Anti-Spitting Action | सार्वजनिक स्वच्छतेसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई पथकाची स्थापना 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

 सार्वजनिक स्वच्छतेसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई पथकाची स्थापना

पुणे | पुणे शहरात १६ व १७ जानेवारी ला G -20 बैठक होणार आहे. या बैठकीत G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येत आहे. परंतु वॉल पेंटिंग व सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी नागरिक थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.

या विशेष पथकामार्फत दिनांक १०/०१/२०२३ रोजी एकूण २३ केसेस व र.रु.२३०००/- इतका दंड वसूल करण्यात आला. दिनांक ११/०१/२०२३ रोजी एकूण २९ केसेस व र.रु.२९०००/- इतका दंड वसूल करण्यात आला. दिनांक १२/०१/२०२३ रोजी एकूण ७१ केसेस व र.रु. ७१०००/- याप्रमाणे आत्ता पर्यंत एकूण १२३ केसेस व र.रु.१,२३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांकडून दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली जाते त्या नागरिकांकडून थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली जात आहे.

शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकविण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा थुंकल्यास महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.