Meri Mati Mera Desh | पुण्यातून ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Meri Mati Mera Desh | पुण्यातून ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Meri Mati Mera Desh | मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश (Amrit Kalash) देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील (Kartavya Path) स्मारकासाठी रवाना करण्यात आले.
रांगोळी, सनई-चौघड्याचे सूर, ढोल-ताशांचा गजर, ठिकठिकाणी उभारलेले राष्ट्रध्वज, भारतमातेचा जयघोष करणारी सळसळत्या उत्साहातील तरुणाईने परिसरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) 1400 विद्यार्थ्यांनी अमृत कलश घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले.
राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एनएसएसच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहीद प्रदीप ताथवडे व शहीद दिलीप ओझरकर यांच्या नातेवाईकांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर अमृतवाटीका उभारण्यात येत आहे. तरुण पीढीला पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य टिकविण्यासाठीचा संघर्ष  माहीत व्हावा यासाठी या अमृतवाटीकेसाठी एक मूठभर माती पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबरला होणार आहे. ही पीढी आयुष्यभर या प्रसंगाची आठवण ठेवेल. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तरूणाई बाहेर पडते, तेव्हा देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास मिळतो.
शेकटकर म्हणाले,अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा धोका आहे. तो आधुनिक भारताला तोडणारा आहे. मी राहीन किंवा राहणार नाही परंतु भारत राहील अशी भावना असलेला आजचा युवक हा देशाचे भविष्य आणि वर्तमान आहे.
पांडे म्हणाले, राज्यात सेल्फी विथ माती अभियान सुरू आहे. या अभियानात सोळा लाखांहून अधिक फोटो लिंकवर अपलोड केले आहेत. हा एक विश्वविक्रम ठरणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत या अभियानात सहभागी होता येणार आहे. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Meri Mati Mera Desh | PMC Pune | ‘माझी माती माझा देश’ उपक्रम अंतर्गत 11 हजार वृक्षांची लागवड | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Meri Mati Mera Desh | PMC Pune | ‘माझी माती माझा देश’ उपक्रम अंतर्गत 11 हजार वृक्षांची लागवड | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत  ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता
Meri Mati Mera Desh | PMC Pune |  शहरातील ३३ हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली आणि विविध प्रभागात ११ हजार वृक्षांची लागवड (Tree Plantation) करण्यात आली. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. तसेच त्यांनी महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. (Meri Mati Mera Desh | PMC Pune)
 पुणे महापालिकेच्यावतीने (PMC Pune) आयोजित ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सांगता  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. (Pune News)
पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय येथे शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), विकास ढाकणे (PMC Additional commissioner Vikas Dhakane), विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे (CEO Rajendra Muthe) आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
यावेळी पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या मनात देशाविषयी गौरवाची भावना असणे आणि भारताच्या वैभवशाली इतिहासाची चांगली मांडणी करून जगासमोर आणणे गरजेचे आहे. देशाचे वैभव, इतिहास, संस्कृती आणि परंपरा नव्याने समोर आणणे आणि नागरिकांना माहीत असणे देशाच्या ऐक्यासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी देशपातळीवर ‘माझी माती माझा देश’  उपक्रम राबविण्यात येत आहे. (PMC Pune News)
या उपक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचविणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी रत्ने जन्माला आली त्या मातीला वंदन करण्यासाठी आयोजित  ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने चांगले काम केले आहे, यासाठीचा लोकसहभागाही स्तुत्य आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे येथील एमआयटी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या कारगिल युद्धात शहीद जवानांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरात ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. श्री.पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक, वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर सन २०२३-२४ मध्ये मुदतीत मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्याकरिता पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित लॉटरी योजनेची सोडत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली.
तत्पूर्वी  छत्रपती संभाजी उद्यान येथे पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते अमृत वाटिकेचे उदघाटन करण्यात आले आणि अमृत कलश पूजन करण्यात आले. हा अमृत कलश आयुक्त विक्रमकुमार यांनी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला. अमृत वाटिकेत बकुळ, सोनचाफा, कांचन, ताम्हण, बहावा आदी ७५ रोपांची लागवड करण्यात आली. अमृत वाटिकेत पर्यावरण पूरक रोपे लावण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.
———-
News Title | Meri Mati Mera Desh | PMC Pune | Plantation of 11 thousand trees under ‘Majhi Mati Maja Desh’ initiative Municipal Commissioner Vikram Kumar

Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Categories
Breaking News social पुणे

Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!

