PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार! | महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार!

| महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

PMC Pune Disaster Management – (The Karbhari News Service) – पावसाळ्यापुर्वी (Premonsoon) व पावसाळ्यादरम्यान (Monsoon) करावयाची आपत्कालीन कामे व आपत्ती व्यवस्थापन याकरीता आपत्कालीन कार्यकेंद्र (Disaster Centre) स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (Ward office) आपत्कालीन केंद्र आणि पूर नियंत्रण कक्ष (Flood control room) स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले  (PMC commissioner Dr Rajendra Bhosale IAS) यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (PMC Pune Disaster management)

पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्या दरम्यान आणि आपत्ती व्यवस्थापनाकरीता महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावर  आपत्कालीन कार्य केंद्र असणे आवश्यक आहे. आपत्कालीन कार्यकेंद्रात संपर्क यंत्रणा उभारुन क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करावी व याकरीता नोडल ऑफिसरची नेमणुक करण्यात यावी.  1 जुन पासून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वॉर रूम / पूर नियंत्रण कक्ष (War room) स्थापन करावा. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (PMC Pune Marathi News)
आयुक्तांनी पुढे म्हटले आहे कि  31 डिसेंबर 2024  पर्यंत आपत्कालीन केंद्र २४x७ तास सुरु राहील याची दक्षता घ्यावी व याकरीता स्टाफची नेमणुक करण्यात यावी. आपत्कालीन केंद्रामध्ये २४ तास संपर्क होऊ शकेल असा दुरध्वनी क्रमांक, नोडल ऑफिसरचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय. डी व त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर पुरविण्यात आलेल्या वायरलेसयंत्रणा यांचा उपयोग करुन मुख्य आपत्कालीन केंद्राशी जोडण्यात यावा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संपुर्ण माहिती मुख्य आपत्कालीनकेंद्र, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथे दुरध्वनी क्रमांक०२० – २५५०६८००/1/2/3 व ०२० २५५०१२६९ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. (PMC Pune disaster management department)
2024 मध्ये पावसाळी लाईनची साफसफाई, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच नाले व कलव्हर्टची साफसफाईची कामे मुख्य खात्यांमार्फत करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने मुख्य खात्यामार्फत क्षेत्रिय स्तरावरनैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढविल्यास तात्काळ प्रतिसाद देणेकरीता टिम तयार ठेवावी जेणे करुन इमारतकोसळणे, नाला- ओढयाचे पाणी शहरातील विविध भागात शिरणे, नागरिकांना स्थलांतरीत करणे इत्यादी घटनांमध्ये सदर कर्मचाऱ्यांची मदत होईल. अग्निशमन दला मार्फत प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात घ्यावी. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-

PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका

| 95 लाखांचा येणार खर्च

PMC Wheelbarrow | पुणे महापालिकेच्या )Pune Municipal Corporation) विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कचरा गोळा केला जातो. हा संकलित केलेला कचरा वाहतुक करण्यासाठी ढकल गाड्यांची (Pushkarts) आवश्यकता असते. त्यामुळे क्षेत्रीय कार्याकाया कडून मागणी केली जाते. त्यानुसार 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो (Wheelbarrow) महापालिका खरेदी करणार आहे. यासाठी 95 लाखांचा खर्च येणार आहे. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)

पुणे मनपा मोटार वाहन विभागाच्या कर्मशाळा विभागाकडून मनपाच्या विविध कार्यालयातील लाकडी फर्निचर दुरुस्ती, नवीन तयार करणे तसेच कचरा संकलनासाठी उपलब्ध तरतूदीनुसार ढकलगाडे, व्हिलबॅरो खरेदी करुन पुरविणे त्यांची दुरुस्ती करणे व इतर तदनुषंगिक कामे करण्यात येतात. पुणे मनपाच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीमधील विविध ठिकाणावरून ओला व सुका कचरा संकलनाचे काम मनपा सेवक व स्वच्छ संस्थेमार्फत करण्यात येते. विविध ठिकाणावरून संकलित केलेला कचरा उचलणे व तो अनलोडिंगच्या ठिकाणापर्यंत वाहतुक करणेसाठी सेवकांमार्फत ढकलगाडे, व्हिलबॅरो, गाळगाडे यांचा वापर केला जातो. (PMC Solid Waste Management Department)

केंद्र शासनाकडील १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पुणे महानगरपालिकेला सन २०२०-२१ ते २०२५-२६ एस डब्ल्यू वॉटरसाठी सुमारे ४५८ कोटी टप्याटप्याने वितरीत करण्यात येत आहे. यामधील पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार २ बकेट असलेली १५०० नग व्हिलवॅरो (पुशकार्टस) व ४ बकेट असलेली १५०० नग ढकलगाड्या (पुशकार्टस) खरेदी करणे कामी  महापालिका आयुक्त यांची मान्यता मिळाली आहे.
तथापि, मोटार वाहन विभागाकडे याकामासाठी तांत्रिक सेवकवर्ग अत्यंत अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने घनकचरा विभागाचे मागणीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयासाठी २ बकेटसह असलेले व्हिलबॅरो (पुशकार्टस) पद्धतीने जाहीर निविदा मागवुन खरेदी करणे प्रस्तावित होते.  त्यानुसार याची टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. यासाठी 95 लाख इतका खर्च येणार आहे.

