Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Categories
Breaking News cultural social पुणे

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील (Kothrud) नवजवान मित्र मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात (Ganesh Utsav 2023) ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा (Decorations) साकारला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक चांगली गर्दी करत आहेत. शिवाय मंडळाला गणेश उत्सव स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. देखाव्याची संकल्पना ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीच आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni) यांनी दिली.
मंडळाने यावर्षी ३८व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक सामाजिक, लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, शिवजयंती, दहीहंडी, श्री कृष्ण जन्म, गडभ्रमंती, सार्वजनिक होळी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच दुष्काळ , पूरग्रस्त भागातील लोकांना मदत असे सातत्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवित असते. नम्रपणे वर्गणी मागत आणि मिळेल त्या ऐच्छिक वर्गणीतून मंडळ वर्षभरातील कार्यक्रम साजरे करते. (Pune Ganesh Utsav 2023)
त्याचीच दखल घेत लोकमत समूह व रिलायन्स ट्रेंड्स कडून घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला पुण्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पश्चिम विभागात मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (Pune Ganesh Utsav Decorations)
——
News Title | Navjawan Mitra Mandal Decoration | A moving scene of the killing of Jwalasura by Navjawan Mitra Mandal in Kothrud!

PMC Sevakvarg Ganesh Utsav Samiti | पुणे महापालिका सेवकवर्गाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते संपन्न

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

PMC Sevakvarg Ganesh Utsav Samiti | पुणे महापालिका सेवकवर्गाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते संपन्न

PMC Sevakvarg Ganesh Utsav Samiti | पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती, महात्मा फुले मंडई च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional commissioner Vikas Dhakane) यांच्या हस्ते करण्यात आली.

पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.  सकाळी श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना आणि महा आरती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी मानाच्या 5 गणपती नंतर सेवकवर्ग चा गणपती निघतो. हा मान महापालिका सेवकांनी टिकवून ठेवला आहे. (Pune Ganesh Utsav 2023)

—-

Nehru Tarun Mandal Trust | नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते संपन्न

Categories
Breaking News cultural social पुणे

Nehru Tarun Mandal Trust | नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते संपन्न

Nehru Tarun Mandal Trust | पुणे |  तपकीर गल्ली बुधवार पेठेतील नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट (Nehru Tarun Mandal Trust) च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत (Shrigauri Sawant) यांच्या हस्ते संपन्न झाली
यावेळी बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की लोकमान्यांनी ज्या उद्देशाने हे उत्सव चालू केले तो उद्देश नेहरू तरुण मंडळ सत्यात उतरवत आहे याचा मनस्वी आनंद होतोय मंडळाने अशी प्रगती करत राहो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली एका तृतीयपंथी व्यक्तीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणे ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच घटना आहे असे त्यांनी नमूद केले
यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक मोडक ,नितीन राऊत अविनाश वाडकर शेखर बेहेरे निलेश राऊत पुष्कर तुळजापूरकर (Pushkar Tuljapurkar) हे उपस्थित होते.

PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

Categories
Breaking News cultural social पुणे

PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

PMPML Pune | Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई,सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरीकांचे सोयीकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये 20 व 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर रोजी 168 बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजेनुसार 22, 26 आणि 28 सप्टेंबर या कालावधीत 654 जादा बसेसचे गणेशोत्सवाकरीता नियोजन करण्यात आलेले आहे. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)

नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10.00 नंतर बंद राहणार असून रात्री 10.00 नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
  • रात्री 10.00 नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये 5 रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल.
  • गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांना रात्री 12.00 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)
  • गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.

गणेशोत्सव कालावधीत खालील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत रात्री गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.

  1. स्वारगेट बस स्थानक – कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
  2. नटराज हॉटेल / सिंहगड रोड – वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
  3. स्वारगेट डेपो बस स्थानक- हडपसर, कोंढवा हॉस्पीटल.
  4. महात्मा गांधी बस स्थानक – कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
  5. हडपसर गाडीतळ बस स्थानक – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरूळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी.
  6. मोलेदिना हॉल / ससून रोड बस स्थानक – विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
  7. डेंगळेपुल बस स्थानक – लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर.
  8. म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक व पेट्रोल पंप – भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देवगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
  9. काँग्रेस भवन बस स्थानक -कर्वेनगर, माळवाडी, एनडीए 10 नं. गेट, कोथरूड डेपो.
  10. डेक्कन जिमखाना / संभाजी पूल कॉर्नर – कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
  11. कात्रज बस स्थानक – स्वारगेट करीता.
  12. म.न.पा. पंप बस स्थानक – बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करीता.
  13. अप्पर डेपो बस स्थानक – स्वारगेट करीता.
  14. धनकवडी बस स्थानक – स्वारगेट करीता.
  15. निगडी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  16. भोसरी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  17. चिंचवडगांव बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  18. पिंपरी मेट्रो स्टेशन – चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली.

दि. 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक हा बंद होत असल्याने स्वारगेट चौकातील बस थांबे खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले आहेत.

मूळ बसस्थानाचे नाव – मार्ग – तात्पुरते बसेस सुटण्याचे ठिकाण

  1. शाहु महाराज स्थानक (स्वारगेट) – सातारा रोडने कात्रज , मार्केटयार्ड करीता लक्ष्मी नारायण चौक
  2. नटराज बस स्थानक – सिंहगड रोडकडे जाणे करिता – पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांबा
  3. स्वारगेट स्थानका बाहेर – सोलापूर रोडने पुलगेट, हडपसर करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
  4. स्वारगेट स्थानका बाहेर – भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)

रात्री 2.00 वाजेपर्यंतच जादा बसेसचे संचलन सुरु राहील.

