Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

Categories
Breaking News Political पुणे

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

 

Pune Shivsena UBT | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Loksabha and Vidhansabha Elections) सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने (Shivsena UBT) इतर काही महत्वाच्या जिल्ह्यांसह पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. आता ठाकरे गटाने पुण्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Pune Vidhansabha Election) हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विविध मतदारसंघाची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे दिली आहे. यामध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar), विशाल धनवडे (Vishal Dhanvade), बाळा ओसवाल (Bala Oswal) आणि संजय भोसले (Sanjay Bhosale) यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी चार माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. (Maharashtra Vidhansabha Elections)

 

  • पृथ्वीराज सुतार – कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
  • बाळा ओसवाल – पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ
  • विशाल धनवडे – कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
  • संजय भोसले – वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ

 

पुणे शहर शिवसेना कात टाकणार. यंदाच्या विधानसभा आणि महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार याकरिता शिवसेनेचे 4 नगरसेवक पुणे शहर पिंजून काढणार. संघटना बळकट करणार आणि याकरिता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या शहरातील प्रमुख नगरसेवकांना जबाबदारी दिली आहे व दिलेली जबाबदारी आम्ही समर्थपणे स्वीकारू आणि शिवसेना वाढवू. असे या माजी नगरसेवकांनी यावेळी सांगितले.


News Title | Pune Shivsena UBT | Four loyal former corporators are in charge of the Pune Vidhan Sabha

Kothrud Constituency | Shivsena UBT | कोथरूड विधानसभा मतदार संघात होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन 

Categories
Breaking News Political social पुणे

Kothrud Constituency | Shivsena UBT | कोथरूड विधानसभा मतदार संघात होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन

 

Kothrud Constituency | Shivsena UBT|शिवसेना कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये ६ ऑक्टोबर रोजी होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड या कार्यक्रमाचे कोथरूड मध्ये सुतार दवाखाना, आशिष गार्डन चौक, किनारा हॉटेल, मोरे विद्यालय चौकसुतारदरा, नवभूमी शास्त्रीनगर, किष्किंदानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक कोथरूड गावठाण या ठिकाणी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लोकत सांस्कृतिक ग्रुपच्या वतीने पथनाटयद्वारे नागरिकांमध्ये सत्तारूढ पक्षाच्या नाकर्तेपणाची माहिती देण्यात आली. (Kothrud Constituency | Shivsena Pune)

कार्यक्रमासाठी सह- संपर्क प्रमुख अदित्यजी शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, योगेश मोकाटे, चंद्रकांत मोकाटे , शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, बेरोजगार तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिकठिकाणी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवाधिकारी राम थरकुडे, नितीन शिंदे, अनिल भगत, आकाश सुतार, विशाल उभे, उमेश भेलके, जयदिप पडवळ, योगेश थोरात, चेतन डेरे, भारत सुतार, दिलीप गायकवाड, नितीन पवार, पुरषोत्तम विटेकर, मनोज आल्हाट, श्रीपाद चिकणे, कांता बराटे, सुधीर जानोरकर यांनी सहकार्य केले.

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!

| नागरिकांना विसर्जन करण्यात अडचणी

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | पुणे | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) गणेश विसर्जनासाठी (Ganesh Immersion) फिरते विसर्जन रथाची (Moving Immersion Chariots) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी करोडो खर्च केले आहेत. असे असले तरी नागरिकांना विसर्जन करण्यात अडचणी येत आहेत, असा आक्षेप शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी केला आहे. तसेच नागरिकांना वेळेवर रथ उपलब्ध करून देण्याची मागणी सुतार यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)