Ganesh Utsav 2023 | PMC Pune | गणेशोत्सव २०२३ करिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयारी पूर्ण 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Ganesh Utsav 2023 | PMC Pune | गणेशोत्सव २०२३ करिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयारी पूर्ण 

 

Ganesh Utsav 2023 | सालाबादप्रमाणे यंदाचा  सार्वजनिक गणेशोत्सव  १९ ते  २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने गणेशोत्सवाकरिता जय्यत तयारी करण्याचे काम चालू असून पुणे महानगरपालिकेचे १५ क्षेत्रिय कार्यालये (15 Ward offices), विविध विभाग यांचे वतीने सर्व स्तरावर तयारी करण्यात आलेली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीचे दृष्टीने १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचे परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाèयांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे.  सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे.

प्रमुख विसर्जन घाट खालीलप्रमाणे.

 

१.    संगम घाट १०. नेने/आपटे घाट
२.    वृध्देश्वर घाट / सिध्देश्वर घाट ११. ओंकारेश्वर
३.    अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ) १२. पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे
४.    बापूघाट (नारायण पेठ) १३. खंडोजी बाब चौक
५.    विठ्ठल मंदिर (अलका चौक) १४. गरवारे कॉलेजची मागील बाजू
६.    ठोसरपागा घाट १५. दत्तवाडी घाट
७.    राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर १६. औंधगाव घाट
८.    चिमा उद्यान येरवडा १७. बंडगार्डन घाट
९.    वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १नदीकिनार १८. पांचाळेश्वर घाट

 

आरोग्य विभागाच्या वतीने केलेली तयारी

आरोग्य खात्याकडे ४ मोबाईल क्लिनिक असून त्या गणेश विसर्जन मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मोबाईल क्लिनिक मार्फत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जातील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सर्व मोबाईल क्लिनिक सोबत १०८ च्या अॅम्ब्युलन्स  सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान पुणे महानगरपालिके अंतर्गत असणारे सर्व दवाखाने व रुग्णालयामध्ये मोफत औषधोपचार देण्यात येतील.

सर्व गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष यांना भेटून हस्त पत्रिके वाटप करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणच्या गणेशोत्सव मंडप व विसर्जन हौद  येथे आरोग्य विषयी बॅनर्स लावणेत येणार आहेत. टेम्पोद्वारे आरोग्य विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

पुणे महानगरनपालिका आरोग्य विभागाच्या वतीने पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत नागरिक, युवक युवतीनां एच आय व्ही, एड्सबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून या विषयाची माहिती जास्तीत जास्त ठिकाणी देण्याकरिता पथनाट्याद्वारे ८ दिवसामध्ये १२० कार्यक्रम करून  जनजागृती करणेत येणार आहे.  टेम्पोद्वारे डिस्प्ले, आय.ई.सी. अॅक्टिव्हिटी,   handbil, पुस्तिका वाटप, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वतंत्र जनजागृती वाहन तयार करण्यात आले आहे. समुपदेशकांद्वारे नागरिकांना ठिकठिकाणी माहिती दिली जाणार आहे. नागरिकांकडून विचारणा करण्यात येणारे प्रश्न, शंका यांचेही निरसन केले जाणार आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने केलेले आवाहन

  • सर्दी, खोकला, ताप असणाèया व्यक्तींनी गर्दीत जाण्याचे टाळावे.
  • गुलाल चेहèयाला लावल्याने डोळ्यात गेल्यास अपाय होण्याची शक्यता असते. तसेच गुलाल मोठ्या प्रमाणात उधळल्याने हवेचे प्रदुषण होऊन नागरिकांना डोळ्याचे व श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते.
  • नागरिकांनी गुलाल चेहèयास लावण्याचे टाळून तो फक्त कपाळावर लावावा. गुलाल तोंडावर फेकू नये. डोळयात न जाईल याची काळजी घ्यावी.
  • मिरवणूक वेळी गुलाल उधळला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी.
  • गुलाल डोळ्यात गेल्यास डोळे थंड पाण्याने स्वच्छ करावेत, डोळ्याची आग होणे व चुरचुरणे चालू राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाय योजना करावी.
  • नैसर्गिक रंगाचा वापर करुन (Enviromental Friendly(Green) तयार केलेल्या गुलालाचा वापर शक्यतो करणेत यावा.

 

 

भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालय

महापालिका सहाय्यक आयुक्त, अस्मिता तांबे  (९७३०७२१११६)

 

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील कार्यक्षेत्रातील गणेश विसर्जनासाठी सावित्रीबाई फुले प्रशाला, आनंदीबाई कर्वे शाळा, स्वारगेट पोलिस लाईन या ठिकाणी विसर्जन हौद करणेत आले आहे.