दि.22 ते 28 सप्टेंबर पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी अशा रात्री (यात्रेकरिता) जादा बसेस सोडण्यात येतील.

गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळक रोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

Pune Ganesh Utsav | पुणे शहरातील या वर्षीचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर चे कालावधीत साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने गणेशमंडळांनी व नागरिकांनी यावर्षीचे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा कसा करावा, याबाबत पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) नियमावली जाहीर करण्यात आली आहे.   या सूचनांचे व अटी शर्तीचे पालन करणेबाबत सर्व संबंधितांना पुणे महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन” करण्यात आले आहे. (Pune Ganesh Utsav)
 मागील वर्षांपासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीकरिता सन २०१९ चे सालामध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादींच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशा परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
पुणे शहरात ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करावयाचा असेल अथवा पूर्वीच्या सन २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल करणे आवश्यक असल्यास नवीन जागेवरील सर्व परवानग्या सन २०१९ सालच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित क्षेत्रिय कार्यालय व पोलीस स्टेशन या कार्यालयामार्फत नव्याने आवश्यक ते सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील. या परवानग्यांना पुणे मनपामार्फत कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही.
सर्व गणेश मंडळांनी सन २०१९ सालच्या अथवा नव्याने घेतलेल्या सर्व परवान्यांच्या प्रती मंडप/कमानीच्या दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंगमध्ये सहजपणे दिसतील अशा ठिकाणी लावाव्यात.
उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा नसावी. ४० फुटापेक्षा जास्तीचा उत्सव मंडप उभारायाचा असल्यास त्याकामी मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील.
 मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या उदा. अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बसेस इ. रहदारीकरिता लगतचे रस्ते मोकळे ठेवणे तसेच कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटापेक्षा जास्त राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार स्वयंसेवक / सुरक्षारक्षक नेमावेत.
स्थापना करण्यात येणाच्या गणेशमूर्ती ह्या प्राधान्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच वापराव्यात. संस्था/संघटना / मंडळे अथवा वैयक्तिक नागरिक यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना योगदान देऊन यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा.
• शहरातील गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग, पुणे शहर तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळविण्यात आलेल्या सूचना/नियम अथवा आदेश यांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहील.
उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी ३ दिवसांचे आत स्वखचनि सदरचे मंडप/स्टेज कमान / रनिंग मंडप/तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मुर्ती व अन्य साहित्य रस्त्यांवरून ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रेटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहील.
परवाना दिलेल्या जागेची पुणे महानगरपालिकेस जरूरी भासल्यास अथवा त्या जागेबाबतचा वाद /विवाद निर्माण झाल्यास देण्यात आलेला अधिकृत मंडप कमान / परवाना, उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा मनपास हक्क राहील.
उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये दिलेल्या सर्व आदेशांचे व त्या अनुषंगाने शासनाने परिपत्रकाद्वारे कळविलेल्या सर्वं सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करणे बंधनकारक राहील.
स्थानिक रहिवाश्यांना / पदपथांवरील पादचाऱ्यांना/ वाहनांना अडथळा होणार नाही, ध्वनीप्रदुषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी.
उत्सव कालावधीत नागरिकांना तक्रारी करणेकरिता खालील माध्यमाद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा पुणे महानगरपालिकेतर्फे उपलब्ध केली आहे.
संकेतस्थळ :- http://complaint.punecorporation.org टोल फ्री नंबर 1800 103 0222 सर्व महा. सहा. आयुक्त कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल अँप PUNE Connect (PMC Care), Whatsapp NO – 9689900002, मुख्य अतिक्रमण कार्यालय संपर्क क्र.: ०२०-२५५०१३९८ ई-मेल-feedback@punecorporation.org, encroachment1@punecorporation.org • वरील माध्यमाद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निराकरण सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावर तसेच सर्व स्थानिक पोलीस स्टेशनवर करण्यात येईल.
सण / उत्सवांचे कालावधीत कोणत्याही अडचणींबाबत गणेश मंडळ/ नागरीकांनी संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयांशी संपर्क साधावा. यावर्षी देखील गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मागील वर्षाप्रमाणेच सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मनपा मोकळ्या जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी परवानगी देणेची कार्यवाही मनपाच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत देखील पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या हंगामी व्यवसाय धारकांना सोडत पद्धतीने काही अटी/शर्तीवर ठराविक ठिकाणच्या जागा गाळे आधून व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे

Ganesh Utsav 2023 |पुणे  महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) गणेश उत्सव २०२३ (Ganesh Utsav 2023) ची तयारी सुरु करण्यात आली आहे.  प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी असल्याने पीओपी (POP) गणेश मूर्ती (Ganesh Idol) खरेदी करू नये. तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन (Environment Conservation) करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी १२ मे २०२० रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी  मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. महापालिका अतिररिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (PMC Additional Commissioner Dr Kumar Khemnar) यांच्याकडून सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव- २०२३ साजरा करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. (Ganesh Utsav 2023)

१) केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे कि, पारंपारिक शाडू माती / चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.  [ कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर होणार नाही.]

२) मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.

३) मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा

[ विषारी आणि नॉन बायो डीग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग / ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे.

४) नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.

[ विषारी रसायने असलेली डिसपोजेबल साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.]

 

सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

———-

News Title | Ganesh Utsav 2023 | Preparations for Ganesh Utsav have started from Pune Municipal Corporation Guidelines for Environmental Ganesh Utsav