PMC Encroachment Action | कल्याणीनगर वडगावशेरी येथील अनाधिकृत रूफ टॉप हॉटेल वर पुणे महापालिकेची कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Action | कल्याणीनगर वडगावशेरी येथील अनाधिकृत रूफ टॉप हॉटेल वर पुणे महापालिकेची कारवाई

| 14000 चौ.फु अनधिकृत बांधकाम केले जमीनदोस्त

PMC Encroachment Action | पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण विभागा (PMC Building Devlopment Department) मार्फत वडगाव शेरी स.नं 13 येथील हॉटेल एलरो यांनी टेरेस वर अनधिकृत पणे शेड बांधुन हॉटेल व्यवसाय  सुरू असल्या कारणाने एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधितास 02 ऑगस्ट 2022 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने अंदाजे 14000 चौ.फु कच्चे स्वरूपाचे बांधकाम या वर कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

हे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून  06 गॅस कटर,12 बिगारी, 8 महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान समवेत पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून कार्यकारी अभियंता श्री अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा बांधकाम निरीक्षक  विष्णू तौर, पंकज दोंदे, अरेखक योगेश गुरव हे उपस्थित होते. यापुर्वी या ठिकाणी दोन वेळेस कारवाई करण्यात आली असून MRTP ACT 1966 मधील कलम 43 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. (PMC Pune News)

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला ! कारण जाणून घ्या

Categories
Breaking News PMC Political social पुणे

आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला! कारण जाणून घ्या

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (vadgaonsheri constituency) विविध मूलभूत प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) उपोषणाला बसणार आहेत. टिंगरे यांनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांना निवदेन दिले आहे. वडगाव शेरीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा निवेदन देवून सुद्धा तसेच वारंवार बैठका घेऊनही या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नसल्याने नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 6 एप्रिल पासून आमदार उपोषणाला (Hunger strike) बसणार आहेत.
 आमदार सुनिल टिंगरे यांच्या निवेदनानुसार    माझ्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील विविध मूलभूत प्रश्नांबाबत मी सातत्याने आपल्याकडे बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहार यामाध्यमातून पाठपुरावा केला आहे.  विधिमंडळ अधिवेशनातही या प्रश्नांकडे मी शासनाचे लक्ष वेधले आहे. असे असतानाही या प्रश्नांची आपल्याकडून दखल घेतलेली जात नाही. प्रत्येक वेळेस केवळ आश्वासने देऊन माझी बोळवण केली जात आहे. मात्र आता मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न इत्यादीनी गंभीर रूप धारण केले आहे. आपणाकडून त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर नाईलाजास्तव येत्या गुरुवार दि. 6 एप्रिल पासून मी स्वतः  व माझ्या मतदार संघातील नागरिकांसमवेत महापालिका भवनासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केलेला आहे.  यासंबंधीची दखल आपण घ्यावी. असे टिंगरे यांनी म्हटले आहे.
| या आहेत मागण्या!
1) पोरवाल रोड वाहतूक कोंडी
2 एअरफोर्स जागेतील (509) ते धानोरी रोड
3) नदी काठचा प्रलंबित रस्ता
4)  विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे.
5) नगर रोड वाहतूक कोंडी
6) लोहगावचा पाणी प्रश्न
7) खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड
8) सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनर्वसन
9) धानोरी लक्ष्मी टाऊनशिप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड
10) धानोरी सर्वे नं. 5  ते सर्वे नं. 12 रोड
11) धानोरी पेलेडीयम रोड ते सर्वे नं. 6  रोड

