Ganesh Visarjan Holiday | पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अनंत चतुर्दशीची सुट्टी जाहीर | विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश जारी

Categories
Breaking News PMC social पुणे

Ganesh Visarjan Holiday  | पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अनंत चतुर्दशीची सुट्टी जाहीर | विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश जारी

Ganesh Visarjan Holiday  | अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना उद्या म्हणजे गुरुवारी सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या पुणे महापालिका कर्मचारी आणि इतर सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची आवश्यकता नाही. महापालिका प्रशासन देखील याबाबतचे आदेश जारी करेल. दरम्यान या निमित्ताने कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे.
गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आणि ईद ए मिलादचा (Eid-a-Milad 2023) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) देखील उद्या कामावर यावे लागणार होते. मात्र यामुळे बराच संभ्रम निर्माण होत होता. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने हा संभ्रम दूर केला आहे.

 – असे आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाचे आदेश

शासन निर्णय २७ सप्टेंबर २०२३ चे अधिसुचनेनुसार ई-ए-मिलाद ची शासकिय सुट्टी दिनांक २८ सप्टेंबर २०२३ ऐवजी शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करणेत आली आहे.  २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने पुणे येथे सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणुक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने प्रतिवर्षी पुणे जिल्ह्याकरीता अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात येते. तथापि  २८ सप्टेंबर रोजीची शासकीय सुट्टी रद्द होवून २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिर केल्याने शासन, राजनैतिक सेवा विभाग, निर्णय अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे या नात्याने पुणे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशी, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करीत आहे.

| सलग 5 दिवस सुट्टी

दरम्यान या निमित्ताने पुणे महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यानुसार उदा 28 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशीची स्थानिक सुट्टी, 29 ची सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि सोमवार 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती निमित्त सुट्टी असणार आहे.
——

Ganesh Visarjan Holiday Cancel | पुणे महापालिका कमर्चाऱ्यांना उद्या कामावर यावे लागणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

Ganesh Visarjan Holiday Cancel | पुणे महापालिका कमर्चाऱ्यांना उद्या कामावर यावे लागणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Ganesh Visarjan Holiday Cancel | अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आणि ईद ए मिलादचा (Eid-a-Milan 2023) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) देखील उद्या कामावर यावे लागणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना दरवर्षी अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली जाते. कारण पुण्यात विसर्जन मिरवणूक खूप जल्लोषात साजरी केली जात असते. मात्र ही सुट्टी विभागीय आयुक्त घोषित करत असतात. मात्र यंदा गौरी पूजन ला सुट्टी देण्यात आली होती. जी दरवर्षी दिली जात नसते. तसेच आळंदी यात्रेसाठी देखील स्थानिक सुट्टी दिली गेली होती. त्यामुळे अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली गेली नाही. यामुळे आता महापालिका कर्मचाऱ्यांची गुरुवारची सुट्टी सरकारच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असून ही सुट्टी शुक्रवारी असणार आहे.

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

| गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि  शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

| मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी  ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Sinhagad Road Traffic Diversion | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

Categories
Breaking News social पुणे

Sinhagad Road Traffic Diversion | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

 

Sinhagad Road Traffic Diversion | पुणे शहरातील सिंहगड रोड (Sinhagad Road Pune) वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम आदेश तसेच काही तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत. (Sinhagad Road Traffic Diversion)

पार्कींग बाबतच्या अंतिम आदेशानुसार गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँकेपर्यंत (दुभाजक संपेपर्यंत) रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर पर्यंत नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात येत आहे. गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँक ते अमृतगंगा सोसायटी गेट नं. ४ (शोरबा हॉटेल) पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस एच.डी.एफ.सी. बँकेपासून ते सोबा ऑप्टिमा सोसायटीचे गेट (प्रेमाचा चहा शॉप) पर्यंत फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून गोयलगंगा चौकाकडे जाताना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय चौक ते दुभाजक संपेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

स्वारगेटकडून वडगाव पूल वीर बाजी पासलकर चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड रस्त्याने गणेशमळा सिग्नल येथे डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) येथे डावीकडे वळवून कॅनॉलच्या उजव्या बाजूने आनंदविहार रस्त्याने तुकाईनगर चौकापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.

वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय चौकातून डावीकडे वळून लंडन पूल चौक ते कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) चौकातून डावीकडे वळून विश्रांतीनगर चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत असून कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) कडून येणारी वाहने (कॅनॉलच्या डाव्याबाजूने) जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

दोन्ही कॅनॉल रस्ते जोडणाऱ्या लंडन पुलावरून हिंगणे ते महादेवनगरकडे जाण्याकरीता चारचाकी वाहनांना बंदी करण्यात येत असून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.

जनता वसाहत ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय फन टाईम थिएटर पर्यंत कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

स्वारगेटकडून वडगाव पूलाकडे (वीर बाजी पासलकर चौक) येण्याकरीता व वडगाव पूलाकडून स्वारगेटकडे जाण्याकरीता (कॅनॉल रस्ता) पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही.

वाहतूक व पार्किंगच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या आदेशानुसार वडगाव पूल चौक ते नांदेड सिटी गेट चौकपर्यंत गर्दीच्या वेळेमध्ये (सकाळी ८.०० वा ते ११.०० वा. आणि सायं. १८.०० वा. ते २१.०० वा.) जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. श्री कंट्रोल चौकातून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत, कंट्रोल चौकाकडून पारी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस ५० मीटर पर्यंत आणि कंट्रोल चौकाकडून झील कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूस ३० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

ग्रीनपार्क, प्रथमेश तुलीप, स्वामिनी रेसिडन्सी सोसायटी समोरील सनसिटी रस्त्याकडे जाणाऱ्या डी.पी. रोडवर दोन्ही बाजूस व्यावसायिक वाहनांकरिता नो पार्किंग करण्यात येत आहे.

तात्पुरत्या आदेशांच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ९ ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उप आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती | विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती

 

| विसर्जन घाटमूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

 

PMC Care | पुणे |  पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) नव्या स्वरूपातील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म PMC CARE नागरिकाभिमुख सेवा प्रदान करतो. त्यात सिटी अपडेट्सऑनलाईन मनपा सेवाआसपासच्या डील्स आणि अजून बरेच काही उपलब्ध आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका (PMC Pune) सज्ज झाली आहे. महापालिकेच्या PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जनाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेशोत्सवाविषयी ब्लॉग्सलेख नागरिक वाचू शकतात. तसेच गणेश विसर्जनाविषयी माहिती देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲप आणि पोर्टलच्या माझ्या जवळ‘ या टॅबवर क्लिक केले कीनागरिक आपल्या जवळपासचे विसर्जन घाटमूर्ती संकलन व दान केंद्रगणेश मंडळेपार्किंगची जागाबंद रस्तेपर्यायी मार्गांविषयी माहिती मिळवू शकतात. या यादीतील एखाद्या ठिकाणाला क्लिक केले कीआपल्याला त्या ठिकाणी कसे पोहोचायचे यासाठी मॅप देखील दिसतो. अशा प्रकारे पुणेकर नागरिक ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील. त्यासाठी मात्र हे PMC CARE ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे. नागरिक त्यासाठी पुढील लिंकचा वापर करून ॲप डाउनलोड करू शकतात.

 

गूगल प्ले स्टोअरसाठी लिंक –  https://fxurl.co/rFshd 

iOS ॲपल ॲपसाठी लिंक – https://fxurl.co/4IJJ123

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!

| नागरिकांना विसर्जन करण्यात अडचणी

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | पुणे | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) गणेश विसर्जनासाठी (Ganesh Immersion) फिरते विसर्जन रथाची (Moving Immersion Chariots) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी करोडो खर्च केले आहेत. असे असले तरी नागरिकांना विसर्जन करण्यात अडचणी येत आहेत, असा आक्षेप शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी केला आहे. तसेच नागरिकांना वेळेवर रथ उपलब्ध करून देण्याची मागणी सुतार यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)