विद्युत विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये दोन शिफ्टमध्ये सेवकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या असून विसर्जन मार्गावर तसेच मुख्य ठिकाणी गुरुवार पेठ, पालखी चौक, लोहियानगर, काशिवाडी, लक्ष्मीरोड, सोमवार पेठ, रास्ता पेठ या ठिकाणी सदर सेवकांच्या नेमणूका करुन विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

स्वच्छतेबाबत भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात व मिरवणुकीच्या मार्गावर झाडणकाम, ग्रुप स्विपींग करुन पावडर मारुन किटकनाशक औषध फवारणी करणे तसेच कचरा दोन शिफ्टमध्ये वाहतुक करुन घेणे व परिसर स्वच्छ करणे इ. कामे तत्परतेने करणेत येणार आहे. या कामी क्षेत्रिय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रिय अधिकारी, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम व सफाई सेवक तसेच विद्युत विभागाकडील कर्मचारी व तांत्रिक विभागाकडील अभियंता यांच्या कामकाजाचे नियोजन करणेत आले आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालय

महापालिका सहाय्यक आयुक्त, संदीप खलाटे (९६८९९३१८७६)

सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील  श्रीगणेश विसर्जनाच्या ठिकाणी मा. महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता ,कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता, आरोग्य विभागाकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम,मिस्त्री, बिगारी इत्यादी सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेश विसर्जन हौद ,तात्पुरती लोखंडी टाकी व्यवस्था करून गणेशाच्या विर्सजनाची तसेच निर्माल्य कलशाची व्यवस्था प्रतीवर्षी करणेत येते. जीवरक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. जीवरक्षक व आरोग्य विभागाकडील सेवकांनी शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत व परीसराची पूर्ण स्वच्छता होईपर्यंत आरोग्य विभागाकडील सेवकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी थांबणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

खालील ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था करणेत आलेली आहे-

गणेश विसर्जन हौदाचे ठिकाण-

जनता वसाहत कॅनॉल, पर्वती पायथा, जयभवानीनगर, जनता बाग मागे, गोल्डन व्हिल पूल, चूनाभट्टी कॅनॉल, पानमळा कॅनॉल, कॅनॉल लगतचे २१ ठिकाणी, ६ ठिकाणी हौद.

 

 

गणेश विसर्जन व्यवस्थेमधील महत्वाच्या बाबी

१) गणेश विसर्जनासाठी अस्तित्वातील हौदांची तसेच परीसराची दुरूस्ती, रंगकाम  करण्यात आलेले आहे.

२) गणेश विसर्जन करावयाच्या ठिकाणी जाण्यासाठी अस्तित्वातील रस्ते, खड्डे दुरूस्त करून घेण्यात आलेले आहे.

३) विसर्जनाच्या ठिकाणी व रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

४)   विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत.

५)  विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेल्या आहेत.

६)  गणेश विसर्जन हौदाच्या ठिकाणी हौद व परीसराच्या स्वच्छतेसाठी मनपा सेवकांची दोन पाळीमध्ये  नेमणूक करण्यात आली आहे.

 

वारजे कर्वेनगर कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्तराजेश गुर्राम (९६८९९३१२७८)

१)राजारामपूल,डी.पी रोड, २) साई मंदिर, सौरभ सोसायटी समोर, डीपी रोड, ३) राहूलनगर, जितेंद्र अभिषेकी उद्यानाशोजारी, ४) मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, ५) सिध्देश्वर घाट, कर्वेनगर, ६) नादब्रम्ह सोसायटी, वारजे  ७) वारजे स्मशानभूमी वारजे, ८) मॅजेस्टिक हॉल, सर्व्हिस रस्ता, ९) अतुलनगर कॉर्नर, १०) आदित्य गार्डन सिटी वारजे, ११) शिवणे, १२) उत्तमनगर

सद्यस्थितीत वर नमुद ठिकाणांच्या लोखंडी टाक्या जागेवर ठेवण्यात आलेल्या आहेत. निर्माल्य कलश व कंटेनरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय-

महापालिका सहाय्यक आयुक्तप्रकाश पवार  (९६८९९३१७८५)

१) कै गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलिसबरी पार्क २) स.नं. ३८८, वैरागे मनपा उद्यान, मीरा सोसायटी ३) पुजारी गार्डन मिनाताई ठाकरे वसाहत, ४) डायस प्लॉट, ५) स्वारगेट पूल कॅनॉल ६) सिटी प्राइड शेजारी पार्किंग, ७) गंगाधाम चौक स.नं. ५७८ बिबवेवाडी अग्निशमन केंद्र ८) कै.यशवंतराव चव्हाण शाळा ९) चिंतामणराव देशमुख शाळा इंदिरानगर

प्रभागामधील विसर्जन हौद ठेवण्यात आले असून सदर विसर्जन हौदाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, कंटेनर, हॅलोजन व्यवस्था, जनरेटर व्यवस्था, मंडप व्यवस्था व स्वच्छतेविषयक व्यवस्था करणेत आलेली आहे.

सदर व्यवस्थापनेसाठी प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मोकादम, विद्युत विभागातील सर्व सेवक, जीव रक्षक तसेच इतर सेवकांची नेमणूक करणेत आलेली असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

 

 

रामटेकडी, वानवडी  क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्त, शाम तारू (९६८९९३१८७३)

 

१)शिंदे छत्री २)जांभूळकर मळा, घोरपडी कॅनॉल ३)सोपान बाग कॅनॉल ४) संत गाडगे महाराज शाळा ५) नर्मदाबाई किसान कांबळे शाळा, ६)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, रामटेकडी ७)संविधान चौक, वानवडी ८) आचलनगर कुमार पृथ्वी या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्त, श्रीमती सुरेखा भणगे  (७०५७९०६७८९)

