PMU Meeting Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

PMU Meeting Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

| पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार गतीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

PMU Meeting Ajit Pawar – (The Karbhari News Service) – राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन राज्यात विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरू आहेत. नागरिकांच्यादृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार गतीने पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. (Project Monitoring Unit Meeting)

बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (व्हिसीद्वारे), राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन आणि बंदरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-१) असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुणे मेट्रो क्रमांक तीन च्या कामाला वेग द्यावा. नागरिकांच्यादृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कुलचे कामदेखील तातडीने मार्गी लावावे. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या ‘रेवस ते रेडी’ किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वडाळा येथील जीएसटी भवन,पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचादेखील आढावा घेतला.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह (सर्व दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

***

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  केस अजून बोर्डावर नाही |  नवीन सुनावणी आता 21 जून ला

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  केस अजून बोर्डावर नाही |  नवीन सुनावणी आता 21 जून ला

 

Aurangabad High Court |  घाणकाम भत्ता वारसा हक्क केसची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. घाणभत्ता (Ghanbhatta Allowance) अबाधित राहिलाच पाहिजे, या मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर (Aurangabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 11 जून तारीख दिली होती. मात्र त्यावेळी सुनावणी होऊ शकली नाही. आता नवीन सुनावणी 21 जून ला होणार आहे.
  घाणकाम भत्ता वारसा अधिकार कायम रहावा. या मागणीकरता महाराष्ट्र सरकारने ठाम व परीणामकारक भूमिका घ्यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची स्थगिती उठवावी व घाणीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती अजूनही मोठ्या प्रमाणात झालेली नाही.  याची दखल शासन दरबारी असलेल्या प्रतिनिधींनी घ्यावी व यावरची स्थगिती तात्काळ उठवावी. अशी मुख्य मागणी आहे. दरम्यान घाणभत्ता वारस केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर प्रलंबित आहे. (Ghanbhatta Varas Hakk)
11 जून  रोजी  घाणभत्ता वारस हक्क संबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.  त्या दिवशी घाणभत्ता वारस केस सुनावणी करिता बोर्डावर होती.  परंतु वेळेअभावी सुनावणी झालेली नाही. आता 21 जून ला सुनावणी आहे. केस बोर्डवर आणण्यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत.

CM Eknath Shinde on Rain | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

CM Eknath Shinde on Rain | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

| टंचाईच्या ठिकाणी टॅंकर भरण्यासाठी सोलर पंप वापरावेत

| पाणी साठवणुकीसाठी प्लास्टीक टाक्यांचा वापर करावा

 

CM Eknath Shinde on Rain – (The Karbhari News Service) –  राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात दि. १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे. आपत्तीकाळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करून नागरिकांना वेळेवर मदत पोहोचेल यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध होत नसेल तर त्याठिकाणी जिल्हा विकास निधीतून सोलर पंप बसविण्यासाठी आणि पाणी साठवणुकीसाठी प्लास्टीक टाक्या घेण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती व पर्जन्यमानाबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे, शंभूराज देसाई, धनंजय मुंडे, दादा भुसे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.

यंदा चांगला पाऊस पडणार असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणेने अधिक सज्ज रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यात गेल्या दहा दिवसात सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला असून जेथे पुरेसा पाऊस आहे तेथे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात यावे. खरीपासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणांचा काळाबाजार आणि बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कारवाई करावी. त्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पाणी टंचाई ज्या भागात जाणवते तेथे टॅंकर भरण्यासाठी सोलर पंप वापरण्याची परवानगी देतानाच हे पाणी विहीरीत न साठवता त्यासाठी प्लास्टीक टाक्या वापराव्यात जेणेकरून पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल. या टाक्यांना नळ बसविण्यात यावे जेणेकरून महिलांना पाणी भरण्यासाठी सुलभता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीजबिल थकीत असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घ्यावी. अशा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मदतीचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. त्याच्या वितरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी. केवायसी अभावी निधी बॅंकेत पडून राहता कामा नये, असे सांगतानाच. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे, घरांचे पंचनामे तातडीने करण्यात यावे. जेथे पुरेसा पाऊस झाला नाही तेथे टँकर, चारा डेपो सुरू ठेवावे. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने फिल्डवर जाऊन कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Lok Sabha Election Code of Conduct | शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Lok Sabha Election Code of Conduct | शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

 

 

Lok Sabha Election Code of conduct – (The Karbhari News Service) –  लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

MP Supriya Sule | आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, असे का म्हणाल्या सुप्रियाताई? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MP Supriya Sule | आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, असे का म्हणाल्या सुप्रियाताई?