सालाबादप्रमाणे यंदा ही शहरात सार्वजनिक गणेशोत्सव  (Pune Ganeshotsav 2023) साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) गणेश मूर्ती विसर्जन (Ganesh Idol Immersion) करिता 150 पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथ (Moving Immersion Chariots) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असले तरी मात्र नागरिकांना सुविधा मिळत नसल्याची तक्रार सुतार यांनी केली आहे. The karbhari वृत्तसंस्थेशी बोलताना सुतार म्हणाले कि नागरिक दीड दिवसापासूनच गणपती विसर्जन करतात. असे असताना पालिकेने विसर्जन रथाची सुविधा पाचव्या आणि सातव्या दिवसापासून देण्यात सुरुवात केली. याचाच अर्थ महापालिकेचे नियोजन चुकले आहे. गणेश उत्सव सुरु होण्या अगोदर याचे नियोजन करणे गरजेचे होते. सुतार पुढे म्हणाले, महापालिका आयुक्तांनी टीका झाल्यानंतर रथ उपलब्ध करून देणार नाही असे सांगितले. मात्र काही काळातच पुन्हा प्रक्रिया सुरु केली.  प्रशासन म्हणते कि 150 ठिकाणी रथ उपलब्ध करून देण्यात आले. मात्र तरीही आमच्या परिसरातील नागरिकांना याची माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांना अडचणी येताहेत. सुतार म्हणाले कि करोडो रुपये खर्च केले आहेत तर लोकांना किमान चांगल्या सुविधा तरी द्या.

यावर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, महापालिका वेबसाईट वर रथाची सगळी माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित लोकांचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत.
—-/-

Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | गणेश विसर्जनासठी पुणे महापालिकेकडून 150 फिरते विसर्जन रथ!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | गणेश विसर्जनासठी पुणे महापालिकेकडून 150 फिरते विसर्जन रथ!

| निर्माल्य नदीपात्र, तलावात न टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

Ganesh Immersion | Firate Visarjan Haud |  सालाबादप्रमाणे यंदा ही शहरात सार्वजनिक गणेशोत्सव  (Pune Ganeshotsav 2023) साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) गणेश मूर्ती विसर्जन (Ganesh Idol Immersion) करिता 150 पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथ (Moving Immersion Chariots) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे व पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रती क्षेत्रिय कार्यालय सरासरी १० असे एकूण १५० पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथांची गणेश मूर्ती विसर्जन करणे करिता सोय करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथात गणेश मूर्ती विसर्जन करिता सजवलेला हौद, लाईट व्यवस्था, निर्माल्य गोळा करणे करिता स्वतंत्र व्यवस्था 25 सप्टेंबर  पासून नागरिकांना संबोधित करणे / जागरूकता निर्माण करणे करिता स्पीकर इ. व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
क्षेत्रिय कार्यालयांनी केलेल्या नियोजना नुसार ठरवून दिलेल्या मार्गावरती दि. २३/०९/२०२३ ते २९/०९/२०२३ (दि. २६/०९/२०२३ वगळून) या कालावधीत पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथांचे कामकाज क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
गणेश मूर्ती विसर्जन करणे करिता पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदाचे ठिकाण मिळणे नागरिकांना सुलभ
व्हावे याकरिता क्षेत्रिय कार्यालयांनी निश्चित केलेले मार्ग पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले असून फिरते विसर्जन रथांचे Live Location उपलब्ध करून देणे करिता पुणे महानगरपालिकेमार्फत http://35.165.18.115/livevisarjan.aspx हि लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.  पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदांचे मार्ग व Live Location बाबत पुणे मनपाचे संकेतस्थळ व समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आलेली आहे.
 कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले आहे.
नागरिकांनी पुणे महानगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती विसर्जन करिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या बांधलेले विसर्जन हौद, मूर्ती संकलन केंद्रे, फिरते विसर्जन रथ, लोखंडी टाक्या या सुविधांचा वापर करून
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
——
News Title | Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | 150 moving immersion chariots from Pune Municipal Corporation for Ganesh Visarjan!

Vivek Velankar Slams PMC commissioner Vikram Kumar on Ganesh immersion tanks Tender

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Social Activist Vivek Velankar Slams PMC commissioner Vikram Kumar on Ganesh immersion tanks Tender

