Tag: pmc hospitals
PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता!
Diet plan for new mothers from Pune Municipal Corporation
| Facilities in 8 major hospitals and maternity homes of the Pune Municipal Corporation
PMC Maternity Homes | Pune | Janani Shishu Suraksha (JSSK) program of central government is being implemented in the city on behalf of Pune Municipal Corporation. A free diet plan (Diet Plan for New Mothers) has been started by the Municipal Corporation for the mothers who have given birth under this scheme. At the same time, drop back means mothers are being taken to their homes in an ambulance. Recently this has been started on behalf of the Municipal Corporation. This information was given by Dr Vaishali Jadhav PMC, Assistant Health Officer of the Municipal Corporation. (PMC Diet Plan for New Mothers)
There are four major components of the Janani Shishu Safety Program. These include free food, taking women home, medicines and various check-ups. Only medicines and tests were being done by the Municipal Corporation. But now arrangements have been made for feeding and home discharge. Assistant Health Officer Dr Jadhav has initiated these two things. Women are being left at home since last month. A work order of diet plan has also been given.
According to Dr. Jadhav, a diet plan has been started in 8 major hospitals and maternity homes of the Municipal Corporation. A tender process was conducted for this. 1 crore 11 lakhs will be spent for this year. In this, mothers will be given two times tea, one time breakfast and two times lunch. If the delivery of the concerned mother is normal, she will be fed for three days and if there is a cesarean, she will be fed for 7 days. Meanwhile, this facility has now been made available in all maternity homes of the municipality.
: Diet plan is running in this hospital and maternity home
(PMC Hospitals and Maternity Homes)
1. Kamala Nehru Hospital
2. Kai Matoshree Ramabai Amdekar Maternity Hospital
3. Dr Dalvi Hospital
4. Kai Chandumama Sonawane Maternity Hospital
5. Bharat Ratna Swa Rajiv Gandhi Hospital
6. Kai Savitribai Phule Maternity Hospital
7. Kai Malti Kachi Maternity Hospital
8. Rajmata Jijau Maternity Hospital
Covid New Varient | कोविड च्या नवीन व्हेरियंट ची भीती बाळगण्याची गरज नाही | महापालिका आयुक्तांचे दक्षता घेण्याचे आवाहन
केरळ मधील कोरोना संक्रमित जे.एन. १ हा कोविड १९ विषाणूचा उपप्रकार आढळल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या पूर्व तयारीसाठी १९ रोजी मा. रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस आरोग विभागांकडील सर्व अधिकारी यांची उपस्थिती राहून खालील विषयावर आढावा घेण्यात आला. (PMC Health Department)
रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापी कोविड प्रतिबंधांसाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण (W.G.S.) करण्यात येत आहे. आजपर्यंत पुणे शहरात एकही JN.1 या व्हेरीयंटचा रुग्ण सापडला नाही. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे.
असून, Influenza like illness ( I.L.I. ) / Severe adverse respiratory infection (SARI) रुग्णांचे
सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहे. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.LI व SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बरोबर सर्व म. न. पा. च्या कार्यक्षेत्रामध्ये कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत.
रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत पुणे म. न. पा. रुग्णालयांचा
आढावा घेण्यात आला. पुणे म. न. पा. सद्यस्थितीमध्ये कोविड सर्वाधिक रुग्ण संख्येच्या वेळेत लागलेल्या ऑक्सिजनच्या क्षमतेपेक्षा दुपटीने ऑक्सिजनची उपलब्धता आहे. १७ डिसेंबर २०१३ रोजी पर्यंत पुणे म.न. पा. स्तरावर संस्थांनी हे मॉकड्रील पूर्ण करून त्याची माहिती सादर केली आहे.
PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू
| शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा
PMC Hospitals | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन (Liftman) नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ लिफ्टमन नेमण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पृथ्वीराज सुतार (Shivsena Leader Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच नेमणूक नाही झाली तर आंदोलनाचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. (PMC Hospitals)
सुतार यांच्या निवेदनानुसार मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या ईमारती बहुमजली आहेत; म्हणून रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते. (PMC Pune News)
परंतु आता आपल्या विद्युत विभागाने (PMC Electrical Department) या लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही, असा फतवा काढला आहे. हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.
News Title | PMC Hospitals | Liftman in Pune Municipal Hospital or else we will protest | Shiv Sena leader Prithviraj Sutar’s warning to the Municipal Corporation
महापालिकेच्या दवाखान्यात अचानक भेटी दिल्या जाणार!
| कार्यालयीन शिस्त नसल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
| असे आहेत आदेश
महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा
| प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन
कोविड १९ लसीकरण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्फत दि. १५ जुलै २०२२ पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांना निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड लसीचा प्रिकॉशन डोस देणेस सुरुवात करणेत येत आहे.
देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी पुणे शहरातील सर्व नागरिकांनी आपले घराजवळील पुणे मनपाच्या दवाखान्यात / रुग्णालयात जाऊन ( दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर तसेच त्यांना ३ महिन्यामध्ये कोव्हीड संसर्ग झालेला नसल्यास) निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड
लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.