Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

महाविजय २०२४: पुणे महानगरपालिकेसोबतच पांडे यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी

 

Meri Mati Mera Desh Abhiyan |’मन की बात’ (Man ki Bat) या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मांडलेल्या “मेरी माटी, मेरा देश” (Meri Mati Mera Desh Abhiyan) या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande BJP) यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद म्हणून पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या हस्ते दोन्ही निवडीचे पत्र पांडे यांना बुधवारी (२ जुलै २०२३) मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. (Meri Mati Mera Desh Abhiyan)

देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात ‘मिट्टी यात्रा’, ‘वसुधा वंदन’, ‘वीरो को वंदन’, ‘ध्वज वंदन’, शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची महाराष्ट्रात राज्यभर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर असेल.

उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येईल. या अभियानाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्मारकाचे समर्पण करण्यात येईल.

———

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी ‘हर घर तिरंगा’ विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे “मेरी माटी, मेरा देश” अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. ‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.

| राजेश पांडे उपाध्यक्ष, भाजप , महाराष्ट्र प्रदेश-


News Title |Meri Mati Mera Desh Abhiyan | “Meri Mati, Mera Desh”: BJP’s Rajesh Pandey as Maharashtra Pradesh Coordinator of Nationwide Campaign