DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.
पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. मात्र उद्याच्या बैठकीत यातील प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठीच पदोन्नती होणार आहे. उपअधिक्षक आणि वरिष्ठ लिपिक बाबत काही काळाने निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय या बैठकीत, मोटर वाहन विभागाकडील विविध पदे, क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती होणार आहे. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

उद्याच्या पदोन्नती समिती बैठकीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक
2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी
3. मोटर वाहन विभागाकडील विविध पदे
4.  क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे
5. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक
6. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)
——-