Meri Mati Mera Desh | पुण्यातून ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Meri Mati Mera Desh | पुण्यातून ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Meri Mati Mera Desh | मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश (Amrit Kalash) देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील (Kartavya Path) स्मारकासाठी रवाना करण्यात आले.
रांगोळी, सनई-चौघड्याचे सूर, ढोल-ताशांचा गजर, ठिकठिकाणी उभारलेले राष्ट्रध्वज, भारतमातेचा जयघोष करणारी सळसळत्या उत्साहातील तरुणाईने परिसरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) 1400 विद्यार्थ्यांनी अमृत कलश घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले.
राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एनएसएसच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहीद प्रदीप ताथवडे व शहीद दिलीप ओझरकर यांच्या नातेवाईकांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर अमृतवाटीका उभारण्यात येत आहे. तरुण पीढीला पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य टिकविण्यासाठीचा संघर्ष  माहीत व्हावा यासाठी या अमृतवाटीकेसाठी एक मूठभर माती पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबरला होणार आहे. ही पीढी आयुष्यभर या प्रसंगाची आठवण ठेवेल. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तरूणाई बाहेर पडते, तेव्हा देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास मिळतो.
शेकटकर म्हणाले,अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा धोका आहे. तो आधुनिक भारताला तोडणारा आहे. मी राहीन किंवा राहणार नाही परंतु भारत राहील अशी भावना असलेला आजचा युवक हा देशाचे भविष्य आणि वर्तमान आहे.
पांडे म्हणाले, राज्यात सेल्फी विथ माती अभियान सुरू आहे. या अभियानात सोळा लाखांहून अधिक फोटो लिंकवर अपलोड केले आहेत. हा एक विश्वविक्रम ठरणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत या अभियानात सहभागी होता येणार आहे. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे शहरात रविवारी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे शहरात रविवारी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) ‘माझी माती माझा देश’ (Meri Mati Mera Desh) अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Cabinet Minister Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून (PMC Pune) देण्यात आली आहे. (Meri Mati Mera Desh | PMC)
केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने (PMC Pune) ‘माझी माती माझा देश’ हे अभियान पुणे शहरात (Pune City) मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
0000
News Title | Meri Mati Mera Desh | PMC | ‘Majhi Mati Maja Desh’ initiative concluded in Pune city on Sunday

Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Categories
Breaking News social पुणे

Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Tilak Maharashtra Vidyapeeth | टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे (Tilak Maharashtra Vidyapeeth Pune) यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्याच्या (Purandar Fort) पायथ्याशी वसलेल्या घेरा पुरंदर गट ग्रामपंचायती अंतर्गत येणारे  घेरा पानवडी हे गाव संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे. विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या वतीने सदर गावचे सामाजिक सर्वेक्षण तसेच संसाधनांचे सर्वक्षण करून गरजांच्या अध्ययनाचा अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेल्या गावकऱ्यांच्या समस्या आणि गरजा यांना उत्तर आणि समाधान शोधण्यासाठी  गाव विकासाचा कृती आराखडा तयार करून विद्यापीठाच्या समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने सदर गावच्या शाश्वत विकासासाठी वेळोवेळी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. (Tilak Maharashtra Vidyapeeth)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश (Meri Mati Mera Desh) हे अभियान देशभर राबविले जात आहे. सदर अभियानांतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच नर्सिंग विभागाच्या वतीने स्वातंत्र्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या किंबहुना स्वतःचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे विचार देशातील नागरिकांनी अंगी जोपासावेत आणि अमलात आणण्याचे प्रयत्न करावेत यासाठी शपथ घेण्यात आली.  त्याचबरोबर थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्यावरती काव्यवाचन आणि कथाकथन अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याच
अनुषंगाने मेरी माटी मेरा देश या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून मौजे घेरा पानवडी या गावांमध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.  यामध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. घेरा पानवडी गावातील ढगारे आळी, कारकुड आळी, राजे शिवछत्रपती विद्यालय परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, बेंगळे वस्ती, कोकरे वस्ती आणि पठारे वस्ती इत्यादी भागामध्ये वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्या त्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर सोपविण्यात आली आहे आणि तशी नागरिकांनी हमी देखील दिली आहे की आम्ही त्या वृक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करू. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नोंदणीकृत स्वयंसेवक अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट विभाग, विधी विभाग, फिजिओथेरपी विभाग आणि समाजकार्य विभाग इत्यादी विभागातील ४०  जणांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण ४ कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू, डॉ. गीताली टिळक, कुलसचिव, डॉ. सुवर्णा साठे ,  उपाध्यक्ष, डॉ. रोहित टिळक,  शैक्षणिक सल्लागार, डॉ. प्रणती टिळक आणि विद्यापीठाचे  सचिव  अजित खाडीलकर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या अभियानाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक श्री. ओंकार केणे यांचे अविरत सहकार्य लाभले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.  निलेश उपाध्ये, श्री. रोहन बावडेकर, योगेश पाटील, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. या अभियानाचे उत्कृष्ट समन्वय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश यादव आणि निता कदम यांनी केले.
——-
News Title | Tilak Maharashtra Vidyapeeth | Under Meri Mati Mera Desh Abhiyan, Tilak Maharashtra University completed tree plantation campaign at Ghera Panwadi!

Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून  ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत  विविध कार्यक्रम संपन्न

Meri Mati Mera Desh | PMC Pune |  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 August पासून सुरु झालेला आहे. सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक  हिरवळीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी पंचप्रण शपथ घेतली. त्या पाठोपाठ सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.
मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत,अमृत वाटिका या उपक्रमातर्गत , देशी ७५ वृक्ष लागवडीचा (Tree Plantations) उपक्रम धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून, तळजाई टेकडी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी, स्थानिक नागरिक, काही संस्था, स्वछता दूत, मोहल्ला समितीचे सदस्य, आणि सर्व कार्यालयीन स्टाफच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष विभागाने, यासाठी खड्डे, आणि वृक्षाची उपलब्धता करून दिली होती. या कार्यक्रमानंतर सामूहिक पंचप्रण शपथ घेण्यात आली.
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी आगाखान पॅलेस या ऐतिहासिक ठिकाणी मनपा शाळा क्रमांक ४९ बी, रामवाडी या शाळेतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी  भेट दिली. (Meri Mati Mera Desh | PMC Pune)
११ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाट्यप्रयोगाच्या सुरवातीस माझी माती माझा देश या अभियानांतर्गत मातीचे दिवे प्रजवलित करून, सर्व रसिकांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी, पुणे महानगरपालिकेचे  उप आयुक्त डॉ. चेतना केरूरे, प्रशासन अधिकारी श्रीमती सुप्रिया हेंद्रे, अभिनेता प्रशांत दामले, कविता लाड, उमेश कामत, नाट्य परिषदेचे कार्यवाहक सत्यजित धांडेकर, समीर हंपी आदी उपस्थित होते.
माझी माती माझा देश  या उपक्रमा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महानगरपालिका- कस्तुरबा गांधी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक ११४बी, ढोले पाटील रोड पुणे -१ या शाळेने दिनांक १२/८/२०२३ रोजी पंचप्रण शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर राबविला  असून १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक १३/०८/२०२३ रोजी येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय “मेरी माटी मेरा देश” अभियान अंतर्गत मा उपायुक्त श्रीमती किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली WAR MEMORIAL SOUTHERN COMMAND  या ठिकाणी  तेथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांच्या मातीचे संकलन करण्यात आले.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत  दिनांक १४/०८/२०२३ रोजी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. संदीप खलाटे यांच्या हस्ते सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशनिंग दुकान) योजनेचे लाभार्थी यांना तिरंगा ध्वज वाटप केले गेले.
आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवाबद्दल शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान येथे मेरी माटी मेरा देश या संकल्पने अंतर्गत शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचे बंधू मिलिंद ताथवडे यांचा सत्कार करून त्यांच्या कडून मातीचा स्वीकार केला व शहिदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली . त्यावेळी उप अभियंता चिंतामणी दळवी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरिड, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १० शास्त्रीनगर अंतर्गत हर घर तिरंगा राष्ट्रध्वज टिव्ही चैनल १२ विजेती कलाकार माजी महामही राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते  गौरवण्यात आलेल्या कुमारी वैष्णवी पाटील यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण ६९७ सुस्थितीतील राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले आहेत. तसेच शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संगमवाडी हजेरी कोठी व येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील आरोग्य कोठी मार्फत ध्वज वितरण करण्यात आले.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वातंत्र सैनिक कै. बाळकृष्ण मिरजकर  यांच्या पत्नी श्रीमती शोभना मिरजकर (राहणार परमहंस नगर कोथरूड)   यांचा सम्मान करण्यात आला. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निवृत्त विंग कमांडर श्री सुरेश त्रिंबक मेहंदळे (राहणार डहाणूकर कॉलनी कोथरूड) यांचा सन्मान करण्यात आला.
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी, मेरा देश या उपक्रमासाठी मिट्टी को नमन वीरों को वंदन अभियान  अंतर्गत मा. आमदार सुनील कांबळे यांना  मा. महापालिका सहायक आयुक्त ढवळे पाटील, यांचे हस्ते तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळेस  प्र. उप अभियंता श्री पंडित, कनिष्ठ अभियंता श्री गांगुर्डे हे उपस्थित होते.
हर घर तिरंगा व मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाची माहिती देऊन  माजी सभासद मा.माधुरी ताई सहस्रबुद्धे  यांचे घरी सन्मानपूर्वक तिरंगा झेंडा देण्यात आला. श्री आलम पठाण, संघटक गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, बांधकाम व्यवसायिक, वारजे माळवाडी यांच्याकडून माती स्वीकारण्यात आली. खटके मोहन अंकुश फ्रीडम फायटर यांच्या नातेवाईकांकडून माती स्वीकारली, तसेच त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. प्रभाग क्र. ३१ मध्ये  मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत आर्किटेक्ट श्री संजय भगत यांजकडून माती स्वीकारण्यात आली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक  नंदा प्रताप, वारजे कर्वेनगर ब्रँड ॲम्बेसेडर रुपाली मगर व मनपा सेवक सागर राजगुरू उपस्थित होते.
अशा रीतीने पुणे शहरात सर्व ठिकाणी पुणे महानगरपालिके अंतर्गत सर्व  क्षेत्रीय कार्यालयामार्फत व शिक्षण विभागामार्फत हर घर तिरंगा कार्यक्रमा निमित्त राष्ट्रध्वज वाटपाचा कार्यक्रम व ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ या अभियाना अंतर्गत  राबविण्यात  येणाऱ्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
——-

