Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | गणेश विसर्जनासठी पुणे महापालिकेकडून 150 फिरते विसर्जन रथ!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे
Spread the love

Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | गणेश विसर्जनासठी पुणे महापालिकेकडून 150 फिरते विसर्जन रथ!

| निर्माल्य नदीपात्र, तलावात न टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

Ganesh Immersion | Firate Visarjan Haud |  सालाबादप्रमाणे यंदा ही शहरात सार्वजनिक गणेशोत्सव  (Pune Ganeshotsav 2023) साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) गणेश मूर्ती विसर्जन (Ganesh Idol Immersion) करिता 150 पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथ (Moving Immersion Chariots) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे व पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रती क्षेत्रिय कार्यालय सरासरी १० असे एकूण १५० पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथांची गणेश मूर्ती विसर्जन करणे करिता सोय करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथात गणेश मूर्ती विसर्जन करिता सजवलेला हौद, लाईट व्यवस्था, निर्माल्य गोळा करणे करिता स्वतंत्र व्यवस्था 25 सप्टेंबर  पासून नागरिकांना संबोधित करणे / जागरूकता निर्माण करणे करिता स्पीकर इ. व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
क्षेत्रिय कार्यालयांनी केलेल्या नियोजना नुसार ठरवून दिलेल्या मार्गावरती दि. २३/०९/२०२३ ते २९/०९/२०२३ (दि. २६/०९/२०२३ वगळून) या कालावधीत पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथांचे कामकाज क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
गणेश मूर्ती विसर्जन करणे करिता पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदाचे ठिकाण मिळणे नागरिकांना सुलभ
व्हावे याकरिता क्षेत्रिय कार्यालयांनी निश्चित केलेले मार्ग पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले असून फिरते विसर्जन रथांचे Live Location उपलब्ध करून देणे करिता पुणे महानगरपालिकेमार्फत http://35.165.18.115/livevisarjan.aspx हि लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.  पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदांचे मार्ग व Live Location बाबत पुणे मनपाचे संकेतस्थळ व समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आलेली आहे.
 कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले आहे.
नागरिकांनी पुणे महानगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती विसर्जन करिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या बांधलेले विसर्जन हौद, मूर्ती संकलन केंद्रे, फिरते विसर्जन रथ, लोखंडी टाक्या या सुविधांचा वापर करून
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
——
News Title | Ganesh Immersion | Firate Visarjan Haud | 150 moving immersion chariots from Pune Municipal Corporation for Ganesh Visarjan!