Rahul Gandhi Vs PM Narendra Modi : मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत : कोरोनामुळे पाच  नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू

Categories
Breaking News Political आरोग्य देश/विदेश

मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत

: कोरोनामुळे पाच  नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू

: राहुल गांधी यांचा दावा

करोनाच्या संकटातून सध्या देश लढत पुढे जात आहे. पहिल्या लाटेपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपर्यंत करोनाने देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. त्याचवेळी, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील करोनामुळे मृतांचा आकडा पाच लाख २१ हजार ७५१ वर पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे आकडे खोटे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. करोनामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे करोना व्हायरसमुळे ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखत

“मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत ​​नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही! मी याआधीही म्हटले होते कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे पाच लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडत प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची भरपाई द्यावी,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारताने शनिवारी देशातील कोविड मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या एवढ्या विशाल राष्ट्राच्या मृत्यूच्या आकड्यांचा अंदाज लावण्यासाठी अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर केला जाऊ शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १६ एप्रिल रोजी ‘जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना भारत थांबवत आहे’ या शीर्षकाच्या लेखाला उत्तर म्हणून एक निवेदन जारी केले होते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५५८ वर आली आहे. त्याचबरोबर यामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख २१ हजार ७५१ झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत चार कोटी २५ लाख आठ हजार ७८८ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत चार कोटी ३० लाख ३१ हजार ९५८ लोकांना करोनाची लागण झाली आहे.

XE Variant : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही  : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश

भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही

: केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट आढळून आल्याच्या बातम्यांचा केंद्र सरकारनं इन्कार केला आहे. यासंदर्भात आढळून आलेले पुराव्यांनुसार हा कोरोनाचा नवा व्हेरियंट असल्याचं स्पष्ट होत नाही, असं सरकारनं म्हटलं आहे.

 

सरकारी सुत्रांनी सांगितलं की, नमुन्यांच्या फास्ट क्यू सँपलला XE व्हेरियंट म्हटलं गेलं आहे, ज्याचं परिक्षण INSACOG नं (इंडियन सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्टिअम) केलं आहे. ज्यांनी असा निष्कर्ष काढला की, या प्रकाराची जीनोमिक रचना ‘XE’ च्या जीनोमिक प्रतिमेशी जुळणारी नाही. त्यामुळं सध्या यासंबंधीचे जे पुरावे हाती आले आहेत त्यावरुन हा कोविडचा XE व्हेरियंट असल्याचं सिद्ध होत नाही.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेनं आज माहिती देताना सांगितलं होतं की, नमुन्यांच्या नियमित चाचणीदरम्यान आढळून आलं की, एक रुग्ण हा कोविडच्या Kappa व्हेरियंटन तर आणखी एक रुग्ण XE व्हेरियंटन बाधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही नुकतंच हे जाहीर केलं होतं की, युकेमध्ये XE नावाचा व्हेरियंट आढळून आला असून हा ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा दहापट अधिक संसर्गजन्य आहे. दरम्यान, व्हायरॉलॉजिस्टनं सांगितलं होतं की, जर कोविडच्या नियमांचं तंतोतंत पालन केलं तर ओमिक्रॉन हा वेगानं पसरणारा असला तरी त्यामुळं भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाही.

Prashant Damle : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली भावना 

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल

: प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली भावना

: अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन

पुणे : मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे ही नाटकाशी संबंधित सगळ्या कलाकारंची जबाबदारी असते. कारण नाटक हे टीम वर्क असते. पुण्याचे प्रेक्षक चोखंदळ असून पुण्यात नाटक गाजले की, जगभरात गाजते. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने आगामी वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुढी पाडवा या हिंदू नववर्षा निमित्त कलावंत साहित्य गुढीचे पूजन आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि डॉ. आशिष धांडे यांच्या हस्ते आणि पुण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख आणि पदाधिकारी तसेच ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील कलावंतांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी दामले बोलत होते.