१)तळजाई मंदिर तळजाई टेकडी, २) ढुमे शाळा, ३) शिंदे हायस्कूल जवळ, तळजाई कडे जाणारा रस्ता, ४) तुळशीबागवाले कॉलनी मैदानाजवळ, ५) मनपा शाळा क्र. ९१ जी चे मागे धनकवडी गाव, ६) गुलाबनगर, धनकवडी पोस्ट ऑफीस समोर ७) स.नं. ३५ जावळकर शॉप समोर, ८) आंबेगाव पठार, आरोग्य कोठी लगत (साई सिध्दी) ९) कात्रज रॅम्प (कात्रज डेअरी शेजारी) १०) कात्रज गावठाण तलाव, ११) थोरवे विद्यालय, १२) दशक्रिया विधी घाट आंबेगाव, १३) जांभूळवाडी तलाव, १४) चिंतामणी शाळेजवळ लोंखडी टाकी १५) अशोक लेलॅण्ड कॅम्प लोखंडी टाकी १६) स्वारगेट एस.टी. स्टॅण्डजवळ, १७) अप्सरा टॉकीज जवळ, १८) पर्वती पायथा, १९) पाटील प्लाझा या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

शिवाजीनगर- घोलेरोड  क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्तरवी खंदारे (९६८९९३१९३२)

१)    मुळारोड घाट २) संगमवाडी घाट ३) स्फुर्ती सोसायटी घाट ४) वृध्देश्वर घाट, ५) पतंगा घाट ६) पांचाळेश्वर घाट, ७) एस.एम.जोशी घाट या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

हडपसर , मुंढवा  क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्तबाळासाहेब ढवळे पाटील  (९५०३६३५४५९)

१) मुंढवा गाव नदीकिनार २) भोसले गार्डन-हडपसर, स.नं. १५ लक्ष्मी कॉनर, ३) स.नं. १६ सातव प्लॉट, ४) इंग्लिश मिडीयम शाळा, डीपी रोड, ५) हिंगणे मळा, कॅनॉल घाट, ६) ननावरे बिल्डींग समोर कॅनॉल घाट, ७) उन्नतीनगर, कॅनॉल घाट, ८) हनुमान सेवा ट्रस्ट, बालउद्यान काळेपडळ, ९) श्रीराम चौक, रुणवाल सोसयाटी, हांडेवाडी रस्ता, १०) संकेत पार्क समोर, तरवडे वस्ती, महंमद रोड, ११) दशक्रिया विधी घाट, कोंढवा खुर्द, १२) कुंभारवाडा नदीलगत, केशवनगर, १३) स.नं. ५ मयुरेश्वर ग्रामपंचायत रोड नदीलगत, केशवनगर, १४) साडेसतरा नळी उद्यानात, १५) गंगानगर महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, १६) नवमहाराष्ट्र तरुण मंडख, पवार आळी जवळ, फुरसुंगी १७) पाणीपुरवठा तळे जुन्या पुलाशेजारी, फुरसुंगी, १८) मारुती मंदिराजवळ, उरुळी देवाची या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

सदर ठिकाणी खालीलप्रमाणे सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

१)    गणपतीचे विसर्जन विधीचे हार, फुले व इतर साहित्य जमा करणेकरिता निर्माल्य कलश प्रत्येक घाटावर ठेवण्यात आले आहेत.

२)    विसर्जन घाटावर विसर्जनाचे ठिकाणी जीवरक्षक (लाईफगार्डस) नेमण्यात आले आहेत. तसेच त्या अनुषंगाने धोका नियंत्रक कठडे, बांबूचे रेलिंग, टेबल, बॅनर्स इ सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरुपाचे वीट बांधकाम, पायèया दुरुस्ती, फरशी रंगरंगोटी इ. कामे करण्यात आलेली आहेत.

३)    विद्युत विभागाकडून गणेश विसर्जन पूर्ण होईपर्यंत विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे.

४)    विसर्जनाचे ठिकाणी विसर्जन घाटावरील श्रीगणेश विसर्जन कामी घाटावर क्षेत्रिय कार्यालय सेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

 

कै. बा.. ढोलेपाटील क्षेत्रिय कार्यालय

महापालिका सहाय्यक आयुक्त, अशोक झुळूक  (९७६४७००७०० )

 

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून खालील प्रमाणे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून १२ ठिकाणी मांडव व्यवस्था, 3 विसर्जन हौद, १० फिरते हौद, लोखंडी टाकी, तसेच विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था सी.सी. टीव्ही कॅमेरा, मोबाईल टोयलेट इत्यादी सोयी करण्यात आलेल्या आहेत.

१)क्वालिटी बेकरी कॅनॉल २) राजगुरू समाज मंदिर ३) बंडगार्डन हौद ४) संगम घाट ५) शाहू तलाव (टँक) हौद ६) पिंगळे वस्ती (लक्ष्मी माता मंदिरा शेजारी) ७)शांताबाई लडकत शाळा ८)तरुण विकास मंडळ ९)मोलाना अबुल कलम आझाद स्मारक परिसर १०) श्रावस्ती नगर जिजाऊ संकलन जलतरण केंद्र ११) शिंदे वस्ती कॅनॉल १२) दौलतराव मगर विद्यालय या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

 

 

 

नगररोड (वडगाव शेरी) क्षेत्रिय कार्यालय

महापालिका सहाय्यक आयुक्त, श्री. सोमनाथ बनकर (९६८९९३४२६१)

 

नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत खालील प्रमाणे विसर्जनाची सोय करण्यात आलेली असून यामध्ये हौद, लोखंडी टाक्या, सिंटेक्स टाक्या यांचा समावेश आहे.

