PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू  | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू

| शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा

PMC Hospitals | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन (Liftman) नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ लिफ्टमन नेमण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पृथ्वीराज सुतार (Shivsena Leader Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच नेमणूक नाही झाली तर आंदोलनाचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. (PMC Hospitals)

सुतार यांच्या निवेदनानुसार  मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या ईमारती बहुमजली आहेत; म्हणून  रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते. (PMC Pune News)

परंतु आता आपल्या विद्युत विभागाने (PMC Electrical Department) या लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही, असा फतवा काढला आहे. हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.


News Title | PMC Hospitals | Liftman in Pune Municipal Hospital or else we will protest | Shiv Sena leader Prithviraj Sutar’s warning to the Municipal Corporation