Rapid Test | महापालिका अधिकारी/सेवकाना  रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य  | आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

महापालिका अधिकारी/सेवकाना  रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य

| आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश

पुणे |  कोरोना १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या सर्व  कार्यालयाकडील सर्व अधिकारी/सेवकांची रॅपिड कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार याची अंमलबाजवणी करण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी रॅपिड चाचणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरोना १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकारी पुणे यांचे कार्यालयात सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे समावेत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी संपन्न झाली. बैठकीस महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका हे उपस्थित होते. सदर बैठकीत सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपल्या विभागाकडून कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणेसाठी टेक्निशिअनचे पथक नियुक्ती करण्यात यावे व पुढील ३ दिवसांमध्ये उप आयुक्त (परिमंडळ १ ते ५) व सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त (१ ते १५) कार्यालयांकडील सर्व अधिकारी/सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणी करणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत. तरी आपल्या विभागाकडील सर्व अधिकारी / सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणीकरून घेण्यात येऊन तसा अहवाल आरोग्य अधिकारी यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.