यावेळी पुणे महानगर पालिकेतील शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष आणि संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संगीता बर्वे, नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख प्रकाश पारखी, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील मते, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे, अॅड. अर्चिता जोशी, समीर हंपी, सत्यजीत धांडेकर, प्रवीण बर्वे, दीपक गुप्ते, केतकी बोरकर, तसेच अभिनेत्री पौर्णिमा अहिरे, उदय लागू यांच्यासह ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातील सगळे कलाकार उपस्थित होते.

यावेळी सावनी रवींद्र यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून ‘कौसल्येचा राम बाई’ या गीताच्या काही ओळी सादर केल्या. वर्षा उसगावकर, पृथ्वीराज सुतार, सुनीताराजे पवार, प्रकाश पारखी, निकीता मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजना मागील भूमिका विशद केली. सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.

 

Corona In Pune : शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर : शहरातील कोरोना ओसरत चालला 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

: शहरातील कोरोना ओसरत चालला

पुणे  : कोरोनाची तिसरी लाट (corona cases in pune decreasing) आता पूर्णत: ओसरली असल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे. शनिवारी  केवळ एकाच रुग्णाला ऑक्सिजनची गरज असून, कोणताही कोरोनाबाधित व्हेंटिलेटरवर अथवा आयसीयूमध्ये नाही. शनिवारी दिवसभरात केवळ 10 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यांनाही सौम्य लक्षणे आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 1 हजार 670 जणांनी कोरोना चाचणी करून घेतली. यापैकी बधितांची टक्केवारी फक्त अर्धा टक्का आहे. शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 166 इतकी असून, यापैकी 2.76 टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची आहे. परंतु यापैकी बहुतांशी जण हे अन्य व्याधींनी त्रस्त आहेत व काही जण वयोवृद्ध आहेत.

शनिवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू शहरात झालेला नाही. आजपर्यंत शहरात एकूण 45 लाख 31 हजार 902 जणांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. यापैकी 6 लाख 61 हजार 707 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 6 लाख 52 हजार 193 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 348  झाला आहे.

Mask Wearing : DCM Ajit Pawar : बाबांनो कोरोनाला हलक्यात घेऊ नका  : मास्क न घालणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बाबांनो कोरोनाला हलक्यात घेऊ नका

: मास्क न घालणाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना पवार भेटी देणार आहेत. यावेळी कात्रज येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मास्क घालण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका, चीनमध्ये अजूनही हा वेगाने पसरत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

चीनमध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे मागील वर्षी कोरोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम सुरु होते. पण आता कोरोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलाय. असं चालणार नाही. असं पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये तेव्हाच मी मास्क काढतो. तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क झोपताना तेवढा मास्क काढतो. अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी कोरोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.

No Restrictions : राज्यात निर्बंधांत शिथीलता : ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

राज्यात निर्बंधांत शिथीलता

: ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश

 

मुंबई,  :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या भागतील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले आहे.

राज्य कार्यकारी समितीची 25 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार 4 मार्च 2022 मध्यरात्री 12.00 पासून केली जाणार आहे. हे निर्देश पुढील आदेशांपर्यंत अमलात राहणार आहे.

व्यक्तीचे “पूर्ण लसीकरण” याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सगळी मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अ प्रशासकीय घटक

१-महानगरपालिकांना एक वेगळे प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यातील इतर क्षेत्राला दुसरे एकल प्रशासकीय घटक म्हणून गृहीत धरले जाईल.

२- जे प्रशासकीय घटक खालील अटी पूर्ण करतील त्यांचा ‘अ’ सुचित समावेश असेल

अ- पहिली लस घेतलेल्यांची संख्या 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल;

ब- दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्केपेक्षा जास्त असेल;

क- पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल;

ड- ज्या ठिकाणी प्राणवायू आधारित बेडची संख्या किंवा आयसीयूमधील ४० टक्क्यांपेक्षा कमी बेड रुग्णांनी भरलेले असतील.

ब- वेग वेगळी स्थिती

सर्व ठिकाणी एक सारखी परिस्थिती नसेल आणि यामुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन या मापदंडांचा आकलन करून आपल्या क्षेत्रातील ‘अ’ किंवा ‘ब’ प्रशासकीय घटक सामान्य लोकांसाठी माहिती देतील आणि चालू स्थितीच्या आधारे एखाद्या प्रशासकीय घटकाला यादीमधुन वगळायचे की त्यात सामील करायचे, हे ठरवले जाईल. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या संमतीने घेतील. एकदा एखाद्या प्रशासकीय घटकाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा यादीतून वगळण्यात आले, तर त्या ठिकाणी निर्बंध/ शिथिलतेचे मापदंड तत्काळ बदलतील.