१)बाबू जगजीवनराम शाळा २) सुभेदार आंबेडकर शाळा, ३) बाबू गेनू खेसे शाळा, ४) आनंद विद्या निकेतन शाळा, शाळा क्र. १२६ ५)कळमकर गार्डन ६)की. राजाराम भिकू पठारे स्टेडीयम ७)बहुउद्देशीय हॉल चंदन नगर ८)आपले घर शाळा ९)गणपतराव थिटे शाळा १०)की. शांताबाई खुले शाळा ११) गणेश मंदिर १२)लोणकर शाळा १३)पुण्यनगरी भाजी मंडई १४)साईनाथ नगर भाजी मंडई १५)छत्रपती शिवाजी महाराज उद्यान १६)लोगाव शाळा क्र. १ १७)वाघेश्वर मंदिर १८)भैरवनाथ तळे १९)प्रभू राम उद्यान २०)बीजीएस कॉलेज या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून  गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

येरवडा कळस  क्षेत्रिय कार्यालय-

महापालिका सहाय्यक आयुक्त, श्रीमती इंद्रायणी करचे  (९६८९९३१६६६)

 

१)श्री संत माळी महाराज २) शेलार घाट चव्हाण चाळ ३) कळसगाव घाट ४) भारतनगर घाट ५) शांतीनगर घाट  ६)राजमाता जिजाऊ भाजी मंडई ७)कळसगाव कोठी ८)गोकुळनगर कुस्ती मैदान ९)आनंद मंगल कार्यालय बाहेर १०)गगनगिरी मंगल कार्यालय ११)नागपूर चाळ पोस्ट ऑफिस १२)लुंबिनी उद्यान जवळ १३)सरस्वती शाळा १४)आशीर्वाद मंगल कार्यालय १५)वाल्मिकी उद्यान बाहेर १६) वी.द. घाटे शाळा १७)प्रिझन रेस कोठी बाहेर १८)पांडू लमाण वस्ती १९)सावंत शाळा या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली असून फिरते हौद, गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रे, निर्माल्य टाकणेकरिता १४ कंटेनरची सोय करणेत आलेली आहे. तसेच कीटक प्रतिबंधक विभागाकडून ठिकठिकाणी व घाटांवर औषध फवारणी करणेत आलेली आहे.

 

कसबा विश्रामबागवाडा  क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्तअमोल पवार   (९५०३९००९८०)

सदर ठिकाणी गणेश विसर्जन घाटांची सोय ४ ठिकाणी करणेत आलेली आहे.

१) अमृतेश्वर मंदिर/नेने घाट २) भिडे पुलाशेजारी ३) अष्टभुजा देवी मंदिरावजळ, ४) ओंकारेश्वर मंदिराजवळ ५)आपटे घाट ६) अष्टभुजा देवी मंदिराजवळ, ७) भिडे पुलावजळील हौद ८) कसबा पेठ दादोजी कोंडदेव शाळा पटवर्धन समाधीजवळ, सभांजी पूल (लकडी पूल), एस.एम,जोशी पूल, विठ्ठल हनमघर घाट, पाटील प्लाझा, पर्वती गाव, स्वागेट कॉर्नर या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली असून फिरते हौद, गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रे, निर्माल्य टाकणेकरिता कंटेनरची सोय करणेत आलेली आहे. तसेच कीटक प्रतिबंधक विभागाकडून ठिकठिकाणी व घाटांवर औषध फवारणी करणेत आलेली आहे.

कोथरुड बावधन   क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्तकेदार वझे   (९६८९९३१२८७)

 

सदर ठिकाणी गणेश विसर्जन घाटांची सोय करणेत आलेली आहे.

१)गुरु गणेश नगर, शांतीबन चौक, २) लोकमान्य कॉलनी, जीत ग्राऊंड, ३) उजवी भुसारी कॉलनी, ४) बावधन शाहा, ५) मराठा मंदिरामागे, ६) भारती विद्यापीठ कन्याशाळेमागे, ७) सुतार दरा- हजेरी कोठी, ८) यशवंतराव चव्हाण  नाट्यगृह, ९) लोढा पेट्रोल पंप, १०) मयुर डीपी रोड, ११) तेजस नगर ग्राऊंड, १२) कमिन्स कंपनी गेट नं. १, १३) गांधी भवन ग्राऊंड, १४) गोपीनाथ नगर

 

कोंढवा येवलेवाडी  क्षेत्रिय कार्यालय –

महापालिका सहाय्यक आयुक्त, श्रीमती ज्योती धोत्रे  (९७६६१३४०६३)

 

सदर ठिकाणी गणेश विसर्जन घाटांची सोय करणेत आलेली आहे.

