Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

Categories
PMC Political social पुणे

Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

 

Dehu Alandi Municipal Corporation |शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, स्वप्नील पठारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाण्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील, असेही श्री. पवार म्हणाले.

नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असेही ते म्हणाले.

राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे. राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

आमदार श्री. टिंगरे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी मिळत आहे. लोहगाव – वाघोली समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३० कोटी रुपये मंजूर असून एकूण ४५० कि.मी. च्या वितरण नलिकांपैकी २३० कि.मी. नलिका फक्त लोहगावमध्येच आहेत. २० लक्ष हून अधिक क्षमतेच्या ८ टाक्या येथे असून नवीन ९ टाक्यांची कामे सुरू होत आहेत. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयचे काम अंतिम टप्प्यात असून लोहगाव आयटीआय साठी निधी मंजूर आहे. रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासाठी निधी मंजुरीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!

| आमदार सुनिल टिंगरे यांनी केली होती मागणी

Bhakti Shakti Statue | PMC | पुणे : लोहगांव परिसरातील (Lohgaon Pune) भक्ती शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा (Bhakti Shakti Purskar) बसवला जाणार आहे. अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत याचे सगळे काम केले जाणार आहे. दरम्यान याबाबत आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर (PMC City Improvement Committee) ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार या ठिकाणी बसवले जाणारे  शिल्प अखिल शिवजयंती उत्सव लोहगाव या संस्थेमार्फत देण्यात येणार असून सदर शिल्प लोहगाव येथील भक्ती शक्ती चौक बस स्टॉप चौकामध्ये बसविण्यात येणार आहे.  तसेच पुतळ्याची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती संबंधित संस्था करणार आहे. सदर शिल्पाचे काम शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी यांचेकडून डोणजे पुणे येथे तयार करण्यात येणार आहे. (PMC Pune News)

असा असेल पुतळा
१) पुतळयाची उंची : १० ते १२ फुट
२) पुतळयाचे वजन : ३००० ते ३५०० किलो
३) पुतळयाचे माध्यम ब्रांझ
४) पुतळ्याचा बेस ९ फुट व रुंदी ७ फुट

PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!

PMC Water Supply Scheme | पुणे | महापालिका (PMC Pune) हद्दीत 2017 साली समाविष्ट झालेल्या लोहगांव (Lohgaon) आणि वाघोली (Wagholi) या गावांत समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 173 कोटींचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
राज्य सरकारच्या वतीने 2017 साली महापालिका हद्दीत 11 गावे समाविष्ट केली होती. यामध्ये लोहगाव आणि वाघोली या गावांचा समावेश होता. पुणे शहरा प्रमाणे या गावांत देखील समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या योजने अंतर्गत वाघोली आणि लोहगांव या गावांत पाण्याच्या लाईन विकसित करायच्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. हे काम अरिहंत कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. त्यानुसार या कामासाठी 173 कोटी इतका खर्च येणार आहे. त्यानुसार मंजूरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार | लोहगाव-धानोरीत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

| लोहगाव-धानोरीत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असण्याची शक्यता आहे. कारण लोहगाव-धानोरीत समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. याबाबतच्या सुमारे 230 कोटीच्या निविदाच्या प्रस्तावाला मंगळवारच्या एस्टीमेट कमिटीत (PMC Estimate Committee) मंजूरी देण्यात आली आहे. (Lohgaon Water Issue)
महापालिकेत समाविष्ट होऊनही लोहगाव – वाघोली परिसराला पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यामुळे प्रशासना देखील हा विषय गंभीरपणे घेतला होता. त्यानुसार प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी एस्टीमेट कमिटी समोर ठेवला होता. याला नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिकेत समाविष्ट होऊनही लोहगाव – वाघोली परिसराला पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासानुसार या योजनेच्या २३० कोटी रुपयांच्या योजनेला आज पूर्वगणन समितीत मंजुरी दिली. त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. लवकरच या योजनेची निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू होईल आणि लोहगाव परिसराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी खात्री आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा कायम सुरू राहील.
   – सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
—-
News Title | Lohgaon Water Issue | Lohgaon-Dhanori-Wagholi water problem will be solved forever 13 new water tanks will be constructed in Lohgaon-Dhanori

Property Tax Recovery | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढूनही टॅक्स विभाग 7 कोटींची वसुली करण्याबाबत उदासीन 

Categories
Breaking News PMC पुणे

मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढूनही टॅक्स विभाग 7 कोटींची वसुली करण्याबाबत उदासीन

| टॅक्स विभागाने खुलासा देखील नाही केला

पुणे | महापालिकेला महसूल मिळवून देण्यात टॅक्स विभाग अग्रेसर आहे. जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी टॅक्स विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे हाच विभाग काही ठिकाणी हक्काची वसुली करण्यात उदासीन दिसून येत आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी पेठ लोहगाव आणि येरवड्यातील मिळकतीबाबत आक्षेप काढत 7 कोटीची वसुली करण्याबाबत टॅक्स विभागाला सुचवले होते. मात्र कर विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे त्याबाबत खुलासा देखील केला नाही. त्यामुळे आता मुख्य लेखापरीक्षकांनी ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे.

