Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप 

| महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

पुणे | वारजे परिसरात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी सुरु आहेत. नागरिकांची याबाबत ओरड सुरु आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर ही वेळ  आली आहे. असा आरोप माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबत धुमाळ यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि आमच्या परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच closure घेतले जाते. गांधीभवन, एसएनडीटी या पाण्याच्या टाक्या बंद आहेत. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. धुमाळ यांनी सांगितले कि, नागरिकांच्या तक्रारी आम्ही पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना सांगण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमचा फोन देखील उचलत नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त देखील आमच्याशी संवाद साधून दखल घेतात. शिवाय स्थानिक अधिकारी देखील सहकार्य करतात, मात्र पावसकर आमच्याकडे फिरकण्यास देखील तयार नाहीत. धुमाळ म्हणाल्या, काही परिसरात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र तो पुरेसा नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू. असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
गुरुवारी एक दिवस पाणी नसेल तर पुढील चार-पाच दिवस आम्हाला अजिबात पाणी येत नाही ….कारण पाण्याला प्रेशर कमी असते व ते उताराने खाली जाते ….काल आज मी पाण्याचे बिसलेरी जार आणून घरात वापरत आहे पिण्यासाठी देखील दोन-तीन हंडे पाणी येत नाही…
– नागरिक
…बरेच दिवस सांगत आहे की वरती जो वाल बसवलेला आहे सरोदे एडगे घराजवळ तो काढून टाकावा किंवा  तो काढून खाली बसवावा ..आम्हाला वरील 10 घराणं 1 वर्ष होऊन गेले पाणी खूप कमी येते…आत्ता पाणी उताराने सर्व खाली जात आहे… कृपया लक्ष लक्ष घालून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा.
– नागरिक
वारजे भागात सलग 3 दिवस पाण्यावाचून नागरिकांचे हाल. सुस्त पाणी पुरवठा यंत्रणा आणि यांना जागे करण्यासाठी कोणीच वाली नसल्यामुळे मागील काही काळा पासून वारजे भगातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत.
– नागरिक

आपण फारच सहनशील आहोत. ठीक आहे एक दिवस पाणी येणार नाही समजू शकतो पण पुढील दोन दिवस पाणी येत नाही हे मात्र योग्य नाही. दर 15 दिवसांनी गुरुवारी पाणी नसते आणि पुढील दोन दिवस पाण्या साठी वणवण करायची. हे नेहमीचेच झाले आहे. आपल्या भागातील नगरसेवक काय करतात?

– नागरिक
—-
तांत्रिक अडचण समजू शकतो पण मग महापालिकेने स्वतःचे टँकर्स पाठवून स्वखर्चाने टाक्या भरून द्याव्यात.
– नागरिक

Warje Sahitya Katta | वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन

पुणे : आपण भौतिक सुखाच्या मागे धावत चाललोय. आपल्याकडे रस्तोरस्ती भरपूर खाऊगल्ल्या होतायत पण ग्रंथालय होत नाहीत. पण वारजे परिसरात ग्रंथालयाची निर्मिती होत असेल तर ती आनंदाची गोष्ट असून यामुळे परिसराचा वैचारिक विकास होणार आहे. असा विचार सर्व लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं असल्याचं मत साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केलं.

माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांतून पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि वारजे साहित्यिक कट्टाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या साहित्यिक स्व.डॉ.रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन प्रसिद्ध बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माधवी वैद्य, दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, मलिक्कर्जून नवांदे , भावार्थ देखणे, पूजा देखणे, पद्मश्री देखणे, देखणे, धर्मराज महाराज हांडे, गणेश भगत, ज्योत्स्ना चांदगुडे, वी. दा. पिंगळे उपस्थित होते. यावेळी बर्वे यांचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य कट्टा वारजेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

बर्वे म्हणाल्या जागोजागी ग्रंथालये झाली तर वैचारिक दृष्ट्यापरिपक्व महाराष्ट्र तयार होईल. ज्यांनी लोककलेच्या मध्येमातून समाजाला घडवण्याचं काम केलं त्या डॉ. रामचंद्र देखणे यांच्या नावाने हे ग्रंथालय सुरू होत आहे. देखणे सरांची आणि माझी पहिली भेट सांगलीतील एका कार्यक्रमात झाली. त्यांनी सादर केलेली लोककला पाहून मी भारावून गेले होते.

