PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

PM SVAnidhi Scheme | PMC Pune |  प्रधानमंत्री स्वनिधी योजने ( PM SVAnidhi Scheme) अंतर्गत १०,०००,२०,००० व ५०,००० हजार रुपया पर्यंत कर्ज वाटपासाठी (Loan Disbursement) २८ ऑगस्ट,  २९ ऑगस्ट,  ३० ऑगस्ट या दिवशी बँकेत कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका  उपायुक्त्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas) यांनी दिली. (PM SVAnidhi Scheme | PMC Pune)
महापालिका उपायुक्त  नितीन उदास यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांची प्रधानमंत्री स्वनिधी योजने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार पुणे शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, व छोटे मोठे सर्व व्यवसायिक यांना कळविण्यात आले आहे कि प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पी.एम. स्वनिधी ) योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनी १०००० रु.चे कर्जासाठी अर्ज केला आहे. अशा लाभार्थी साठी दिनांक २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३० ऑगस्ट या तीन दिवशी शहरात बाजीराव रोड, भवानी पेठ, सोमवार पेठ,वडगाव बु. कात्रज, संगमवाडी ,बिबेवाडी, हडपसर या भागातील बँक शाखेमध्ये कर्ज वाटप करण्यासाठी खास कॅम्प चे
आयोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
तरी शहरातील ज्या लाभार्थींनी पी. एम. स्वनिधी योजनेचा अर्ज भरला आहे . अशा नागरिकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक घेऊन बाजीराव रोड,भवानी पेठ,सोमवार पेठ, वडगाव बु.कात्रज, संगमवाडी, बिबेवाडी, हडपसर याठिकाणच्या जेथे त्यांचे बँक खाते आहे. त्या शाखेमध्ये उपस्थित रहावे. या दिवशी बँक अधिकारी यांच्याकडून कर्ज मंजूर करून त्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे. तरी त्याचा सर्व लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री कारेगावकर यांनी केले आहे. (PM SVAnidhi Scheme)
त्याशिवाय स्वनिधी से समृद्धी या योजनेतील फॅमिली प्रोफाईलिंगसाठी समाज विकास विभागाला सहकार्य करावे जेणेकरून शासनाच्या विविध कौशल्य प्रशिक्षण व इतर योजनेचा लाभ विक्रेत्यांच्या कुटुंबां पर्यंत पोहचला जाईल. असे ही उदास यांनी म्हटले आहे.
——
News Title | PM SVAnidhi Scheme | PMC Pune | Important news for hawker | Organization of camp in bank for loan disbursement

Central Bank Of India | ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नकार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

Central Bank Of India | ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नकार