Town planning shceme | वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

पुणे | पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दी मधील वडगावशेरी येथे नगर रचना परियोजना अर्थात टीपी स्कीम (Town  planning scheme) राबवली जाणार आहे.  या क्षेत्रासाठी प्रारूप नगर रचना योजनेचा मसुदा लवकरच प्रसिध्द केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती (City Improvement committee) समोर ठेवण्यात आला आहे.
समितीच्या प्रस्तावानुसार  वडगावशेरी हे गाव पुणे महानगरपालिकेमध्ये १९९७ साली समाविष्ट झाले. या गावांचा विकास आराखडा सन २००५ साली
प्रसिध्द झाला असून सन २००७ मध्ये टप्याटप्याने सदर डी.पी. मान्य झाला आहे. २००७ पासून आजतागायत वडगाव शेरी येथील स.नं. १७/१/३न, १०/४, ११/१/२/३ मधील डी.पी. रस्त्याखालील जागा पुणे मनपाच्या ताब्यात आलेल्या नाही. तसेच स्थानिक जागामालक रस्ते विकसित करणेकरीता विरोध होत असल्यामुळे वडगावशेरी गावाचा विकास झालेला नाही. तसेच रस्त्यांची कनेक्टीव्हीटी पुर्ण होत नसल्यामुळे विकसित रस्त्याचा वापर करणे शक्य होत नसून वाहतुक कोंडी होत आहे. तरी, सदर गावामधील रस्ते विकसित / ताब्यात येणाच्या दृष्टीने रोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सदर गावामध्ये स.नं. १७/१/३ब, १०/४, ११/१/२/३ येथे टि. पी. स्कीम राबविणे गरजेचे आहे. तरी वडगावशेरी गावातील स.नं. १७/१/३ब, १०/४, ११/१/२/३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टि. पी. स्कीम राबविण्यास  माजी सभासद शीतल ज्ञानेश्वर शिंदे यांनी विनंती केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहर सुधारणा समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला जाईल. (Pune Municipal corporation)

Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा!

| वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी

| आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या 42 कोटींच्या कामांना महापालिकेच्या सिमेंट एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. 
         पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.  तसेच वडगाव शेरी मतदारसंघातील पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 42 कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.  त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
———————–
*वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी*
– विश्रांतवाडी – 509 चौक- विमानतळ  – 19 कोटी
– पुणे नगर रोड रिसर्फेसिंग –  15 कोटी
– बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी 7 कोटी 25 लाख.
– 509 चौक ते नागपूर चाळ –  1 कोटी

Traffic Congestion in Vadgaonsheri | वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

 

    वडगावशेरी मतदारसंघातील विमाननगर, कल्याणीनगर व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळच्या जवळ असणाऱ्या रस्त्यांची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसोबत पाहणी केली.
या पाहणी दौर्‍या दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळकडे जाणारी व विमानतळवरुन येणारी वाहतूक ही प्रामुख्याने 509 चौका मधून होत असते. यामुळे 509 चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांचा पुष्कळ वेळ वाहतूक कोंडी मध्ये जातो. याचा दैनंदिन नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार सुनिल टिंगरे यांनी 509 चौकाची पाहणी करुन वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे अधिकार्‍यांना 509 चौकात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
तसेच 509 चौक ते स्काय बेलवेडेरे सोसायटी, विमाननगर कडे जाणार्‍या रस्त्याच्या ठिकाणी रुंदीकरण करणे व तात्पुरते दुभाजक बसविणे आवश्यक असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी संबंधित पोलिस व पुणे मनपा अधिकार्‍यांना सांगितले. तसेच 509 चौकाचे सर्व बाजूंनी रुंदीकरण करण्याचे निर्देश संबंधित पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले. 509 चौकाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला.
 आमदार सुनिल टिंगरे यांनी बोलविलेल्या संयुक्त बैठकी मध्ये विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त समोर थेट आपल्या समस्या मांडल्या.
            मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी कल्याणीनगर आणि विमाननगर येथे आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे,  KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांच्या संयुक्त बैठका पार पडल्या.
      या बैठकी मध्ये कल्याणीनगर येथील सेंट्रल एव्हेन्यू रोड ते डी’मार्ट रोडवर पार्किंगची उपलब्धता करने, वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणारे भरमसाट टोईंग शुल्क बंद करावे, बेकायदेशीर बॅरीकेट्स लाऊ नये तसेच यासारख्या भेडसावणाऱ्या विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. तसेच विमाननगर येथे घेण्यात आलेल्या बैठकी मध्ये विमाननगर मधील अनेक चौकांमधील होणारी दैनंदिन वाहतूक कोंडीमूळे येथील नागरिकांना खूप गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहतूक कोंडी होत असलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस उपलब्ध करून देणे व नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिस प्रशासनाला दिले.
         बैठकी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यावर निशचितपणे वाहतूक कोंडीचे कमी होईल व नागरिक होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.
         या वेळी आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे, पुणे मनपा पथ विभागाचे उपअभियंता अमर मतीकूंड, कनिष्ठ अभियंता तांबारे, KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिक, नानासाहेब नलवडे, माजी नगरसेविका मीनल सरवदे, सुहास टिंगरे, सोनसिंग सोना, आनंद सरवदे, अजय बल्लाल, राकेश म्हस्के व मनोज पाचपुते उपस्थित होते.