सालाबादप्रमाणे यंदा ही शहरात सार्वजनिक गणेशोत्सव  (Pune Ganeshotsav 2023) साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) गणेश मूर्ती विसर्जन (Ganesh Idol Immersion) करिता 150 पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथ (Moving Immersion Chariots) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असले तरी मात्र नागरिकांना सुविधा मिळत नसल्याची तक्रार सुतार यांनी केली आहे. The karbhari वृत्तसंस्थेशी बोलताना सुतार म्हणाले कि नागरिक दीड दिवसापासूनच गणपती विसर्जन करतात. असे असताना पालिकेने विसर्जन रथाची सुविधा पाचव्या आणि सातव्या दिवसापासून देण्यात सुरुवात केली. याचाच अर्थ महापालिकेचे नियोजन चुकले आहे. गणेश उत्सव सुरु होण्या अगोदर याचे नियोजन करणे गरजेचे होते. सुतार पुढे म्हणाले, महापालिका आयुक्तांनी टीका झाल्यानंतर रथ उपलब्ध करून देणार नाही असे सांगितले. मात्र काही काळातच पुन्हा प्रक्रिया सुरु केली.  प्रशासन म्हणते कि 150 ठिकाणी रथ उपलब्ध करून देण्यात आले. मात्र तरीही आमच्या परिसरातील नागरिकांना याची माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांना अडचणी येताहेत. सुतार म्हणाले कि करोडो रुपये खर्च केले आहेत तर लोकांना किमान चांगल्या सुविधा तरी द्या.

यावर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, महापालिका वेबसाईट वर रथाची सगळी माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित लोकांचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत.
—-/-

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी

PMC School Audit | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation School) शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या (Shivsena Party) वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. अशा इशारा शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC School Audit)
सुतार यांच्या निवेदनानुसार गुरुवार रोजी पुणे मनपाच्या कै हबीरराव मोझे या शाळेमध्ये आगीची दुदैवी घटना घडली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी सारखी गंभीर घटना घडली नाही. सदरची आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असे समजले. आगीची तीव्रता वाढण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेले अडगळीचे सामान, टाकाऊ साहित्य, विना वापराच्या खराब झालेल्या वस्तू. (Pune Municipal Corporation)
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, मनपाच्या शेकडो शाळांमध्ये सुस्थितीतील व विना वापराचे टाकाऊ, खराब झालेल्या वस्तू व साहित्य आहे. जे शाळाच्या विविध मजल्यावर, विना वापरांच्या खोल्यांमध्ये, टेसेवर पडून आहे कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. नुकत्याच झालेल्या दुदैवी घटनेवरून आपण बोध घेऊन भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून येऊ नयेत म्हणून मनपाच्या शाळांमधील असे सर्व प्रकारचे विना वापरांचे साहित्य त्वरीत काढून घेण्यात यावे. (PMC Pune)
तसेच या शाळामध्ये मनपाने करोडो रूपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा जी बसविली होती, त्या यंत्रणांचे सद्यपरिस्थिती काय ? त्यातील किती चालू आहेत व बंद आहेत त्याची माहिती काय ? या यंत्रणा चालविण्याबाबत शाळामधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे का ? अनेक शाळांमध्ये जुनीच विद्युत व्यवस्था आहे. शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.
—-

PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू  | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू

| शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा

PMC Hospitals | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन (Liftman) नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ लिफ्टमन नेमण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पृथ्वीराज सुतार (Shivsena Leader Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच नेमणूक नाही झाली तर आंदोलनाचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. (PMC Hospitals)

सुतार यांच्या निवेदनानुसार  मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या ईमारती बहुमजली आहेत; म्हणून  रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते. (PMC Pune News)

परंतु आता आपल्या विद्युत विभागाने (PMC Electrical Department) या लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही, असा फतवा काढला आहे. हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.


News Title | PMC Hospitals | Liftman in Pune Municipal Hospital or else we will protest | Shiv Sena leader Prithviraj Sutar’s warning to the Municipal Corporation

Summer Camp News | श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीरात विविध कलांचे प्रशिक्षण 

Categories
Breaking News cultural Education Political social पुणे

Summer Camp News | श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीरात विविध कलांचे प्रशिक्षण

Summer Camp News | पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) व बाल विकास केंद्र, नॉर्थ डहाणूकर कॉलनी यांच्या संयुक्त सहकार्याने कोथरूड परिसरातील ३ ते १५ वर्षाच्या वयोगटातील मुला – मुलीसाठी श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीराचे आयोजन दि. २० मे ते ३१ मे या कालावधीमध्ये सायं ५ ते ७ या वेळेत करण्यात आले होते. या कालावधीमध्ये मुला-मुलींसाठी नृत्य प्रशिक्षण, हस्तकला,मातीकाम, चित्रकला, संगीत, गायन, जादूचे प्रयोग, अॅक्टींग यांचे प्रशिक्षण देण्यात आले, या शिबीराचे आयोजन नॉर्थ डहाणूकर कॉलनीच्या मैदानावर करण्यात आले. रोज मुलांना खाऊ देण्यात आला, समारोपाच्या दिवशी सर्व मुलांना व पालकांना आईस्क्रिम देण्यात आले. (Summer Camp News)

समारोपाच्या कार्यक्रमात शिबिराच्या काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील ५० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सदरची बक्षिसे शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या शुभहस्ते देण्यात आली.

आपल्या भाषणात पृथ्वीराज सुतार यांनी या शिबिराचे आयोजन करण्याचा उद्देश हा लहान मुलांची मानसिक व शारिरिक वाढ व्हावी, सर्वागीण विकास व्हावा, मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिराचे १८ वे वर्ष असून, दरवर्षी साधारण साडेतीनशे ते चारशे मुले-मुली यामध्ये सहभागी होती. या शिबीरामुळे मुलांना नवीन मित्र मिळाले, त्यांच्या आवडीने खेळ खेळता आले.त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास या शिबिराची मदत झाली.या पुढे कोथरूडच्या विविध भागात या शिबिराचे आयोजन करावे तसेच पालकांसाठी सुध्दा अशा संस्कार शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी सर्व पालकांनी केली.

या कार्यक्रमास नॉर्थ डहाणूकर कॉलनी फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. दिपालीताई पाठक, सेक्रेटरी राहुल यादव, सभासद यशवंत बुचके, बालविकास केंद्राच्या संचालिका अपर्णाताई वेर्णेकर, स्मिताताई वाळीबे, राजेश्वरीताई यादव हे उपस्थित होते.

या कार्यक्रमास राजेश्वरीताई यादव, श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर वघरडे हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत बोहुडे, नचिकेत घुमटकर, विशाल उभे, जितेंद्र खुंटे, योगेश चौधरी, चेतन डेरे,योगेश क्षीरसागर, सुंदर खुंडे, प्रशांत पाटील, अभिजीत चव्हाण यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदाताई डेरे यांनी केले तर आभार राजेश्वरीताई यादव यांनी मानले.


News title | Training in various arts at Shree Shivarai Vasanthik Summer Camp

Prithviraj Sutar | डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही! | योजना सुरु नाही केल्यास आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही!

| योजना सुरु नाही केल्यास आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

पुणे | पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत होता. मात्र या योजनेसाठी चालू बजेटमध्ये तरतूदच करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना लाभ घेता येणार नाही. याबाबत शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आक्षेप घेत योजना सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच योजना सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या अंतर्गत क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड मार्फत कोथरूड येथील सुतार हॉस्पिटल व कमला नेहरू हॉस्पिटल येथे दोन डायग्नोस्टिक सेंटर चालविली जातात. या सेंटरमध्ये पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत होता. परंतु आता १ एप्रिल २०२३ पासुन ही योजना राबवू नये म्हणून क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड यांना आरोग्य अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी याच्या सहीने एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे सदर योजना बंद करावी असे म्हटले आहे.  हे निश्चितच चुकीचे व अन्यायकारक आहे. मनपाकडून अनावश्यक अशा अनेक कामासाठी बजेटमध्ये कोटयावधी रूपयांची तरतूद केली जाते. परंतु सामान्य नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मनपा तरतूद करू शकत नाही हे निश्चितच निषेधार्य आहे. आपण त्वरीत ही योजना चालू करण्याचे आदेश संबंधितांना दयावेत व ही योजना चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरीत करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन आपल्या कार्यालयामध्ये करावे लागेल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.

Prithviraj Sutar | Water Meter | शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध | समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे

 शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध

| समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

पुणे मनपाने (PMC Pune) पालकमंत्री यांच्याकडे पुणे शहरामध्ये घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या (Water Meter) रिडींगनुसार पाण्याचे बील अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे समजले.  आमच्या ” शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) या पक्षाचा या बील अकारणीला तीव्र विरोध आहे. असे शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा ही सुतार यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)

सुतार यांनी दिलेल्या निवेदनानुसार २४x७ ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.

