Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Pune Rain | पुणे – पुण्यात काल उत्साहामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion Rally) सुरू असताना सायंकाळच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला. दरम्यान यावर महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी (PMC Commissioner and Additional Commissioner) याचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

आयुक्त विक्रमकुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घ्यावी लागली.आज दुपारी चार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सुस, बावधन या भागात प्रचंड मोठा पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौक, वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत चेंबर मधील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला.अशी स्थिती सुस बावधन मध्ये देखील निर्माण झाली होती. (Pune Rain News)
——

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Categories
Breaking News cultural social पुणे

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील (Kothrud) नवजवान मित्र मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात (Ganesh Utsav 2023) ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा (Decorations) साकारला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक चांगली गर्दी करत आहेत. शिवाय मंडळाला गणेश उत्सव स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. देखाव्याची संकल्पना ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीच आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni) यांनी दिली.
मंडळाने यावर्षी ३८व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक सामाजिक, लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, शिवजयंती, दहीहंडी, श्री कृष्ण जन्म, गडभ्रमंती, सार्वजनिक होळी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच दुष्काळ , पूरग्रस्त भागातील लोकांना मदत असे सातत्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवित असते. नम्रपणे वर्गणी मागत आणि मिळेल त्या ऐच्छिक वर्गणीतून मंडळ वर्षभरातील कार्यक्रम साजरे करते. (Pune Ganesh Utsav 2023)
त्याचीच दखल घेत लोकमत समूह व रिलायन्स ट्रेंड्स कडून घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला पुण्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पश्चिम विभागात मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (Pune Ganesh Utsav Decorations)
——
News Title | Navjawan Mitra Mandal Decoration | A moving scene of the killing of Jwalasura by Navjawan Mitra Mandal in Kothrud!

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Warje DP Road | PMC Pune |  पुणे : महामार्गावरून (Highway) वारजे कर्वेनगर कोथरूड (Warje, Karvenagar, Kothrud) परिसरात येण्यासाठी पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या चोवीस मीटर रुंद  डीपी रस्त्याचे (DP Road) काम त्वरित व्हावे यासाठी आज महापालिकेत (Pune Municipal Corporation) महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे या संदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ (Pradeep Baba Dhumal) यांनी पुढाकार घेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या समवेत बांधकाम विभाग, पथ विभाग, भूमी जिंदगी व भूसंपादन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर सदर बाधित जागा मालकांना घेवून बैठक घेतली. पाच ते सहा बाधित जागा मालक यावेळी उपस्थित होते. यामध्ये काहींची घरे जात आहेत तर काहींच्या जागा बाधित होत आहेत. (PMC Pune News)
जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करावा यावर अधिकारी, जागा मालक व बाबा धुमाळ यांच्यात चर्चा झाली. या जागा मालकांना योग्य तो मोबदला लवकर दिला जाईल अशी सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता व्हावा यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर दरम्यान काही टप्प्यातील काम ही झाले आहे. ज्या बाधित जागा येत आहेत त्या जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यास या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामर्गवरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी हा रस्ता तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
—-
News Title | Warje DP Road | PMC Pune | Important meeting in Pune Municipal Corporation regarding alternative road to come to Warje, Karvenagar, Kothrud area

New parliament Building | नवीन संसद इमारत ही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभे राहिलेले मंदिर

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे

New parliament Building | नवीन संसद इमारत ही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभे राहिलेले मंदिर