MLA Sunil Tingre | रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे

Categories
Breaking News PMC Political पुणे

रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे

अपूर्ण कामे व खड्डे लवकरात लवकर बुजविण्याच्या आमदारांच्या महापालिका प्रशासनास सूचना
नवीन पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासोबतच रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची दूरावस्था दूर करून
नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या तात्काळ सोडविण्याचा सूचना वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास केल्या.
लोहगाव परिसरातील विविध रस्त्यांच्या कामांची पाहणी, रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच पोरवाल रोड येथील रस्त्याच्या भूसंपादनाच्या कामाची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी सकाळी केली. यावेळी महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. या बाबत अधिक माहिती देताना सुनील टिंगरे यांनी सांगितले कि लोहगाव परिसरातील खंडोबा माळ, पठारे वस्ती व इतर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेल्या अधिकार्‍यांसोबत या परिसरातील कामांचे निरीक्षण करण्यात आले. अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या अधिकार्‍यांच्या पुढे मांडल्या.
पोरवाल परिसरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता नियम २०५ च्या अंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्यांसाठी २०० मीटरचे भूसंपादन बाकी आहे. ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सुनील टिंगरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. ऑर्चिड हॉस्पिटल शेजारील आर.पी. रोड शुरू करणे आवश्यक आहे, या रस्त्यामुळे पोरवाल रोडवरील ताण कमी होणार आहे. या आर.पी. रोडचे कार्य लवकर करण्यात यावे. पोरवाल रोड परिसरातील सर्व पर्यायी मार्ग वाहतूकीसाठी खुले करण्याचे निर्देश प्रशासनास यावेळी देण्यात आले.

लोहगाव परिसरात पाणी वितरणचे जाळे तयार करा

सुनील टिंगरे यांनी सांगितले कि महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतरही लोहगावातील पाणी समस्या दूर झालेली नाही. गावातील जुन्या पाइपलाइन काढून त्याजागी नवीन पाणी वितरणाचे जाळे पसरविणे आवश्यक आहे. या कामाकरिता ६० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. हे काम लवकर सुरू करण्याची सूचना प्रशासनास करण्यात आली. साठे वस्ती तसेच पोरवाल रोड परिसरातील नागरिकांना देखील पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. याकरिता ८ इंचाची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ग्रॅविटीने पाइपलाइन मधून पाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरासाठी पाइपलाइनला बूस्टर लावण्याचे काम १५ दिवसात केले जाणार आहे. पाणी पुरवठ्याची सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला.
 या वेळी पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, शाखा अभियंता अलुरकर, उप अभियंता अनवर मुल्ला, उप अभियंता मतीकूंड, कनिष्ठ अभियंता बुध्दप्रकाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता कोतवाल, एल.आर.डब्ल्यू.ए (लोहगाव रेसीडंट वेलफेर असोसिएशन) चे अध्यक्ष संदिप लोखंडे, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

– आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे |  शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून विकासकामे करता येणार आहेत. त्यानुसार एका सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त 50 लाखापर्यंतची विकासकामे करता येणार असून त्यामध्ये रस्ते, पेव्हिंग ब्लॉक़, सीसीटिव्ही कॅमेरे अशा कामांचा समावेश आहे.
          राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी सोसायट्यांमध्ये विकासकामे करण्यास परवानगी मिळावी यासाठी गेली वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापुर्वी आमदार निधीतून सहकारी सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येत नव्हती. त्यात अनेक सोसायट्यांमधील नागरि समस्या सोडविण्यास मर्यादा येत होती. या निर्णयाने मात्र सोसायटीधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या कामांसाठी काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत. त्यानुसार एका आमदाराला एका वर्षात अडीच कोटींची विकासकामे करता येणार आहेत. संबधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थेतंर्गत झालेली असणे बंधनकारक आहे. तसेच या सोसायटीला महापालिकेची मंजुरी असणे म्हणजेच भोगवटापत्र असणे आवश्यक आहे.

सोसायट्यांमध्ये करता येणारी विकासकामे

– रस्त्यांचे डांबरीकरण करणे
– सिस्थेटिंक रस्ते विकसीत करणे
– सोसायट्यांतील रस्त्यांवर पेव्हिंग बसविणे
– जॉगिग ट्रॅक विकसीत करणे
– व्यायाम शाळा अथवा छोटे मैदान करणे
– छोटे उद्यान आणि ट्रि गार्डन करणे
– सीसीटिव्ही कॅमेरे आणि अग्निशमन यंत्रणा बसविणे
– इलेट्रिक व्हेईकल चार्जींग स्टेशन उभारणे
– सोलर सिस्टीम यंत्रणा बसविणे
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे
– कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे
– रेन हार्विस्टिंग प्रकल्प उभारणे
——————————
शहरी भागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये काही हजार नागरिक असतात. त्यात विकासकामे करण्यास परवानगी नव्हती. प्रामुख्याने सोसायट्यांतील रहिवाशांना फ्लॅटचे हप्ते, मिळकतकर, मेंटेन्स याचा खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याने सोसायट्यातील अंतर्गत विकासकामे करण्यास अडचण येत होती. आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे.
             सुनिल टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

Sunil Tingre : Pune : आमदार सुनील टिंगरे यांचा दावा : शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकीं सर्वाधिक विशेष निधी मी मिळविला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

वडगाव शेरी मतदारसंघासाठी 50 कोटींचा विकास निधी

– आमदार सुनिल टिंगरे यांचा दावा

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मी राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 50 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या मधील अनेक विकासकामांना सुरवात झाली असून काही कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकीं सर्वाधिक विशेष निधी मी  मिळविला आहे. असा दावा आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुण्यात आघाडी सरकारचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे. या मध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून 20 कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यात 17 कोटींचा निधी हा रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांसाठी तर 3 कोटींचा निधी विद्युत  कामांसाठी मिळाला आहे. तर जिल्हा वार्षीक योजनेच्या माध्यमातून चालू आणि गत आर्थिक वर्षातील अशी एकूण 7 कोटी 72 लाखांची कामे मंजूर झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदारसंघात मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या तीन गावांसाठी 1 कोटीचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणा योजनेंतर्गत 1 कोटींचा निधी मिळाला आहे.
या शिवाय नाबार्ड योजनेंतर्गत लोहगाव – वडगाव शिंदे पूल बांधण्यासाठी दीड कोटी, लोहगाव-वाघोली रस्त्यासाठी  साडेचार कोटी, मांजरी- कोलवडी रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख , प्रमुख जिल्हा मार्ग योजनेंतर्गत हडपसर – मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी आणि राष्ट्रीय मार्ग योजनेंतर्गत मुंढवा- केशवंनगर – कोलवयांचा डी रस्त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

सर्वाधिक निधी लोहगावला

लोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी या गावांसाठी पुरेसा निधी महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी 7 कोटींचा सर्वाधिक निधी लोहगावला दिला आहे. तर मांजरी खुर्दला 4 कोटी 75 लाख, निरगुडी गावाला 2 कोटी 25 लाख आणि वडगाव शिंदे 2 कोटी 68 लाख इतका निधी विविध विकासकांमासाठी दिला असून उर्वरित 35 हुन अधिक कोटींचा निधी वडगाव शेरीतील मतदारसंघातील पालिका हद्दीतील कामांसाठी दिला आहे.