृसिंह मंदिराचा मोठा भाग रस्ता रुंदीकरणात जात आहे. सि.स.नं. १४२०, सदाशिव पेठ व त्यामुळे पुरातन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तू नष्ट होणार आहे. त्यामुळे सदरचा फडके रस्ता मान्य सुधारित विकास आराखडा (२००७-२७, सेक्टर-१, शीट क्र. ६ व ९) मध्ये प्रस्तावित करण्यात आलेला २४ मी. रस्ता रुंदी डीपी रद्द करून तो सन १९८७ च्या मंजूर आराखड्याप्रमाणे १५ मी. ठेवावा अशी मागणी संबंधितांनी केली आहे. त्यास अनुसरून अवर सचिव यांनी पुणे महानगरपालिकेचा अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. (PMC Pune News)

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (२००७-२७) शासनाने सन २०१७ मध्ये मंजूर केला आहे. सदर मान्य विकास आराखड्यामध्ये पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.  रस्ता हा दक्षिण दिशेला असून या रस्त्यावर पुरातन ऐतिहासिक लक्ष्मी नृसिंह मंदिर हे पश्चिमेकडे आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मी. रस्तारुंदीमध्ये सदर मंदिराचा गाभारा आहे. तो तसाच राहणार असून सभामंडप हा दक्षिणेकडील बाजूस ८ मी. ने व उत्तरेकडील बाजूस ९०६ मी. ने बाधित होत आहे. तसेच प्रस्तुत बाबत वारसा व्यवस्थापन विभाग यांचेकडील अभिप्राय  प्राप्त झाला असून “मान्य २०१७ डी.पी. मध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा रस्ता १५ मी. ऐवजी २४ मी. रुंदीचा केल्यास ग्रेड -१ दर्जाचे खुन्या मुरलीधर मंदिर व ग्रेड -२ दर्जाचे लक्ष्मी नृसिंह मंदिर या दोन्ही वास्तू बाधित होत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने खुन्या मुरलीधर मंदिर चौक ते खजिना विहीर चौक या संबंध रस्त्याची रस्तारुंदी रद्द करण्याची पुणे महानगरपालिकेच्या हेरीटेज कमिटीची शिफारस आहे.” असे कळविले आहे.
जागेवरील रस्त्याचे टोटल स्टेशन मशिनद्वारे सर्वेक्षण केले असता १५ मी. रस्तारुंदीमध्ये एकुण ३२मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये पुर्व बाजूकडील २१ व पश्चिम बाजूकडील ११ मिळकतींचा समावेश आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यामधील २४ मी. डीपी. रस्त्याने एकुण १२७ मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये रस्त्याचे पुर्व बाजूकडील ५८ व पश्चिम बाजूकडील ६९ मिळकतींचा समावेश होत आहे. त्यामुळे खुन्या मुरलीधर चौक ते खजिना विहीर चौक (श्रीधर स्वामी चौक) सदरचा रस्ता सन १९८७ चे मान्य डी.पी. नुसार १५ मी. कायम करणे असे कळविण्यात आले होते.

त्यानुसार सरकारने महापालिकेला कळवले होते कि, पुणे शहराच्या मूळ हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसारच्या खजिना विहीर चौक तेनागनाथपार चौक दरम्यानच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्त्याची रुंदी २४मी. ऐवजी १५ मी. पर्यंत कमी करण्यापेक्षा १८ मी. पर्यंत करणे शक्य आहे किंवा कसे? हे तपासावे व त्यानुसार, सदर रस्त्याची रुंदी १९८७ च्या मंजूर विकास योजनेनुसार १५ मी. अथवा १८ मी. करणेबाबत प्रस्ताव शासनास सादर केल्यास शासन त्यावर गुणवत्तेवर निर्णय घेईल. त्यानुसार महापालिकेने रस्ता 15 मी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आता शहर सुधारणा समिती समिती समोर ठेवण्यात आला आहे.

