Tag: PMC Education Department
PMC Sanitary Napkin Tender | शिक्षण विभागाच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी टेंडरमध्ये संगनमत केल्याचा आरोप | टेंडर रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी
| भाजपच्या चेतन चावीर यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देत केली मागणी
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील प्राथमिक व माध्यमिक शाळातील मुलीना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणे या कामी मध्यवर्ती भांडर कार्यालय मार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. निविदेचे ब पाकीट दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले आहे. या निविदेमध्ये मे. स्टेझी हायजीन प्रा लि. यांची सर्व कागदपत्रे असताना देखील त्यांची निवीदा अपात्र करण्यात आली आहे. तसेच शासन निणर्य मध्ये किरकोळ कारणासाठी निविदा
अपात्र करण्यात येऊ नये. असे आदेश असताना देखील उपायुक्त डॉ. चेतना केरुरे यांनी आर्थिक हितासाठी मनमानी कारभार केलेला आहे. असा आरोप पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चावीर यांनी पुढे म्हटले आहे कि, निविदेमध्ये Menstrual Health Management Training Certificate हि अट मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत गेल्या २-३ वर्षात कधीही टाकण्यात आलेली नव्हती. अट मध्ये पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये Menstrual Health Management Training Certificate देणे बंधनकारक आहे. अशी अट टाकण्यात आलेली आहे. या अटी निविदेमध्ये टाकण्यापूर्वी कार्यालयीन परीपत्रकानुसार खरेदी उच्चधिकार समिती ची मान्यता अपेक्षित असताना उपायुक्तांनी समितीची मान्यता न घेता महापालिका आयुक्त यांची आदेशाचे पालन न करता आर्थिक हितासाठी ही अट टाकली आहे. हे प्रशिक्षण शासकीय/ निमशासकिय संस्था पैकी कुणालाही दिल्याचे चालत असताना उपायुक्तांनी फक्त पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये असे नमूद केले आहे. ही बाब ठराविक ठेकेदारला डोळ्यासमोर ठेऊन टाकण्यात आलेली आहे असे स्पष्ट होत आहे. (Pune Municipal Corporation)
प्राप्त आहे. त्यांनी सादर केलेले नमुने हे IS 5405:2019 स्पेसिफिकेशनुसार आहेत व त्याच दर्जा चांगला आहे.
PMC Primary Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक
प्र.क्र. ३२ वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सदर शाळेत गेले अनेक दिवसांपासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत 6 शिक्षक कमी आहे. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना
२ ते ३ वर्ग घ्यावे लागतात . त्याचप्रमाणे काही वर्गांना शाळेतील शिपाई तसेच बालवाडी शिक्षिका, मावशी व काही वेळेला पालक सुद्धा वर्गांना शिकवीत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला असुन या वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत १७ विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. मात्र शिक्षक कमी असल्याने दर्जा खालावत आहे. (PMC School)
बराटे इंग्रजी शाळेत 6 शिक्षकांची कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही शिक्षण विभाग आणि पालकांची एकत्रित बैठक बोलावली आहे. हा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल. नुकतीच काही इंग्रजी माध्यमासाठी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यातील काही शिक्षक या शाळेत देण्यात येतील.
PMC Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | नवीन वर्षांपासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!
PMC Pune Education Department | शिक्षण विभाग समायोजन प्रक्रियेला वेग! | सामान्य प्रशासन विभागाने मागवली 18 पदांची सविस्तर माहिती
या पदांची मागवली आहे माहिती
प्रशासकीय अधिकारी (वर्ग 1), उपप्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), सहायक प्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), क्रीडाप्रमुख(वर्ग 2), पर्यवेक्षक (वर्ग 3), सहा. प्रशासकीय अधिकारी क्रीडा विभाग (वर्ग 2), शारीरिक शिक्षण संघटक (क्रीडा अधिकारी वर्ग 2), स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) (PMC Pune)
Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा!
| लवकरात लवकर समायोजन करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी
| राजीव नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला
PMC Education Department | MLA Madhuri Misal |पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार आक्रमक
PMC Education Department | MLA Madhuri Misal |वर्गात शिक्षक शिकवायला येत नाहीत, मुला – मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्य आणि सुरक्षिततेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत अशी टीका करीत, पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या (PMC Primary Education Department) गलथान कारभाराविरोधात आमदार माधुरी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) आक्रमक पवित्रा घेतला. (PMC Education Department | MLA Madhuri Misal)
शिक्षकांची रिक्त पदे, खाजगी संस्थांशी कराराद्वारे चालविले जाणारे वर्ग, खाजगी संस्थांना चालवायला दिलेली क्रीडांगणे, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची असुविधा, रखवालदार आणि सुरक्षा रक्षक जागेवर नसणे, विद्युत व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसणे, परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधी आदी समस्यांवर लक्षवेधी सूचनेद्वारे मिसाळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून शिक्षण मंत्र्यांनी या शाळांना अचानक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी. ज्या शाळा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. (Pune Municipal Corporation)
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘ शिक्षण विभागाच्या गैरकारभारामुळे निर्माण झालेल्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नसून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आठवी ते दहावीचे माध्यमिक विभागाचे वर्ग खासगी संस्थांच्या माध्यमातून चालविले जातात. या संस्थांचे शालाव्यवस्थापन समाधानकारक नाही. माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या नियुक्त्या खासगी संस्था कंत्राटी पद्धतीने करतात. या नियुक्त्या करताना शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे यासंस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यात अपयशी ठरतात. या माध्यमिक शाळांची जबाबदारी राज्य सरकार किंवा महापालिकांनी घ्यावी. ‘ (PMC Pune Schools)
सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीला उत्तर दिले. सामंत म्हणाले, ‘ पुणे महापालिका शिक्षण विभागाकडे एकूण २७२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या १८५, इंग्रजी माध्यमाच्या ५२, उर्दू माध्यमाच्या ३३ आणि कन्नड माध्यमाच्या २ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २४२५ शिक्षकांच्या पदांना मान्यता असून, त्यापैकी ३५२ पदे रिक्त आहेत. समाविष्ट ३४ गावांमधील जिल्हा परिषदेच्या ६६ प्राथमिक शाळा महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘ (Maharashtra Monsoon Session)
सामंत म्हणाले, ‘ माध्यमिक विभागाच्या २६ शाळा चालविल्या जातात, या शाळांसाठी २०५ शिक्षक पदे मंजूर आहेत. परंतु केवळ ७५ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या १३० इतकी आहे. २०१ ९ पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती झालेली नाही. उच्च न्यायालयाची मनाई असल्याने ही भरती झाली नाही. आता न्यायालयाने भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून, पुढील काही दिवसांत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात शिक्षकांच्या ३० हजार जागा भरण्यात येणार आहेत. ‘ सामंत पुढे म्हणाले, ‘ मिसाळ यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. पर्वती विधानसभा मतदारसंघातील सरसेनापती हैबतराव शिळीमकर शाळा, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, सिताराम आबाजी बिबवे इंग्रजी माध्यमिक शाळांची गैरसोयींची माहिती घेतली जाणार आहे. शाळांना अचानक भेटी देऊन ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मिसाळ यांची सूचना मान्य करीत आहोत. माध्यमिक शाळांनी राज्य सरकारची मान्यता घ्यावी यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार आहेत. (Pune News)
News Title |PMC Education Department | MLA Madhuri Misal |MLA Aggressive Against Mismanagement of Pune Municipal Primary Education Department