Raj Thackeray : तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही : राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही

: राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे  (MNS Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यानंतर ते पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंनी बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पक्षातील पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांच्या बैठका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत. तसेच आताच्या दौऱ्यात राज ठाकरे कामाचा आढावा घेत आहेत.

पुण्यात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी एक खंत बोलावून दाखवली. पूर्वी खरंच बरं होतं. जेव्हा मला लोक भेटायचे, तेव्हा तिथले विषय सांगायचे, घरच्या काही गोष्टी सांगायचे. मात्र आता जे मला भेटतात ते फक्त फोटो काढतात आणि निघून जातात. तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच ते मतदारसंघानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यात ते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवतानाच उमेदवारांचीही चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.

पुण्यात राज ठाकरेंनी चिमुकल्याचं केलं नामकरण-

राज ठाकरे यांना पुणे दौऱ्यावर असताना एक वेगळाच अनुभव आला आहे. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परभणीचे जिल्ह्यातील एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली. केसरीवाड्यातील बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज ठाकरे यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले होते. पण नंतर मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला ‘यश’ हे नाव दिलं.

Raj Thakarey : corona : राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा 

Categories
Breaking News आरोग्य महाराष्ट्र

राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा

: त्यांच्या आईचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांची आईचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्यानं त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शुक्रवारीच राज ठाकरे यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले होते.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.