| विनायक देशपांडे यांची भावना

New Parliament Building | नवी दिल्लीत (New Delhi) उभी राहिलेली नवीन संसद इमारत (New parliament Building) ही स्वतंत्र भारताने स्व:तासाठी उभारलेली पहिली संसद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister narendra Modi) यांच्या प्रेरणेतून आणि हजारो मजुरांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून लोकशाहीचे हे नवे मंदिर उभे राहिले. ही अप्रतिम देखणी वास्तू भावी पिढ्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा व आत्मविश्वास देईल, असे मत नव्या संसद भवन प्रकल्पाचे मुख्य सल्लागार विनायक देशपांडे (Vinayak Deshpande) यांनी रविवारी व्यक्त केले. (New Parliament Building)
स्मार्ट पुणे फाउंडेशनतर्फे (Smart Pune Foundation) पुण्यातील कोथरूडचे (Kothrud Pune) सुपुत्र असलेल्या देशपांडे यांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrkant patil) यांनीही देशपांडे यांचा सत्कार केला. स्मार्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला (Dr Sandip Butala) यांनी प्रास्तविक केले. उत्तरार्धात प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा जाणून घेतली.
नवी संसद  ही केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील मेरूमणी आहे. टाटा प्रोजेक्ट्सकडे हे काम आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच याकडे पाहिले. भूमीपूजनावेळी पंतप्रधान मोदींच्या मनातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेची सर्वांना जाणीव झाली. तीच भावना सर्वांच्या मनात उतरली. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेल्या मजुरांपासून ते प्रकल्पात विविध टप्प्यांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केले. त्यामुळेच करोना व लॉकडाउनसारख्या आव्हानात्मक काळातही २८ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाले, असे देशपांडे म्हणाले.  या काळातील आव्हाने, रात्रंदिवस केलेले काम, कामाचे व्यवस्थापन याचे बारकावेही देशपांडे यांनी उलगडले. (New parliament building news)
या नव्या इमारतीत भारतीय संस्कृती, भारतीय स्थापत्यकला आणि अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे. विमल पटेल यांनी त्याचे आरेखन केले. तर सांस्कृतिक मंत्रालयाने कुठे काय असावे, याचे नियोजन केले. यासाठीच्या विविध वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यातून आणण्यात आल्या. याशिवाय विविध राज्यातील कलाकारांनी त्याची कलाकुसर केली. त्यामुळे या वास्तूला राष्ट्रीय एकात्मकेचे प्रतीक म्हणता येईल. ही इमारत पर्यावरण पूरक, शाश्वत, भूकंपरोधी असून भविष्याचा विचार करून यात अधिक आसनक्षमता ठेवण्यात आली आहे. लोकसभेची रचना राष्ट्रीय पक्षी मोराप्रमाणे, राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे आहे. बांधकाम सुरू असताना तीन वेळा पंतप्रधानांनी अचानक प्रकल्पस्थळी येऊन कामगारांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांना काही अडचण नाही ना, त्यांना या प्रकल्पाविषयी काय वाटते हे जाणून घेतले. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाली. टाटा समूहाने दिलेला संपूर्ण पाठिंबा व देशभावनेतून कामाकडे पाहण्याची शिकवण महत्त्वाची ठरली. या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी मला मिळाली, हे मी माझे परमभाग्यच समजतो, असे देशपांडे म्हणाले.
स्वतंत्र भारतासाठी नवी संसद उभारण्याची अनेकदा चर्चा झाली. पण फक्त नरेंद्र मोदीच आपल्या संकल्पनेतून ती साकार करू शकले. पुणेकर देशपांडे यांच्या नेतृत्वात आकाराला आलेली ही भव्यदिव्य इमारत अतिशय सुबक, देखणी आणि थक्क करणारी आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी दिल्ली ही जगातील सर्वात आकर्षक सुबक राजधानी ठरेल असे खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. अजित वाराणशीवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
——-
News Title | New Parliament Building |  The new Parliament building is a temple of patriotism |  Sentiments expressed by Vinayak Deshpande

Pune Municipal Corporation |  पद्मश्री ग.दि.माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ | वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश 

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Pune Municipal Corporation |  पद्मश्री ग.दि.माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ | वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Pune Municipal corporation | पुणे महानगरपालिकेतर्फे (PMC pune) कोथरूड (Kothrud) येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक (G D Madgulkar Memorial) कामाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या हस्ते करण्यात आला. (pune municipal corporation)

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर (BJP MLA Bhimrao Tapkir), मनपा आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional commissioner Vikas Dhakane), सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, गीतरामायणामुळे (Geet Ramayan) समाजाला रामायण (Ramayan) सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक (Gadima Memorial) केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील. महापालिकेने (PMC Pune) स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. (G D Madgulkar Memorial Kothrud)

आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाचे स्मरण होणे आणि पुढील पिढीला यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. (PMC Pune News)

सुमित्र माडगूळकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ग.दि.माडगूळकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. गदिमांच्या स्मारकाच्या माध्यमातून मराठी भाषेतील त्यांचे लेखनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन, चित्रपट दालन, साहित्य दालन, डिजिटल दालन, कॅफेटेरिया आदी विविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


News Title | Pune Municipal Corporation | Commencement of Padmashri G.D. Madgulkar memorial work Guardian Minister’s order to complete the memorial work within a year

Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील 

Categories
Breaking News cultural Political पुणे

Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील

| थेट भेटच्या माध्यमातून बाणेरमधील नागरिकांशी संवाद

Kothrud Constituency | कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील (Minister chandrakant patil) यांनी आज दिली. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी (Theatre in Baner) सर्वतोपरी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी आश्वास्त केले. (Kothrud constituency)

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Minister Chandrakant patil)

नामदार पाटील म्हणाले की, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे इथला प्रत्येक भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केल्यानंतरही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे एकूण ७८ ठिकाणे निदर्शनास आली असून, सदर भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन केल्यानंतर ही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे लोकसहभागातून ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून सदर भागातील कचरा संकलित केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Kothrud constituency)

ते पुढे म्हणाले की, बाणेर मधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसोबत सततच्या पाठपुराव्यामुळे समान पाणीपुरवठा योजने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे बाणेरमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. (Theatre in Baner)

दरम्यान, यावेळी नागरिकांनी बाणेरमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह उभारावे, भागात ठिकठिकाणी टाकलेला राडारोडा, मुरकुटे गार्डन येथे मोठे विश्रांतीस्थान, अवैध फेरीवाले यामुळे होणारा त्रास, स्वच्छता गृहे आदी समस्या मांडल्या. सदर समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल, असे यावेळी आश्वास्त केले. तसेच यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

 

कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सह माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

CSR | Sanitation | कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्या | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्यावी

|  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला

| नालेसफाईच्या कामाची प्रभागात जाऊन करणार पाहणी

पुणे | शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिकेत पालकमंत्री श्री. पाटील यांनी महानगरपालिकेच्या परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्यासह परिमंडळ कार्यालयांचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,  महानगरपालिकेला शासनाच्या निधीतून तसेच स्वत:च्या उत्पन्नातून विविध स्वरुपाची कामे हाती घ्यावी लागतात. सीएसआरच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ज्याप्रमाणे गटारची झाकणे, स्वच्छताविषयक कामे राबविण्यात येत आहेत त्याप्रमाणे पूर्ण शहरातही सीएसआरची मदत घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन मोठ्या कामांसाठी महानगरपालिकेला शासनाचा आणि स्वत:चा निधी वापरता येऊ शकेल. नगरविकास विभागाकडून प्रभागाला दरवर्षी २ वेळा १० कोटी रुपये निधी मिळतो. त्यातून छोटी छोटी परंतु नागरिकांच्या गरजेची कामे करता येतील.
नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासकामांचे नियोजन याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे दरमहा अशी बैठक घेण्यात येईल. शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्याअनुषंगाने शहरात सुरू असलेल्या विकासकामांची, रस्ते, नालेसफाई आदी कामांची दर आठवड्याला ३ प्रभागात जाऊन स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 महापालिकेने प्राधान्याने रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यावर काम करावे लागेल. शहरातील अतिक्रमणे, टेकड्यांवरील अतिक्रमणे, अवैध फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई करावी. विद्रुपीकरण टाळण्यासाठी फ्लेक्सविरोधी कारवाई करावी. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशाही सूचना श्री.पाटील यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी रिक्त पदांचाही आढावा घेतला. पुरेशा मनुष्यबळासाठी नियमाप्रमाणे पदोन्नती तसेच पदभरतीची प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील नालेसफाईच्या कामाची माहिती दिली. नालेसफाईचे काम सुरू केलेले आहे. तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज स्वच्छतेच्या कामासही सुरूवात केली आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाणी साचणारी ३३८ ठिकाणे होती. तेथे आवश्यक उपाययोजना केल्यामुळे पाणी साचण्याचे बंद झाले असून अजून २३ ठिकाणे शिल्लक आहेत. आंबील ओढा येथे उपाययोजना केल्यामुळे पावसाचे पाणी आता साठत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी परिमंडळांचे उप आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्तांशी संवाद साधून आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या.

Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! | कोथरुडकरांचा निर्धार

| भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले होते. या गौरव यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आशा भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.


पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Kothrud Traffic | कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटणार! | सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर

Categories
Breaking News Political social पुणे

कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटणार!

| सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोडला मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा रस्ता लवकरच तयार होऊन कोथरूडकरांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. (Kothrud Traffic)

कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून समोर आले होते‌. त्यातील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सदर रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. या मार्गावरील बहुतांश जागा ही किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्याने, जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता. (Guardian Minister Chandrakant Patil)

हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष प्रयत्न सुरू होते.अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास मंजूरी मिळाली आहे. सदर रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन २० मीटर होणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जुलै २०२३ पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.