| माहिती अधिकारात मागवण्यात आली होती माहिती

Central Bank Of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने गेल्या ७ वर्षांत बड्या कर्जथकबाकीदारांची ( १०० कोटींपेक्षा जास्त कर्जथकबाकीदार)  21085 कोटी रुपयांची कर्जे write off केली आहेत. त्यातील फक्त 10% कर्जाची (Loan) आजवर वसुली होऊ शकली आहे. यापैकी ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या ( wilful defaulters ) कर्जथकबाकीदारांची 4805 कोटी रुपयांची कर्जे write off केली गेली आहेत. त्यातील फक्त 8% रकमेची वसुली आजवर होऊ शकली आहे , मात्र या wilful defaulters ची नांवे जाहीर करण्यास बॅंकेने नकार दिला आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी याबाबत माहिती (Right to Information) अधिकारात माहिती विचारली होती. (Central Bank of India)
याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ला मी माहिती अधिकारात बड्या कर्जथकबाकीदारांची थकबाकी वसुली, write off , कर्जवसुली करताना सोसलेला हेअरकट यासंबंधीची माहिती मागितली होती.  याच्या उत्तरात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने गेल्या ७ वर्षांत बड्या कर्जथकबाकीदारांची ( १०० कोटींपेक्षा जास्त कर्जथकबाकीदार)  21085 कोटी रुपयांची कर्जे write off केली असून त्यातील फक्त 10% कर्जाची म्हणजेच 2031 कोटी रुपयांची आजवर वसुली होऊ शकली आहे.  यापैकी ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या किंवा ज्यांनी कर्जाचा पैसा जाणूनबुजून भलतीकडे वळवला आहे अशी बॅंकेची खात्री पटली आहे अशा( wilful defaulters ) कर्जथकबाकीदारांची 4805 कोटी रुपयांची कर्जे write off केली गेली आहेत . त्यातील फक्त 8% रकमेची म्हणजे 400 कोटींची आजवर  वसुली होऊ शकली आहे .  मात्र या wilful defaulters ची नांवे जाहीर करण्यास बॅंकेने  नकार दिला आहे. (Banking News)
वेलणकर पुढे म्हणाले, खरं तर अशा wilful defaulters ची यादी बॅंक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) तसेच क्रेडिट रेटिंग (Credit Rating) कंपन्यांना पाठवते.  मात्र माहिती अधिकारात ती नाकारली जाते हे मोठे गौडबंगाल आहे.
 कर्जथकबाकीदारांवर बॅंका NCLT सह विविध न्यायिक संस्थांकडे केसेस दाखल करतात आणि अनेकदा मोठा तोटा सोसून ( हेअरकट) ही कर्जप्रकरणे निकालात काढली जातात.   मी आणखी एक माहिती मागितली होती की गेल्या सहा वर्षांत अशी कोणकोणती कर्जे बॅंकेने तोटा सोसून ( हेअरकट घेऊन) निकालात काढली त्यांची यादी व किती हेअरकट घेतला त्याची माहिती. मात्र बॅंकेने ही माहिती द्यायला ही नकार दिला. (Right to Information Act)
केंद्र सरकारने अनेक कडक कायदे करूनही बॅंकांची write off कर्जांची रक्कम फुगतच चाललीये आणि वसुली मात्र  नाम मात्रच आहे. छोट्या कर्जथकबाकीदारांची नावागावासकट वर्तमानपत्रातून जाहीर बदनामी करुन त्यांची घरेदारे विकून कर्ज वसुली करताना तत्परता दाखवणार्या बॅंका बड्या कर्जदारांबाबत,  तेही ज्यांनी जाणूनबुजून कर्जफेड केलेली नाही , बोटचेपी भूमिका घेतात हे दुर्दैव आहे. असे  विवेक वेलणकर म्हणाले.
—-
News Title | Central Bank Of India | Central Bank of India’s refusal to disclose the names of defaulters who are unable to repay their loans

PMC STP Project | समाविष्ट गावांत STP प्रकल्प बांधण्यासाठी पुणे महापालिका घेणार कर्ज! | PMC चा STP प्रकल्पासाठी IFC सोबत करार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC STP Project | समाविष्ट गावांत STP प्रकल्प बांधण्यासाठी पुणे महापालिका घेणार कर्ज!

| PMC चा STP प्रकल्पासाठी IFC सोबत करार

PMC STO Project | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) सोबत करार केला आहे. ज्या अंतर्गत पुणे महापालिका शहरात आणखी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STPs) बांधण्यासाठी कर्ज (Loan) घेईल.  खास करून समाविष्ट गावांत हे प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी शुक्रवारी आयएफसी अधिकाऱ्यांसोबत करार केला. (PMC STP Project)
 अलीकडेच 34 गावे PMC हद्दीत विलीन झाली आहेत आणि या भागात योग्य सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था नाही.  आता, या गावांना सुविधा पुरवण्यासाठी, महापालिका STP  बांधण्याची योजना आखत आहे. या करारामुळे IFC ₹1000 कोटींच्या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करेल.    या प्रसंगी आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “IFC प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करेल आणि दीर्घ मुदतीचे कर्ज कसे घ्यावे आणि त्यासाठी व्याज दर काय असावा हे सुचवेल.  पीएमसी त्यानुसार नवीन एसटीपी सुविधा स्थापन करण्यासाठी या निधीचा वापर करण्याची योजना करेल. (Pune Municipal Corporation News)
 कराराअंतर्गत, IFC संपूर्ण शहरातील साइटचे सर्वेक्षण करेल आणि PMC ला दीर्घकालीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करेल.
दरम्यान  अशाच प्रकारे, नुकतेच, महाराष्ट्र सरकारने भांडवली आणि दीर्घकालीन प्रकल्पांसाठी IFC सोबत करार केला. (PMC Pune News)
 दरम्यान, जुन्या शहरांच्या काही भागांसाठी, पीएमसीला नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम करण्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (JICA) कडून आधीच निधी प्राप्त झाला आहे, ज्या अंतर्गत पुणे महापालिका शहरातील मध्यवर्ती भागांसाठी 11 STP स्थापित करत आहे. (PMC News)
News Title | PMC STP Project |  Pune Municipal Corporation will take loan to build STP project in included villages!
 |  PMC’s agreement with IFC for STP project