१)    चिंतामणराव देशमुख, मनपा शाळा, बिबवेवाडी, २) मनपा उर्दू शाळा, ३) राजस सोसायटी कमला सिटीजवळ, ४) कात्रज तलाव फुलराणी परिसर, ५) काकडे वस्ती गंगाधाम रस्ता, ६) शरद पवार उद्यानाजवळ, कोंढवा बु. ७) येवलेवाडी, भैरवानाथ मंदिरामागे येवलेवाडी गावठाण, ८) गोकुळनगर स्टेट बँक ऑफ इंडिया कात्रज कोंढवा रस्ता ९) जिल्हापरिषद शाळा

 

अग्निशमन दलाकडून गणेशोत्सव काळात करण्यात येत असलेली व्यवस्था-

 

  • गणेशोत्सवाचे काळात विविध दिवशी गणपती विसर्जन करण्यात येते, अशाप्रकारे प्रामुख्याने गणपती सिर्जन होणाèया मुठा नदीकाठच्या एकूण १८ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने दलाचे १८ जवान तसेच १३० खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.
  • घाटांवर नेमलेल्या जीवरक्षकांना त्यांचे काम अधिक सुरक्षिततेने व कार्यक्षमतेने करता येण्याच्या उद्देशाने लाईफ जॅकेटस, लाईफ बॉय व रात्रीचे वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेन्ट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
  • प्रत्येक घाटावर नदीकिनारी नागरिक व त्यांचे समवेत येणाèया लहान मुलांनी गर्दी करु नये, म्हणून नदी किनारी आडवा दोरखंड लावण्यात आलेले आहे. तसेच काही घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोर बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास, या दोरखंडास धरुन आपला जीव वाचवू शकते. नटराज घाटावर लाईफ मास्ट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नदीच्या पात्रामध्ये मोठा उजेड उपलब्ध करुन बुडणाèया व्यक्तीस वाचविता येणे शक्य होणार आहे.
  • नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, काठावरच गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बèयाचदा अग्निशामक दलाकडील जवान व भोई लोकांकडूनच गणपतींचे विसर्जन करण्यात येते.
  • अनंत चतुर्थीचे दिवशी वृध्देश्वर घाट, संगम घाट, अमृतेश्वर घाट व नटराज सिनेमा जवळील घाट येथे भोई लोकांकडून नावेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दलाकडून रोजंदारीवरील ज्या बिगाèयांची जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्यात येते. त्यांचेकडूनही काही नावांची व्यवस्था केली जाते.
  • जीवरक्षक ओळखू यावेत म्हणून त्यांना जीवरक्षक अशी अक्षरे रंगविलेले शर्ट्स व दइंडाला बांधावयाच्या पट्ट्या देण्यात आलेल्या आहेत.
  • अनंत चतुर्दशीचे दिवशी गणेश विसर्जनाचा अंतिम दिवस असल्याने व यादिवशी शहरातून गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक निघत असल्याने, मिरवणूकीत काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणूकी संबंधीची माहिती मिळवण्यासाठी, मिरवणुकीच्या मार्गावर तीन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात आलेली आहे.
  • मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, पुणे यांचे वतीने गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्यासाठी टिळक चौकात उभारण्यात येणाèया मंडपांमध्ये,
  • नटराज सिनामागृहाचे मागे, मुख्यत: जेथे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते, त्या ठिकाणी,
  • मिरवणूकीचे मार्गावर, लक्ष्मी रस्त्यावरील कॉमनवेल्थ इमारतीचे आवारात

सदरील ठिकाणी फायर बुलेटसह अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात येतात.

  • सर्व घाटांपैकी महत्वाच्या गणपतींचे विसर्जन होणाèया व गर्दी होणाèया नटराज सिनेमा मागील घाट, संगम घाट, वृध्देश्वर घाट, गरवारे कॉलेज कॉजवे येथे नागरिकांना सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनीक्षेपण यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यावरुन नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांकडून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
  • मुख्य विसर्जन मिरवणूकीत काही कारणास्तव आगीचा प्रादुर्भाव झाल्यास सदरील आग तातडीने विझविण्याचे उद्देशाने कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्वीशर्स व ते हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
  • अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व आठवडा सुट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरीज्ञ १८ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.
  • संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत मुठा नदीकिनारीचे विसर्जन घाट वगळता शहरातील अन्य विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून त्यांचे स्तरावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येते.

 

पुणे अग्निशमन दलाचे विनम्र आवाहन

अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा.

  • गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे यापासून दूर उभे करुन त्यांचेजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे.
  • नाव/होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नये, तसेच बसलेल्या व्यक्तींनी नाव/होडीस अपघात होईल असे वर्तन करुन नये.
  • पुणे मनपाच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या ‘‘जीवरक्षकङ्कङ्क सेवकांकडून शक्यतो गणेश मुर्तीचे विसर्जन करवून घ्यावे.
  • एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षकांना तातडीने द्यावी.
  • मद्यपान केलेल्या अवस्थेत नदीपात्र, तलाव, कॅनॉल, विहीर, तळे इत्यादींजवळ जाऊ नये.
  • पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे.
  • अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी कृपया अधिकृत घाट, मनपाने विविध ठिकाणी बांधलेले विसर्ज़न हौद व मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांनी गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी कृपया गणेश मुर्तीचे विसर्जन करावे.

