Central Bank Of India | ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नकार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

Central Bank Of India | ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नकार

| माहिती अधिकारात मागवण्यात आली होती माहिती

Central Bank Of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने गेल्या ७ वर्षांत बड्या कर्जथकबाकीदारांची ( १०० कोटींपेक्षा जास्त कर्जथकबाकीदार)  21085 कोटी रुपयांची कर्जे write off केली आहेत. त्यातील फक्त 10% कर्जाची (Loan) आजवर वसुली होऊ शकली आहे. यापैकी ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या ( wilful defaulters ) कर्जथकबाकीदारांची 4805 कोटी रुपयांची कर्जे write off केली गेली आहेत. त्यातील फक्त 8% रकमेची वसुली आजवर होऊ शकली आहे , मात्र या wilful defaulters ची नांवे जाहीर करण्यास बॅंकेने नकार दिला आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी याबाबत माहिती (Right to Information) अधिकारात माहिती विचारली होती. (Central Bank of India)
याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ला मी माहिती अधिकारात बड्या कर्जथकबाकीदारांची थकबाकी वसुली, write off , कर्जवसुली करताना सोसलेला हेअरकट यासंबंधीची माहिती मागितली होती.  याच्या उत्तरात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने गेल्या ७ वर्षांत बड्या कर्जथकबाकीदारांची ( १०० कोटींपेक्षा जास्त कर्जथकबाकीदार)  21085 कोटी रुपयांची कर्जे write off केली असून त्यातील फक्त 10% कर्जाची म्हणजेच 2031 कोटी रुपयांची आजवर वसुली होऊ शकली आहे.  यापैकी ऐपत असून कर्जफेड न करणाऱ्या किंवा ज्यांनी कर्जाचा पैसा जाणूनबुजून भलतीकडे वळवला आहे अशी बॅंकेची खात्री पटली आहे अशा( wilful defaulters ) कर्जथकबाकीदारांची 4805 कोटी रुपयांची कर्जे write off केली गेली आहेत . त्यातील फक्त 8% रकमेची म्हणजे 400 कोटींची आजवर  वसुली होऊ शकली आहे .  मात्र या wilful defaulters ची नांवे जाहीर करण्यास बॅंकेने  नकार दिला आहे. (Banking News)
वेलणकर पुढे म्हणाले, खरं तर अशा wilful defaulters ची यादी बॅंक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) तसेच क्रेडिट रेटिंग (Credit Rating) कंपन्यांना पाठवते.  मात्र माहिती अधिकारात ती नाकारली जाते हे मोठे गौडबंगाल आहे.
 कर्जथकबाकीदारांवर बॅंका NCLT सह विविध न्यायिक संस्थांकडे केसेस दाखल करतात आणि अनेकदा मोठा तोटा सोसून ( हेअरकट) ही कर्जप्रकरणे निकालात काढली जातात.   मी आणखी एक माहिती मागितली होती की गेल्या सहा वर्षांत अशी कोणकोणती कर्जे बॅंकेने तोटा सोसून ( हेअरकट घेऊन) निकालात काढली त्यांची यादी व किती हेअरकट घेतला त्याची माहिती. मात्र बॅंकेने ही माहिती द्यायला ही नकार दिला. (Right to Information Act)
केंद्र सरकारने अनेक कडक कायदे करूनही बॅंकांची write off कर्जांची रक्कम फुगतच चाललीये आणि वसुली मात्र  नाम मात्रच आहे. छोट्या कर्जथकबाकीदारांची नावागावासकट वर्तमानपत्रातून जाहीर बदनामी करुन त्यांची घरेदारे विकून कर्ज वसुली करताना तत्परता दाखवणार्या बॅंका बड्या कर्जदारांबाबत,  तेही ज्यांनी जाणूनबुजून कर्जफेड केलेली नाही , बोटचेपी भूमिका घेतात हे दुर्दैव आहे. असे  विवेक वेलणकर म्हणाले.
—-
News Title | Central Bank Of India | Central Bank of India’s refusal to disclose the names of defaulters who are unable to repay their loans