Health Workers : Prithviraj Sutar : लसीकर केंद्रावर डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नेमणुका करा 

Categories
PMC आरोग्य पुणे
Spread the love

लसीकर केंद्रावर डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नेमणुका करा

: शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

पुणे : शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साधारण रोजची पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या चार हजारावर गेलेली आहे. बूस्टर डोससाठी महापालिकेने लसीकरण केंद्रांवर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध केले नसल्यामुळे  केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे तात्काळ या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

: आयुक्तांना दिले पत्र

सुतार यांच्या पत्रानुसार  कोरोनाची तीसरी लाट जर थोपवायची असेल तर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र मनपाने सुरु करणे गरजेचे आहे. 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यास तसेच फ्रंट लाईन वर्कसना व 60 वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देणेबाबत परवानगी देण्यात आली आहे. मनपाने सुद्धा अनेक लसीकरण केंद्रांवर ही सुविधा सुरु केली आहे. परंतु या लसीकरण केंद्रांवर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे लासीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीला नियंत्रित करणे आवश्यक होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद सुद्धा होते आहेत. आपण लसीकरण केंद्रांवर आवश्यक ते डॉक्टर, नर्स, ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची त्वरीत नेमणूक करावी. ही नेमणूक करताना कमीत कमी सहा महिन्यांसाठी करावी. अन्यथा “शिवसेना पक्षामार्फत आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे.

Leave a Reply