CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!

Categories
Breaking News PMC social पुणे

CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!

CSR | Pune Municipal Corporation | कोविड जागतिक महामारीच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ५४ लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.२२ कोटी रुपये पडून आहेत. अशी माहिती सजग नागरिक मंचाने (Sajag Nagrik Manch) उजेडात आणली आहे. (CSR | Pune Municipal Corporation)


याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि कोविड काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणाऱ्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करायला पुढे येतील का असा विचारही आपल्या व आपल्या अधिकार्यांच्या मनात आला नाही याचे वैषम्य वाटते. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे. यावर कळस म्हणजे या पैशांचा वापर महापालिका इस्पितळ व दवाखाने यातील उपकरणे खरेदीवर करण्याऐवजी आपल्या आरोग्य विभागाने एका खाजगी इस्पितळासाठी ( बोपोडी आय हाॅस्पिटल) दोन कोटी रुपयांची उपकरणे घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. (PMC Pune News)

—-
आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात ही सगळी माहिती मिळाली म्हणून निदान या गोष्टी चव्हाट्यावर तरी आल्या. या ७ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी. अशी आमची मागणी आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे


News Title |CSR | Pune Municipal Corporation | Donation of 7 crores given to Pune Municipal Corporation during Kovid period through CSR went unused!

Announcement of Higher Education Minister | ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात |उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात

|उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने त्यांचे शिक्षण योग्य रितीने झाले नाही, अनेक विषयात ते मागे पडले आणि त्यांच्यावर ‘कोरोना पास’चा शिक्का बसला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत एका विशेष योजनेची घोषणा विधिमंडळात केली.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये कोरोना कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’ हा उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

चालू शैक्षणिक वर्षामधील पदवी व पदव्युत्तरच्या सर्व विषयांसाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त शैक्षणिक उपक्रम आहे व त्यामध्ये सहभागी व्हावे अथवा नाही हे ठरविण्याची विद्यार्थ्यांना मोकळीक असेल. या उपक्रमाची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रत्येक विषय शिक्षकावर देण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

कोरोना काळात शिक्षणात अडथळा आल्याने विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाहीत. त्यामुळे त्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येईल. प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान पाच तासिका आयोजित करायच्या आहेत. सेतू अध्ययन उपक्रमाचे वेळापत्रक महाविद्यालयांनी करून त्याची अंमलबजावणी करायची आहे. शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. प्रथम सत्रात हा उपक्रम १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करायचा आहे तर दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण करता येईल.

या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित पूर्वज्ञान झाले का, याची खातरजमा करण्यासाठी परीक्षा घेण्यात येईल. हा उपक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदविका नापास विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून संधी

कोरोनामुळे विस्कळित झालेली शिक्षण प्रक्रिया ध्यानात घेता अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या यंदा 2022 च्या अंतिम परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थांसाठी एक विशेष बाब म्हणून सप्टेंबर, 2022 मध्ये फेर परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधिमंडळात केली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना एक अधिकची संधी देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांना संबंधित विषयाचे योग्य आकलन व्हावे यासाठी संस्था स्तरावर मार्गदर्शन करणारे रेमेडिअल कोचिंग किंवा ब्रिज कोर्सेस घेण्याचे आदेशही सर्व संस्थांना देण्यात येतील.

राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या स्वायत्त मंडळाद्वारे आयोजित केल्या जातात. कोरोनाच्या महासाथीमुळे तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२०, हिवाळी परीक्षा २०२०, उन्हाळी परीक्षा २०२१ व हिवाळी परीक्षा २०२१ या चार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. त्यानंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली व तिचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर केला आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी यासाठी काही विद्यार्थी, संस्था आणि संघटनांची निवेदने तंत्रशिक्षण मंडळाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी निर्णय जाहीर केला.

Gov will pay the fee | कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई| कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत फी सरकारच्या वतीने भरली जाईल त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी विधानसभेत दिली.

