Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old Pension Scheme | नागपूर|  जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात (Old Pension Scheme) राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhansabha Elections) याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधान परिषदेत दिले. (Maharashtra Winter Session)

विधान परिषदेत नियम 101 अन्वये, जुन्या पेन्शनसंदर्भात विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित मुद्यावर सरकारतर्फे माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारस्तरावर सुध्दा वेगळा विचार सुरु आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यासंदर्भात केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर राज्य सरकार सुध्दा त्याच पध्दतीने वाढ करत असते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्यात सुध्दा निर्णय घेण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

Categories
Breaking News Political पुणे

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे

 

Pune Shivsena UBT | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Loksabha and Vidhansabha Elections) सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने (Shivsena UBT) इतर काही महत्वाच्या जिल्ह्यांसह पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. आता ठाकरे गटाने पुण्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Pune Vidhansabha Election) हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विविध मतदारसंघाची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे दिली आहे. यामध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar), विशाल धनवडे (Vishal Dhanvade), बाळा ओसवाल (Bala Oswal) आणि संजय भोसले (Sanjay Bhosale) यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी चार माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. (Maharashtra Vidhansabha Elections)

 

  • पृथ्वीराज सुतार – कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
  • बाळा ओसवाल – पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ
  • विशाल धनवडे – कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
  • संजय भोसले – वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ

 

पुणे शहर शिवसेना कात टाकणार. यंदाच्या विधानसभा आणि महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणार याकरिता शिवसेनेचे 4 नगरसेवक पुणे शहर पिंजून काढणार. संघटना बळकट करणार आणि याकरिता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या शहरातील प्रमुख नगरसेवकांना जबाबदारी दिली आहे व दिलेली जबाबदारी आम्ही समर्थपणे स्वीकारू आणि शिवसेना वाढवू. असे या माजी नगरसेवकांनी यावेळी सांगितले.


News Title | Pune Shivsena UBT | Four loyal former corporators are in charge of the Pune Vidhan Sabha