Minister Chandrakant Patil | शिवरायांच्या स्मारकाजवळ कचरा टाकल्यास कठोर कारवाई करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

Categories
Breaking News Political social पुणे

Minister  Chandrakant Patil | शिवरायांच्या स्मारकाजवळ कचरा टाकल्यास कठोर कारवाई करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

| स्मारक परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतादूतची नियुक्ती

Minister  Chandrakant Patil |  बाणेर (Baner) गावाची शोभा वाढवी यासाठी बाणेर नागरी पतसंस्था येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) कचरा टाकून, अस्वच्छता निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास येत असून, कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी दिला. तसेच, सदर ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छतादूत देखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  (Minister  Chandrakant Patil)
बाणेर गावची शोभा वाढवी यासाठी बाणेर नागरी पतसंस्था परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र, सदर स्मारकाच्या समोरील मोकळ्या जागेवर रात्रीच्या सुमारास कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. आज कचरा टाकल्याची बाब समोर येताच नामदार पाटील यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर भागातील कचरा उचलण्याचे निर्देश दिले. (Pune News)
तसेच सदर ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहे. याशिवाय, या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागातून एक कायमस्वरूपी स्वच्छतादूत देखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यामुळे त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे यासाठी बाणेर चौक येथे  उभारण्यात आलेले स्मारक हे आपल्यासाठी मंदिर आहे. या मंदिराचं आणि परिसराचं पावित्र्य आणि स्वच्छता राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर भागात कचरा टाकून अस्वच्छता करु नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
——
News Title | Minister Chandrakant Patil Strict action will be taken if garbage is thrown near the memorial of Shivaji! | Guardian Minister Chandrakantada Patil’s warning

Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन

Categories
Breaking News PMC social पुणे

Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन

| 5 हजाराहून अधिक पुणेकरांचा सहभाग

Plogathon Drive | G20 Pune |  G-20 च्या अनुषंगाने शनिवारी 15  क्षेत्रिय कार्यालयांतर्गत (PMC Ward Offices) विविध ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्हचे (Plogathon Drive) आयोजन करण्यात आले होते. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३७ ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आले असून यामध्ये एकूण २८६७ किलो ओला कचरा व ८९६७ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच एकूण ५३६२ नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदविला. अशी माहिती घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) उपायुक्त आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांनी दिली. (Plogathon Drive | G20 Pune)
१९ ते २२ जून २०२३ या कालावधीमध्ये पुणे शहरात शिक्षण विषयावर G-20 परिषद होणार आहे. या कालावधीमध्ये जी २० सदस्य देशांचे प्रतिनिधी पुणे शहरात मुक्कामी असणार आहेत. (G20 Summit in Pune)
G-20 परिषदेच्या अनुषंगाने दिनांक १७/०६/२०२३ रोजी स.७.०० ते ९.०० या वेळेत सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत शहरातील सर्व मुख्य रस्ते, उद्याने, शाळा व नदी किनारी प्लॉगेथॉन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये सर्व मनपा अधिकारी/कर्मचारी,ब्रॅंड अम्बॅसेडर, स्थानिक नागरिक, स्वयं सेवी संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, बचत गट, प्रतिष्ठीत व्यक्ती, लेखक, नाटककार, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू व सर्व माजी नगरसेवक इत्यादिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (Pune Municipal Corporation)
पांचाळेश्वर मंदिर परिसर, भिडे पूल नदीपात्र परिसर या ठिकाणी उप आयुक्त आशा राऊत घनकचरा व्यवस्थापन, अंजली ढमाळ राज्यकर उप आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन पुणे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे घनकचरा व्यवस्थापन, व वुई पुणेकर, आम्रपाली चव्हाण, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत श्री. पुनीत शर्मा या संस्थेचे स्वयंसेवक, पुणे
महानगरपालिकेचे ब्रॅंड अम्बॅसेडर   सत्या नटराजन हे उपस्थित होते. या शिवाय एस एम जोशी पूल वारजे व मगरपट्टा चौक ते गाडीतळ चौक हडपसर, शास्त्री नगर,आगाखान पॅलेस ते रामवाडी पोलीस चौकी, आगाखान पलेस मधील आतील परिसर, गोल्फ क्लब चौक ते आंबेडकर चौक ते ठाकरे चौक ते शादल बाबा चौक, माता रमाई आंबेडकर पुतळा ते आर.टी.ओ चौक, सुतारवाडी आरोग्य कोठी अंतर्गत पाषाण सुसरोड शिवशक्ती चौक ते राज जिजामाता चौक सुसखिंड, कर्वे पुतळा ते वनदेवी चौक उजवी बाजू, तीन हत्ती चौक ते दत्तनगर भुयारी मार्ग, चुना भट्टी ( पु. ल. देशपांडे उद्यान मागील बाजू) ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयापर्यंत कॅनॉल रोड, एस. एम. जोशी पूल ते रजपूत वीटभट्टी नदी पात्र, संविधान चौक ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन, खडी मशीन चौक ते सोमाजी चौक, लोकमान्य नगर जॉगिंग पार्क, डुल्या मारुती चौक ते बेलबाग चौक, पुष्पमंगल कार्यालय ते महेश सोसायटी. या विविध ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये बुई पुणेकर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, जनवाणी, कमिन्स इंडिया, नेहरू युवा केंद्र, आदर पुनवाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, सिटी बैंक, EFI (Environment Foundation of India), NFF चे विद्यार्थी, एलटीज स्कूल फौंडेशन, हर्षदीप फौंडेशन, रोटरी क्लब, सेवा संवर्धन फौंडेशन, बिईंग वॉलेंटियर अशा विविध स्वयं सेवी संस्थांनी देखील सहभाग घेतला. (PMC Pune)
—-
News Title | Plogathon Drive |  G20 Pune |  11 thousand 800 kg garbage collected in Plogathon drive |  More than 5 thousand Punekars participated