क- पूर्ण लसीकरणासाठी आवश्यकता

१-सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असलेले सर्व आस्थापनांच्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

२-होम डिलिव्हरी करणाऱ्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल;

३-सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक असेल;

4 -सर्वसामान्य लोक जमा होतात अशा सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल, थेटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, उपहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

5- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अश्या सर्व ठिकाणी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना भेट देण्याची परवानगी देतील की जेथे जास्त लोकांचा संपर्क येतो आणि कोविड-१९ चा प्रसार होण्याची शक्यता आहे किंवा कोविड सुयोग्य व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.

६-लोकांशी संपर्क येत असलेल्या कोणत्याही खाजगी, सार्वजनिक किंवा शासकीय कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक असेल.

७-औद्योगिक कार्यकलापात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण लसीकृत असणे अनिवार्य असेल.

ड ‘अ’ यादीतील प्रशासकीय घटकांमध्ये ज्या सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारोह, अंतिम यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थिती मुभा देण्यात आली आहे परंतु एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक जमणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर निर्बंध घालू शकतील. ज्या प्रशासकीय घटकांचा ‘अ’ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी वरील प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत उपस्थितीस परवानगी असेल किंवा 200 जणांची उपस्थितीचे (जी कोणती कमी असेल) मुभा असेल.

ई- सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागाच्या आदेशाच्या अधीन राहून ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी असेल. अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकांना ऑफलाइन सहित ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. सर्व अंगणवाड्या व प्री-शाळांना वर्ग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा सर्व संस्था आणि आस्थापनांना कोविड सुयोग्य व्यवहाराचे अनुपालन करावे लागतील.

फ- सर्व प्रशासकीय घटकांसाठी सर्व प्रकारचे होम डिलिव्हरी सेवांसाठी मुभा असेल.

ग- ‘अ’ यादीत सामील असलेल्या प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. इतर प्रशासकीय घटकांना क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ने संचलनास परवानगी देण्यात आली आहे.

ह- पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्य अंतर्गत प्रवास करण्यास परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये- जा करणाऱ्या पूर्णपणे लसीकृत नसलेल्या लोकांना 72 तासाच्या आत मध्ये चाचणी करून आणलेले आर टी पी सी आर अहवाल दाखवणे बंधनकारक असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची हरकत नसल्यास, अशा प्रकारच्या प्रवासासाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसेल.

आय- शासकीय व खाजगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची परवानगी असेल.

जे- सर्व उद्योग आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेसह काम करू शकतील.

के- या आदेशात सामील नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त ‘अ’ यादी मध्ये समावेश असेल तरच शंभर टक्के क्षमतेने संचलनाची परवानगी असेल आणि यादी ‘ब’ मध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेची अट लागू असेल. अन्वयार्थ लावण्यात वाद असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अंतिम निर्णय घेतील.

एल- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने आणखी जास्त कठोर निर्बंध लादण्याची अनुमती असेल. जिल्हास्तरावर या प्रशासनाने वारंवार बैठका, किमान आठवड्यातून एक बैठक, घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा.

एम- जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि लसीकरणाची गती वाढवावी. ‘अ’ यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या प्रशासकीय घटकांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. सध्या अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी लसीकरण आवश्यक नसले तरी निकट भविष्यात त्यांनाही लस घेणे आवश्यक ठरू शकते. पात्र वयस्क लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून डोस घ्यावे. सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे की नाही याची जिल्हा प्रशासनाने सहनिशा करून घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे.

एन- चालू कोविड परिस्थितीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती द्यावी. त्याचप्रमाणे चाचणीसाठीची मूलभूत सुविधा याबाबतची लोकांना माहिती द्यावी. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होणार नाही आणि लोक घाबरणार नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये लोकांना या कार्यात समाविष्ट करून घ्यावे आणि कोविड नियमांचे सुयोग्य वर्तन होत असल्याची खात्री करावी. समाजाला पुरावे आधारित माहिती वेळोवेळी द्यावी.

