Precautionary dose | महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा  | प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा

| प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन

कोविड १९ लसीकरण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्फत दि. १५ जुलै २०२२ पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांना निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड लसीचा प्रिकॉशन डोस देणेस सुरुवात करणेत येत आहे.

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांना तसेच १५ क्षेत्रीय कार्यालांतर्गत असणाऱ्या पुणे मनपा ६८ दवाखाने व रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड लसीचा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
तरी पुणे शहरातील सर्व नागरिकांनी आपले घराजवळील पुणे मनपाच्या दवाखान्यात / रुग्णालयात जाऊन ( दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर तसेच त्यांना ३ महिन्यामध्ये कोव्हीड संसर्ग झालेला नसल्यास) निशुल्क कोव्हॅक्सिन / कोव्हिशिल्ड
लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रम कुमार यांनी केले आहे.

Free booster dose | 15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस | ७५ दिवस राहणार सुविधा 

Categories
Breaking News social आरोग्य देश/विदेश

15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस

| ७५ दिवस राहणार सुविधा

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी 1 टक्‍क्‍यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या सावधगिरीच्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. म्हणजेच दुसऱ्या इंजेक्शननंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेता येतो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरण तीव्र करण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘हर घर दस्तक अभियान 2.0’ ची दुसरी फेरी सुरू केली आहे. ही दोन महिन्यांची मोहीम आता सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 96 टक्के लोकसंख्येला कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 87 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Booster Dose | Corona | उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

Categories
Breaking News Political आरोग्य महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

| राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरीकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Booster Dose : Adar Poonawala : बूस्टर डोस’ संदर्भात अदर पूनावालांचं मोठं विधान; म्हणाले…

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश पुणे

बूस्टर डोस’ संदर्भात अदर पूनावालांचं मोठं विधान, म्हणाले…

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी बूस्टर डोस बद्दल मोठं विधान केलं आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोस आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला लवकर निर्णय घेण्याचे देखील आवाहन केले असल्याची माहिती त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली.

“आम्ही बूस्टर डोसबाबत सरकारला आवाहन केले आहे. कारण, प्रवास करणे आवश्यक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोसची गरज असते. या संदर्भात सरकार अंतर्गत चर्चा करत आहे आणि बूस्टर डोसबाबत लवकरच धोरण जाहीर केले जाईल. कारण, अन्य देश देखील करत आहेत आणि आता याकडे लक्ष देण्याची आपली वेळ आहे.” असं अदर पूनावाला यांनी म्हटल

याचबरोबर, “केंद्र सरकारने खूप चांगले काम केले आहे. मोदी सरकारने जवळपास सर्वांना दोन डोस दिले आहेत आणि आता बुस्टर देण्याची देखील वेळ आली आहे. आम्ही आवाहन केलं आहे आता ते निर्णय घेतील. ज्याप्रकारे आपला देश नव्या व्हेरिएंटला सामोरं जात आहे, आपल्या देशातील लसीकरण हे अन्य देशांच्या तुलनेत खूप चांगले आहे. अमेरिका, युरोपमध्ये मोठ्याप्रमाणावर रूग्ण आहेत आणि आपल्या देशात यासाठी कमी आहेत कारण आपण योग्य लस निवडली.” असं देखील अदर पूनावाला यावेळी म्हणाले.

तर, ”आपल्या देशातील लसींचा नव्या व्हेरिएटवर चांगला परीणाम झाला आहे. आपल्या लशी सकारात्मक काम करतात. पण, करोनाच्या पुढील लाटेसाठी बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आताच धोरण जाही करावं. पण बूस्टर देताना दोन लशींचे मिश्रण की तीच लस द्यायची हे ठरवायला हवं.” असंही यावेळी अदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.

Health Workers : Prithviraj Sutar : लसीकर केंद्रावर डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नेमणुका करा 

Categories
PMC आरोग्य पुणे

लसीकर केंद्रावर डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नेमणुका करा

: शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

पुणे : शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साधारण रोजची पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या चार हजारावर गेलेली आहे. बूस्टर डोससाठी महापालिकेने लसीकरण केंद्रांवर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध केले नसल्यामुळे  केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे तात्काळ या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

: आयुक्तांना दिले पत्र

सुतार यांच्या पत्रानुसार  कोरोनाची तीसरी लाट जर थोपवायची असेल तर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र मनपाने सुरु करणे गरजेचे आहे. 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यास तसेच फ्रंट लाईन वर्कसना व 60 वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देणेबाबत परवानगी देण्यात आली आहे. मनपाने सुद्धा अनेक लसीकरण केंद्रांवर ही सुविधा सुरु केली आहे. परंतु या लसीकरण केंद्रांवर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे लासीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीला नियंत्रित करणे आवश्यक होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद सुद्धा होते आहेत. आपण लसीकरण केंद्रांवर आवश्यक ते डॉक्टर, नर्स, ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची त्वरीत नेमणूक करावी. ही नेमणूक करताना कमीत कमी सहा महिन्यांसाठी करावी. अन्यथा “शिवसेना पक्षामार्फत आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे.