Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

 

कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सह माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

– आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे |  शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून विकासकामे करता येणार आहेत. त्यानुसार एका सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त 50 लाखापर्यंतची विकासकामे करता येणार असून त्यामध्ये रस्ते, पेव्हिंग ब्लॉक़, सीसीटिव्ही कॅमेरे अशा कामांचा समावेश आहे.
          राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी सोसायट्यांमध्ये विकासकामे करण्यास परवानगी मिळावी यासाठी गेली वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापुर्वी आमदार निधीतून सहकारी सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येत नव्हती. त्यात अनेक सोसायट्यांमधील नागरि समस्या सोडविण्यास मर्यादा येत होती. या निर्णयाने मात्र सोसायटीधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या कामांसाठी काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत. त्यानुसार एका आमदाराला एका वर्षात अडीच कोटींची विकासकामे करता येणार आहेत. संबधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थेतंर्गत झालेली असणे बंधनकारक आहे. तसेच या सोसायटीला महापालिकेची मंजुरी असणे म्हणजेच भोगवटापत्र असणे आवश्यक आहे.

सोसायट्यांमध्ये करता येणारी विकासकामे

– रस्त्यांचे डांबरीकरण करणे
– सिस्थेटिंक रस्ते विकसीत करणे
– सोसायट्यांतील रस्त्यांवर पेव्हिंग बसविणे
– जॉगिग ट्रॅक विकसीत करणे
– व्यायाम शाळा अथवा छोटे मैदान करणे
– छोटे उद्यान आणि ट्रि गार्डन करणे
– सीसीटिव्ही कॅमेरे आणि अग्निशमन यंत्रणा बसविणे
– इलेट्रिक व्हेईकल चार्जींग स्टेशन उभारणे
– सोलर सिस्टीम यंत्रणा बसविणे
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे
– कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे
– रेन हार्विस्टिंग प्रकल्प उभारणे
——————————
शहरी भागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये काही हजार नागरिक असतात. त्यात विकासकामे करण्यास परवानगी नव्हती. प्रामुख्याने सोसायट्यांतील रहिवाशांना फ्लॅटचे हप्ते, मिळकतकर, मेंटेन्स याचा खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याने सोसायट्यातील अंतर्गत विकासकामे करण्यास अडचण येत होती. आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे.
             सुनिल टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

Vaccination : PMC : आता थेट सोसायट्यांमध्येच लसीकरण : मुरलीधर मोहोळ

Categories
PMC आरोग्य पुणे

आता थेट सोसायट्यांमध्येच लसीकरण : मुरलीधर मोहोळ

– संपर्क साधून थेट सोसायटीतच लसीकरण टीम बोलवता येणार

– महानगरपालिकेची विशेष लसीकरण मोहीम

पुणे : ‘पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण वेगाने तर होत आहेच मात्र राहिलेल्या नागरिकांनाही लवकर लस देणे आवश्यक असून त्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरणाची विशेष मोहिम पुणे महानगरपालिका राबवत आहोत. या मोहिमेंतर्गत थेट सोसायट्यांमध्येच महापालिकेची लसीकरण टीम बोलवता येणार आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

लसीकरणाच्या या विशेष मोहिमेंतर्गत क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध करण्यात आले असून आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर थेट टीम सोसायटीमध्ये दाखल होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘ज्या गृहसंस्था, सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी’

पुणे मनपा हद्दीत विक्रमी लसीकरण झालेले असून असे असले तरी या लसीकरणाला आणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे. आजवर लसीकरणाबाबतीत महापालिकेने राबवलेल्या सर्वच विशेष मोहीमा यशस्वी झालेल्या आहेत. या मोहिमेलाही पुणेकर प्रतिसाद देतील, हा विश्वास वाटतो’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी

१. येरवडा-कळस-धानोरी
डॉ .माया लोहार
९६८९९३१९६६

२. ढोले पाटील रोड
डॉ. सुजाता माने
९०११०४९०१०

३. नगररोड-वडगावशेरी
डॉ. विजय बडे
९८८१३९८०४८

४ शिवाजीनगर-घोलेरोड
डॉ. मृणाल कोलते
९३२६०५०३४४

५ औंध-बाणेर
डॉ. गणेश दामले
७५८८१७०९९८

६ कोथरूड-बावधन
डॉ. टिळेकर अंजली
७३५००२००१०

७ वारजे-कर्वेनगर
डॉ. अरुणा तरडे
९८२३५१४६४४

८ सिंहगड रोड
डॉ. काकडे आसाराम
९७६२५०५४००

९ धनकवडी-सहकारनगर
डॉ. संदीप परदेशी
९४२३९११५६२

१० वानवडी-रामटेकडी
डॉ. मनीषा सुलाखे ९७६४५६९४४७

११ हडपसर-मुंढवा
डॉ. स्नेहल काळे
९९७०९४२८७८

१२ कोंढवा-येवलेवाडी
डॉ. मदन बिरादार
९६८९९३१७२४

१३ भवानी
डॉ. सारंग केळकर ९८९०६०९४३२

१४ बिबवेवाडी
डॉ अमित उदावत ९४०५६९९५६०

१५ कसबा विश्रामबागवाडा
डॉ. गोपाल उज्ज्वनकर ८४२१९४८४९५