FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!
FIR on Ravindra Dhangekar PMC Chief Engineer Abuse | Pune | Abusing the PMC HOD of Water Supply Department and the Chief Engineer of Pune Municipal Corporation has done well to MLA Ravindra Dhangekar. A case has been registered against Dhangekar at Chatushrungi Police Station on Monday night after the protest of PMC Engineers Association. (Pune Municipal Corporation Latest News)
PMC Chief Engineer Nandkishore Jagtap, Head of Water Supply Department of Pune Municipal Corporation, has filed a complaint in this matter. Based on that, a case has been registered against MLA Dhangekar under section 353 for obstructing the government work and for abusing him. The Municipal Corporation organized a program on the Republic Day to inaugurate the water tank constructed by the Municipal Corporation at Ashanagar in Gokhalenagar area.
Meanwhile, MLA Dhangekar had threatened Nandkishore Jagtap, the head of water supply department of the Municipal Corporation, by abusing him in Aravachy language, accusing the Congress party of dropping the relevant program. His video went viral on social media.
Meanwhile, the Municipal Corporation’s Engineer’s Association held a meeting on Monday and protested against Dhangekar’s action. After that, the officials reached the Chatushringi police station and registered a case against Dhangekar.
FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | पुणे | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC HOD of Water Supply Department) प्रमुख तथा मुख्य अभियंता (PMC Chief Engineer) यांना शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या (PMC Engineers Association) निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (Chatushrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे. (Pune Municipal Corporation Latest News)
पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
When Pune Municipal Corporation (PMC) prepare a policy to prevent incidents of abuse and beating of officers and employees?
PMC Chief Engineer Abuse | Pune | Pune Municipal Corporation (PMC) is witnessing an increase in the incidents of beating, abuse and abuse of employees and officers by third parties. To prevent such incidents, the municipality is now going to make a policy (PMC Policy). With the help of the PMC Legal Department. It will be implemented. Municipal employees, officials and associations were assured by the Municipal Additional Commissioner. However, this policy is still not ready. After that, another incident has happened. The question is being raised whether the Municipal Corporation will take action now. (PMC (Chief Engineer Abuse)
On the occasion of the inauguration of the municipal water tank in Ashanagar, it came to light that Congress MLA Ravindra Dhangekar abused Nandkishore Jagtap, chief engineer of the water supply department of the municipal corporation. A protest meeting was held on Monday on behalf of the Municipal Engineers Association to oppose it. (Pune PMC News)
On this occasion, Executive President of Engineers Association and City Engineer Prashant Waghmare, Secretary Sunil Kadam and Secretary Sanjay Pol, Treasurer Kedar Sathe, Vice President Mukund Barve along with Head of Road Department Anirudh Pavaskar, Chief Engineer of Electricity Department Srinivas Kandul, Project Department Srinivas Bonala, Deputy Commissioner of Encroachment Department Madhav Jagtap , Chief Engineer of Water Supply Department Nandkishore Jagtap and engineers from all departments of the Municipal Corporation were present.
Political activists as well as officials are threatening, abusing and pushing municipal officials. In this case, if a single officer files a complaint with the police, the opposite officer will suffer. Therefore, a demand was made on behalf of the association to create a cell through the legal department of the municipal corporation and file a complaint with the police through them to prevent such incidents in the future. A statement of this demand was also given to the Municipal Commissioner. Also, the responsibility of the inauguration program rests with the Municipal Secretary’s department and in future this task should not be given to the head of the department. Such a demand was also made at this time.
The officers of the Pune Municipal Corporation’s Encroachment Department (PMC Encroachment Department) were beaten up a few days ago. All the employee associations of the municipal corporation had gathered on the green of the municipal building to protest against this. Earlier also there have been incidents of employees being beaten up. A discussion was held at this time to curb this.
If such an incident happens to any employee in the future, everyone must show one. That employee should not feel alone. The tone emerged from the discussion that the cooperation of the concerned department as well as the lawyers of the legal department should be given. After that, the employees and unions had a meeting with Additional Municipal Commissioner Ravindra Binwade. At this time, the Additional Commissioner had assured that a policy would be prepared in this regard. For this, the cooperation of the legal department will be taken. The issue of beating employees is related to the Municipal Corporation. Therefore, serious steps should be taken in this regard. But nothing further happened regarding this policy. But the incidents are happening. On this occasion, the question is being raised whether the municipality is going to take any step on this.
PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?
| मागील वेळी देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते आश्वासन
PMC Employee | PMC Officers | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्रयस्थ व्यक्तीकडून मारहाण, शिवीगाळ आणि अरेरावी करण्याच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता महापालिका एक धोरण (PMC Policy) बनवणार आहे. विधी विभागाच्या (PMC Lagal Department) साहाय्याने याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि संघटनांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी तसे आश्वासन दिले होते. मात्र हे धोरण अजूनही तयार झाले नाही. त्यानंतर आता दुसरी घटना झाली आहे. आता तरी महापालिका पाऊल उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (PMC Chief Engineer Abuse)
आशानगर येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा विरोध करण्यासाठी महापालिका अभियंता संघाच्या वतीने सोमवारी निषेध सभा घेण्यात आली. (Pune PMC News)
यावेळी अभियंता संघाचे कार्याध्यक्ष आणि नगर अभियंता प्रशांंत वाघमारे, सचिव सुनील कदम सह सचिव संजय पोळ, खजिनदारर केदार साठे, उपाध्यक्ष मुकुंद बर्वे यांच्यासह, पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल, प्रकल्प विभागाचे श्रीनीवास बोनाला, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि महापालिकेतील सर्व विभागांचे अभियंते उपस्थित होते.
राजकीय कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यांकडून महापालिका अधिकार्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार घडत आहे. या प्रकरणी एकाटया अधिकार्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास उलट अधिकार्याला त्रास होतो. त्यामुळे, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाच्या माध्यमातून सेल तयार करून त्यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार करण्यात यावी अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले. तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी नगरसचिव विभागाकडे असून भविष्यात विभाग प्रमुखांवर हे काम दिले जाऊ नये. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातील (PMC Encroachment Department) अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली. याबाबत निषेध नोंदवण्यासाठी महापालिकेच्या सर्व कर्मचारी संघटना महापालिका भवनातील हिरवळीवर एकत्र आल्या होत्या. याआधी देखील कर्मचाऱ्यांना मारहाण अरेरावी करण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली होती.
भविष्यकाळात कुठल्याही कर्मचाऱ्याबाबत अशी घटना घडली तर सर्वांनी एकी दाखवणे आवश्यक आहे. त्या कर्मचाऱ्याला एकटे वाटते कामा नये. संबंधित विभाग तसेच विधी विभागातील वकिलांचे सहकार्य द्यायला हवे, असा सूर या चर्चेतून निघाला होता. त्यानंतर कर्मचारी आणि संघटनांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेतली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिले होते कि याबाबत एक धोरण तयार केले जाईल. त्यासाठी विधी विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण हा मुद्दा महापालिकेशी सम्बंधित असतो. त्यामुळे याबाबत गंभीरपणे पाऊल उचलायला हवे आहे. मात्र या धोरणाबाबत पुढे काहीही झाले नाही. मात्र घटना घडतच आहेत. यावर महापालिका काही पाऊल उचलणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त
PMC Officers Retirement | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) तीन दशक काम करणारे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (PMC Chief Engineer V G Kulkarni) , मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) हे महापालिका सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. महापालिकेत नम्रता पूर्वक काम कसे करावे, याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. त्यांच्या कामाची नोंद महापालिकेच्या इतिहासात नेहमी घेतली जाईल. (PMC Pune)
व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. शिपाई ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांमध्ये ते एक नम्र अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. (Pune PMC News)
अरुण खिलारी यांनी कामगार अधिकारी म्हणून खूप काळ काम पाहिले. त्यांच्याकडे या कामासोबतच क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. खिलारी हे महापालिकेत 1987 साली रेडिओग्राफर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी food inspector म्हणून 5 वर्ष काम पाहिले. कामगार कल्याण विभागात ते 2003 साली रुजू झाले. 2 वर्ष त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात देखील काम पाहिले. प्रत्येक काम तंतोतंत आणि चोख करण्यावर त्यांचा भर होता.
PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप
| पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
PMC Chief Engineer | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पदोन्नती समितीने (Promotion Committee) नुकतीच अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtgp) यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती करण्यासाठी शिफारस केलेली आहे. मात्र ही शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune City President Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच ही शिफारस मान्य करू नये, असे पत्र देखील त्यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) दिले आहे. (PMC Chief Engineer)
शिंदे यांच्या पत्रानुसार पदोन्नत्तीसाठी केवळ सेवा ज्येष्ठता हा निकष लागू केलेला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वास्तविक मुख्य अभियंता हे पद अतिशय
जबाबदारीचे असून त्या पदाअंर्तगत पूर्ण पुणे शहराचा तांत्रिक कार्यभार येत आहे. नंदकिशोर जगताप हे अकार्यक्षम बेजबाबदार, बिनकामाचे अधिकारी असून अधिक्षक अभियंता पदी त्यांची कामगिरी कागदोपत्री व शिक्क्याने समाधानकारक दाखवली गेली असली तरी वास्तवात अतिशय सुमार आहे. २४ x ७ पाणीयोजना हा प्रकल्प रखडण्यामागे जगताप यांची सुमार दर्जाचा प्रशासकिय अमंल ठेकेदार धार्जिणा व्यवहार, लोक प्रतिनिधींसमोर सपशेल शरणागती पत्करून नियमबाह्य
काम करण्याची उपजत प्रवृत्ती ह्या गोष्टी आहेत. २४ x ७ पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी टेंडर काम सुरू असताना देखील अनेक खाजगी सोसायट्यांमध्ये नियम बाह्य पाणी कनेक्शन देण्यामागे जगताप यांचा हात असल्याचे वारंवार मी प्रभारी मुख्य अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. (Pune Municipal Corporation News)
पत्रात शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, जगताप यांना पाणी पुरवठा सारख्या सवेंदनशिल विभागाचे पुणे शहराचा कार्यभार सुपूर्त करणे ही पुणेकरांसाठी निश्चितच त्रासदायक बाब आहे. पदोन्नती समितीने राजकीय तसेच आर्थिक दबावापोटी केलेली आक्षेपार्ह शिफारस ही पुणे शहरासाठी अडचणीची ठरू शकते. जगताप यांच्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ अहवाल, त्रयस्त निमशासकीय समितीवर अवलोकित यावा. याशिवाय श्री. जगताप यांचे पदोन्नतीची शिफारस मुख्य सभेने मान्य करू नये. अन्यथा कायदेशिर दाद मागितली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Pune Promotion)
—-
News Title | PMC Chief Engineer | Allegation that the recommendation of Nandkishore Jagtap by the Promotion Committee for the post of Chief Engineer was objectionable
PMC Pune Chief Engineer | नंदकिशोर जगताप यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीकडून शिफारस!
PMC Pune Chief Engineer | (Author: Ganesh Mule) | महापालिकेतील मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समिती ने नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. सेवाज्येष्ठतेने (seniority) पदोन्नतीच्या (Promotion) माध्यामातून हे पद भरले जाणार आहे. यासाठी महापालिकेतील तीन अधिक्षक अभियंता पात्र होत होते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे प्रकरण तयार करून ते महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीच्या बैठकी (Promotion Committee) समोर ठेवले होते. समितीने यासाठी नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Chief Engineer)
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता हे पद रिक्त आहे. राजेंद्र राऊत सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. मुख्य अभियंता हे पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाज्येष्ठता हा निकष लागू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने मागील वर्षी जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली होती. नंतर काही तांत्रिक कारणाने ऑगस्ट महिन्यापर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. पुन्हा ही मुदत 31 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली. कारण काही अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल (Confidential Report) मिळाले नाहीत. गोपनीय अहवालामुळे याला उशीर झाला. त्यानंतर प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली होती. (PMC Pune Chief engineer)
सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार पदोन्नतीच्या माध्यमातून यासाठी तीन अधिकारी पात्र होत होते. त्यात अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) , अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) आणि अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांचा समावेश होता. प्रशासनाने हे प्रकरण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समिती बैठकीत ठेवले होते. त्यानुसार या पदासाठी समितीने नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. आता याबाबतचे विषयपत्र विधी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवले जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune water supply department chief engineer)
—-
News Title |PMC Pune Chief Engineer | The promotion committee recommended Nandkishore Jagtap for the post of Chief Engineer!