State Bank loan scheme for farmers | शेतकऱ्यांठी राज्य बँकेची अभिनव कर्ज योजना

Categories
Breaking News Commerce महाराष्ट्र शेती

State Bank loan scheme for farmers | शेतकऱ्यांठी राज्य बँकेची अभिनव कर्ज योजना

• केवळ 4 तासात संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा होते.
• जागतिक बँक अर्थसहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत गोदाम पावतीवर ऑनलाईन कर्जाचे वितरण.
• ब्लॉक चेन संगणक प्रणालीचा यशस्वी वापर.
• महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या मदतीने आजपर्यंत ा100 कोटी कर्जाचे वितरण. (State Bank loan scheme for farmers)

आपल्या शेती मालाला योग्य भाव येईपर्यंत मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तारणावर, मुल्याच्या 70% इतका कर्जपुरवठा केवळ 9% व्याजदराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बॅंकेने सन 2020 पासून आखले आहे.

या योजनेसाठी राज्य बँकेला, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व व्हर्ल कंपनी व जागतिक बँक अर्थसहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसीत केलेल्या ब्लॉक चेन संगणक प्रणालीचे सहकार्य लाभले आहे. आजतागायत या योजनेअंतर्गत प्राफ्त झालेल्या 4,543 अर्जाद्वारे बॅंकेने रु.100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्ज वाटप केले आहे.

कर्ज प्रक्रिया पध्दतः

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या राज्यामधील 202 ठिकाणी वखार केंद्रांमधून शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालापोटी त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास, संबंधित वखार केंद्राद्वारे बॅंकेने पुरस्कृत केलेला विहीत नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वखार महामंडळाकडून केली जाते. के.वाय.सी. नुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता एकदाच केली जाते. सदर दस्तऐवज ब्लॉक चेन प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने बॅंकेस प्राफ्त होतात. कागदपत्रांची छाननी होऊन, संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाईन पध्दतीनेच बॅंकेच्या कर्ज बोजाची नोंद होते. त्यानंतर वखार महामंडळाने निश्चित केलेल्या मुल्याच्या 70% इतकी रक्कम कर्ज मागणी केलेल्या शेतकऱयाच्या बँक खात्यावर आरटीजीएस/एनईएफटीद्वारे कर्जाची रक्कम वितरीत केली जाते. या सर्व प्रक्रियेस जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱयास बँकेत यावे लागत नाही. किंबहुना शेतकरी व बॅंक यांची भेटच होत नाही. या कर्जाची मुदत 6 महिने असल्याने सदर मुदतीत आवश्यकतेनुसार कर्जाची परतफेड करुन शेतकरी मालाची सोडवणूक व विक्री करतात.

अत्यंत जलद पध्दतीने होणाऱ्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना जशी तातडीची आर्थिक मदत मिळते, तसेच योग्यवेळी माल बाजारात विक्री करणे शक्य असल्याने त्याचा फायदाही होतो.

राज्य सहकारी बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाद्वारे या कर्जाचे वितरण होत आहे. आजपर्यंत प्राफ्त झालेल्या एकूण 4,543 शेतकऱ्यांच्या अर्जापोटी केलेल्या 100 कोटी कर्जवितरणापैकी एकूण 2,555 शेतकऱ्यांनी सुमारे 55 कोटी इतक्या कर्जाची परतफेड केली असुन उर्वरित 1,988 शेतकऱ्यांकडे 45 कोटींची येणे बाकी आहे.

याच धर्तीवर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता बॅंकेची प्रस्तावित कर्ज योजना

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कापूस व पणन महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गतही शेतकऱ्यांना अशाच प्रकारे कर्जपुरवठा करण्याचे राज्य बँकेचे धोरण प्रस्तावित आहे.

त्यासाठी बँकेचे प्रशासक व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच नागपूर येथे स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत कापूस व पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेउढन चर्चा केली आहे.

या योजनेमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन केले जाणार असून, महामंडळातर्फे या शेतकऱ्यांच्या कापसाची प्रत उंचवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अशा कापसाचे जिनिंग प्रेसींग करुन त्याच्या गाठी बनविणे, योग्य भाव येईपर्यंत त्याची साठवणूक महामंडळाच्या गोदामामध्ये करणे, अशा कापसाचे योग्य वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर ई-ऑक्शनद्वारे विक्री करणे इ. सर्व कामे महामंडळाकडून केली जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत साठवणूक केल्या जाणाऱया कापसाच्या तारणावर अत्यंत जलद रित्या कर्ज मंजूरी व वितरण करुन देण्याची योजना कापूस महामंडळ व ब्लॉक चेनच्या सहकार्याने राज्य बँकेतर्फे लवकरच राबविली जाणार आहे.


News Title |State Bank loan scheme for farmers State Bank’s innovative loan scheme for farmers

CIBIL Score | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 058 कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. 2021-22 या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात 47 टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

आजच्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आर्थिक परिषदेतदेखील हा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल, तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात वेगाने सुरु झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या देखील आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज – गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील, तसेच आत्महत्येचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा उल्लेख केला. तसेच अडीच वर्षे बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु झाल्याचे देखील सांगितले. गेल्या नऊ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना गती दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानाशी जुळवून घेण्यासाठी आणि प्रतिकूलता कमी करण्यासाठी नाबार्ड राबवित असलेल्या उपक्रमांसाठी त्यांनी नाबार्डचे कौतुकही केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

पाणंद रस्त्यांसाठीही तरतूद हवी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यात येत असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसाठीही शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते उपयुक्त ठरु शकेल. समृद्धी मार्ग शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे उभारण्यास चालना देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. सिबिलची आवश्यकता नाही, याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यावी, असेही ते म्हणाले. नवीन प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था तयार करण्याची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

स्टेट फोकस पेपर

नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांनी स्टेट फोकस पेपरची माहिती दिली. यात २०२३-२४ साठी कृषी क्षेत्राकरिता १ लाख ५६ हजार ८७३ कोटी (२४.७%), एसएमई साठी ३ लाख ५४ हजार ८५४ कोटी ( ५६%), अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी १ लाख २२ हजार ३३१ कोटी ( १९.३%) क्रेडिट क्षमता असल्याचे नमूद केले आहे.

राज्यात सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, कृषी मूल्य साखळ्या विकसित व्हाव्यात, कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक व्हावी, एकात्मिक शेतीला चालना द्यावी , ग्रामीण तरुणांना कृषी व पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, हवामानावर आधारित शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे बँकांनी देखील आपले जाळे अधिक व्यापक करावे, कृषी क्षेत्रात क्लस्टर फायनान्सिंग करावे, बचत गटांना अर्थसहाय करण्यासाठी कॉर्पोरेट धोरण आखावे, ग्रामीण सहकाराला बळकट करावे यासाठी पाऊले उचलावीत, असे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक श्री. रावत म्हणाले.

००००

Good or Bad Loan | कर्ज देखील चांगले आणि वाईट असते |  तुम्हाला फरक माहित आहे का | कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या! 

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल

कर्ज देखील चांगले आणि वाईट असते |  तुम्हाला फरक माहित आहे का | कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या!

 कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही कधी विचार केला आहे का की, कर्जही चांगले आणि वाईट असते.  चांगल्या आणि वाईट कर्जांमधील फरक जाणून घेऊया तज्ञांकडून.
 आजच्या काळात आपल्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण बँकेकडून अगदी सहज कर्ज घेतो.  डिजिटल क्रांतीमुळे कर्ज घेणे आणखी सोपे झाले आहे.  पण तुम्हाला माहीत आहे का की कर्जेही चांगली आणि वाईट असतात.  होय, तुम्ही बँकेकडून जे काही कर्ज घेता, ते चांगले किंवा वाईट असते.  सामान्य भाषेत असे समजू शकते की, तुमची एकूण संपत्ती वाढवणार्‍या प्रत्येक कर्जाला चांगले कर्ज म्हणतात आणि ज्या कर्जामध्ये त्यावरील व्याजाच्या व्यतिरिक्त परतफेड करावी लागते त्या कर्जाला बुडीत कर्ज म्हणतात.  फौजी इनिशिएटिव्हचे सीईओ कर्नल संजीव गोविला (निवृत्त) आणि मनी मंत्राचे संस्थापक विरल भट्ट यांच्याकडून याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

