Tag: Aasha Raut
PMC Education Department | Transfer | शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत यांची बदली | आशा उबाळे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी
| राज्य सरकार कडून करण्यात आली बदली
| माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदी आशा उबाळे
PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर!
| Toilet Seva App चे उद्या उदघाटन
—-
PMC Sanitory Inspector | तब्बल 8-10 वर्षानंतर आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या!
| कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून केल्या बदल्या
Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन
| 5 हजाराहून अधिक पुणेकरांचा सहभाग
महानगरपालिकेचे ब्रॅंड अम्बॅसेडर सत्या नटराजन हे उपस्थित होते. या शिवाय एस एम जोशी पूल वारजे व मगरपट्टा चौक ते गाडीतळ चौक हडपसर, शास्त्री नगर,आगाखान पॅलेस ते रामवाडी पोलीस चौकी, आगाखान पलेस मधील आतील परिसर, गोल्फ क्लब चौक ते आंबेडकर चौक ते ठाकरे चौक ते शादल बाबा चौक, माता रमाई आंबेडकर पुतळा ते आर.टी.ओ चौक, सुतारवाडी आरोग्य कोठी अंतर्गत पाषाण सुसरोड शिवशक्ती चौक ते राज जिजामाता चौक सुसखिंड, कर्वे पुतळा ते वनदेवी चौक उजवी बाजू, तीन हत्ती चौक ते दत्तनगर भुयारी मार्ग, चुना भट्टी ( पु. ल. देशपांडे उद्यान मागील बाजू) ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयापर्यंत कॅनॉल रोड, एस. एम. जोशी पूल ते रजपूत वीटभट्टी नदी पात्र, संविधान चौक ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, खडी मशीन चौक ते सोमाजी चौक, लोकमान्य नगर जॉगिंग पार्क, डुल्या मारुती चौक ते बेलबाग चौक, पुष्पमंगल कार्यालय ते महेश सोसायटी. या विविध ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये बुई पुणेकर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, जनवाणी, कमिन्स इंडिया, नेहरू युवा केंद्र, आदर पुनवाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, सिटी बैंक, EFI (Environment Foundation of India), NFF चे विद्यार्थी, एलटीज स्कूल फौंडेशन, हर्षदीप फौंडेशन, रोटरी क्लब, सेवा संवर्धन फौंडेशन, बिईंग वॉलेंटियर अशा विविध स्वयं सेवी संस्थांनी देखील सहभाग घेतला. (PMC Pune)
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ!
| “स्वच्छोत्सव २०२३” अभियान अंतर्गत गोवा शहरातील महिला स्वच्छतादूत व समन्वयक यांची पुणे शहरातील स्वच्छता यात्रा
कात्रज K-3 व K-4 बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली. याठिकाणी उपस्थित सर्व महिला स्वच्छतादूतांशी संवाद साधला. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ज्यूट बॅग, पुणे शहराचे वैशिष्ट सांगणारे कॅलेंडर व इतर काही पर्यावरणपूरक भेटवस्तू देऊन या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेअंतर्गत चालणा-या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या फिल्स, गाणी देखील दाखविण्यात आले. उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत महिलांच्या सहभागातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.
२०१८ मध्ये चालू केलेले काम कोव्हीड नंतर देखील चालू असून येथे कचरा वर्गीकरण व संकलनाचे काम यशस्वीरीत्या चालू असल्याचे दाखले त्यांनी महिलांना दिले तसेच हे काम गोव्यात घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुणे शहरातील विविध महिला बचत गट व संस्थांनी देखील आपण करत असलेल्या कामाची माहिती आलेल्या पाहुण्यांना दिली व सर्व महिला एक आहेत असा संदेश देखील दिला. यावेळी संदीप क्षीरसागर, संपत खैरे, वैजनाथ गायकवाड, समीर गायकवाड, युवराज चाबुकस्वार यांसह जनवानी, हर्षदीप, सेवा सहयोग, पुणे महानगपालिका व कमिन्स इंडिया
फाउंडेशनचे पदाधिकारी व लक्ष्मीनगर येथील नागरिक उपस्थित होते. यानंतर वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत मल्टी स्पाईस हॉटेल याठिकाणी शहरातील विविध नागरिकांनी पुर्नवापर व पुर्नचक्रिकरण करून बनवलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तुंच्या प्रदर्शनाची पहाणी करण्यात आली.
प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा | 7 टन 68 किलो प्लास्टिक बॉटल जमा
पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 7 टन 68 किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय आहे. अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली होती.
—
समाज विकास विभागाची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे
प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली
पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
सार्वजनिक स्वच्छतेसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई पथकाची स्थापना
पुणे | पुणे शहरात १६ व १७ जानेवारी ला G -20 बैठक होणार आहे. या बैठकीत G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येत आहे. परंतु वॉल पेंटिंग व सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी नागरिक थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
या विशेष पथकामार्फत दिनांक १०/०१/२०२३ रोजी एकूण २३ केसेस व र.रु.२३०००/- इतका दंड वसूल करण्यात आला. दिनांक ११/०१/२०२३ रोजी एकूण २९ केसेस व र.रु.२९०००/- इतका दंड वसूल करण्यात आला. दिनांक १२/०१/२०२३ रोजी एकूण ७१ केसेस व र.रु. ७१०००/- याप्रमाणे आत्ता पर्यंत एकूण १२३ केसेस व र.रु.१,२३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांकडून दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली जाते त्या नागरिकांकडून थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली जात आहे.
शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकविण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा थुंकल्यास महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.