ओ- कोविड-१९ च्या परिस्थितीत कधीही बदल होऊ शकते. म्हणून जिल्हा प्रशासन तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि दररोजच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असेल.

‘अ’सूचीतील यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Mayor : Murlidhar Mohol : Pune : महापौरांना कोरोनाची लागण! 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापौरांना कोरोनाची लागण!

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौरांनी ही माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान आपली प्रकृती स्थिर असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. या अगोदर पहिल्या लाटेत देखील महापौरांना कोरोना होऊन गेला आहे.

: पहिल्या लाटेत देखील झाला होता कोरोना

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.
दरम्यान या अगोदर पहिल्या लाटेत देखील महापौरांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत.

Pune : Corona : Active cases : शहरातील Active केसेस ११ हजाराच्या पार : आज नवे २४७१ रुग्ण मिळाले

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

शहरातील Active केसेस ११ हजाराच्या पार

: आज नवे २४७१ रुग्ण मिळाले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (शनिवार, ८ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २ हजार ४७१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ११ हजार ५५० झाला आहे.

शनिवारी  पुण्यात ७११  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२६  वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत.

– दिवसभरात 2471 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 711 रुग्णांना डिस्चार्ज.
– 02 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
522006
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11550
– एकूण मृत्यू – 9126
– एकूण डिस्चार्ज- 501330
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- 19186

Pune : Corona : पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख  : आज मिळाले 2284 पॉजिटीव्ह रुग्ण 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख

: आज मिळाले 2284 पॉजिटीव्ह रुग्ण

पुणे : पुणे शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 2000 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर आज 2284 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7665 झाली आहे.

:आज 3 मृत्यू

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून महापालिकेने पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद केल्या आहेत. शिवाय काही नियम देखील कडक केले आहेत. मात्र शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 1800 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले होते.  तर आज 2284 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7665 झाली आहे.गुरुवारी  शहरात 3 मृत्यू होते.

6 जानेवारी – गुरुवार

– दिवसभरात 2284 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 80 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 एकूण 04 मृत्यू.

– 106 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 516778

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7665

– एकूण मृत्यू – 9122

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499991

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15715

Pune : School Closed : Ajit Pawar : पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद! : नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद!

: नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील

: पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आता मास्क नसेल तर पाचशे रुपयांचा दंड होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांनी शाळांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुढे त्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत म्हटलंय की, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि कोर्पोरेशनबाबत पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून नववी-दहावीचे वर्ग चालू राहिल. मात्र, पहिली ते आठवीचे यांचं ऑनलाईन शाळा कामकाज सुरु राहिल. नववी-दहावीचे विद्यार्थी आले पाहिजेत कारण त्यांना लस द्यायची आहे. डी जी भार्गव यांनी देखील सांगितलं की, ही जर परिस्थिती 10 टक्के पॉझिटीव्हीटीची तर तुम्ही निर्णय घ्या. पुणे शहरामध्ये पॉझिटीव्हीटीचा दर 18 टक्क्यापर्यंत गेला आहे. या परिस्थितीतच काळजी करण्याचं कारण बनतं. म्हणूनच काळजीपोटी हे निर्णय घेण्यात येत आहे. पुढील तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सध्या 105 देशांत आणि भारतातील 23 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात 11 ठिकाणी सापडले आहेत.

अजित पवार यांनी पुणेकरांना इशारा देत म्हटलंय की, पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस न घेतल्यास इथून पुढेही कठोर निर्णय घेऊ. इतर देशात एकदम पॉझिटीव्हीटीचा दर वाढलेला दिसून आला आहे. म्हणून आपण 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. चार टक्के लसीकरण काल पूर्ण केलंय मुलांचं. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यात आज 1 हजार 104 कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्व नागरिकांनी थ्री फ्लायर डबल असा चांगला मास्क वापरावा.

पुण्यात असे असतील निर्बंध

  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड
  • मास्क नसताना थुंकला तर 1000 रुपये दंड
  • लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, कुठेही प्रवेश मिळणार नाही.