 चांगले कर्ज म्हणजे काय?  (चांगले कर्ज म्हणजे काय)

 कर्ज घेतल्याने तुमची निव्वळ संपत्ती वाढते
 कालांतराने अधिक मालमत्ता निर्माण करण्यात सक्षम व्हा
 ज्यामुळे करिअर, प्रॉपर्टीमध्ये सकारात्मक वाढ होते
 ज्यामध्ये कर्जाच्या व्याजापेक्षा परताव्याचा दर जास्त असतो

 कोणते चांगले कर्ज?

 शैक्षणिक कर्ज
 व्यवसाय कर्ज
 गृह कर्ज

 बॅड लोन म्हणजे काय?  (खराब कर्ज म्हणजे काय)

 ज्यामध्ये त्यावरील व्याजाव्यतिरिक्त कर्जाची परतफेड करावी लागते
 ज्यामध्ये सावकार आणि कर्जदार दोघांनाही त्रास सहन करावा लागतो
 कर्ज न भरल्यास पुढील कर्ज मिळणे कठीण
 खराब कर्जाचे व्याजदर खूप जास्त आहेत

 कोणते खराब कर्ज?  (खराब कर्जाचे प्रकार)

 ऑटो कर्ज
 वैयक्तिक कर्ज
 क्रेडिट कार्डवर कर्ज
 उपभोग्य कर्ज

 कर्ज घेण्यापूर्वी समजून घ्या

 मी किती कर्ज घेऊ शकतो
 कर्ज घेणे किती महत्त्वाचे आहे
 आधी बचत करा मग खरेदी करा
 कर्जाची परतफेडही एका दिवसात करायची आहे

 किती कर्ज घेणे योग्य आहे?

 कर्ज घेताना कर्ज आणि उत्पन्नाचे प्रमाण लक्षात ठेवा
 कर्ज आणि उत्पन्नाचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त होऊ देऊ नका
 बँका कमी कर्ज आणि उत्पन्न गुणोत्तर असलेल्यांना प्राधान्य देतात
 30% च्या खाली कर्ज आणि उत्पन्न गुणोत्तर चांगले आहे

 चांगले क्रेडिट स्कोअर फायदे

 कमी व्याजावर कर्ज मिळण्याची शक्यता
 जास्त रकमेचे कर्ज मिळण्याची शक्यता
 बँका लवकर कर्ज मंजूर करतात
 जास्त परतफेड कालावधीचा लाभ

 तुमचा क्रेडिट स्कोअर कसा आहे?

 600 पेक्षा खूपच कमी
 कमी 600-649
 ओके 650-699
 चांगले 700-749
 खूप चांगले 750-900

 क्रेडिट स्कोअर कसा बिघडतो?

 वेळेवर ईएमआय न भरणे
 जेव्हा कर्ज चुकते तेव्हा स्कोअर खराब होतो
 क्रेडिट कार्ड वरून जास्त कर्ज घेतल्यावर
 उच्च कर्ज-ते-उत्पन्न गुणोत्तर खराब होण्याचा धोका असतो
 तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वारंवार वाढवल्याने तुमचा स्कोअर खराब होऊ शकतो

 खराब क्रेडिट स्कोअर सुधारा

 CIBIL क्रेडिट स्कोअर ठरवते
 क्रेडिट स्कोअर सुधारणे तुमच्या हातात आहे
 क्रेडिट कार्डची थकबाकी कमी ठेवा
 वेळेवर EMI भरा
 सर्व प्रकारच्या कर्जांचे चांगले गुणोत्तर
 जास्त असुरक्षित कर्ज घेणे टाळा
 कर्जासाठी जास्त अर्ज करू नका

 क्रेडिट कार्डच्या गैरवापराचा परिणाम

 प्रचंड व्याज आणि अगदी कर्जाच्या सापळ्यात अडकणे
 CIBIL स्कोअरवर नकारात्मक प्रभाव
 पुढील क्रेडिट कार्ड/कर्ज मिळण्याची शक्यता कमी
 गैरवापर किंवा डीफॉल्टसाठी कायदेशीर दंड
 तणाव, मानसिक, शारीरिक आणि भावनिक प्रभाव
 बर्याच काळासाठी वैयक्तिक जीवनाचे नुकसान