 

आपत्कालीन संपर्क दुरध्वनी क्रमांक

१) ०२०-२५५०१२६९

२) ०२०-२५५०६८०० (/१ /२ /३/४)

संपर्क मोबाईल क्रमांक

१) गणेश सोनुने , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,  पुणे महानगरपालिका

मोबाईल नं. ९६८९९३१५११

२)देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मोबाईल नं. ८१०८०७७७७९ /   ०२०२६४५१७०७,

(१०१)

 

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Meri Mati Mera Desh |  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत “मेरी माटी मेरा देश” (Meri Mati Mera Desh)  उपक्रम राबविणेकामी तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसर (Nodal Officer) यांची क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office’s) आणि परिमंडळ स्तरावर नेमणूक करण्याचे आदेश उपायुक्त्त चेतना केरुरे (Deputy Commissioner Chetana Kerure) यांनी दिले आहेत. (Meri Mati Mera Desh)

आदेशानुसार  “आजादी का अमृत महोत्सव” (Aazadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “मेरी माटी मेरा देश” उपक्रम १६-२० ऑगस्ट पुणे महानगरपालिका क्षेत्रातील घरांसाठी व संस्थासाठी तिरंगा ध्वज वाटपाचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी  ३०-३५ हजार झेंडे तपासणे, नागरिक, सोसायटी, संस्था यांना वाटप करणे कामी आपले स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे व त्याकरिता सर्व परिमंडळ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालये यांनी त्यांचे अखत्यारीतील नोडल ऑफिसर यांची त्वरित नेमणूक करायची आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Meri Mati Mera Desh | Order to field offices to appoint nodal officer for distribution of tricolor flag

PMC Medical Camp | पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे केले जाणार आयोजन

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Medical Camp | पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे केले जाणार आयोजन

| महापालिका घनकचरा विभागाची माहिती

PMC Medical Camp |  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व Sancheti Institute for Orthopedics & Rehabilutation यांचे संयुक्त विद्यमाने डॉक्टर एच के संचेती यांचे वाढदिवसा निमित्त  22 जुलै रोजी शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालया मधील सफाई कर्मचार्‍यांसाठी Medical  Orthopedics Camp चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प  चे उदघाट्न प्रसंगी 165 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान पुणे मनपाच्या सर्व क्षेत्रीय (PMC Ward Offices) कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (PMC Medical Camp)
यामध्ये सेवकांचे Height, Weight, BMI, Hemogrm, Bone Mineral Density Diabetic Neuropathy Foot Checking,Orthopedic,
Consultation, Physiotherapy तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज )श्री रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ )डॉ. कुणाल खेमनार सर व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आशा राऊत  यांचे मार्गदर्शनाने करण्यात आले. संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर राहूल चौबे यांनी आयोजनाकरिता समन्वय साधला. हा खूपच चांगला उपक्रम असून भविष्यात तो पुणे महानगरपालिके मधील सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कोठी नुसार राबविण्यात येणार आहे. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Medical Camp | A medical camp will be organized for the cleaning staff of all the field offices of the Pune Municipality

Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?

Pune Municipal Corporation | (Author- Ganesh Mule) | पुणे महापालिका (PMC Pune) ही राज्यातील अ वर्गातील महापालिका आहे. ई गव्हर्नन्स बाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) राज्यात आघाडी घेतली असून विविध पुरस्कार देखील मिळवले आहेत. अशा स्मार्ट महापालिका भवनात (PMC Building) मात्र कँटीन (PMC Canteen) ची वानवा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र गैरसोयीला सामोरे जावे लागते. कँटीन कधी हो होणार, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून विचारला जात आहे. (Pune Municipal Corporation)

दुपारच्या जेवणासाठी पार्किंग मध्ये शोधावी लागते जागा!

पुणे शहर आणि पुणे महापालिका (Pune Corporation) ही राज्यातच नाही तर देशात महत्वाची समजली जाते. महापालिकेच्या स्मार्ट कारभाराबद्दल राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील कौतुक केले जाते. असे असले तरी पुणे महापालिका प्रशासन (Pune Civic Body) आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोयींबाबत मात्र उदासीन दिसून येते.महापालिका भवन किंवा कुठल्याही क्षेत्रीय कार्यालयात (PMC Ward Offices) कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेचे कँटीन नाही. कर्मचाऱ्यांना याची सर्वात जास्त निकड दुपारच्या जेवणाच्या वेळी भासते. कारण दुपारी जेवायला बसताना कर्मचाऱ्यांना जागा शोधाव्या लागतात. काही कर्मचारी आपल्या कार्यालयात बसण्याच्या जागेवर, काही कर्मचारी पायऱ्यांवर तर काही कर्मचारी पार्किंग मध्ये जेवणासाठी बसलेले असतात. जास्त गैरसोय पावसाळ्यात होते. कारण पावसाळ्यात पायऱ्यांवर किंवा पार्किंग मध्ये बसता येत नाही. तिथे पाणी साचलेले असते. जवळ घर असणारे कर्मचारी आणि अधिकारी (PMC Employees and Officers) जेवणासाठी आपल्या घरी निघून जातात. घरी गेल्याने मात्र कर्मचाऱ्यांचा बराच वेळ खर्ची होतो. यात महापालिकेच्या कामकाजाचेच नुकसान आहे. (PMC Pune News)
सायंकाळच्या वेळी चहा, कॉफी घेण्यासाठी बरेचसे कर्मचारी महापालिका भवना बाहेर जाताना दिसतात. यात देखील त्यांचा बराच वेळ वाया जातो. काही दिवसांपूर्वी जुन्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागाच्या शेजारी कँटीन सुरु करण्यात आले होते. मात्र ते चहा, कॉफी आणि स्नॅक पुरतेच मर्यादित होते. तिथे बसण्याची सोय नव्हती. मात्र त्यामुळे कर्मचारी चहा घेण्यासाठी भवन सोडून जात नव्हते. त्यात वेळ वाचायचा. मात्र ते ही कॅन्टीन बंद झाले. नवीन इमारतीत कॅन्टीन साठी जागा देखील ठरवून देण्यात आली होती. मात्र त्याबाबत उदासीनताच दिसून येत आहे. (Pune Municipal Corporation News)
अ दर्जाच्या संस्थेत कमर्चाऱ्यांना कॅन्टीन नसणे, हे पुणे महापालिकेसाठी शोभणारे नक्कीच नाही. इतर संस्थांमध्ये असे कॅन्टीन निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने देखील याबाबत गंभीरपणे पाऊले उचलून कॅन्टीन तयार करावे, अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
News Title | Pune Municipal Corporation |  When will there be a canteen for employees in Smart Pune Mahapalika Bhawan?

Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन

Categories
Breaking News PMC social पुणे

Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन

| 5 हजाराहून अधिक पुणेकरांचा सहभाग

Plogathon Drive | G20 Pune |  G-20 च्या अनुषंगाने शनिवारी 15  क्षेत्रिय कार्यालयांतर्गत (PMC Ward Offices) विविध ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्हचे (Plogathon Drive) आयोजन करण्यात आले होते. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३७ ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आले असून यामध्ये एकूण २८६७ किलो ओला कचरा व ८९६७ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच एकूण ५३६२ नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदविला. अशी माहिती घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) उपायुक्त आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांनी दिली. (Plogathon Drive | G20 Pune)
१९ ते २२ जून २०२३ या कालावधीमध्ये पुणे शहरात शिक्षण विषयावर G-20 परिषद होणार आहे. या कालावधीमध्ये जी २० सदस्य देशांचे प्रतिनिधी पुणे शहरात मुक्कामी असणार आहेत. (G20 Summit in Pune)
G-20 परिषदेच्या अनुषंगाने दिनांक १७/०६/२०२३ रोजी स.७.०० ते ९.०० या वेळेत सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत शहरातील सर्व मुख्य रस्ते, उद्याने, शाळा व नदी किनारी प्लॉगेथॉन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये सर्व मनपा अधिकारी/कर्मचारी,ब्रॅंड अम्बॅसेडर, स्थानिक नागरिक, स्वयं सेवी संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, बचत गट, प्रतिष्ठीत व्यक्ती, लेखक, नाटककार, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू व सर्व माजी नगरसेवक इत्यादिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (Pune Municipal Corporation)
पांचाळेश्वर मंदिर परिसर, भिडे पूल नदीपात्र परिसर या ठिकाणी उप आयुक्त आशा राऊत घनकचरा व्यवस्थापन, अंजली ढमाळ राज्यकर उप आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन पुणे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे घनकचरा व्यवस्थापन, व वुई पुणेकर, आम्रपाली चव्हाण, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत श्री. पुनीत शर्मा या संस्थेचे स्वयंसेवक, पुणे
महानगरपालिकेचे ब्रॅंड अम्बॅसेडर   सत्या नटराजन हे उपस्थित होते. या शिवाय एस एम जोशी पूल वारजे व मगरपट्टा चौक ते गाडीतळ चौक हडपसर, शास्त्री नगर,आगाखान पॅलेस ते रामवाडी पोलीस चौकी, आगाखान पलेस मधील आतील परिसर, गोल्फ क्लब चौक ते आंबेडकर चौक ते ठाकरे चौक ते शादल बाबा चौक, माता रमाई आंबेडकर पुतळा ते आर.टी.ओ चौक, सुतारवाडी आरोग्य कोठी अंतर्गत पाषाण सुसरोड शिवशक्ती चौक ते राज जिजामाता चौक सुसखिंड, कर्वे पुतळा ते वनदेवी चौक उजवी बाजू, तीन हत्ती चौक ते दत्तनगर भुयारी मार्ग, चुना भट्टी ( पु. ल. देशपांडे उद्यान मागील बाजू) ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयापर्यंत कॅनॉल रोड, एस. एम. जोशी पूल ते रजपूत वीटभट्टी नदी पात्र, संविधान चौक ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, खडी मशीन चौक ते सोमाजी चौक, लोकमान्य नगर जॉगिंग पार्क, डुल्या मारुती चौक ते बेलबाग चौक, पुष्पमंगल कार्यालय ते महेश सोसायटी. या विविध ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये बुई पुणेकर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, जनवाणी, कमिन्स इंडिया, नेहरू युवा केंद्र, आदर पुनवाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, सिटी बैंक, EFI (Environment Foundation of India), NFF चे विद्यार्थी, एलटीज स्कूल फौंडेशन, हर्षदीप फौंडेशन, रोटरी क्लब, सेवा संवर्धन फौंडेशन, बिईंग वॉलेंटियर अशा विविध स्वयं सेवी संस्थांनी देखील सहभाग घेतला. (PMC Pune)
—-
News Title | Plogathon Drive |  G20 Pune |  11 thousand 800 kg garbage collected in Plogathon drive |  More than 5 thousand Punekars participated