Tilak Maharashtra Vidyapeeth | टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे (Tilak Maharashtra Vidyapeeth Pune) यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्याच्या (Purandar Fort) पायथ्याशी वसलेल्या घेरा पुरंदर गट ग्रामपंचायती अंतर्गत येणारे  घेरा पानवडी हे गाव संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे. विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या वतीने सदर गावचे सामाजिक सर्वेक्षण तसेच संसाधनांचे सर्वक्षण करून गरजांच्या अध्ययनाचा अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेल्या गावकऱ्यांच्या समस्या आणि गरजा यांना उत्तर आणि समाधान शोधण्यासाठी  गाव विकासाचा कृती आराखडा तयार करून विद्यापीठाच्या समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने सदर गावच्या शाश्वत विकासासाठी वेळोवेळी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. (Tilak Maharashtra Vidyapeeth)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश (Meri Mati Mera Desh) हे अभियान देशभर राबविले जात आहे. सदर अभियानांतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच नर्सिंग विभागाच्या वतीने स्वातंत्र्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या किंबहुना स्वतःचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे विचार देशातील नागरिकांनी अंगी जोपासावेत आणि अमलात आणण्याचे प्रयत्न करावेत यासाठी शपथ घेण्यात आली.  त्याचबरोबर थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्यावरती काव्यवाचन आणि कथाकथन अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याच
अनुषंगाने मेरी माटी मेरा देश या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून मौजे घेरा पानवडी या गावांमध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.  यामध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. घेरा पानवडी गावातील ढगारे आळी, कारकुड आळी, राजे शिवछत्रपती विद्यालय परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, बेंगळे वस्ती, कोकरे वस्ती आणि पठारे वस्ती इत्यादी भागामध्ये वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्या त्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर सोपविण्यात आली आहे आणि तशी नागरिकांनी हमी देखील दिली आहे की आम्ही त्या वृक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करू. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नोंदणीकृत स्वयंसेवक अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट विभाग, विधी विभाग, फिजिओथेरपी विभाग आणि समाजकार्य विभाग इत्यादी विभागातील ४०  जणांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण ४ कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू, डॉ. गीताली टिळक, कुलसचिव, डॉ. सुवर्णा साठे ,  उपाध्यक्ष, डॉ. रोहित टिळक,  शैक्षणिक सल्लागार, डॉ. प्रणती टिळक आणि विद्यापीठाचे  सचिव  अजित खाडीलकर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या अभियानाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक श्री. ओंकार केणे यांचे अविरत सहकार्य लाभले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.  निलेश उपाध्ये, श्री. रोहन बावडेकर, योगेश पाटील, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. या अभियानाचे उत्कृष्ट समन्वय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश यादव आणि निता कदम यांनी केले.
——-
News Title | Tilak Maharashtra Vidyapeeth | Under Meri Mati Mera Desh Abhiyan, Tilak Maharashtra University completed tree plantation campaign at Ghera Panwadi!

Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून  ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत  विविध कार्यक्रम संपन्न