MP Supriya Sule – (The Karbhari News Service) – सुप्रिया सुळे यांनी पुण्यात बोलताना अजितदादांबद्दल सूचक वक्तव्य केलंय. आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, तर  त्यांच्याकडून सल्ला घेत असतो.  असे सुळे म्हणाल्या आहेत. (NCP – Ajit Pawar)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुसंडी मारत यंदाच्या लोकसभेत समाधानकारक जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार)  १० पैकी ८ जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जाग मिळाली आहे. शरद पवार यांनी नवीन चिन्ह, नाव या जोरावर ८ जागा मिळवून दाखवल्या आहेत. बारामतीच्या लढाईत लाखांच्या लीडने सुप्रिया जिंकून आल्याने महाराष्ट्रात त्यांचे कौतुक केले जात आहे. (NCP Sharadchandra Pawar)

खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच  मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, कालपासून मी खूप गडबडीत आहे. संसदेत पेपर वर्क खूप असतो. मला झोपायला पण वेळ मिळाला नाही. रात्री दीड वाजता मी घरी आले. मला सोशल मीडिया, मेसेज, फोन कॉल बघायला वेळच मिळाला नाही. आता तर माझा मोबाईलही माझ्याकडे नाहीये. असं त्या म्हणाल्या आहेत. तुम्ही दादांना काय सल्ला द्याल या पत्रकारांच्या प्रश्नावर, सुप्रिया सुळेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. मी एक मराठी संस्कृतीमधील महिला आहे. आम्ही मोठ्या लोकांना सल्ले देत नाही. त्यांच्याकडून सल्ला घेत असतो.

महाराष्ट्रात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती. सर्वत्र राज्यभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी छावण्याची मागणी असून ती मान्य होत नाही. चारा डेपो नसून पाण्याचे टँकर देखील वेळेवर पोहोचत नाहीत. या सर्व प्रकाराला राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. जनतेने महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे कामाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून यापुढे आणखीन जबाबदारी वाढलीये. काम करीत राहणे आणि विकास करणे हेच खरे कार्य असल्याचे सुळे यांनी सांगितले.

राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. यामुळे रोहित पवार आणि मी उद्या पासून महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी जेसिबी, क्रेनच्या साहाय्याने स्वागत करू नका त्यापेक्षा चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी मदत करा असे आवाहनही सुळे यांनी केले.

Voting Percentage of Maharashtra Increased | महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ!

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Voting Percentage of Maharashtra Increased | महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ!

 

Voting Percentage of Maharashtra – (The Karbhari News Service) – केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. (Loksabha Election 2024)

महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ ही पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये एकूण ६१.३३ इतके टक्के मतदान झाले.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही ३ कोटी ६ लाख ५६ हजार ६११ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या २ कोटी ६३ लाख ४८ हजार ७१७ इतकी आहे. तर इतर मतदार यामध्ये १ हजार ४५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकूण मतदार ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ३८९ मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी ६०.७१ इतकी होती.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्षाकडील फॉर्म – १७ – सी नुसार झालेल्या मतदानाची माहिती त्या केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना पुरवली जाते व अंतिमतः मतमोजणीच्या वेळेस त्याच आकडेवारीशी मतदार यंत्रावरील मतदानाचे आकडे पडताळून पाहिले जातात.

 

0000

Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Maharashtra MLC Election | विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

 

Maharashtra MLC Election- (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (MLC Election) जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे पर्यंत त्या लेखी स्वरुपात मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांना सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम (S Chokkalingam IAS) यांनी येथे केले.

मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सहनिवडणूक अधिकारी मनोहर पारकर यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दि.७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. या निवडणुकीकरिता शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार, १० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जूलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि.२४ मे २०२४ रोजी या निवडणूकीसाठीचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून तात्काळ संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. मुबंई पदवीधर तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग, हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त, नाशिक तर मुबंई शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

या विधान परिषदेच्या निवडणूकांकरिता अंतिम मतदार यादी दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंत दि.७ जून २०२४ पर्यंत या यादीमध्ये सुधारणा करता येईल. त्यासाठी या दिनांकापूर्वी दहा दिवस आधी म्हणजे दि. २८ मे २०२४ पर्यंत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील. दि.१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार १४,५१५ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,४०४ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ रोजीची एकूण मतदारसंख्या १५,९१९ इतकी आहे. यामध्ये मुंबई शहर २,७४८ मतदारसंख्या तर मुंबई उपनगरमध्ये १३,१७१ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबई मतदारसंघात एकूण मतदार संख्या १०,१७० इतकी होती.

नाशिक मतदार संघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ६४,८०२ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,७५५ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या ६६,५५७ इतकी आहे. यामध्ये नाशिक २४,९६५ मतदारसंख्या तर धुळे ८,१६५, नंदुरबार ५,४९५, जळगांव १३,११४, अहमदनगर १४,८१८ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये नाशिक मतदारसंघात एकूण मतदार संख्या ५३,८९२ इतकी होती.

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या ९१,२६३ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही २५,६६० इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या १,१६,९२३ इतकी आहे. यामध्ये मुबंई शहर मध्ये ३१,२२९ तर मुबंई उपनगरमध्ये ८५,६९४ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची मुंबई या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही ७०,५१३ इतकी होती.

कोकण मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या १७,७५१० इतकी असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही ३६,४०७ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यत रोजीची एकूण मतदारसंख्या २,१३,९१७ इतकी आहे. यामध्ये पालघर मध्ये २५,११५ तर ठाण्या मध्ये ९५,०८३, रायगडमध्ये ५३,५४३, रत्नागिरी २२,२०५, सिंधुदुर्ग १७,९७१ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १,०४,४८८ इतकी होती.

राज्यसभेवरील रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडणुकीबाबत

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने दि. २७ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम घोषित केला आह. दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे पद रिक्त झाले असून या पदाचा कालावधी दि. ४ जूलै, २०२८ पर्यंत होता.या रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरवार, दि. ६ जून २०२४ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक), नामनिर्दैशन पत्र दाखल करण्याचा अतिम दिनांक दि.१३ जून, २०२४, गुरवार आहे. दि.१४ जून २०२४, शुक्रवार रोजी नामनिर्दैशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि.१८ जून, २०२४, मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहील.

मतदानाचा दिनांक २५ जून, २०२४ मंगळवार असून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. दि.२५ जून मंगळवार रोजी सायं.५ वा. मतमोजणी केल्या जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, दि. २८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या निवडणूकीसाठी जितेंद्र भोळे, सचिव, (१) प्रभारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी दिली.

0000

 

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९% मतदान

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९% मतदान

Loksabha Election 2024 Voting- (The Karbhari News Service) – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ६०.६० टक्के
जळगाव – ५१.९८ टक्के
रावेर – ५५.३६ टक्के
जालना – ५८.८५ टक्के
औरंगाबाद – ५४.०२ टक्के
मावळ – ४६.०३ टक्के
*पुणे – ४४.९० टक्के*
शिरूर – ४३.८९ टक्के
अहमदनगर- ५३.२७ टक्के
शिर्डी – ५२.२७ टक्के
बीड – ५८.२१ टक्के

 Guidelines issued by the State Government regarding precautions to be taken while working in septic tanks, underground sewers

Categories
Breaking News social महाराष्ट्र

 Guidelines issued by the State Government regarding precautions to be taken while working in septic tanks, underground sewers