 क्रेडिट कार्ड – क्रेडिट कार्ड कसे वापरावे

 गरज असेल तरच क्रेडिट कार्ड वापरा
 उपभोगासाठी कधीही क्रेडिट वापरू नका
 वेळेवर बिले भरा
 दर महिन्याला कार्ड स्टेटमेंट तपासले पाहिजे
 कृपया वापरण्यापूर्वी अटी आणि नियम काळजीपूर्वक समजून घ्या
 कार्डचा पासवर्ड/पिन कोणालाही देऊ नका
 वापरण्यापूर्वी बजेट बनवा, त्यावर चिकटून राहा
 तुमच्या गरजेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवू नका

 किती कर्ज घेणे योग्य आहे?

 जास्त कर्ज घेऊ नका
 दोन किंवा तीन कर्ज घेणे चांगले
 EMI उत्पन्नाच्या 35% पर्यंत मर्यादा
 असुरक्षित कर्ज घेणे टाळा

 कोणते कर्ज प्रथम भरावे?

 ज्या कर्जावर जास्त व्याज आहे त्या कर्जापासून मुक्त व्हा
 पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन जास्त व्याजावर उपलब्ध आहेत
 जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज असेल तेव्हा प्रथम पैसे भरा
 क्रेडिट कार्डवर वार्षिक 40% पर्यंत व्याज
 वैयक्तिक कर्जावर 20% पर्यंत व्याज भरावे लागेल
 असुरक्षित कर्जावरील व्याज व्यतिरिक्त दंड

 स्मार्ट कर्ज टिपा

 कर्जाच्या कालावधीच्या सुरूवातीस कर्जाची पूर्व-पेमेंट करणे चांगले आहे
 त्यावर कर सूट दिल्यानंतर कर्जाचा प्रभावी दर समजून घ्या
 गृह, शैक्षणिक कर्ज यांसारख्या दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी EMI वाढवा
 प्रत्येक छोट्या गरजेसाठी कर्ज घेणे टाळा
 छोट्या नियोजनासाठी गुंतवणूक करून पैसे गोळा करा

Credit Score | Loan | तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो? |  तो महत्त्वाचा का आहे?  | जर तुम्ही कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर या गोष्टी नक्की जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश लाइफस्टाइल

तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो? |  तो महत्त्वाचा का आहे?  | जर तुम्ही कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर या गोष्टी नक्की जाणून घ्या

 जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे.  तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला असेल तितके तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होईल.  क्रेडिट स्कोअरशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
 आजच्या काळात महागाई एवढी वाढली आहे की, केवळ बचतीच्या जोरावर तुमचे काम होऊ शकत नाही.  घर खरेदी करताना किंवा बांधताना, कार खरेदी करताना, शिक्षणासाठी, वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना बँकेतून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कर्ज घ्यावे लागते असे अनेक प्रसंग येतात.  जर तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप महत्वाचे आहे.  आर्थिक घडामोडी तज्ज्ञ शिखा चतुर्वेदी सांगतात की, तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही किंवा किती कर्ज द्यायचे हे ठरवते.  सोप्या शब्दात, तुम्ही समजू शकता की कर्ज घेण्यासाठी तुमची पात्रता ठरवण्यात तुमचा क्रेडिट स्कोअर मोठी भूमिका बजावते.  जर तुम्हीही कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला क्रेडिट स्कोअरशी संबंधित या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

 तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो?

 क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोर असेही म्हणतात.  हे व्यक्तीच्या क्रेडिट रेकॉर्डच्या अहवालाच्या आधारे तयार केले जाते.  क्रेडिट स्कोअर ठरवताना हे पाहिले जाते की तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे, ते वेळेवर फेडले आहे की नाही, कोणत्या बँक किंवा इतर कर्ज देणार्‍या कंपन्यांनी कर्ज घेतले आहे किंवा क्रेडिट कार्ड इत्यादी. कर्जाशी संबंधित सर्व गोष्टी आहेत. साठी हिशोब दिला.  तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके कर्ज सोपे होण्याची शक्यता आहे.