Meri Mati Mera Desh | PMC Pune |  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 August पासून सुरु झालेला आहे. सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक  हिरवळीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी पंचप्रण शपथ घेतली. त्या पाठोपाठ सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.
मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत,अमृत वाटिका या उपक्रमातर्गत , देशी ७५ वृक्ष लागवडीचा (Tree Plantations) उपक्रम धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून, तळजाई टेकडी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी, स्थानिक नागरिक, काही संस्था, स्वछता दूत, मोहल्ला समितीचे सदस्य, आणि सर्व कार्यालयीन स्टाफच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष विभागाने, यासाठी खड्डे, आणि वृक्षाची उपलब्धता करून दिली होती. या कार्यक्रमानंतर सामूहिक पंचप्रण शपथ घेण्यात आली.
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी आगाखान पॅलेस या ऐतिहासिक ठिकाणी मनपा शाळा क्रमांक ४९ बी, रामवाडी या शाळेतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी  भेट दिली. (Meri Mati Mera Desh | PMC Pune)
११ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाट्यप्रयोगाच्या सुरवातीस माझी माती माझा देश या अभियानांतर्गत मातीचे दिवे प्रजवलित करून, सर्व रसिकांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी, पुणे महानगरपालिकेचे  उप आयुक्त डॉ. चेतना केरूरे, प्रशासन अधिकारी श्रीमती सुप्रिया हेंद्रे, अभिनेता प्रशांत दामले, कविता लाड, उमेश कामत, नाट्य परिषदेचे कार्यवाहक सत्यजित धांडेकर, समीर हंपी आदी उपस्थित होते.
माझी माती माझा देश  या उपक्रमा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महानगरपालिका- कस्तुरबा गांधी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक ११४बी, ढोले पाटील रोड पुणे -१ या शाळेने दिनांक १२/८/२०२३ रोजी पंचप्रण शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर राबविला  असून १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक १३/०८/२०२३ रोजी येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय “मेरी माटी मेरा देश” अभियान अंतर्गत मा उपायुक्त श्रीमती किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली WAR MEMORIAL SOUTHERN COMMAND  या ठिकाणी  तेथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांच्या मातीचे संकलन करण्यात आले.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत  दिनांक १४/०८/२०२३ रोजी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. संदीप खलाटे यांच्या हस्ते सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशनिंग दुकान) योजनेचे लाभार्थी यांना तिरंगा ध्वज वाटप केले गेले.
आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवाबद्दल शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान येथे मेरी माटी मेरा देश या संकल्पने अंतर्गत शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचे बंधू मिलिंद ताथवडे यांचा सत्कार करून त्यांच्या कडून मातीचा स्वीकार केला व शहिदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली . त्यावेळी उप अभियंता चिंतामणी दळवी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरिड, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १० शास्त्रीनगर अंतर्गत हर घर तिरंगा राष्ट्रध्वज टिव्ही चैनल १२ विजेती कलाकार माजी महामही राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते  गौरवण्यात आलेल्या कुमारी वैष्णवी पाटील यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण ६९७ सुस्थितीतील राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले आहेत. तसेच शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संगमवाडी हजेरी कोठी व येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील आरोग्य कोठी मार्फत ध्वज वितरण करण्यात आले.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वातंत्र सैनिक कै. बाळकृष्ण मिरजकर  यांच्या पत्नी श्रीमती शोभना मिरजकर (राहणार परमहंस नगर कोथरूड)   यांचा सम्मान करण्यात आला. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निवृत्त विंग कमांडर श्री सुरेश त्रिंबक मेहंदळे (राहणार डहाणूकर कॉलनी कोथरूड) यांचा सन्मान करण्यात आला.
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी, मेरा देश या उपक्रमासाठी मिट्टी को नमन वीरों को वंदन अभियान  अंतर्गत मा. आमदार सुनील कांबळे यांना  मा. महापालिका सहायक आयुक्त ढवळे पाटील, यांचे हस्ते तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळेस  प्र. उप अभियंता श्री पंडित, कनिष्ठ अभियंता श्री गांगुर्डे हे उपस्थित होते.
हर घर तिरंगा व मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाची माहिती देऊन  माजी सभासद मा.माधुरी ताई सहस्रबुद्धे  यांचे घरी सन्मानपूर्वक तिरंगा झेंडा देण्यात आला. श्री आलम पठाण, संघटक गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, बांधकाम व्यवसायिक, वारजे माळवाडी यांच्याकडून माती स्वीकारण्यात आली. खटके मोहन अंकुश फ्रीडम फायटर यांच्या नातेवाईकांकडून माती स्वीकारली, तसेच त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. प्रभाग क्र. ३१ मध्ये  मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत आर्किटेक्ट श्री संजय भगत यांजकडून माती स्वीकारण्यात आली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक  नंदा प्रताप, वारजे कर्वेनगर ब्रँड ॲम्बेसेडर रुपाली मगर व मनपा सेवक सागर राजगुरू उपस्थित होते.
अशा रीतीने पुणे शहरात सर्व ठिकाणी पुणे महानगरपालिके अंतर्गत सर्व  क्षेत्रीय कार्यालयामार्फत व शिक्षण विभागामार्फत हर घर तिरंगा कार्यक्रमा निमित्त राष्ट्रध्वज वाटपाचा कार्यक्रम व ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ या अभियाना अंतर्गत  राबविण्यात  येणाऱ्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
——-

Meri Mati Mera Desh | ‘माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात |

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Meri Mati Mera Desh | ‘माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात

  Meri Mati Mera Desh | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे.  त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे. (Meri Mati Mera Desh)
            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09  ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
            लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिनांक 09 ते 14ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी –कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) सर्व अधिकारी-  कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत घेणार आहेत.
000
News Title | Meri Mati Mera Desh | ‘Majhi Mati, Maja Desh’ campaign will start from tomorrow