Meri Mati Mera Desh | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ 

Meri Mati Mera Desh | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘‘माझी माती माझा देश” (Meri Mati Mera Desh) अंतर्गत  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हिरवळीवर कर्मचाऱ्यांकडून पंचप्रण शपथ (Panchpran Shapath) घेण्याचा  कार्यक्रम संपन्न झाला. (Meri Mati Mera Desh)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘‘मेरी माटी मेरा देश  हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत आज पुणे महापालिका (PMC Pune) प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक हिरवळीवर ‘‘पंचप्रण शपथ घेण्यात आली.

पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी शपथ घेतली. त्या पाठोपाठ उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे,  उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सचिन इथापे,  मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी व अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
—-
News Title | Meri Mati Mera Desh | Pune Municipal Corporation employees took Panchpran Oath

Meri Mati Mera Desh | ‘माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात |

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Meri Mati Mera Desh | ‘माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात

  Meri Mati Mera Desh | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे.  त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे. (Meri Mati Mera Desh)
            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09  ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
            लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिनांक 09 ते 14ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी –कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) सर्व अधिकारी-  कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत घेणार आहेत.
000
News Title | Meri Mati Mera Desh | ‘Majhi Mati, Maja Desh’ campaign will start from tomorrow

“MERI MAATI MERA DESH” CAMPAIGN TO PAY TRIBUTE TO THE ‘VEERS’ WHO LAID DOWN THEIR LIVES FOR THE COUNTRY

Categories
Breaking News cultural social देश/विदेश
azadi ka amrit mahotsavg20-india-2023

“MERI MAATI MERA DESH” CAMPAIGN TO PAY TRIBUTE TO THE ‘VEERS’ WHO LAID DOWN THEIR LIVES FOR THE COUNTRY


NATION-WIDE JAN-BHAGIDHARI PROGRAMMES TO BE ORGANISED FROM VILLAGE TO NATIONAL LEVEL

SHILAPHALAKAMS (MEMORIAL PLAQUES) TO BE INSTALLED IN GRAM PANCHAYATS

SOIL FROM VARIOUS CORNERS OF THE COUNTRY TO BE BROUGHT TO DELHI IN AMRIT KALASH YATRA FOR CREATING AMRIT VATIKA

Posted On: 03 AUG 2023 7:50PM by PIB Delhi

Prime Minister of India, Shri Narendra Modi, recently announced the ‘Meri Maati Mera Desh’ campaign during his Mann Ki Baat broadcast. This campaign aims to honour the brave freedom fighters and bravehearts who sacrificed their lives for the country. The campaign will include various programs across the country to remember the bravehearts (Veers). Shilaphalakams (memorial plaques) commemorating them will be installed in gram panchayats, close to Amrit Sarovars. This information was shared at a joint press conference held by Secretary, Information and Broadcasting and Department of Telecommunications, Shri Apurva Chandra; Secretary, Culture Shri Govind Mohan and Secretary, Youth Affairs, Smt. Meeta Rajivlochan  in New Delhi today. CEO, Prasar Bharti Shri Gourav Dwivedi was also present on the occasion.