 Ganesh immersion tanks |  PMC Pune |  Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar (IAS Vikram Kumar) has asked for a tender of 1.5 crore rupees for 150 mobile Ganesh immersion tanks this year.  This tender needs to be canceled immediately.  Municipal commissioners and administrators should realize that they are not the owners but the trustees of the city treasury.  Vivek Velankar has offered such a prayer to Ganaraya.
 Velankar said, for many years till 2019, the Pune Municipal Corporation had arranged 46 wells, 359 iron tanks, 191 idol collection/donation centers at various places and ghats in the city for Ganesh Immersion.  Apart from this, people who insisted on immersion in flowing water were doing this immersion in the river.  All these immersion systems were proving to be sufficient.  In the year 2020, as these immersion facilities were not available to the citizens due to the Corona epidemic, the municipal administration placed 30 rotating wells in the city and the citizens performed Ganesha immersion in them.  Even in the year 2021, as these immersion facilities are not available to the citizens due to the Corona epidemic, the municipal administration placed 60 rotating wells in the city and the citizens immersed Ganesha in them.  (PMC Pune)
 Velankar further said that since there is no corona virus restrictions this year, 46 wells, 359 iron tanks, 191 idol collection/donation centers will be available for Ganesha immersion at various places and ghats in the city like 2019.  Apart from this, at the ward level, CSR, various organizations and individuals are providing mobile immersion tanks at their own expense.  Moreover, people who insist on immersion in running water will do so in the river.  But still, the municipal administration has taken a rash decision to hire 150 revolving immersion wells.  That is, when there is no other system of irrigation, 30 in 2020 and 60 in 2021 for the entire city, and this year, when there are other abundant facilities for irrigation, is it necessary to rent 150 irrigation tanks and spend one and a half crores of people’s taxes on water for that?  (Pune Municipal Corporation)
 Velankar said, last year (2022) too, the municipal commissioner and administration had hired 150 moving wells.  Then, out of 4,30,091 idols that came for immersion, only 13% were immersed in this moving tank.  However, the municipal corporation, without taking any lesson from its own data, has once again set the stage to drain one and a half crores of citizens’ taxes by renting 150 irrigation tanks.  It was a shock when these documents were received today during the Right to Information Day on Monday.  This arrangement will be for only six days from the fifth day to the eleventh day.  On the sixth, eighth and ninth days, there is very little Ganapati immersion.  However, these one and a half hundred immersion tanks are going to be kept.  While the Ganapati festival lasts for ten days, these moving fountains are going to be held on the eleventh day.
 —-
 This tender needs to be canceled immediately and it is Ganaraya Charani’s request that the Municipal Commissioner and Administrator realize that they are not the owners but the trustees of the city treasury.
 – Vivek Velankar, President, Sajag Nagarik Manch Pune

Ganesh immersion tanks | PMC Pune | गणराया महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना सदबुद्धी दे | विवेक वेलणकर

Categories
Breaking News PMC social पुणे

 Ganesh immersion tanks | PMC Pune | गणराया महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना सदबुद्धी दे | विवेक वेलणकर

