Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

| वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार

Senior Citizens Health | PMC Health Department |  पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गंभीरपणे पाऊल उचलले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. तसेच महापालिकांच्या दवाखान्यामध्ये आठवड्यातून एक दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत राखीव ठेवला जाणार आहे. लवकरच याबाबत अंमल केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ भगवान पवार (PMC Health Department Chief Dr Bhagwan Pawar) यांनी दिली. (Senior Citizens Health | PMC Health Department)
शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal) आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्या पुढाकारातून ही बैठक घेण्यात आली. यावेळी उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpna Baliwant), सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav), समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas), प्रदीप धुमाळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मधुकर पवार, डि के जोशी, नंदकुमार बोधाई, गोपाळराव कुलकर्णी, दिलीप पवार; मुरलीधर रायबागकर, सौ माधुरी पवार व इतर अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
याबाबत डॉ पवार यांनी सांगितले कि, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश

आला होता कि ज्येष्ठ नागरिक संघ सोबत बैठक घ्या. त्यानुसार याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार संघांच्या मागणीनुसार या बैठकीत चर्चा झाली.  ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येईल.   तसेच ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी आठवड्यातून एक दिवस दिवस राखीव  ठेवला जाईल. त्यासाठी ज्येष्ठानी आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. तसे निर्देश संघाला दिले आहेत. तर उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांनी सांगितले कि या विषयावरून आधीच समाज विकास विभागा सोबत चर्चा करून धोरण करायचं ठरवलं होतं. ते धोरण तयार करून त्याचा मसुदा सर्व विभागांना पाठवला होता. सध्या हा मसुदा Pmpml कडे आहे. लवकरच समाज विकास विभाग याबाबत धोरण तयार करेल.
पुणे शहरांमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. हे ज्येष्ठ नागरिक संघ वर्षभर साहित्य, संगीत कला क्रीडा संदर्भात विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करून नागरिकांचे मनोरंजन करत असतात. या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये ज्येष्ठ सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य विषयक  सुविधा, आरोग्य चाचणी व अन्य सुविधा ज्येष्ठ नागरिक सभासदांना उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्याला प्रशासना कडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका. 
—-
News Title | Senior Citizens Health | PMC Health Department | Pune Municipal Corporation will take care of the health of the senior citizens of the city

PMC Pune Health Scheme | पुणे महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेबाबत आरोग्य विभागाचे नवीन आदेश 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Pune Health Scheme | पुणे महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेबाबत आरोग्य विभागाचे नवीन आदेश

PMC Pune Health Scheme | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अंशदायी वैद्यकीय योजनेबाबत (Health scheme) आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) नवीन आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील दर आर्थिक वर्षात उपरोक्त नमूद सेवक, सेवानिवृत्त सेवक, आजी व माजी नगरसेवक यांनी वैयक्तिक खर्चाची वैद्यकीय परतावा बिले हि त्या-त्या आर्थिक वर्षातच सादर करावी. असे आदेशात म्हटले आहे. उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpana Baliwant) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Assistant Health officer Dr Manisha Naik) यांनी हे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune Health Scheme)

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत (PMC Pune Health Department) अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना चालवली जात आहे. या अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत पुणे महानगरपालिका सेवक, सेवानिवृत्त सेवक शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेवक / सेवानिवृत्त सेवक, मा.आजी व मा.माजी सभासद यांची वैद्यकीय उपचारार्थ वैयक्तिक स्व खर्चाची वैद्यकीय परतावा बिले सादर करुन त्यांची वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती करण्यात येत आहेत. या योजनेबाबत आता आरोग्य विभागाकडून काही आदेश जारी करण्यात आले आहेत. (PMC Pune Marathi News)

त्यानुसार आर्थिक वर्ष सन २०२३-२४ पासून पुढील दर आर्थिक वर्षात उपरोक्त नमूद सेवक, सेवानिवृत्त सेवक,  आजी व माजी सभासद यांनी वैयक्तिक खर्चाची वैद्यकीय परतावा बिले हि त्या-त्या आर्थिक वर्षातच सादर करावी. तसेच सदर रुग्ण मनपा सेवक / सेवानिवृत्त सेवक, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेवक / सेवानिवृत्त सेवक अथवा मा. आजी / मा.माजी सभासद हे जर दि. ३१/०३/२०२३ ला रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांनी सदर वैद्यकीय परतावा बिल हे पुढील आर्थिक वर्षातील माहे एप्रिल अथवा रुग्णांचा रुग्णालयातील डिस्चार्ज प्रमाणे जी गोष्ट आधी घडली आहे त्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत बिले सादर करण्यात यावीत.
तसेच या पुढील काळात त्या- त्या र्थक वर्षात वैयक्तिक वैद्यकीय परतावा बिल सादर न केल्यास त्या बिलांचा परतावा मिळणार नाही याची सर्व सेवकांनी नोंद घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
News Title | PMC Pune Health Scheme | New Order of Health Department regarding Contributory Medical Scheme of Pune Municipal Corporation

PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाकडील (PMC health department) उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpana Baliwant) यांचेकडील कार्यभार व कामकाज व्यवस्थेबाबत बदल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आरोग्य प्रमुखांच्या दैनंदिन कामात तसेच त्यांच्या  रजा कालावधीत त्यांचे सर्व काम हे डॉ बळिवंत यांनी पाहायचे आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune Civic Body) नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (PMC Health Department)

पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य विभागाकडे (Pune Municipal Corporation Health Department) पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत विविध कामे चालतात. त्यामध्ये पुणे मनपाचे दवाखाने, प्रसूतिगृह, ई. हॅल्थ सेंटर, वस्ती क्लिनिक, परवाने, राष्ट्रीय वैद्यकीय योजना, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना इ. कामांचा समावेश होतो.  संबंधित कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने होणे आवश्यक आहे. त्यामुळे उप आरोग्य अधिकारी यांची जबादारी वाढवली आहे. (PMC Pune Marathi News)

 डॉ. कल्पना बळीवंत सहा. आरोग्य अधिकारी वर्ग १ या पदावरून उप आरोग्य अधिकारी वर्ग-१ या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे PCPNDT विभागाची जबाबदारी होती. ती काढून घेत नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation News)

डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग

१. आरोग्य अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात मदत करणे.
२. आरोग्य अधिकारी यांचे रजा कालावधीत त्यांचे कामकाज करणे.
३. परिमंडळ क्र. १ ते ५ करिता सनियंत्रक म्हणून कामकाज करणे.
४. जन्म मृत्यू विभाग, स्मशान भूमी व दफनभूमी अद्यावतीकरण करणे.
—-
News Title | PMC Health Department | Deputy Health Officer Dr. Kalpana Baliwant’s duties increased