Pune Metro Passenger | अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Metro Passenger | अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

आगामी काळात ही मेट्रोला प्राधान्य देण्याचे चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 

Pune Metro Passenger |पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil )यांनी अनंत चतुर्दशीसाठी (Anant Chaturdashi) केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून; गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी एक लाख ६३ हजार पुणेकरांनी मेट्रोने (Pune Metro Service) प्रवास केला. आगामी काळात सण उत्सवाच्या काळात ही पुणेकरांनी वाहतूककोंडीत न अडकता; मेट्रोला प्राधान्य देण्याचे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे. (Pune Metro Passenger)

पुणे शहराला गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav) वेगळी परंपरा आहे. अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion pune) पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह आसपासचे नागरिक पुण्यात येत असतात. परिणामी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येऊ अनेक भागात पुणेकरांना वाहतुककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही संभाव्य वाहतूककोंडी होऊ नये; यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करण्याचा संकल्प केला होता. तसेच, पुणेकरांनीही मेट्रोनेच प्रवास करण्याचे आवाहन केले होते.

नामदार पाटील यांनी संकल्पाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यासाठी वनाझ ते पुणे महापालिका मेट्रोने प्रवास केला. या प्रवासावेळी नामदार पाटील यांनी अनेक मेट्रो प्रवाशांशी अनौपचारिक संवाद ही साधला. यावेळी पुणेकरांनीही मेट्रोचे भरभरून कौतुक केले होते. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या आवाहनानुसार विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरात जाणाऱ्या नागरिकांनी मेट्रोनेच प्रवास करणे पसंत केले. जवळपास एक लाख ६३ हजार पुणेकरांनी गुरुवारी मेट्रोने प्रवास केला.

पुणेकरांच्या या नव्या विक्रमाबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व पुणेकरांसह महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जनसंपर्क अधिकारी आणि प्रशासन हेमंत सोनावणे सर्वांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत. तसेच, आगामी काळात नवरात्री, दिवाळी यांसारखे अनेक सण होणार आहेत. त्यामुळे या काळात ही खरेदीसाठी बाहेर पडताना मेट्रोला प्राधान्य द्यावे, असे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.


News Title | Pune Metro Passenger | On Anant Chaturdashi, more than one and a half lakh Pune residents travel by metro Chandrakantada Patil’s appeal to give priority to Metro in the future

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Categories
Breaking News cultural social पुणे

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!

Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील (Kothrud) नवजवान मित्र मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात (Ganesh Utsav 2023) ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा (Decorations) साकारला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक चांगली गर्दी करत आहेत. शिवाय मंडळाला गणेश उत्सव स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. देखाव्याची संकल्पना ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीच आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni) यांनी दिली.
मंडळाने यावर्षी ३८व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक सामाजिक, लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, शिवजयंती, दहीहंडी, श्री कृष्ण जन्म, गडभ्रमंती, सार्वजनिक होळी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच दुष्काळ , पूरग्रस्त भागातील लोकांना मदत असे सातत्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवित असते. नम्रपणे वर्गणी मागत आणि मिळेल त्या ऐच्छिक वर्गणीतून मंडळ वर्षभरातील कार्यक्रम साजरे करते. (Pune Ganesh Utsav 2023)
त्याचीच दखल घेत लोकमत समूह व रिलायन्स ट्रेंड्स कडून घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला पुण्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पश्चिम विभागात मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (Pune Ganesh Utsav Decorations)
——
News Title | Navjawan Mitra Mandal Decoration | A moving scene of the killing of Jwalasura by Navjawan Mitra Mandal in Kothrud!

Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | गणेश उत्सव काळात देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था | जाणून घ्या ठिकाणे

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | गणेश उत्सव काळात देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था | जाणून घ्या ठिकाणे

 

Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी शहरातील तसेच शहराबाहेरील नागरीक मोठ्या प्रमाणात येत असतात. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा तसेच नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत पार्क करता यावी यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली असून रस्त्यांच्या आजूबाजूला वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

पार्किंग व्यवस्था 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर (गणेश विसर्जन) दरम्यान असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत रोषणाई व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तसेच विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

वाहनांसाठी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था कंसात वाहनाचा प्रकार