२४x७ या पाणीपुरवठा योजनेचा अर्थ होता बाराही महिने, चौवीस तास पाणीपुरवठा पुणेकरांना मिळणार काही दिवसानी योजनेचे नाव झाले समान पाणी पुरवठा आणि आता ही योजना आहे कधी-कधी पाणी पुरवठा.

ही पाणीपुरवठा योजना संपूर्ण फसवी असून पुणेकरांना फसवणारी योजना आहे ही योजना फक्त काही लोकाच्या फायदयासाठी राबविण्यात येत आहे. योजना ही सुरूवातीपासुन वादात अडकली आहे. त्याच्या इस्टिमेटपासुन ते टेंडर प्रक्रियेपर्यंत ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे लांबली गेली. या योजनेमध्ये काही तात्रिक बदल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नाही आणि पाण्याची समस्या संपूर्णपणे सुटणार नाही, अशा चुकीच्या योजनेमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. असे सागून मनपाचे हित सांभाळणाऱ्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त करून त्यांची बदली करण्यात आली.

या योजनेमुळे पुणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही, अजूनही पुणे शहरामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलबित आहेत. पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नसताना सुध्दा मीटर बसविण्याचे काम घाई-घाईत करण्यात आले हे फक्त कंपनीच्या फायदयाचा व काही लोकांचा फायदयाचा विचार करून, वेळ कोणती निवडली तर लोकप्रतिनिधी मनपामध्ये नसताना यामुळेच या योजनेबाबत अजून संशय वाढत चाललेला आहे.

जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे सुतार यांनी म्हटले आहे. (24*7 water project)

Aditya Thackeray | शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना | आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

Categories
Breaking News PMC Political पुणे
शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना
| आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
पुणे | पुणे शहरातील पर्यावरण, ई-बस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था,पावसाळी पाण्याचे नियोजन, ई-बाईक, रस्ते, फूटपाथ, सायकल ट्रॅक या प्रश्नांबाबत चर्चा केली व पुणे शहराच्या विकासासाठी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला काही उपयुक्त अशा सूचना केल्या. आयुक्त विक्रम कुमार यांनी या सूचनांसाठी सकारात्मक असा प्रतिसाद दिला. अशी माहिती शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पुणे महानगरपालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा *सी-४०* पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्त यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाशी निगडीत कामांना चालना व गती आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना दिलेली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पुणे शहराला मिळालेल्या या पुरस्कारासाठी खास अभिनंदन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत आले होते.

या वेळेस शिवसेनेचे पुणे शहर व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार.मा.सचिनभाऊ अहिर ,शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार, शहरप्रमुख – गजानन थरकुडे, शहरप्रमुख – संजय मोरे, पुणे उपशहर प्रमुख – आनंद रामनिवास गोयल, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे, मा.आमदार.चंद्रकांत मोकाटे हे उपस्थित होते.

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray | पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा

भारतीय निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह दिले आहे. तर पक्षाला  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाला नव्याने नाव मिळाल्याने पुण्यातील शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळयासमोर मशाल पेटवून आनंदोत्सव साजरा केला.

तर बंडखोर आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंधेरी तो झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है अशा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी मनपाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार सहित बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे म्हणाले की, शिवसेनेने ४० आमदाराना सर्व काही दिले. पण आज त्याच आमदारांनी बंडखोरी करून शिवसेनेच धनुष्यबाण गोठविण्याच पाप केल आहे.आता निवडणूक आयोगाने अंधेरी निवडणुकी करीता मशाल चिन्ह दिले आहे.पण आमचा आमच्या पक्षाचा इतिहास आहे.मशाल चिन्ह मिळाल्यानंतर तो उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतो आणि तो संदेश राज्यभरात जातो.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज्यात होणार्‍या निवडणुकीमध्ये बंडखोराना या मशालीच्या माध्यामातून जनता त्यांची जागा दाखवली जाईल,अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.