Garbage : Merged 23 Villages : समाविष्ट 23 गावांमुळे 300 टन कचरा वाढला 

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट 23 गावांमुळे 300 टन कचरा वाढला

: कर्नाटक ची कंपनी कचऱ्याची करणार विल्हेवाट

पुणे : महापालिका हद्दीत नवीन 23 गावाचा समावेश झाला आहे. साहजिकच मूलभूत सुविधा देताना महापालिकेवर ताण येत आहे. दरम्यान या गावांमधून 250-300 टन कचरा जमा होत आहे. यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे 150 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम कर्नाटकच्या कंपनीला महापालिकेने दिले आहे. यासाठी महापालिकेला वर्ष भरासाठी 4 कोटी 92 लाख खर्च येणार आहे. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

: स्थायी समितीने दिली मंजुरी

पुणे शहरात नव्याने २३ गावांचा समावेश झाल्याने दैनंदिन कचरा निर्मिती मध्ये अंदाजे २५० ते ३०० मे.टन. कचऱ्याची वाढ झालेली आहे. सदर कचऱ्यावर प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावणे या साठी मनपा कडे पर्यात्प प्रक्रिया यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच नव्याने प्रकल्प उभारणे करिता सध्या जागा देखील उपलब्ध नसल्याने त्यानुसार Collection & Transportation of minimum 150 MT Per day segregated dry waste coming daily at 7 Ramps/Transfer stations of PMC and its scientific processing and disposal at Cement Industries for a period of One year काम करणेस निविदा मागवली होती.   कामाची निविदा दाखल करण्याची मुदत दि.०८/१२/२०२१ ते दि.२८/१२/२०२१ दरम्यान होती. सदर कालावधी दरम्यान प्रस्तृत कामाला तीन निविदाधारकांचा प्रस्ताव ऑनलाईन दाखल झाल्या आहे. सदर कामाकरीता तीन पात्र निविदाधारकांचे ‘ब’ पाकिट मा.उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन ठराव क्र.२६०, दि.०४/०१/२०२२ नुसार मान्यता घेऊन दि.०६/०१/२०२२ रोजी उघडण्यात आले आहे. तरी प्रस्तृत कामासाठी मे.दालमिया सिमेंट भारत लिमिटेड (व्हिलेज-यादवाड, ता.मुदलगी, जि.बेळगाव, कर्नाटक-५९११३६) यांची सर्वात कमी दराची निविदा आली. त्यांचे दर र रू.४,९२,७५,०००.०० (अक्षरी र रू.चार कोटी ब्याण्णव लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये फक्त) (जी.एस.टी. विरहित) काम करून घेणेस सध्या खात्याकडे दररोजचे कचरा नियोजन करणे आवश्यक असून त्यामुळे खात्याने सर्वात कमी दराचे मे,दालमिया सिमेंट भारत लिमिटेड (व्हिलेज-यादवाड, ता.मुदलगी, जि.बेळगाव, कर्नाटक-५९११३६) यांचे टेंडर मान्य करण्याची खात्याची शिफारस आहे. त्यानुसार स्थायी समितीने याला मान्यता दिली आहे.