Addressing the press conference, Shri Apurva Chandra said that Meri Maati Mera Desh will be the concluding programme of Azadi ka Amrit Mahotsav which celebrates 75 years of India’s Independence. The nationwide campaign Har Ghar Tiranga organised last year was a roaring success and this year even a more ambitious programme ‘Meri Maati Mera Desh’ is being rolled out under Azadi ka Amrit Mahotsav, he added. Sh. Apurva Chandra explained that installing Shilaphalakam as tribute to bravehearts, Mitti ka Naman and Veeron ka Vandan are the key components of the campaign Meri Maati Mera Desh.  Har Ghar Tiranga will also be organised this year but as an important component of Meri Maati Mera Desh, he added. The Secretary also highlighted the role of media in generating awareness about the campaign and taking it to every nook and corner of the country.

Secretary, Culture,Shri Govind Mohan  in his presentation informed that the campaign will feature programs like the establishment of Shilaphalakams dedicated to freedom fighters and security forces, as well as initiatives like Panch Pran Pledge, Vasudha Vandan, Veeron ka Vandan which venerates the gallant sacrifices of our bravehearts. Shilaphalakam  or Memorial plaques saluting the spirit of sacrifice of local bravehearts from the village, panchayat, block, town, city, municipality etc. are to be erected across urban and rural areas. It will have Prime Minister’s message with the names of those who have laid down their lives for the nation belonging to that region.

Sh Govind Mohan said that this campaign is the concluding event of  ‘Azadi ka Amrit Mahotsav,’ which began on 12th March, 2021, and has witnessed widespread public participation (Jan Bhagidari) with over 2 lakh programs organized across India. From 9th- 30th August, 2023, the ‘Meri Maati Mera Desh’ campaign will include programs at the village, and  block levels , by local urban bodies, as well as state and national level.

He further elaborated that an ‘Amrit Kalash Yatra’ will be conducted, carrying soil from all corners of the country in 7500 kalash to create an ‘Amrit Vatika’ in Delhi This ‘Amrit Vatika’ will symbolize the commitment to ‘Ek Bharat Shreshtha Bharat’.

Giving further details, Culture Secretary said that to encourage mass participation (Jan Bhagidari), a website, https://merimaatimeradesh.gov.in, has been launched where people can upload selfies holding soil or an earthen lamp. By doing so, they take the pledge of Panch Pran, with focus to make India a developed country, eliminate the mentality of slavery, be proud of our rich heritage, uphold unity and solidarity, fulfill duties as citizens, and respect those who protect the nation. Once the pledge is taken, a digital certificate of participation can be downloaded from the website. Last year, “Har Ghar Tiranga” programme, became a grand success owing to participation of one and all. This year too, Har Ghar Tiranga will be celebrated between 13th -15th  August, 2023. Indians everywhere can hoist the national flag, click selfie with the Tiranga and upload on Har Ghar Tiranga website. (harghartiranga.com).

Secretary Ministry of Youth Affairs and Sports Smt. Meeta Rajivlochan  informed that the details of the nationwide campaign can be accessed on the portal https:// yuva.gov.in/meri_maati_mera_desh. Not only will the portal contain relevant information on various activities under Meri Maati Mera Desh campaign, the youth can also join the campaign through this portal by uploading their activities like selfies and planting of saplings on this website. She urged the youth to take part in the campaign with enthusiasm and to also engage all around them in the nation wide effort to pay tribute to our Bravehearts and our Motherland.

Chief Executive Officer (CEO), Prasar Bharti Shri Gourav Dwivedi gave the details of media coverage of Meri Maati Mera Desh campaign through Akashvani, Doordarshan and other digital platforms of Prasar Bharti.

The ‘Meri Maati Mera Desh’ campaign will start on 9th August, with scheduled programs until Independence Day on 15thAugust,2023. Subsequent events will take place from  16th August , 2023 onwards at block, municipality/corporation, and state levels. The closing ceremony is scheduled for 30th August, 2023, on the Kartavya Path, New Delhi in the presence of dignitaries.