 हा गुण कोण ठरवतो

 सर्व क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोअर जारी करतात.  यामध्ये TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark सारख्या क्रेडिट माहिती कंपन्यांचा समावेश आहे, ज्यांना या डेटावर आधारित क्रेडिट रिपोर्ट/क्रेडिट स्कोअर गोळा करणे, देखरेख करणे आणि व्युत्पन्न करण्याचा परवाना आहे.  क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित आहे.  साधारणपणे 750 च्या वर स्कोअर चांगला स्कोअर मानला जातो.

 क्रेडिट स्कोर नसणे देखील चांगले नाही

 असे बरेच लोक आहेत ज्यांनी कधीही कर्ज घेतले नाही किंवा ते क्रेडिट कार्ड वापरत नाहीत.  अशा परिस्थितीत कर्जाशी संबंधित कोणताही इतिहास नसल्यामुळे त्यांना सहज कर्ज मिळेल, असे वाटते.  पण तुमचा अंदाज चुकीचा आहे.  जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल, तर तुम्हाला कर्जाच्या बाबतीत जोखीम श्रेणीत ठेवायचे की नाही हे क्रेडिट माहिती कंपन्यांना कळत नाही.  या प्रकरणात तुमच्याकडे कोणताही क्रेडिट स्कोअर नाही.  तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर नसल्यास अनेक वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्यास कचरतात.

 क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा

 तेवढेच कर्ज घ्या, ज्याचा हप्ता तुम्ही वेळेवर भरू शकता.  वेळेवर EMI भरा.
 क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा आणि जास्त वैयक्तिक कर्ज घेऊ नका.  गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या.
 तुमच्या कर्जाची हमी देणार्‍या व्यक्तीवर लक्ष ठेवा कारण चुकीच्या व्यवहारांचा तुमच्या स्कोअरवरही परिणाम होतो.

Banking Time : बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी  : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी

: ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

: आरबीआयची माहिती

नवी दिल्ली : बँक  संबंधित काम पूर्ण करण्यासाठी आता १ तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. १८ तारखेपासून बँका सकाळी १० च्या ऐवजी सकाळी ९ वाजल्यापासून उघडण्यास ससुरुवात झाली आहे. आरबीआयने बँका उघडण्याचे तास बदलले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १ तास अतिरिक्त मिळेल; मात्र बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे पूर्वीच्या वेळेत बँका बंद होतील.

परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँडमधील रेपो इत्यादी फॉरेन एक्स्चेंज (एफसीआय)/भारतीय रुपया यातील व्यवहार सकाळी १० वाजता ऐवजी ९ वाजता पासून सुरू झाले आहेत.

सर्व बँकांना नियम होणार लागू –


कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरबीआयने बँकिंगचे तास कमी केले होते. बँकेत एकाच दिवसात जास्त लोक नसावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र आता हे नियम पुन्हा सामान्य करण्यात आले आहेत. देशात एसबीआयसह ७ सरकारी बँका आहेत. याशिवाय देशात २० हून अधिक खासगी बँका आहेत. नवा नियम या सर्व बँकांना लागू होणार आहे.

कार्डलेस एटीएममधून लवकरच व्यवहाराची सुविधा
–  आरबीआय लवकरच ग्राहकांना यूपीआय वापरून बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची परवानगी देणार आहे.
–  कार्डलेस म्हणजेच कार्डलेस व्यवहार वाढविण्यासाठी आरबीआय हे करणार आहे.
–  यासाठी सर्व बँका  त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा यूपीआयद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पर्सनल, वाहन, गृह कर्ज महागले –

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदानेही कर्जाच्या व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता पर्सनल, वाहन आणि गृह कर्जासाठी अधिक इएमआय द्यावा लागेल.

एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, ग्राहकांसाठी एका रात्रीपासून ते तीन महिन्यांसाठी कर्ज दर (एमसीएलआर) आता ६.६५ टक्केऐवजी ६.७५ टक्के असेल.

याचवेळी तो सहा महिन्यांसाठी ६.९५% ऐवजी ७.०५% इतका झाला आहे. नवीन दर १५ एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदासह एसबीआयचे कर्ज घेणे महाग होणार आहे.