Swine Flu | PMC | शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय  | ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय

| ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण

पुणे | शहरात कोरोना आटोक्यात आलेलें असताना काही दिवसापूर्वी डेंगू ने डोके वर काढले होते. मात्र आता स्वाईन फ्लू ने शहराला विळखा घातलेला दिसतो आहे. कारण मागील काही दिवसापासून शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतो आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरताना दिसतो आहे. कारण जानेवारी ते मार्च पर्यंत शहरात स्वाईन चा एकही सक्रीय रुग्ण नव्हता. एप्रिल आणि मी महिन्यात एक एक रुग्ण सापडला. तर जून महिन्यात २ रुग्ण मिळाले. मात्र जुलै महिन्यात ११० रुग्ण मिळाले. तर याच महिन्यात ७ रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच ८ दिवसात १५९ सक्रीय रुग्ण मिळाले आहेत. तर आतापर्यंत ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून टेस्ट करून sample घेण्याचे काम सुरु आहे. जुलै महिन्यात ४३९ sample घेतले. तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२९ sample घेण्यात आले आहेत.

Monkey Pox | घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश पुणे महाराष्ट्र

घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्यादृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या आजाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार असून १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो या देशात आढळला होता. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डी.एन.ए. प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो. तसेच काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये विषाणू आढळून आल्यामुळे हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत.

आजाराची लक्षणे: ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलिस दुसरी स्टेज, हँड, फूट माऊथ डिसीज इत्यादी मंकी पॉक्स सदृश्य इतर आजार आहेत. मंकी पॉक्स आजारामुळे न्युमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये दृष्टी जाऊ देखील शकते) आदी गुतांगूत निर्माण होऊ शकते. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.

आजाराचा कालावधी: आजाराचा अधिशयन कालावधी ६ ते १३ दिवस असला तरी हा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो. असा बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य रुग्ण असतो.

आजाराचा प्रसार: व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकी पॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे.

संशयीत रुग्णांची ओळख: मागील ३ आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये किंवा राज्यामध्ये प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर अचानक पुरळ उठणे, सूजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला संशयित रुग्ण म्हणून ओळखले जाते.

संभाव्य रुग्णः ज्या कारणाने या आजाराचा प्रसार, संसर्ग होतो अशा प्रकारचा संपर्क संशयित रुग्णांशी आलेली व्यक्ती संभाव्य रुग्ण मानण्यात येते.

निश्चित निदान तंत्र: प्रयोगशाळेत पी.सी.आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या कपड्यांशी अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येवू न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुणांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आदी काळजी घ्यावी.

मंकी पॉक्स सर्वेक्षणः मंकी पॉक्सचा एक रुग्णदेखील साथरोगाचा उद्रेक असल्यास पुरक आहे. अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या रुग्णांचे रक्त, रक्तद्रव, फुटकळ्यातील द्रव आणि मुत्र हे नमुने संकलित करुन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थतेत पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण: मंकी पॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवावे. या ठिकाणी स्वतंत्र वायुविजन व्यवस्था असावी. रुग्णाने त्रिस्तरीय मुखपट्टीचा (ट्रिपल लेयर मास्क) वापर करावा. कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकण्यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट असा पोषाख वापरावा. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तो पर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे. पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घ्यावी.

तज्ञांचा सल्ला: डोळ्यात वेदना होणे अथवा दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे, शुद्ध हरवणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रुग्ण तोंडावाडे अन्न-पाणी न घेणे, रुग्णास प्रचंड थकवा जाणवणे, अशा स्वरुपाची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांना पुढील योग्य उपचारांसाठी संदर्भित केले जाणार आहे.

निकट सहवासितांचा शोध व सनियंत्रण: निकट सहवासितामध्ये मंकी पॉक्ससारखी काही लक्षणे आढळून येत आहेत का हे पाहण्यासाठी बाधित रुग्णाशी त्याचा संपर्क आल्यापासून पुढील २१ दिवस दैनंदिन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याला ताप आल्यास त्याचा प्रयोगशाळा नमुना घेतला जावा. लक्षणे नसली तरीदेखील या सर्वेक्षण कालावधीमध्ये निकटसहवासिताने रक्तदान, अवयवदान अशा बाबी करु नयेत. निकटसहवासित शाळकरी मुलांना सर्वेक्षण कालावधीमध्ये शाळेत जाऊ देवू नये. स्वरुपाच्या आदी उपाययोजना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महत्वाच्या ठरतात.