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय

Categories
Breaking News PMC Sport पुणे

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय

PMC Sanas Ground | पुणे | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) नुकतेच करोडो रुपये खर्चून सणस मैदान (Baburao Sanas Ground) विकसित केले आहे. अॅथलेटिक्स खेळाडूसाठी पुणे शहराच्या केंद्रस्थानी पहिला व एकमेव असा ४०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक (Synthetic Track) तयार केला होता. मात्र महापालिकेला हे मैदान स्वतःच्या जबाबदारीवर चालवणे शक्य होईना झाले आहे. त्यामुळे हे मैदान पहिल्यांदाच भाडे तत्वावर देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आता महापालिकेला महिन्याला साडे पंधरा हजार भाडे मिळणार आहे. (PMC Pune News)

याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनांकडून शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने सन २००६ मध्ये सारसबागेच्या शेजारील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेवर मैदान विकसित केले व या ठिकाणी ७ एकर जागेमध्ये अॅथलेटिक्स खेळाडूसाठी पुणे शहराच्या केंद्रस्थानी पहिला व एकमेव असा ४०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार केला होता. तसेच या मैदानावर लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन ठिकाणी स्वतंत्र पिट आणि भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज इ. साठी देखील मैदान तयार करणेत आलेले होते. (Pune Municipal Corporation)

मे २०२३ अखेर कै. बाबुराव सणस मैदान येथील खेळाच्या मैदानावर ४०० मी. ८ लेन सिंथेटिक ट्रॅकचे नुतनीकरण करण्याचे काम भवन विभागाकडून करण्यात आलेले आहे. तसेच ट्रॅकच्या आतील भागात असलेल्या
मैदानावर लॉन बसविण्यात आली असून लांबउडी, तिहेरी उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज इ. क्रीडा प्रकारासाठी प्लॉट तयार करण्यात आले आहे. सदर सिंथेटिक ट्रॅक व मैदानाचे उद्घाटन २७/०५/२०२३ रोजी करण्यात आले असून सिंथेटिक ट्रॅक व मैदान खेळाडूंच्या वापरासाठी विनियोजन करणेकरिता क्रीडा विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर मैदान क्रीडा विभागाच्या अखत्यारीत असून निर्मिती पासून क्रीडा विभागाकडून चालविण्यात येत असल्याने याबाबत क्रीडा धोरण २०१३ च्या नियमावलीप्रमाणे मैदानाचा व सिंथेटिक ट्रॅकचा वापर होत आहे. परंतु नियमावलीतील अस्पष्टता तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे सदर मैदानाचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरत होते. सध्यस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक व अॅथलेटिक्स खेळासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा यांचा सुनियोजित वापर होण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील अनुभवी व नामांकित क्रीडा संस्था तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडू यांना सदर सिंथेटिक ट्रॅक व मैदान चालविणेस देणे योग्य होईल. त्याचा अॅथलेटिक्स खेळाडूंना फायदा होऊन ट्रॅक व मैदानाचे सुयोग्य पद्धतीने वापर व देखभाल होणे शक्य होणार आहे.
त्याअनुषंगाने कै. बाबुराव सणस मैदान व सिंथेटिक ट्रॅक हे अॅथलेटिक्स खेळाच्या प्रशिक्षणासाठी Quality Cum Cost BasicSelection या पद्धतीनुसार ३ वर्षे कालावधीसाठी मनपा निर्धारित केलेल्या मुल्यांकनानुसार मासिक भाडे १०,०००/- (वार्षिक भाडे १,२०,०००/- ) याप्रमाणे विनियोगासाठी देणेकरिता निविदा प्रक्रिया राबविणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली होती. त्यानुसार टेंडर प्रक्रिया करण्यात आली. Inventure academy of sports and research foundation ने 5555 रुपये ने अधिक दर दिला होता. त्यामुळे त्यांची निविदा मान्य करण्यात आली. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूरीसाठी शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.

