PMC Recruitment | स्वच्छता निरिक्षक पदाची अनुभवाची अट रद्द करण्याची मागणी | काँग्रेस शिष्टमंडळाकडून मनपा आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

स्वच्छता निरिक्षक पदाची अनुभवाची अट रद्द करण्याची मागणी

| काँग्रेस शिष्टमंडळाकडून मनपा आयुक्तांना निवेदन

पुणे | पुणे महानगरपालिकेने सरळ सेवा पदभरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली असून या जाहिरातीतील वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी ५ वर्षांच्या अनुभवाची अट घातलेली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कडून करण्यात आली आहे. काँग्रेस कडून याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या निवेदनानुसार वास्तविक महाराष्ट्रातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांनी रॉनिटरी इन्स्पेक्टर या पदाची तात्पुरती भरती केलेली नाही. कंत्राटी अथवा हंगामी स्वरूपाची भरती ही कायदेशिररित्या १ वर्षाकरीता ग्राह्य असते. यामुळे ५ वर्षे अनुभव असलेले उमेदवार मिळणे निश्चितच कठिण बाब आहे. तात्पुरती शासकीय अनुभव असलेल्या ठिकाणी महाराष्ट्रात स्वच्छता निरिक्षकाचे प्रशिक्षण घेतलेले अंदोज दहा हजार विद्यार्थी आहेत. परंतु आपल्या ५२ वर्षांच्या अनुभवाच्या अटीमुळे त्यांना या पदासाठी परिक्षा देता येणार नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, म. न. पा. च्या वतीने भरती प्रक्रियेत निर्देशित केलेली अनुभवाची अट ही अन्यायकारक असून काही उमेदवारांना मॅनेज करण्यासाठी ही गैर लागू अट समाविष्ट करण्यात आली आहे, असे बहुतांशी इच्छुक उमेदवारांचे मत आहे. सद्य स्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे अनुभवाची अट समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेने वस्तूस्थितीचे आकलन करून स्वच्छता निरिक्षक पदाकरीता अनुभवाची अट रद्द करावी अशी आमची मागणी आहे.