Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Categories
Breaking News social पुणे

Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Tilak Maharashtra Vidyapeeth | टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे (Tilak Maharashtra Vidyapeeth Pune) यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्याच्या (Purandar Fort) पायथ्याशी वसलेल्या घेरा पुरंदर गट ग्रामपंचायती अंतर्गत येणारे  घेरा पानवडी हे गाव संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे. विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या वतीने सदर गावचे सामाजिक सर्वेक्षण तसेच संसाधनांचे सर्वक्षण करून गरजांच्या अध्ययनाचा अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेल्या गावकऱ्यांच्या समस्या आणि गरजा यांना उत्तर आणि समाधान शोधण्यासाठी  गाव विकासाचा कृती आराखडा तयार करून विद्यापीठाच्या समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने सदर गावच्या शाश्वत विकासासाठी वेळोवेळी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. (Tilak Maharashtra Vidyapeeth)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश (Meri Mati Mera Desh) हे अभियान देशभर राबविले जात आहे. सदर अभियानांतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच नर्सिंग विभागाच्या वतीने स्वातंत्र्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या किंबहुना स्वतःचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे विचार देशातील नागरिकांनी अंगी जोपासावेत आणि अमलात आणण्याचे प्रयत्न करावेत यासाठी शपथ घेण्यात आली.  त्याचबरोबर थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्यावरती काव्यवाचन आणि कथाकथन अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याच
अनुषंगाने मेरी माटी मेरा देश या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून मौजे घेरा पानवडी या गावांमध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.  यामध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. घेरा पानवडी गावातील ढगारे आळी, कारकुड आळी, राजे शिवछत्रपती विद्यालय परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, बेंगळे वस्ती, कोकरे वस्ती आणि पठारे वस्ती इत्यादी भागामध्ये वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्या त्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर सोपविण्यात आली आहे आणि तशी नागरिकांनी हमी देखील दिली आहे की आम्ही त्या वृक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करू. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नोंदणीकृत स्वयंसेवक अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट विभाग, विधी विभाग, फिजिओथेरपी विभाग आणि समाजकार्य विभाग इत्यादी विभागातील ४०  जणांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण ४ कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू, डॉ. गीताली टिळक, कुलसचिव, डॉ. सुवर्णा साठे ,  उपाध्यक्ष, डॉ. रोहित टिळक,  शैक्षणिक सल्लागार, डॉ. प्रणती टिळक आणि विद्यापीठाचे  सचिव  अजित खाडीलकर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या अभियानाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक श्री. ओंकार केणे यांचे अविरत सहकार्य लाभले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.  निलेश उपाध्ये, श्री. रोहन बावडेकर, योगेश पाटील, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. या अभियानाचे उत्कृष्ट समन्वय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश यादव आणि निता कदम यांनी केले.
——-
News Title | Tilak Maharashtra Vidyapeeth | Under Meri Mati Mera Desh Abhiyan, Tilak Maharashtra University completed tree plantation campaign at Ghera Panwadi!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti| पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti|पुरंदर  किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

| किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर (Purandar Fort) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी केली.

किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला , उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील . गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.

छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज कुशल प्रशासक होते. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल.

कार्यक्रमपूर्वी सुवासिनींनी बाल शंभुराजेंचा पाळणा म्हटला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.