रोजच्या दिनक्रमातून बाजूला जाऊन ज्यावेळी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा करण्यासाठी वारीत सहभागी झाले होते. त्यावेळी पुन्हा सरांची भेट झाली. एका गावात झाडाच्या पारावर ते लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करत होते. या वारीतला अनुभव फार वेगळा होता. त्यावेळी सुचलेल्या ओळी मी सरांना दाखवल्या त्यावेळी त्यांनी ही कविता नसून अभंग आहे असे कैतुक केले.

देखणे सर आपल्यातून लवकर निघून जाणे समाजाची फार मोठी हाणी आहे. तहान भूक हरवून सरांसारखी लोक समाजासाठी काम करत असतात. अशा लोकांची काळजी समाजाने घेणं गरजेचं आहे.

या उद्घाटन सोहळ्यानंतर शब्दब्रम्ह या चार दिवसीय व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी महाराष्ट्राची लोककला या विषयावर डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान झाले. प्रास्तविक बाबा धुमाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी.के. जोशी यांनी केले.

Dipali Dhumal | पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या | माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या

| माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नोटीसा देणे त्वरित थांबविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या  दीपाली  धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली. कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी  सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

धुमाळ यांनी याबाबत महापालिका आयुक्त यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा विभागा मार्फत नागरिकांसाठी समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल अॅणड टी कंपनी मार्फत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या व पाईप लाईन चे काम सुरु आहे. मध्यंतरी प्रशासन व एल एन टी अधिकार्यांनी जबरदस्तीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नळ कनेक्शनला पाण्याचे मीटर बसवले होते व सदर मीटर बसवताना झालेले तोडफोड, लिकेज व नुकसान तसेच काम अपूर्ण सोडून मीटर बसविण्यात आले त्यावेळी नागरिकांना असे सांगण्यात आले की हे मीटर लवकर सुरु होणार नाही व याचे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा बिल येणार नाहीत अशी नागरिकांची खोटी समजुत काढून त्यांना आता पाणीपुरवठा विभाग मार्फत नोटीसा येत आहेत.

नोटीस कोणत्याही प्रकारची मीटर रिडिंग न घेता किंवा त्या ठिकाणी व त्या जागी जाऊन सदर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा खरच पाण्याचा वापर तेवढ्या प्रमाणत होत आहे का अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे आकडे टाकून नोटीसा देत आहेत. सदर कुटुंबात व्यक्ती असेल तर त्या कुटुंबात 5 ते 6 व्यक्ती आहेत अशी बोटी आकडेवारी नमुद करून त्या कुटुंबाला नोटीस देत आहे. तसेच या नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि नोटीस दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या कालावधी नंतर पाणीपुरवठा विभाग द्वारे कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किती नाही याची शहानिशा न करता या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत आम्ही संबंधित अधिकार्‍यांशी  चर्चा चौकशी केली त्यावेळी अधिकार्‍यांना असे सांगण्यात आले कि या नोटीसा फक्त नागरिकांमध्ये पाण्याच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यासाठी देत आहेत परंतु असे असेल तर या बाबत आधी जाहिरात करून प्रचार करून नोटीस दिली गेली पाहिजे होती याची कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी या सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

 

Deepali Dhumal | प्रत्येक गोष्टी मध्ये नफा बघू नका  | अंशदायी आरोग्य योजनेवरून माजी विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला सुनावले

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

प्रत्येक गोष्टी मध्ये नफा बघू नका

| अंशदायी आरोग्य योजनेवरून माजी विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला सुनावले

पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र यावरून माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे.
दीपाली धुमाळ म्हणाल्या,  प्रत्येक क्षेत्रात खाजगी कंपन्यांना नफा कमवून देणे व खाजगी कंपन्यांकडून सर्व कामे करून घेणे ही भूमिका योग्य नसून वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये चालू असलेली अंशदायी सहाय्य योजना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झालेली शहरी गरीब योजना या अत्यंत प्रभावीपणे राबवाव्यात अशी मागणी मी यानिमित्ताने करते.
धुमाळ पुढे म्हणाल्या तसेच मेडिक्लेम कंपन्यांचे उखळ पांढरे करणाऱ्यांना आवाहन करते की, आता बास झाले प्रत्येक गोष्टी मध्ये नफा बघू नका, माणूस कसा जगेल, त्याला कसे उपचार मिळतील, त्याला कशा सुविधा मिळतील याचा विचार करा.

Deepali Dhumal | Pradeep Dhumal | Yoga Day | वारजे परिसरामध्ये  कायम योग वर्गाचे उद्घाटन | दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम 

Categories
Breaking News cultural Sport आरोग्य पुणे महाराष्ट्र

वारजे परिसरामध्ये  कायम योग वर्गाचे उद्घाटन

| जागतिक योग दिन

| दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम

योग विद्नान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्र मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी योग वर्गाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. विरोधी पक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ व मा नगरसेवक बाबा धुमाळ व मित्र परिवार यांनी केले.

याप्रसंगी योग विद्नान संस्थान दिल्ली पुणे शाखेचे प्रमुख  शिवप्रकाश मानधनी;  दत्तात्रय रेड्डी,  राजाभाऊ अभ्यंकर, दिलीप सोमवंशी, उदय हर्डीकर, श्रीधर डुरेपाटील,सौ सुलेखा मानधनी व मीनाताई गावडे यांनी योगा संदर्भात मानवाच्या दैनदिन जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे, याचे महत्व पटवून दिले. योगा मधील प्रत्येक आसने किती महत्वाचे आहे व या आसना मुळे काय काय फायदे होतात व कोणते रोग अथवा शरीराला अपायकारक असणाऱ्या  ज्या गोष्टी कशा दुर करायचे यावर शास्त्रोक्त पध्दतीने योग साधकांना योगाद्वारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले.

आजच्या या वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी जवळपास दोनशे योग साधकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष योग साधना केली. सदर योग वर्ग रोज सकाळी साडे सहा ते आठ यावेळेत कायमस्वरूपी सुरू राहिल. या योग वर्गात जास्तीतजास्त योग साधकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी , आनंदी राहण्यासाठी रोज योगा करावे असे आवाहन सौ दिपाली धुमाळ यांनी केले. सदर योग वर्ग यशस्वी होण्यासाठी श्री महादेव गायकवाड सर व सौ मानसी नलावडे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. अशी माहिती  प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यानी दिली.

हे योगावर्ग विनामूल्य आहे. या वर्गामध्ये योगसाधना चे वर्ग घेणारे है प्रशिक्षक है शास्त्रोक्त पध्दतीने उच्च शिक्षित व अनुभवी आहेत. या वर्गातून अनेक योगशिक्शक घडविण्याचे उद्दीष्ट आहै. असेही धुमाळ म्हणाले.

Deepali Dhumal | Sharad Pawar | ketaki Chitale : केतकी चितळे सारख्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे आवश्यक : दिपाली धुमाळ यांची मागणी 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

केतकी चितळे सारख्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे आवश्यक

: दिपाली धुमाळ यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  पवार  यांच्यासारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात पोस्ट करणारी केतकी चितळे म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती असून तिचा वेळीच बीमोड करणे आवश्यक आहे. अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी चितळे ने केलेला हा प्रयत्न म्हणजे तिला मिळालेल्या संस्काराचे दर्शन आहे. अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

केतकी चितळे, वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांची पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी व असंतोष पसरवणारी आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड करून महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत झटणाऱ्या पवार साहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राच्या संस्कृतिला परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न अशा समाज कंटकांकडून सुरू असून त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.

कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन करायचे असते पण या स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्या केतकी चितळे मध्ये वेगळेच कलागुण असून ते समाजाला घातक असल्याने तिच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई करून बंदोबस्त करावा. असे धुमाळ म्हणाल्या.