स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या ऑडिट अहवालानुसार  कर आकारणी व कर संकलन खात्याकडील पेठ लोहगाव सन २०१८-२०१९ व २०१९-२०२० A फॉर्म आकारणी रजिस्टरची तपासणी मुख्य लेखापरीक्षक कार्यालय यांच्याकडून करण्यात आली. यामध्ये  काही आक्षेपार्ह व दोषास्पद बाबी आढळून आल्या. पेठ लोहगाव सन २०१८-२०१९ व २०१९ २०२० A फॉर्म रजिस्टरची तपासणी करीत असताना पी/१/०९/०४१४६००० या मिळकतीवर ६,४९,०४,८००/. थकबाकी दिसून आली. याबाबत  खात्यास कळवून त्यावरील खुलासे १५ दिवसांचे आत पाठविणेबाबत कळविले होते. कर आकारणी व कर संकलन प्रमुख कार्यालयाकडे सदरची वसूल पात्र रक्कम आपल्या नियंत्रणाखालील पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षक यांना वसूल करण्याचे आदेश देण्यास व सदरची रक्कम वसूल केल्याबाबत आमच्या कार्यालयाकडे कागदपत्राधारे कळविण्यात यावे असे कळविले होते. परंतू कर आकारणी व कर संकलन कार्यालयाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने  सदरचा अहवाल स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील पेठ येरवडा A फॉर्म क्र. A/००१५०, A /०००१५२, A /००००२३, A /००१४९६, A /००००२२,

A /००००२५, A /००००३०, A /००१५३४ सन २०१८-१९ या मिळकतीच्या आकारणी प्रकरणाची व तद्नुषंगिक कागदपत्रांची तपासणी केली असता आक्षेपार्ह व दोषास्पद बाबींमुळे वसूलपात्र रक्कम रुपये
५१,७१,८०६/- वसूल करावयाची आहे.

अशी सुमारे 7 कोटींची वसुली करण्याबाबत मुख्य लेखापरीक्षक यांनी सुचवले आहे. मात्र टॅक्स विभागाने कुठलीही कारवाई न केल्याने वसूलपात्र रक्कम तशीच पडून आहे.

MLA Sunil Tingre | लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार

| आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

वडगाव शेरी मतदार संघातील लोहगाव येथे मंजूर असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगती पथावर आहे. गुरुवारी या रूग्णालयाच्या कामाची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. अपूर्ण असलेली कामे लवकर पूर्ण करून रूग्णालय लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची सूचना अधिकार्‍यांना आमदार टिंगरे यांनी केली.
मागील दोन वर्षांच्या काळात रूग्णालयाच्या कामामध्ये गती आली. आमदार सुनिल टिंगरे यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्ती निधी मिळविला. डिसेंबर अखेर रूग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सेवेमध्ये मार्च २०२३ मध्ये रूग्णालय रूजू होगणार आहे. रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सोयी सुविधा व उर्वरीत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. आमदार सुनिल टिंगरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालयाच्या सुधारित कामांसाठी आणखी २४ कोटी रुपए निधी मंत्रालयातून मिळाला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. रूग्णालयाच्या कामाची पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांच्या सोबत जिला शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, उप अभियंता जान्हवी रोडे, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुसज्ज रूग्णालयाची गरज लवकरच पूर्ण
आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले कि वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांना उपचाराकरिता ससून हॉस्पिटल जावे लागत आहे. या परिसरात सरकारी व सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध नाही. अनेकदा नागरिकांना खासगी हॉस्पिटलवर अवलंबून रहावे लागत आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन लोहगाव येथे सुसज्ज रूग्णालय बनविले जात आहे. रूग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या रूग्णालयामुळे गरीब व गरजवंतांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political पुणे

 पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा

: आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश

: पूरग्रस्त ठिकाणची केली पाहणी.

पुणे:  येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या  भागात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र तरीही यावर्षी  पुन्हा नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडल्यास संबधित महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी विधी मंडळात केली जाईल असा इशारा पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे.
          येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेकडून तरीही ठोस उपाय योजना होत नाही.  येत्या पावसाळ्यात पुन्हा पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या जागी पूराचे पाणी जमा होते अशा पूरग्रस्त ठिकाणे आणि नालेसफाईची कामे यांची पाहणी आमदार टिंगरे यांनी महापालिका अधिकारांसमवेत येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्यात प्रामुख्याने डाॅ बाबासाहेब आंबेडकर काॅलिनी, फुलेनगर, प्रतिकनगर, शांतीनगर, गंगा कूंज सोसायटी कळस, वैभव काॅलनी, धनेश्वर शाळा मुंजाबा वस्ती धानोरी, मयुर किलबिल सोसायटी लगत नाला धानोरी, लक्षमीनगर सोसायटी धानोरी, संकल्प सोसायटी लोहगाव, कर्मभूमी नगर लोहगाव व कलवड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
         यावेळी आमदार टिंगरे यांनी प्रत्येक पूराने बाधित ठिकाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन काय काय उपाययोजना करतील यातील माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या संदर्भात येत्या गुरुवारी आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात येणार असल्याचे ही आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. यावेळी मा.नगरसेविका शितल सावंत, शशि टिंगरे, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, राजेंद्र खांदवे, मिलिंद खांदवे, विश्वास खांदवे, मा. नगरसेवक सतिश म्हस्के, डाॅ. राजेश साठे, निखिल गायकवाड, बंटी म्हस्के, विनोद पवार, सतिश धापटे, राहुल म्हस्के, दाजी शेटकर, सिध्दार्थ कांबळे, सुभाष खेसे, कुलदीप शर्मा, महेश खांदवे, अमित जंगम, राहुल टेकवडे, पंकज निकाळजे, बाबू कांबळे  पुणे महानगरपालिका मलःनिसरण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे, उप अभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता खरे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त वैभव कडलख,  उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.