  1. न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग (दुचाकी)
  2. शिवाजी आखाडा वाहनतळ (दुचाकी/चारचाकी)
  3. देसाई कॉलेज (पोलीस पार्किंग)
  4. हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ (दुचाकी/चारचाकी)
  5. गोगटे प्रशाला (दुचाकी)
  6. एसपी कॉलेज (दुचाकी)
  7. नदीपात्रालगत (दुचाकी/चारचाकी)
  8. शिवाजी मराठा शाळा (दुचाकी)
  9. नातुबाग (दुचाकी)
  10. पीएमपीएमएल मैदान पुरम चौकाजवळ (चारचाकी)
  11. पेशवे पार्क सारसबाग (दुचाकी)
  12. हरजीवन हॉस्पिटल समोर सावरकर चौक (दुचाकी)
  13. पाटील प्लाझा पार्किंग (दुचाकी)
  14. मित्रमंडळ सभागृह (दुचाकी)
  15. पर्वती ते दांडेकर पुल (दुचाकी)
  16. दांडेकर पुल ते गणेश मळा (दुचाकी)
  17. गणेश मळा ते राजाराम पुल (दुचाकी)
  18. निलायम टॉकीज (दुचाकी/चारचाकी)
  19. विमलाबाई गरवारे हायस्कुल (दुचाकी)
  20. आबासाहेब गरवारे कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
  21. संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान (दुचाकी/चारचाकी)
  22. आपटे प्रशाला (दुचाकी)
  23. फर्ग्युसन कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
  24. जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान (दुचाकी/चारचाकी)
  25. मराठवाडा कॉलेज (दुचाकी)
  26. एसएसपीएमएस कॉलेज (दुचाकी)

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठक

Pune Ganesh Utsav | राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी (Ganesh Mandal)  दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा (Pune Metro Service) रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर (Ganesh idol Height) शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे. (Pune Ganesh Utsav)
उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. (Pune News)
धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रितरित्या विसर्जन मिरवणूक काढण्याचा सुरू केलेला उपक्रम अनुकरणीय असून इतरही मंडळांनी तसा प्रयत्न करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यावरील उघडे चेंबर्स बंद करण्याची कारवाई त्वरित करावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामही उत्सवापूर्वी करण्यात यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागातील मार्गावर असलेली एकतर्फी वाहतूक शक्य असल्यास दुतर्फा सुरू करण्यात यावी. मानाच्या गणपतींसोबत इतरही मंडळांसोबतही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. (Ganesh Utsav Meeting)
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात.  प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले,  गणेशोत्सवासाठी वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी  घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री.चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.
आयुक्त विक्रमकुमार यांनी गणेश मंडळांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. उत्सवादरम्यान वाहनतळासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ध्वनिक्षेपक, वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. मागील वर्षी ३ हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यावर्षीही तेवढ्याच प्रमाणात गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बैठकीला विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

*अशी आहे गणेशोत्सव स्पर्धा*

सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य,  शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.
 अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८  सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५  हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
0000

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

 
Pune Ganesh Utsav Meeting | पुणे शहरात गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पुणे गणेश उत्सव (Pune Ganesh Utsav)  नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) उद्या सकाळी 11:30 वाजता गणेश मंडळासोबत बैठक घेणार आहेत. पोलीस मुख्यालय, शिवाजी नगर येथे ही बैठक होणार आहे. (Pune Ganesh Utsav Meeting) 
 पुणे शहर आणि जिल्हयात गणेश उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षीचा पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav) 19 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यानुषंगाने नियोजनाकरिता शहरातील गणेशोत्सव मंडळे (Ganesh Mandal), पोलीस विभाग (Pune Police) यांची संयुक्त बैठक 8 सप्टेंबर  रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केली आहे. नुकतीच नीलम गोर्हे यांनी गणेश मंडळासोबत बैठक घेतली होती. मात्र यावरून शहरात वाद सुरु झाला होता. त्यानुसार आता अजित पवार उद्या बैठक घेणार आहेत.  (Ganesh Utsav Meeting) 
——
News Title | Pune Ganesh Utsav Meeting | Meeting with Ajit Pawar tomorrow regarding Ganesh Utsav planning

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Ganesh Utsav | गणेशोत्सव (Ganesh Utsav Pune) जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे (Dhol Tasha Groups) सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Immersion Rally) घालण्यात येणाऱ्या बंधनांसंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज दिली. (Ganesh Utsav)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते. (Pune News)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात ढोल ताशा पथकासारख्या पारंपरिक वाद्यांना सर्वांचीच पसंती असते. अनेक वादक यासाठी अनेक महिने सराव करत असतात. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करु, अशी ग्वाही दिली. तसेच, लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे देखील परवानगी मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे यावेळी आश्वस्त केले. (Ganesh Utsav News)
ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात लोकसहभागातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यात ढोल ताशा पथकांनाही प्राधान्य देणार असून, महासंघाने यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी कर्वेनगर डीपी रोड येथे सरावाला परवानगी मिळावी, तसेच विसर्जन मिरवणुकीवेळी रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.
—–
News Title | Ganesh Utsav | Will eliminate the difficulties in the practice of drumming! | Guardian Minister Chandrakantada Patil’s testimony