Deepali Dhumal : महापालिका कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे परिपत्रक तत्काळ मागे घ्या 

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे परिपत्रक तत्काळ मागे घ्या

: माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : अंशदायी सहाय्य योजना अंतर्गत मनपा सेवक व शहरी गरीब योजनेअंतर्गत गोरगरिबांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनाने नव्याने सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे पत्र पॅनल वरील हॉस्पिटल ला दिले असून यामुळे सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मनपा अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देणाऱ्या असे सर्व निर्णय व परिपत्रक तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महपालिका आयुक्तांकडे केली आहे.

धुमाळ यांच्या निवेदनानुसार  महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय सहाय योजना मोडीत काढण्या संदर्भात मनपा अधिकारी व कर्मचारी आंदोलन, निदर्शने करण्याच्या भूमिकेत असून यास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. भाजपच्या कार्यकाळात पुणे मनपाने अंशदायी सहाय्य योजना व शहरी गरीब योजना बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. याचाच भाग म्हणून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली गेली होती, परंतु वेळोवेळी आम्ही विरोधी पक्षात असताना यास कडाडून विरोध केला होता. त्यावेळी अपयशी ठरलेले मनसुबे आता प्रशासक राज्यात पूर्ण करण्याचा डाव चालू असून त्याचाच हा भाग असून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या व शहरातील गोरगरीब नागरिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कायम पाठीशी राहणार आहे.

अंशदायी सहाय्य योजना अंतर्गत मनपा सेवक व शहरी गरीब योजनेअंतर्गत गोरगरिबांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. शहरी गरीब योजना ही 2009 पासून सुरू झाली असून मनपा सेवकांची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे प्रशासनाने नव्याने सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे पत्र पॅनल वरील हॉस्पिटल ला दिले असून यामुळे सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत.यामुळे पुणे महापालिका कामगार युनियन, पीएमसी एम्प्लोइज युनियन, अभियंता संघ आणि पुणे मनपा निवृत्त सेवक संघ हे आंदोलनाच्या भूमिकेत असून यास आमचा पाठिंबा आहे मनपा सेवकांच्या व सेवानिवृत्त सेवकांच्या वेतनातून अंशदायी सहाय्य योजने साठी रक्कम कापली जाते असे असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यावर आवश्यकता असणारे सर्व उपचार, सर्जरी तपासण्या याचा अंतर्भाव हा या योजनेमध्ये असणे क्रमप्राप्तच असते. असे असतानाही निव्वळ तत्सम मान्यता तसेच कागदोपत्री अडचणी न सोडविता विविध कारणे दाखवून हजारो अधिकारी व कर्मचारी यांना हॉस्पिटलला एक साधे पत्र पाठवून वेठीस धरणे कितपत योग्य आहे, याचाही विचार प्रशासनाने करावा.

आता पुन्हा नव्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य सर्वाधिक निवडून येतील याचा मला विश्वास असून राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर पुणे महानगरपालिकेत बसल्यानंतर गोरगरिबांना त्रास देणारे व मनपा अधिकारी व कर्मचारी यांना त्रास देणाऱ्या असे सर्व निर्णय व परिपत्रक तातडीने मागे घेण्यात येतील. असे शब्द या वेळी मी देते. प्रत्येक क्षेत्रात खाजगी कंपन्यांना नफा कमवून देणे व खाजगी कंपन्यांकडून सर्व कामे करून घेणे ही भूमिका योग्य नसून वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये चालू असलेली अंशदायी सहाय्य योजना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झालेली शहरी गरीब योजना या अत्यंत प्रभावीपणे राबवाव्यात अशी मागणी मी यानिमित्ताने करते. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

Deepali Dhumal : शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा

: माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत. त्यामुळे शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