————
डॉ. अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक: *नागरिकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो. त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्ससदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होवू नये यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
————

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Rapid Test | महापालिका अधिकारी/सेवकाना  रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य  | आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिका अधिकारी/सेवकाना  रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य

| आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश

पुणे |  कोरोना १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या सर्व  कार्यालयाकडील सर्व अधिकारी/सेवकांची रॅपिड कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार याची अंमलबाजवणी करण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी रॅपिड चाचणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरोना १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकारी पुणे यांचे कार्यालयात सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे समावेत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी संपन्न झाली. बैठकीस महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका हे उपस्थित होते. सदर बैठकीत सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपल्या विभागाकडून कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणेसाठी टेक्निशिअनचे पथक नियुक्ती करण्यात यावे व पुढील ३ दिवसांमध्ये उप आयुक्त (परिमंडळ १ ते ५) व सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त (१ ते १५) कार्यालयांकडील सर्व अधिकारी/सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणी करणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत. तरी आपल्या विभागाकडील सर्व अधिकारी / सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणीकरून घेण्यात येऊन तसा अहवाल आरोग्य अधिकारी यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.

Free booster dose | 15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस | ७५ दिवस राहणार सुविधा 

Categories
Breaking News social आरोग्य देश/विदेश

15 जुलैपासून  18 वर्षावरील  नागरिकांना मोफत बुस्टर डोस

| ७५ दिवस राहणार सुविधा

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी 1 टक्‍क्‍यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या सावधगिरीच्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. म्हणजेच दुसऱ्या इंजेक्शननंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेता येतो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरण तीव्र करण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘हर घर दस्तक अभियान 2.0’ ची दुसरी फेरी सुरू केली आहे. ही दोन महिन्यांची मोहीम आता सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील 96 टक्के लोकसंख्येला कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 87 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Corona update in Maharashtra | राज्यातील वाढत्या कोरोनाची केंद्राला चिंता 

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राज्यातील वाढत्या कोरोनाची केंद्राला चिंता

: टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्याने कोरोना (Corona ) बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत असताना केंद्राने राज्याला पत्र पाठवून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सलग हजारांपुढे कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक या जिल्ह्यांनी राज्याच्या चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरदेखील बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.”निर्बंध नको असतील तर मास्क वापरा”; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशाराराज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट 6 टक्के असून राज्याच्या रेटमध्ये वाढ झाली असून तो 3 टक्के झाल्याचे व्यास यांनी यावेळी सांगितले. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या आणि ते व्यवस्थित आहेत हे पाहण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय या रूग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून तेवाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

Pune Corporation employees | 79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!   : सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!

: सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली

: मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते. मात्र महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य दिले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. यासाठी कुठलेही निकष नसतील. फक्त रुग्णालयाचे सर्टिफिकेट लागेल. त्यानुसार यासाठी 84 कर्मचारी पात्र होत आहेत. महापालिकेने आतापर्यंत 79 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख दिले आहेत. 3 कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून मदत मिळाली आहे. बाकी 6 लोकांना लवकरच हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांनी दिली.
 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका
 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली आहे.  महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाईल.  महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले आहे.  कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले आहेत.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 1 कोटीची आर्थिक मदतदिली जाईल.  जर वारसला नोकरी हवी असेल तर नोकरी आणि 75 लाखांची मदत दिली जाईल.  या योजनेशी संबंधित सर्व अधिकार कामगार कल्याण निधी समितीकडे असतील.  या योजनेत दोन टप्पे होते. त्यानुसार केंद्राच्या योजनेत न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी दिले जाणार होते. तर त्या योजनेत बसणाऱ्या लोकांना 50 लाख दिले जाणार होते. मात्र केंद्राकडून थोड्याच लोकांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारने तर आपले हात वर केले होते.
 –  95कर्मचाऱ्यांचा मृत्यू
  या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत 95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे.
: 57 वारसांना नोकरी
याबाबत दौंडकर यांनी सांगितले कि एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारीतर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 79 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे. महापालिकेने यासाठी जवळपास 40 कोटी दिले आहेत.  दौंडकर पुढे म्हणाले, महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे.

Corona virus Update : कोरोनाचा आलेख वाढतोय : केंद्राचे महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

कोरोनाचा आलेख वाढतोय

: केंद्राचे महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र

कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून य़ा राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलावीत, असे म्हटले आहे. यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यास सांगितले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर काळजी घेण्यात चूक झाली तर आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल.

गेल्या दोन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली होती. परंतू आता पुन्हा कोरोनाचे दिवसाला हजारावर रुग्ण सापडू लागले आहेत. साप्ताहिक संक्रमण एक टक्क्यापेक्षा कमी आहे, असे ते म्हणाले.