PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त
—
—
PMC Employees and Officers Agitation | पुण्येश्वर या शिवमंदिरावरुन (Punyeshwar Temple) पुण्यात राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्येश्वर मंदिराबाहेरील आतिक्रमणे हटवण्यात यावे म्हणून पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या (Punyeshwar Reconstruction Committee) वतीने पुणे महानगरपालिकेबाहेर (Pune PMC News) आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी दोन्ही आमदारांनी पालिका आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), नगर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकाच्या आवारामध्ये पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण अधिकारी माधव जगताप (Madhav Jagtap), पथ विभाग मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (V G Kulkarni) देखील उपस्थित होते. तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. (Pune Municipal Corporation)
आयुक्त यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल आंदोलनावेळी प्रशांत वाघमारे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी काही संघटनांनी आंदोलने केली. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. पण काल आंदोलनावेळी अधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती योग्य नसून. मागील गेली अनेक वर्षे आम्ही अधिकारी म्हणून शहरामध्ये काम करत आहोत. एका रात्रीमध्ये शहराचा विकास झाला नाही तर अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर आले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्तींबद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे.” अशी मागणी प्रशांत वाघमारे यांनी केली. (PMC Pune)
शहराच्या मध्यवर्ती (Pune PMC News) भागामध्ये असणाऱ्या या पुण्येश्वर मंदिरावरुन काही संघटना राजकारण करत आहेत. मात्र हे प्रकारण न्यायालयामध्ये असून त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आता पुण्येश्वर मंदिराबाबत पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्यासह अधिकारी वर्गासोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रशांत वाघमारे म्हणाले. (Pune Municipal Corporation News)
रुपेश सोनावणे ( अध्यक्ष ), पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांनी देखील काल पुणे महानगरपालिका कर्मचारी याना करण्यात आलेल्या आरे रावी विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
——
News Title | PMC Employees and Officers Agitation | Municipal officers and employees protest by wearing black ribbons!
पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळय़ात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल करोडो रुपयांचा खर्च केला आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने हा खर्च पाण्यात गेल्याने उधळपट्टीच ठरला आहे. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.
यंदाच्या पावसाळय़ात शहर आणि उपनगरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र पुढे आले. वर्षभर सतत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले.
समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळय़ातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. पावसाळापूर्वी कामे करताना रस्ते पूर्ववत करण्यासाठी चार कोटी, तर पावसाळय़ात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने चार कोटी, असा एकूण आठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्याशिवाय क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वतंत्र खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्डय़ांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे, हे विशेष. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.
महापालिका आयुक्तांनी गेल्या अंदाजपत्रकात ही संकल्पना सुचवली होती. त्यानुसार शहरात 25 VIP रस्ते तयार करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात यातील जवळपास 20 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. याचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे.
VIP रस्त्यांसाठी अंदाजपत्रकात 12 कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्येक रस्त्यावर 35-40 लाख खर्च करण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. बाकी रस्त्यांची कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील.
मुख्य अभियंता ( पथ ), पुणे महानगरपालिका कार्यालयामार्फत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पथ विषयक विविध कामकाज करणेत येते. सदर कामांकरीता मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयास प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकामधून आवश्यक तरतुद उपलब्ध करून देणेत येत असते. उपआयुक्त, परिमंडळ क्रमांक – 1 ते 5 व त्यांचे नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांमार्फत त्यांचेकडील कामांकरीता आवश्यक तरतुदीची मागणी प्राप्त झालेस व मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाकडे उपलब्ध तरतुद विचारात घेवून तसेच मागणी करणेत आलेल्या कामाची आवश्यकता व निकड़ विचारात घेवून मा.वितीय समितीची मान्यता प्राप्त असलेल्या कामांनाच पथ विभागाकडील संबंधित कार्यक्षेत्रातील कार्यकारी अभियंता ( पथ ) व अधिक्षक अभियंता ( पथ ) यांचे शिफारसीनंतर माझे स्वाक्षरीने उपलब्ध मंजूर करणेत आलेले आहे. त्यानुसार, याव्दारे सुचित करणेत येत आहे की, मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयामार्फत अदा करावयाचे बीले विचारात घेता इकडील कार्यालयाकडून उपआयुक्त, परिमंडळ क्रमांक – 1 ते 5 व त्यांचे नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालय तसेचnइतर पुणे महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांकडील ज्या कामांना लॉकींग उपलब्ध करून देणेत आले आहेत अशा कामांची बीले SAP प्रोग्रॅममधील ससा काढून, खर्चाच्या नोंदी घेवून सादर करणे बंधनकारक असलेने याकामी आवश्यक कालावधीचा विचार करता दिनांक – 15 मार्च 2022 पुर्वी सदर बीले मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाकडे सादर करणेत यावीत. दिनांक – 15 मार्च 2022 नंतर कोणतीही बोले मुख्य अभियंता ( पय ) कार्यालयाकडे स्विकारणेत येणार नाहीत, याबाबत सर्व संबंधितांनी स्पष्ट नोंद घ्यावी. भविष्यात सदर बीलांना तरतुद उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्य अभियंता ( पथ ) कार्यालयाची राहणार नाही याबाबत याव्दारे सर्व संबंधितांना याव्दारे कळविणेत येत आहे.