धुमाळ यांच्या पत्रानुसार महानगरपालिकेची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली आणि यशस्वी ठरलेली एकमेव योजना म्हणजे शहरी गरीब योजना. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक व दारिद्रयरेषेखालील नागरिक यांना या योजनेचा अनेक वर्षांपासून लाभ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकाळामध्ये ही योजना चालू झाली व गेले अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे पुणे शहरात ही योजना चालू आहे. यामुळेच एक एप्रिलला आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली पुणे महानगरपालिका आहे.
खडकवासला,कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवने, नऱ्हे-आंबेगाव, नादोशी,नांदेड, किरकीट वाडी, वाघोली, शिवणे, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोहगाव कात्रज इत्यादी महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधून व शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी येत असतात. महानगरपालिकेच्या सेवा सुविधा व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महानगरपालिकेचे त्या त्या परिसरामध्ये क्षेत्रीय कार्यालय मिळकत कर भरणा केंद्र अशा प्रकारचे विविध कार्यालये आहेत. अशा शहराच्या चारही बाजूस असलेल्या कार्यालयांमध्ये शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध केल्यास त्याच परिसरात नागरिकांना सदर योजनेचे कार्ड मिळेल. तसेच ही योजना सुटसुटीतपणे व अधिक सक्षमपणे राबविली जावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Deepali Dhumal : विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या  : माजी विरोधी पक्ष नेत्या  दिपाली धुमाळ यांची मागणी 

Categories
Breaking News Education PMC पुणे

विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या

: माजी विरोधी पक्ष नेत्या  दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे: महापालिकेतर्फे इयत्ता १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यासाठी ६ कोटी रुपयांची गरज असल्याने हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची वाट पहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना फार वेळ वाट पाहायला न लावता तत्काळ ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार महापालिका हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्‍यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर १०वीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

२०२०-२१ साठी महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पडताळणीनंतर १३ हजार ३१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर २ हजार ९४३ जणांचे अर्ज अपात्र ठरले.

धुमाळ यांनी पुढे सांगितले कि, पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ३१ मार्च पूर्वी थेट बँक खात्यात जमा केली जाणार होती. १०वीच्या ५ हजार ५५३ जणांच्या बँक खात्यात ८ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये तर १२वी च्या ४ हजार ७०१ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये जमा केले.

इयत्ता १०वीच्या ७९८ तर इयत्ता १२वीच्या १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना तुमचा शिष्यवृत्तीचा अर्ज मंजूर झाला आहे, शिष्यवृत्ती जमा केली जाईल असे मेसेज मोबाईलवर गेले आहेत. पण एप्रिल महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून याची चौकशी सुरू आहे. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील शिष्यवृत्तीची २० कोटीची तरतूद संपली आहे. उर्वरित २ हजार ७७७ जणांच्या शिष्यवृत्तीसाठी ६ कोटी १४ लाख ४५ हजार रुपयांची गरज आहे. विद्यार्थ्यांना फार वेळ वाट पाहायला न लावता तत्काळ ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Music School PMC : Deeapali Dhumal : संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा  : शिक्षण समिती समोर प्रस्ताव

Categories
Education PMC Political पुणे

संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा

: शिक्षण समिती समोर प्रस्ताव

पुणे : 2013 साली महापालिकेच्या वतीने प्रभात रोड वर श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे बंद आहे. कोरोनाचा प्रसार आता कमी झाला आहे. त्यामुळे आता हे संगीत विद्यालय सुरु करावे. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी केली आहे. तसा प्रस्ताव शिक्षण समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रस्ताव

शिक्षण समिती समोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार २०१३ साली शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना पुणे प्रभात रोड गल्ली नं.१५ पुणे महानगरपालिकेच्या इमारती मध्ये पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने ई-लर्निंग व श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. आज तगायात हजारो विद्यार्थी या संगीत विद्यालयाच्या माध्यमातुन तबला वादन, हार्मोनियम, गायन इति या संगित क्षेत्रात या संगित विद्यालयामार्फत घडविण्यात आले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये संगित प्रशिक्षणा मध्ये अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उर्तीण झाले आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम पुणे मनपाच्या शाळांमध्ये सुरू आहे.परंतु मागील दोन वर्षापासुन कोरोना काळात सदर उपक्रम बंद होता. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे सर्व शाळा देखील पुर्ववत नियमित सुरू झाल्या असुन श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करण्यात यावे. अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.