PMC Sanitory Inspector | तब्बल 8-10 वर्षानंतर आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या!

Categories
Uncategorized

PMC Sanitory Inspector | तब्बल 8-10 वर्षानंतर आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या!

| कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून केल्या बदल्या

PMC Sanitory Inspector | पुणे महापालिकेतील घनकचरा विभागातील (PMC Solid Waste Management Department) आरोग्य निरीक्षक (Sanitory Inspector) आणि विभागीय आरोग्य निरीक्षकांच्या (Divisional Sanitory Inspector) नुकत्याच बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. गेल्या 8-10 वर्षांपासून या बदल्या झाल्याच नव्हत्या. महापालिका प्रशासनाकडून (PMC Administration) सध्या तरी फक्त 20% बदल्या केल्या आहेत. दरम्यान यासाठी घनकचरा विभागाकडून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून या बदल्या केल्या आहेत. अशी माहिती घनकचरा विभागाच्या प्रमुख आणि उपायुक्त आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांनी दिली. (PMC Sanitory Inspector)
आरोग्य निरीक्षक आणि विभागीय आरोग्य निरीक्षकांच्या गेल्या 8-10 वर्षांपासून बदल्या झाल्या नसल्याने या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती. तसेच आपली बदली होणार नाही, अशी भावना या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. हीच मक्तेदारी मोडण्याचे काम घनकचरा विभागाकडून (PMC Solid waste management Department) करण्यात आले. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण 180 आरोग्य निरीक्षक आहेत. त्यापैकी 34 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 16 विभागीय आरोग्य निरीक्षकांपैकी 4 जणांच्या बदल्या करण्यात आल्या. 15 क्षेत्रीय कार्यालयात या बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभाग, घनकचरा विभाग आणि मंडई विभागात या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना समुपदेशन करून त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार 90% अधिक कर्मचाऱ्यांना त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली देण्यात आली. त्यानुसार 16 जून ला कर्मचाऱ्यांना रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. असे  उपायुक्त राऊत यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation)
News Title | PMC Sanitary Inspector |  Transfers of Sanitory inspectors after 8-10 years! |  Transfers made after counseling the employees

PMC Recruitment | स्वच्छता निरिक्षक पदाची अनुभवाची अट रद्द करण्याची मागणी | काँग्रेस शिष्टमंडळाकडून मनपा आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्वच्छता निरिक्षक पदाची अनुभवाची अट रद्द करण्याची मागणी

| काँग्रेस शिष्टमंडळाकडून मनपा आयुक्तांना निवेदन

पुणे | पुणे महानगरपालिकेने सरळ सेवा पदभरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली असून या जाहिरातीतील वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी ५ वर्षांच्या अनुभवाची अट घातलेली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कडून करण्यात आली आहे. काँग्रेस कडून याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या निवेदनानुसार वास्तविक महाराष्ट्रातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांनी रॉनिटरी इन्स्पेक्टर या पदाची तात्पुरती भरती केलेली नाही. कंत्राटी अथवा हंगामी स्वरूपाची भरती ही कायदेशिररित्या १ वर्षाकरीता ग्राह्य असते. यामुळे ५ वर्षे अनुभव असलेले उमेदवार मिळणे निश्चितच कठिण बाब आहे. तात्पुरती शासकीय अनुभव असलेल्या ठिकाणी महाराष्ट्रात स्वच्छता निरिक्षकाचे प्रशिक्षण घेतलेले अंदोज दहा हजार विद्यार्थी आहेत. परंतु आपल्या ५२ वर्षांच्या अनुभवाच्या अटीमुळे त्यांना या पदासाठी परिक्षा देता येणार नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, म. न. पा. च्या वतीने भरती प्रक्रियेत निर्देशित केलेली अनुभवाची अट ही अन्यायकारक असून काही उमेदवारांना मॅनेज करण्यासाठी ही गैर लागू अट समाविष्ट करण्यात आली आहे, असे बहुतांशी इच्छुक उमेदवारांचे मत आहे. सद्य स्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे अनुभवाची अट समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेने वस्तूस्थितीचे आकलन करून स्वच्छता निरिक्षक पदाकरीता अनुभवाची अट रद्द करावी अशी आमची मागणी आहे.