****

 

Meri Mati Mera Desh Abhiyan | देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” मोहीम

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

Meri Mati Mera Desh Abhiyan | देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” मोहीम


गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी जन-भागीदारी कार्यक्रम आयोजित केले जाणार

ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणार

अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत माती आणली जाणार

Meri Mati Mera Desh Abhiyan | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच त्यांच्या मन की बात (Man Ki Bat) प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची (Meri Mati Mera Desh Abhiyan) घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. (Meri Mati Mera Desh Abhiyan)

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. माहिती आणि प्रसारण तसेच दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा , सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन आणि युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन यांनी आज नवी दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी देखील उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना अपूर्व चंद्रा म्हणाले की, ‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी  मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे असे ते म्हणाले. (Aazadi ka Amrit Mahotsav)

शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे मेरी माटी  मेरा देश या मोहिमेचे प्रमुख घटक असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले. मेरी माटी  मेरा देश या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वर्षीही हर घर तिरंगा अभियान आयोजित केले जाईल असे ते पुढे म्हणाले. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात माध्यमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.

सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी आपल्या सादरीकरणात माहिती देताना सांगितले की या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील. वीरहृदयांची. गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील  स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन  करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम 12 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात 2 लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग (जन भागीदारी) नोंदवला आहे, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली. 9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, असे या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना सांस्कृतिक सचिवांनी सांगितले. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्रणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे “हर घर तिरंगा”उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, 13 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकावू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करू शकतात. (harghartiranga.com).

या देशव्यापी मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन यांनी दिली. पोर्टलवर केवळ ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती नसून,तरूण या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सामील होऊ शकतात.  तरुणांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मीता राजीवलोचन यांनी केले.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या प्रसारमाध्यमांवरच्या प्रसारणाची माहिती दिली.

‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम 16 ऑगस्ट 2023 पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे.

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Meri Mati Mera Desh |  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत “मेरी माटी मेरा देश” (Meri Mati Mera Desh)  उपक्रम राबविणेकामी तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसर (Nodal Officer) यांची क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office’s) आणि परिमंडळ स्तरावर नेमणूक करण्याचे आदेश उपायुक्त्त चेतना केरुरे (Deputy Commissioner Chetana Kerure) यांनी दिले आहेत. (Meri Mati Mera Desh)

आदेशानुसार  “आजादी का अमृत महोत्सव” (Aazadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “मेरी माटी मेरा देश” उपक्रम १६-२० ऑगस्ट पुणे महानगरपालिका क्षेत्रातील घरांसाठी व संस्थासाठी तिरंगा ध्वज वाटपाचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी  ३०-३५ हजार झेंडे तपासणे, नागरिक, सोसायटी, संस्था यांना वाटप करणे कामी आपले स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे व त्याकरिता सर्व परिमंडळ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालये यांनी त्यांचे अखत्यारीतील नोडल ऑफिसर यांची त्वरित नेमणूक करायची आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Meri Mati Mera Desh | Order to field offices to appoint nodal officer for distribution of tricolor flag

Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

महाविजय २०२४: पुणे महानगरपालिकेसोबतच पांडे यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी

 

Meri Mati Mera Desh Abhiyan |’मन की बात’ (Man ki Bat) या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मांडलेल्या “मेरी माटी, मेरा देश” (Meri Mati Mera Desh Abhiyan) या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande BJP) यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद म्हणून पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या हस्ते दोन्ही निवडीचे पत्र पांडे यांना बुधवारी (२ जुलै २०२३) मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. (Meri Mati Mera Desh Abhiyan)

देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात ‘मिट्टी यात्रा’, ‘वसुधा वंदन’, ‘वीरो को वंदन’, ‘ध्वज वंदन’, शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची महाराष्ट्रात राज्यभर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर असेल.

उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येईल. या अभियानाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्मारकाचे समर्पण करण्यात येईल.

———

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी ‘हर घर तिरंगा’ विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे “मेरी माटी, मेरा देश” अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. ‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.

| राजेश पांडे उपाध्यक्ष, भाजप , महाराष्ट्र प्रदेश-


News Title |Meri Mati Mera Desh Abhiyan | “Meri Mati, Mera Desh”: BJP’s Rajesh Pandey as Maharashtra Pradesh Coordinator of Nationwide Campaign