Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून  ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत  विविध कार्यक्रम संपन्न

Meri Mati Mera Desh | PMC Pune |  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 August पासून सुरु झालेला आहे. सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक  हिरवळीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी पंचप्रण शपथ घेतली. त्या पाठोपाठ सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.
मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत,अमृत वाटिका या उपक्रमातर्गत , देशी ७५ वृक्ष लागवडीचा (Tree Plantations) उपक्रम धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून, तळजाई टेकडी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी, स्थानिक नागरिक, काही संस्था, स्वछता दूत, मोहल्ला समितीचे सदस्य, आणि सर्व कार्यालयीन स्टाफच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष विभागाने, यासाठी खड्डे, आणि वृक्षाची उपलब्धता करून दिली होती. या कार्यक्रमानंतर सामूहिक पंचप्रण शपथ घेण्यात आली.
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी आगाखान पॅलेस या ऐतिहासिक ठिकाणी मनपा शाळा क्रमांक ४९ बी, रामवाडी या शाळेतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी  भेट दिली. (Meri Mati Mera Desh | PMC Pune)
११ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाट्यप्रयोगाच्या सुरवातीस माझी माती माझा देश या अभियानांतर्गत मातीचे दिवे प्रजवलित करून, सर्व रसिकांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी, पुणे महानगरपालिकेचे  उप आयुक्त डॉ. चेतना केरूरे, प्रशासन अधिकारी श्रीमती सुप्रिया हेंद्रे, अभिनेता प्रशांत दामले, कविता लाड, उमेश कामत, नाट्य परिषदेचे कार्यवाहक सत्यजित धांडेकर, समीर हंपी आदी उपस्थित होते.
माझी माती माझा देश  या उपक्रमा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महानगरपालिका- कस्तुरबा गांधी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक ११४बी, ढोले पाटील रोड पुणे -१ या शाळेने दिनांक १२/८/२०२३ रोजी पंचप्रण शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर राबविला  असून १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दिनांक १३/०८/२०२३ रोजी येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय “मेरी माटी मेरा देश” अभियान अंतर्गत मा उपायुक्त श्रीमती किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली WAR MEMORIAL SOUTHERN COMMAND  या ठिकाणी  तेथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांच्या मातीचे संकलन करण्यात आले.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत  दिनांक १४/०८/२०२३ रोजी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. संदीप खलाटे यांच्या हस्ते सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशनिंग दुकान) योजनेचे लाभार्थी यांना तिरंगा ध्वज वाटप केले गेले.
आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवाबद्दल शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान येथे मेरी माटी मेरा देश या संकल्पने अंतर्गत शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचे बंधू मिलिंद ताथवडे यांचा सत्कार करून त्यांच्या कडून मातीचा स्वीकार केला व शहिदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली . त्यावेळी उप अभियंता चिंतामणी दळवी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरिड, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १० शास्त्रीनगर अंतर्गत हर घर तिरंगा राष्ट्रध्वज टिव्ही चैनल १२ विजेती कलाकार माजी महामही राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते  गौरवण्यात आलेल्या कुमारी वैष्णवी पाटील यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण ६९७ सुस्थितीतील राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले आहेत. तसेच शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत संगमवाडी हजेरी कोठी व येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील आरोग्य कोठी मार्फत ध्वज वितरण करण्यात आले.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वातंत्र सैनिक कै. बाळकृष्ण मिरजकर  यांच्या पत्नी श्रीमती शोभना मिरजकर (राहणार परमहंस नगर कोथरूड)   यांचा सम्मान करण्यात आला. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निवृत्त विंग कमांडर श्री सुरेश त्रिंबक मेहंदळे (राहणार डहाणूकर कॉलनी कोथरूड) यांचा सन्मान करण्यात आला.
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी, मेरा देश या उपक्रमासाठी मिट्टी को नमन वीरों को वंदन अभियान  अंतर्गत मा. आमदार सुनील कांबळे यांना  मा. महापालिका सहायक आयुक्त ढवळे पाटील, यांचे हस्ते तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळेस  प्र. उप अभियंता श्री पंडित, कनिष्ठ अभियंता श्री गांगुर्डे हे उपस्थित होते.
हर घर तिरंगा व मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाची माहिती देऊन  माजी सभासद मा.माधुरी ताई सहस्रबुद्धे  यांचे घरी सन्मानपूर्वक तिरंगा झेंडा देण्यात आला. श्री आलम पठाण, संघटक गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, बांधकाम व्यवसायिक, वारजे माळवाडी यांच्याकडून माती स्वीकारण्यात आली. खटके मोहन अंकुश फ्रीडम फायटर यांच्या नातेवाईकांकडून माती स्वीकारली, तसेच त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. प्रभाग क्र. ३१ मध्ये  मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत आर्किटेक्ट श्री संजय भगत यांजकडून माती स्वीकारण्यात आली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक  नंदा प्रताप, वारजे कर्वेनगर ब्रँड ॲम्बेसेडर रुपाली मगर व मनपा सेवक सागर राजगुरू उपस्थित होते.
अशा रीतीने पुणे शहरात सर्व ठिकाणी पुणे महानगरपालिके अंतर्गत सर्व  क्षेत्रीय कार्यालयामार्फत व शिक्षण विभागामार्फत हर घर तिरंगा कार्यक्रमा निमित्त राष्ट्रध्वज वाटपाचा कार्यक्रम व ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ या अभियाना अंतर्गत  राबविण्यात  येणाऱ्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
——-