PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

PM SVAnidhi Scheme | PMC Pune |  प्रधानमंत्री स्वनिधी योजने ( PM SVAnidhi Scheme) अंतर्गत १०,०००,२०,००० व ५०,००० हजार रुपया पर्यंत कर्ज वाटपासाठी (Loan Disbursement) २८ ऑगस्ट,  २९ ऑगस्ट,  ३० ऑगस्ट या दिवशी बँकेत कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका  उपायुक्त्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas) यांनी दिली. (PM SVAnidhi Scheme | PMC Pune)
महापालिका उपायुक्त  नितीन उदास यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांची प्रधानमंत्री स्वनिधी योजने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार पुणे शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, व छोटे मोठे सर्व व्यवसायिक यांना कळविण्यात आले आहे कि प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पी.एम. स्वनिधी ) योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनी १०००० रु.चे कर्जासाठी अर्ज केला आहे. अशा लाभार्थी साठी दिनांक २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३० ऑगस्ट या तीन दिवशी शहरात बाजीराव रोड, भवानी पेठ, सोमवार पेठ,वडगाव बु. कात्रज, संगमवाडी ,बिबेवाडी, हडपसर या भागातील बँक शाखेमध्ये कर्ज वाटप करण्यासाठी खास कॅम्प चे
आयोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
तरी शहरातील ज्या लाभार्थींनी पी. एम. स्वनिधी योजनेचा अर्ज भरला आहे . अशा नागरिकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक घेऊन बाजीराव रोड,भवानी पेठ,सोमवार पेठ, वडगाव बु.कात्रज, संगमवाडी, बिबेवाडी, हडपसर याठिकाणच्या जेथे त्यांचे बँक खाते आहे. त्या शाखेमध्ये उपस्थित रहावे. या दिवशी बँक अधिकारी यांच्याकडून कर्ज मंजूर करून त्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे. तरी त्याचा सर्व लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री कारेगावकर यांनी केले आहे. (PM SVAnidhi Scheme)
त्याशिवाय स्वनिधी से समृद्धी या योजनेतील फॅमिली प्रोफाईलिंगसाठी समाज विकास विभागाला सहकार्य करावे जेणेकरून शासनाच्या विविध कौशल्य प्रशिक्षण व इतर योजनेचा लाभ विक्रेत्यांच्या कुटुंबां पर्यंत पोहचला जाईल. असे ही उदास यांनी म्हटले आहे.
——
News Title | PM SVAnidhi Scheme | PMC Pune | Important news for hawker | Organization of camp in bank for loan disbursement

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

| वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार

Senior Citizens Health | PMC Health Department |  पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गंभीरपणे पाऊल उचलले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. तसेच महापालिकांच्या दवाखान्यामध्ये आठवड्यातून एक दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत राखीव ठेवला जाणार आहे. लवकरच याबाबत अंमल केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ भगवान पवार (PMC Health Department Chief Dr Bhagwan Pawar) यांनी दिली. (Senior Citizens Health | PMC Health Department)
शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal) आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्या पुढाकारातून ही बैठक घेण्यात आली. यावेळी उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Deputy Health Officer Dr Kalpna Baliwant), सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav), समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas), प्रदीप धुमाळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मधुकर पवार, डि के जोशी, नंदकुमार बोधाई, गोपाळराव कुलकर्णी, दिलीप पवार; मुरलीधर रायबागकर, सौ माधुरी पवार व इतर अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
याबाबत डॉ पवार यांनी सांगितले कि, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश

आला होता कि ज्येष्ठ नागरिक संघ सोबत बैठक घ्या. त्यानुसार याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार संघांच्या मागणीनुसार या बैठकीत चर्चा झाली.  ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येईल.   तसेच ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी आठवड्यातून एक दिवस दिवस राखीव  ठेवला जाईल. त्यासाठी ज्येष्ठानी आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. तसे निर्देश संघाला दिले आहेत. तर उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांनी सांगितले कि या विषयावरून आधीच समाज विकास विभागा सोबत चर्चा करून धोरण करायचं ठरवलं होतं. ते धोरण तयार करून त्याचा मसुदा सर्व विभागांना पाठवला होता. सध्या हा मसुदा Pmpml कडे आहे. लवकरच समाज विकास विभाग याबाबत धोरण तयार करेल.
पुणे शहरांमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. हे ज्येष्ठ नागरिक संघ वर्षभर साहित्य, संगीत कला क्रीडा संदर्भात विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करून नागरिकांचे मनोरंजन करत असतात. या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये ज्येष्ठ सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य विषयक  सुविधा, आरोग्य चाचणी व अन्य सुविधा ज्येष्ठ नागरिक सभासदांना उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्याला प्रशासना कडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका. 
—-
News Title | Senior Citizens Health | PMC Health Department | Pune Municipal Corporation will take care of the health of the senior citizens of the city