 Working in Manhole – (The Karbhari News Service) Incidents of workers dying while cleaning underground sewer lines, septic tanks etc. in the limits of civil local bodies are happening.  Due to this, as directed by the National Human Rights Commission, New Delhi, to prevent the recurrence of such unfortunate incidents, confined spaces viz.  While working in septic tanks, underground sewers etc
 Regarding the precautions to be taken, instructions have been given to all civil local self-government bodies in the state as per the government decision.  As per government decision, guidelines for cleaning of septic tanks and sewers by mechanical method have been issued.
 have been done.  Also, Emergency Response Sanitation Unit (ERSU) has been established in all civil local self-government bodies to prevent the death of sanitation workers while working in manholes.  However, it is still observed that such incidents are happening in the civil local bodies of the state.  Therefore, detailed instructions are now being given to all civil local bodies in the state.  (Maharashtra State Circular)
 1) Cleaning of confined spaces should preferably be done mechanically or by machines and cleaning by workers only in unavoidable situations.
 2) The depth of the confined space should be measured before cleaning the confined space by workers.  Also, proper safety measures should be implemented to avoid mishaps by understanding the detailed details of the respective confined space.
 3) Workers should be trained to work in confined spaces and certificate should be given to the worker concerned on successful completion of such training.  Also, only such certified workers should be allowed to work in confined spaces like septic tanks, underground sewers in unavoidable situations.
 4) Before starting work in the confined space, it is essential to check that the air there is free from toxic and flammable gases, dust and that there is no shortage of oxygenated air in the place.
 5) Mechanical ventilation should be provided to ensure adequate supply of proper and fresh air.  Since the use of direct oxygen gas in confined spaces increases the risk of fire or explosion, direct oxygen gas should not be used to air condition the area.
 6) It will be necessary to issue a safety clearance by the site manager that all safety precautions have been taken before allowing workers to enter or start work in confined spaces.
 7) Provision of trained workers to attend to the exterior of the confined space
 is necessary.  Until all workers who entered the confined space exit or replace them
 Outside trained workers will be present in their place until other trained workers arrive.
 8) Before entering the confined space, every worker should wear safety clothing, safety glasses.  Also, it is necessary to have a suitable breathing apparatus and a safety belt securely attached to a rope that is strong enough to pull the worker out in case of an emergency.
 9) If a worker working in a confined space feels uncomfortable, that worker shall be removed immediately.
 10) Mock Drills at regular intervals to get actual experience of rescue operations.
 should be organized and ensure that the workers concerned have knowledge of rescue operations.
 11) According to the provisions of the Workmen’s Compensation Act, 1923, similarly Hon.  Contractors and Principals concerned are responsible for paying compensation payable to dead or injured workers as directed by the Supreme Court / National Human Rights Commission
 of the employer (contractor & principle employer).
 12) It has been observed that some private organizations/individuals are employing workers or private organizations for cleaning confined spaces like septic tanks, underground sewers etc. in many places within the limits of civil local self-government bodies and in such cases the workers employed should be fully trained and such organizations and their workers.  of
 Registration must be done annually with the respective civil local bodies.
 13) All above mentioned instructions should be strictly followed while working in confined spaces like septic tanks, underground sewers etc.  Also, apart from the above guidelines, all necessary measures should be taken from the point of view of safety, according to the local conditions to avoid possible mishaps.

Working in Septic Tank, Sewer Line | सेप्टिक टँक, भूमिगत गटारे मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी 

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Working in Septic Tank, Sewer Line | सेप्टिक टँक, भूमिगत गटारे मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Working in Manhole – (The Karbhari News Service) – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies) हद्दीत भूमिगत गटारे (Sewer Lines), सेप्टीक टँक (Septic Tank) इत्यादी बंदिस्त जागेमध्ये साफसफाई करताना कामगार मृत झाल्याबाबतच्या घटना घडत आहेत. यामुळे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून बंदिस्त जागा उदा. सेप्टिक टैंक, भूमिगत गटारे इत्यादी मध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत यापूर्वी स शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णयान्वये सेप्टीक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता संपुर्णपणे यांत्रिकी पध्दतीने करण्याच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित
करण्यात आल्या आहेत. तसेच, मॅनहोलमध्ये उतरुन कामकरीत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्युच्या घटना टाळण्यासाठीच्या हेतुने  सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिघ्रकृती दल (Emergency Response Sanitation Unit ERSU) स्थापन करण्यात आले आहेत. तथापि, अद्यापही अशा प्रकारच्या घटना राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना  पुन्हा सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. (Maharashtra State Circular)

१) बंदिस्त जागांची साफ- सफाई प्राधान्याने यांत्रिक पद्धतीने अथवा मशिनद्वारे करण्यात यावी आणि केवळ अपरिहार्य परिस्थितीतच कामगारांमार्फत साफ-सफाई करण्यात यावी.
२) बंदिस्त जागांची कामगारांमार्फत साफ-सफाई करण्यापूर्वी बंदिस्त जागेची खोली (Depth) मोजण्यात यावी. तसेच संबंधित बंदिस्त जागेबाबतचा सविस्तर तपशील समजून दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सुयोग्य सुरक्षिततेचे उपाय अंमलात आणावेत.

