PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC  Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप

| पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

PMC Chief Engineer | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पदोन्नती समितीने (Promotion Committee) नुकतीच अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtgp) यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती करण्यासाठी शिफारस केलेली आहे. मात्र ही शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune City President Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच ही शिफारस मान्य करू नये, असे पत्र देखील त्यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) दिले आहे. (PMC Chief Engineer)

शिंदे यांच्या पत्रानुसार पदोन्नत्तीसाठी केवळ सेवा ज्येष्ठता हा निकष लागू केलेला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वास्तविक मुख्य अभियंता हे पद अतिशय
जबाबदारीचे असून त्या पदाअंर्तगत पूर्ण पुणे शहराचा तांत्रिक कार्यभार येत आहे. नंदकिशोर जगताप हे अकार्यक्षम बेजबाबदार, बिनकामाचे अधिकारी असून अधिक्षक अभियंता पदी त्यांची कामगिरी कागदोपत्री व शिक्क्याने समाधानकारक दाखवली गेली असली तरी वास्तवात अतिशय सुमार आहे. २४ x ७ पाणीयोजना हा प्रकल्प रखडण्यामागे जगताप यांची सुमार दर्जाचा प्रशासकिय अमंल ठेकेदार धार्जिणा व्यवहार, लोक प्रतिनिधींसमोर सपशेल शरणागती पत्करून नियमबाह्य
काम करण्याची उपजत प्रवृत्ती ह्या गोष्टी आहेत. २४ x ७ पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी टेंडर काम सुरू असताना देखील अनेक खाजगी सोसायट्यांमध्ये नियम बाह्य पाणी कनेक्शन देण्यामागे जगताप यांचा हात असल्याचे वारंवार मी प्रभारी मुख्य अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. (Pune Municipal Corporation News)
पत्रात शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, जगताप यांना पाणी पुरवठा सारख्या सवेंदनशिल विभागाचे पुणे शहराचा कार्यभार सुपूर्त करणे ही पुणेकरांसाठी निश्चितच त्रासदायक बाब आहे. पदोन्नती समितीने राजकीय तसेच आर्थिक दबावापोटी केलेली आक्षेपार्ह शिफारस ही पुणे शहरासाठी अडचणीची ठरू शकते.  जगताप यांच्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ अहवाल, त्रयस्त निमशासकीय समितीवर अवलोकित यावा. याशिवाय श्री. जगताप यांचे पदोन्नतीची शिफारस मुख्य सभेने मान्य करू नये. अन्यथा कायदेशिर दाद मागितली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Pune Promotion)
—-
News Title | PMC Chief Engineer | Allegation that the recommendation of Nandkishore Jagtap by the Promotion Committee for the post of Chief Engineer was objectionable