Amanora Park Town pune | अॅमनोरा गृह प्रकल्पाला पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी संपवेल बांधला जाणार | पुणे महापालिका आणि अमनोराचा संयुक्त प्रकल्प

Categories
Breaking News PMC पुणे

Amanora Park Town pune | अॅमनोरा गृह प्रकल्पाला पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी संपवेल बांधला जाणार

| पुणे  महापालिका आणि अमनोराचा संयुक्त प्रकल्प

Amanora Park Town pune | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) लष्कर जलकेंद्र मधून अॅमनोरा गृह प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यातून कमी दाबाने पाणी येत असल्याने अमनोरा कडून संपवेल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अमनोराला पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी  लष्कर जलकेंद्रात संपवेल (Buffer Tank) बांधण्यात येणार आहे. महापालिका आणि अमनोरा चा हा संयुक्त प्रकल्प असेल. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी शहर सुधारणा समिती (City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Amanora Park Town pune)

शहर सुधारणा समितीच्या प्रस्तावानुसार लष्कर जलकेंद्र मधून अॅमनोरा गृह प्रकल्पाला, अॅमनोरा गृहप्रकल्पाच्या हिश्याचे पाणी, वाहून नेण्यास महापालिका आयुक्त यांनी यापूर्वी मान्यता दिली आहे.  त्यापोटी महानगरपालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कायमस्वरूपी आकार १.८६,४०,०००/- अॅमनोरा गृह प्रकल्प का
संस्थेकडून भरणा करून घेण्यात आलेला असल्यामुळे व यानुसार अमनोरा गृह प्रकल्पाला पाणी देणे पुणे
महानगरपालिकेला अनिवार्य आहे. (Amanora park town water supply)

सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या रॉ वाटर जलवाहिनी मधून अॅमनोरा गृहप्रकल्पास पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि पर्वती जलकेंद्राकडून लष्कर जलकेंद्राकडे येणाऱ्या मुख्य दाबनलीकेवर अॅमनोरा गृह प्रकल्पाचा पाणी जोड देण्यात आला असल्यामुळे अॅमनोरा गृहप्रकल्पाला पाणीपुरवठा पुरेशा दाबाने व योग्य प्रमाणात होत नाही. त्या अनुषंगाने अॅमनोरा पार्क टाउन सिटी गृह प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार MeLINA QUECON SOLULTANT(MEP) यांनी त्यांना सादर केलेल्या अहवालामध्ये लष्कर जलकेंद्रामध्ये Buffer Tank (संपवेल) मधून पाणी पुरवठा करण्यात यावा असे नमूद केले असून त्यामधून पंपिंगद्वारे पाणी उपसा केल्यास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल, व पुणे महापालिकेच्या वितरण व्यवस्थेवर देखील ताण येणार नसले बाबत अॅमनोरा गृह प्रकल्पाने पत्राने पुणे महानगरपालिकेस कळविले आहे. (Pune Municipal Corporation)
लष्कर जलकेंद्र आवारामध्ये २० मी. x १५ मी. x ७ मी. आकाराच्या जागेवर अमनोरा गृहप्रकल्पास संपवेल बांधणेस, व अॅमनोरा गृह प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणे संदर्भातील आवश्यक ती यंत्रणा उभारण्यास व त्यापोटी येणारा सर्व खर्च अॅमनोरा गृह प्रकल्पाकडून करणेस प्रस्तावित केले आहे.
त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाने अॅमनोरा गृहप्रकल्पासमवेत संयुक्त प्रकल्प अंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेचे अपग्रेडेशन करणेबाबतचे आदेश दिले होते. यानुसार लष्कर जलकेंद्रामधील २० मी x १५मी जागा पाणीपुरवठा विभाग मार्फत उपलब्ध करून संयुक्त प्रकल्प करणे कामी  मान्यता प्राप्त झालेली आहे. यानुसार अॅमनोरा पार्क टाउन सिटी गृह प्रकल्पास संपवेल बांधणेस तसेच अॅमनोरा पार्क टाउन सिटी गृह प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणेकामी पुणे म.न.पा. व अॅमनोरा पार्क टाउन सिटी गृह प्रकल्प यांचा संयुक्त प्रकल्प राबविणेसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र याबाबत काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पाची मालकी आणि नियंत्रण महापालिकेचे राहणार आहे. खर्च देखील अमनोरला करावा लागणार आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (PMC Water Supply Department)
——
News Title | Amanora Park Town Pune | buffer tank will be constructed to supply water under sufficient pressure to the Amanora housing project |  A joint project of Pune Municipality and Amanora