३) बंदिस्त जागांमध्ये काम करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यात यावे व असे प्रशिक्षणयशस्वीरीत्या पूर्ण केल्याबाबत संबंधित कामगारास प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच अशा प्रकारे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या कामगारांनाच सेप्टीक टॅक, भुमिगत गटारे या सारख्या बंदिस्त जागांमध्ये अपरिहार्य परिस्थितीतील काम करण्यास परवानगी देण्यात यावी.
४) बंदिस्त जागेमध्ये काम सुरु करण्यापूर्वी तेथील हवा ही विषारी व ज्वालाग्राही वायू, धूळ यापासून मुक्त असल्याबाबत तसेच त्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त हवेची कमतरता नसल्याबाबत तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
५) योग्य व ताज्या हवेच्या पुरेशा पुरवठ्याची खातरजमा करण्यासाठी यांत्रिक वायुविजनाची (Mechanical Ventilation) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. बंदिस्त जागेत थेटऑक्सिजन वायूचा वापर केल्याने आग किंवा स्फोटाचा धोका वाढत असल्याने, त्या ठिकाणची हवा सुयोग्य करण्यासाठी थेट ऑक्सिजन वायूचा वापर करू नये.
६) बंदिस्त जागांमध्ये कामगारांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यापूर्वी अथवा त्या ठिकाणी काम सुरु करण्यापूर्वी सुरक्षिततेबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आल्याबाबतचा सुरक्षितता परवाना साईट मॅनेजर ने देणे आवश्यक राहील.
७) बंदिस्त जागेच्या बाहेरील बाजूस उपस्थित राहण्यासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बंदिस्त जागेत प्रवेश केलेले सर्व कामगार बाहेर येईपर्यंत अथवा त्यांच्या जागी
अन्य प्रशिक्षित कामगार येईपर्यंत बाहेरील प्रशिक्षित कामगार त्यांच्या जागेवर उपस्थित असतील.
८) बंदिस्त जागेत प्रवेश करण्यापूर्वी, प्रत्येक कामगाराने सुरक्षित वेश, सुरक्षित चष्मा परिधान करावा. तसेच सुयोग्य श्वासोच्छवास उपकरण (breathing apparatus) सोबत असणे व आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास कामगारास ओढून बाहेर काढता येईल अशा पुरेशा मजबूत दोरखंडास (rope) सुरक्षितपणे जोडलेला पट्टा (safety belt) असणे आवश्यक आहे.
९) बंदिस्त जागेत काम करणाऱ्या कामगारास अस्वस्थ वाटल्यास त्या कामगारास लगेच तेथून बाहेर काढण्यात येईल.
१०) बचाव कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी ठराविक कालांतराने मॉक ड्रीलस् (Mock Drills) आयोजित करण्यात यावेत आणि संबंधित कामगारांना बचाव कार्याच्या कार्यपद्धतीचे ज्ञान असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
११) कामगार नुकसान भरपाई अधिनियम, १९२३ मधील तरतुदीनुसार त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने / राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्या निर्देशानुसार मृत अथवा जखमी कामगारास देय असणारी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रमुख नियोक्त्याची (contractor & principle employer) असेल.
१२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी काही खाजगी संस्था / व्यक्ती सेप्टिक टैंक, भूमिगत गटारे इत्यादी बंदीस्त जागेमध्ये साफसफाई करण्यासाठी कामगार अथवा खाजगी संस्था यांची नेमणूक करत असल्याचे निदर्शनास आले असून अशा प्रकरणामध्ये नेमण्यात येणारे कामगार हे पूर्णतः प्रशिक्षित असणे व अशा संस्था व त्यांचे कामगार यांची
संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दरवर्षी नोंदणी असणे आवश्यक आहे.
१३) सेप्टिक टँक, भूमिगत गटारे इत्यादी बंदीस्त जागेमध्ये काम करताना उपरोक्त नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त संभाव्य दुर्दैवी घटना टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.