Corona increasing in Pune : पुण्यात एकाच दिवशी 1104 कोरोना पेशंट  : मुंबई प्रमाणे पुण्यातही चिंता वाढली 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुण्यात एकाच दिवशी 1104 कोरोना पेशंट

: मुंबई प्रमाणे पुण्यातही चिंता वाढली

पुणे : शहर आणि राज्यभरात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतो आहे. मुंबई प्रमाणेच पुणे शहरातही पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मंगळवारी तर 1104 कोरोना पेशंट शहरात आढळून आले. त्या तुलनेत डिस्चार्ज मात्र 151 च झाले. त्यामुळे चिंता वाढली असून सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
शहरात पूर्वी 100-150 च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून यायचे. मात्र मागील आठवड्यापासून यात वाढ होताना दिसते आहे. शहरासह राज्यभरात चिंता वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत पुण्यात मागील दोन तीन दिवसात ही संख्या 400-450 पर्यंत पोचली होती. मंगळवारी मात्र कहर झाला. ही संख्या एकाच दिवशी 1104 झाली. त्यामुळे आता सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान शहरात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 3790 इतकी झाली आहे. त्यातील क्रिटिकल रुग्ण 89 आहेत तर ऑक्सिजन वर 76 रुग्ण आहेत.

Pune : Murlidhar Mohol : निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांशी करणार चर्चा; चिंता नको, काळजी घ्या : महापौर मोहोळ

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांशी करणार चर्चा; चिंता नको, काळजी घ्या : महापौर मोहोळ

– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

पुणे  : ‘गेल्या आठवड्यापासून महापालिका हद्दीत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून महापालिकेची आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, अश्विनी लांडगे, फरजना शेख, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह पक्षनेते, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात ८० टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र प्रत्यक्ष दवाखान्यात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. तरीही आपण पूर्ण क्षमतेने तयारी केली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत ४ हजार रेमिडिसिव्हीर इंजेक्शन, १ हजार ८०० खाटा, ९ हजार ५०० एलपीएमची ऑक्सिजन निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. ऑक्सिजन साठवण करण्याची ९ ठिकाणी सोय करण्यात आली आहे.’

‘शिवाजीनगर जम्बो हॉस्पिटलमध्येही यंत्रणा सज्ज असून कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु करता येऊ शकते. शिवाय एकूण ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि कोरोना सेंटरची संख्या आवश्यकरेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके आणखी सक्रिय केली जाणार आहेत. ही पथके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज असतील, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

Raj Thakarey : corona : राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा 

Categories
Breaking News आरोग्य महाराष्ट्र

राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा

: त्यांच्या आईचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांची आईचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्यानं त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शुक्रवारीच राज ठाकरे यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले होते.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

Corona : positive news : कोरोनाबाबत चांगली बातमी : शहरात आज एक ही मृत्यू नाही 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

कोरोनाबाबत चांगली बातमी : शहरात आज एक ही मृत्यू नाही

 

पुणे : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळून आला होता. तेंव्हापासून पुणेकर कोरोनाचा धीराने सामना करत आहेत. महापालिका आणि इतर प्रशासन देखील याचा प्रकोप कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच लास आल्यामुळे हे काम अधिकच सोपे झाले होते. तरीही शहरात अजूनही कोरोना रुग्णाची संख्या आढळून येतेच आहे. मात्र आता ही संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. कारण गेल्या कित्येक दिवसानंतर शहरातील अक्टीव रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. तीआता ९८८ झाली आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

: अक्टीव रुग्णाच्या संख्येतही घट

शहरात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. मात्र आता त्याचा जोर कमी होताना दिसतो आहे. त्यासाठी महापालिकेच्या  उपाययोजना कामी आलेल्या दिसून येत आहेत. त्याला नागरिकांची देखिल चांगलीच साथ मिळाली आहे. कोरोनाचा  कहर सुरु झाल्यापासून महापालिकेच्या वतीने विभिन्न उपाय योजना राबवल्या आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारची साथ मिळाली. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या लास आल्यामुळे कोरोनाच कहर कमी होण्यात चांगलीच मदत मिळाली. लसीकरणात देखील राज्यात पुणेच पुढे आहे. एवढे करूनही शहरातील अक्टीव रुग्णांची सख्या कमी होत नव्हती. मात्र आता गेल्या दोन आठवड्यापासून याचा जोर पहिल्यापेक्षा कमी होताना दिसतो आहे. कारण आता अक्टीव रुग्णाची संख्या देखील कमी होताना दिसते आहे. गेल्या कित्येक दिवसानंतर अक्टीव रुग्ण संख्या हजाराच्या खाली आहे. अर्थातच रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. दरम्यान त्यानंतर अजून एक चांगली बातमी आली आहे. शहरात बुधवारी एक ही मृत्यू झालेला आढळला नाही. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शहरात दररोज मृत्यू होत होते. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात शून्य मृत्यू आढळले होते. त्यानंतर आताच ही संख्या शून्य वर आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

 

पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.

        मुरलीधर मोहोळ, महापौर