|  पुणेकरांचे दीड कोटी रुपये पाण्यात घालण्याचे टेंडर

Ganesh immersion tanks | PMC Pune |  पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी यंदा १५० फिरत्या गणेश विसर्जन हौदांसाठी (Ganesh immersion tanks) दीड कोटी रुपयांचे  टेंडर काढायला सांगितले आहे. हे टेंडर तत्काळ रद्द होण्याची आवश्यकता आहे. आपण शहराच्या तिजोरीचे मालक नाही तर विश्वस्त आहोत ही जाणीव महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना व्हावी. अशी गणराया चरणी प्रार्थना विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केली आहे.
वेलणकर म्हणाले, २०१९ पर्यंत अनेक वर्षे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गणेश विसर्जनासाठी (Ganesh Immersion) शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद , ३५९ लोखंडी टाक्या , १९१ मूर्ती संकलन / दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती. याशिवाय वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे लोक नदीत ही विसर्जन करत होते. ही सर्व विसर्जन यंत्रणा पुरेशी ठरत होती. २०२० साली करोना महामारी मुळे नागरीकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात ३० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले व नागरीकांनी त्यामध्ये गणेश विसर्जन केले. २०२१ सालीही करोना महामारी मुळे नागरीकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात  ६० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले व नागरीकांनी त्यामध्ये गणेश विसर्जन केले. (PMC Pune)
वेलणकर पुढे म्हणाले, यंदा कोणतेही करोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद , ३५९ लोखंडी टाक्या , १९१ मूर्ती संकलन / दान केंद्रे अशी व्यवस्था उपलब्ध असणार आहे. याशिवाय वाॅर्ड स्तरावर सीएसआर , विविध संस्था व व्यक्ती स्वखर्चाने फिरते विसर्जन हौद उपलब्ध करत असतात. शिवाय वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे लोक नदीत ही विसर्जन करतील. मात्र तरीही याउप्पर महापालिका प्रशासनाने  १५० फिरते विसर्जन हौद ही भाड्याने घेण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. म्हणजे विसर्जनाची अन्य कोणतीही व्यवस्था नसताना संपूर्ण शहरासाठी २०२० मध्ये ३० तर २०२१ मध्ये ६० फिरते विसर्जन हौद संपूर्ण शहरासाठी पुरले आणि यंदा विसर्जनाच्या अन्य मुबलक सोई उपलब्ध असताना १५० फिरते विसर्जन हौद भाड्याने घेण्याचा आणि त्यापोटी जनतेच्या करांचे दीड  कोटी रुपये पाण्यात घालायची आवश्यकता काय ? (Pune Municipal Corporation)
वेलणकर म्हणाले, गेल्या वर्षीही ( २०२२) महापालिका आयुक्त व प्रशासनाने अट्टाहासाने १५० फिरते हौद भाड्याने घेतले होते. तेंव्हा विसर्जनासाठी आलेल्या ४,३०,०९१ पैकी जेमतेम १३% मूर्तींचे विसर्जन या फिरत्या हौदात झाले. मात्र महापालिकेने या स्वतः च्याच  आकडेवारीवरून कोणताही बोध न घेता यंदा  परत एकदा १५० विसर्जन हौद भाड्याने घेऊन नागरिकांच्या करांच्या दीड कोटी रुपयांचे विसर्जन करण्याचा घाट घातला आहे. सोमवारच्या माहिती अधिकार दिनात आज  ही कागदपत्रे मिळाल्यावर धक्काच बसला. यामध्ये पाचवा दिवस ते अकरावा दिवस अशा फक्त सहा दिवसांसाठी ही व्यवस्था असणार आहे. सहावा , आठवा आणि नववा या तीन दिवशी अत्यंत कमी गणपतींचे विसर्जन होते. तरी हे दीडशे विसर्जन हौद ठेवले जाणार आहेत. गणपती उत्सव दहा दिवसांचा असताना अकराव्या दिवशी पण हे फिरते हौद असणार आहेत.
—-
हे टेंडर तत्काळ रद्द होण्याची आवश्यकता आहे आणि आपण शहराच्या तिजोरीचे मालक नाही तर विश्वस्त आहोत ही जाणीव महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना व्हावी हीच गणराया चरणी प्रार्थना
विवेक वेलणकर, अध्यक्ष,  सजग नागरिक मंच पुणे

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Ganesh Utsav | गणेशोत्सव (Ganesh Utsav Pune) जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे (Dhol Tasha Groups) सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Immersion Rally) घालण्यात येणाऱ्या बंधनांसंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज दिली. (Ganesh Utsav)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते. (Pune News)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात ढोल ताशा पथकासारख्या पारंपरिक वाद्यांना सर्वांचीच पसंती असते. अनेक वादक यासाठी अनेक महिने सराव करत असतात. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करु, अशी ग्वाही दिली. तसेच, लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे देखील परवानगी मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे यावेळी आश्वस्त केले. (Ganesh Utsav News)
ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात लोकसहभागातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यात ढोल ताशा पथकांनाही प्राधान्य देणार असून, महासंघाने यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी कर्वेनगर डीपी रोड येथे सरावाला परवानगी मिळावी, तसेच विसर्जन मिरवणुकीवेळी रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.
—–
News Title | Ganesh Utsav | Will eliminate the difficulties in the practice of drumming! | Guardian Minister Chandrakantada Patil’s testimony

Ganesha idols Immersion | हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन  | 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन

| 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा

पुणे | गणेश उत्सवाची सांगता झाली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेकडून गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हौद आणि लोखंडी टाक्या बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये शहर वासियांकडून एकूण 3 लाख 10 हजार 158 मूर्तीचे विसर्जन झाले.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या हौदात 68 हजार 547 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लोखंडी टाक्यात 1 लाख 32 हजार 999 मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. फिरत्या हौदात 40 हजार 522 मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. 68 हजार 90 मूर्ती संकलित करण्यात आल्या. अशा एकूण 3 लाख हुन अधिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शिवाय निर्माल्य जमा करण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 4 लाख 4 हजार 347 किलो निर्माल्य जमा करण्यात आले. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.