Tag: sahebrao Dandge
सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील
९ शाळांमध्ये घेतली जाणार वाहतूक सुधारणा आराखड्याची ट्रायल!
|विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेच्या पथ विभागाचे पाऊल
पुणे | शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची कसलीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, यासाठी महापालिका (PMC Pune) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका शाळा वाहतूक आराखडा (School travel improvement plan) तयार करणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने (PMC Road dept) खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. त्यातील तीन जणांचे प्रस्ताव अंतिम करण्यात आले आहेत. त्यानुसार ९ शाळांमध्ये त्याची ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत ट्रायल घेतली जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. इथे खूप शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे देश विदेशातून इथे विद्यार्थी शिकायला येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत देश पातळीवर पुण्याचे नाव घेतले जाते. मात्र पुणे शहरात वाहतुकीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसून येतात. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकलवर अथवा घरातून चालत शाळेत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून आपल्या पाल्याला स्कूल van ने शाळेत पाठवतात. तसेच अपघाताचे देखील प्रकार पाहायला आढळतात. हीच समस्या महापालिकेच्या पथ विभागाने ओळखून त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यार्थी कुठल्याही अडचणी शिवाय आणि कुणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकेल. यासाठी पथ विभागाकडून आराखडा तयार केला जाणार आहे. (School travel improvement plan)
याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन आम्ही हा प्रकल्प राबवणार आहेत. विदेशात school safe zone नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर आम्ही हा प्रकल्प साकारणार आहोत. यामध्ये शाळेच्या परिसरातील १ किमी चा परिसर आम्हाला विकसित करायचा आहे. ज्यामध्ये ५ ते १२ वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकेल. यासाठी शहरातील ९ झोन आम्ही तयार केले आहेत. त्यानुसार खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. या ९ झोन मध्ये डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा, आणि खराडी अशा झोन चा समावेश आहे. त्यानुसार प्रमुख तीन प्रस्ताव अंतिम केले गेले आहेत. (School travel improvement plan)
महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार यांनी सांगितले कि, खराडी परिसरासाठी अभिजित कोंढाळकर आणि टीम काम करणार आहे. तर डेक्कन परिसरासाठी अर्चना कोठारी आणि टीम तसेच पर्वती परिसरासाठी रोहित गादिया आणि टीम आराखडा बनवण्याचे काम करतील. या तीनही परिसरातील प्रत्येकी तीन अशा ९ शाळामध्ये ट्रायल घेतली जाईल. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत ही ट्रायल घेण्यात येईल. याबाबत पालक आणि विध्यार्थ्यांना सूचित करण्यात आले आहे. तसेच पुणे पोलिसांचा देखील यात सहभाग असणार आहे. (School travel improvement plan)
पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली जाणार
| 140 ठिकाणाची केली जाणार डागडुजी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पुणे महापालिका सरसावली!
| पथ विभागाने वास्तुरचनाकाराकडून मागवले प्रस्ताव
पुणे | शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची कसलीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका एक वाहतूक आराखडा तयार करणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले आहेत. येत्या शुक्रवारी त्यातील तीन जणांचे प्रस्ताव अंतिम करून त्यानुसार त्याची लवकरच ट्रायल घेतली जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. इथे खूप शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे देश विदेशातून इथे विद्यार्थी शिकायला येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत देश पातळीवर पुण्याचे नाव घेतले जाते. मात्र पुणे शहरात वाहतुकीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसून येतात. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकलवर अथवा घरातून चालत शाळेत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून आपल्या पाल्याला स्कूल van ने शाळेत पाठवतात. तसेच अपघाताचे देखील प्रकार पाहायला आढळतात. हीच समस्या महापालिकेच्या पथ विभागाने ओळखून त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यार्थी कुठल्याही अडचणी शिवाय आणि कुणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकेल. यासाठी पथ विभागाकडून आराखडा तयार केला जाणार आहे.
याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन आम्ही हा प्रकल्प राबवणार आहेत. विदेशात school safe zone नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर आम्ही हा प्रकल्प साकारणार आहोत. यामध्ये कुठल्याही शाळेच्या परिसरातील १ किमी चा परिसर आम्हाला विकसित करायचा आहे. ज्यामध्ये ५ ते १२ वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकेल. यासाठी शहरातील ९ झोन आम्ही तयार केले आहेत. त्यानुसार खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. या ९ झोन मध्ये डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा, आणि खराडी अशा झोन चा समावेश आहे. दांडगे यांनी सांगितले कि, आतापर्यंत ८ लोकांचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले आहेत. येत्या शुक्रवारी या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात येईल. त्यासाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, पथ विभागातील प्रमुख अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत हे प्रस्ताव अंतिम केले जातील. यामधील प्रमुख तीन प्रस्ताव अंतिम केले जातील. त्यानुसार डिसेंबर महिन्यात याची ट्रायल घेतली जाईल.
पुण्यातील जवळपास 20 रस्ते झाले VIP
: महापालिका पथ विभागाचा रस्ते सुधारण्यावर भर
– वाहतूक सुधारणेचा सकारात्मक प्रयत्न
– अर्थसंकल्पात 12 कोटींची तरतूद करण्यात आली होती
– हे रस्ते व्हीआयपी झाले
: या रस्त्यांची कामे बाकी
महापालिका आयुक्तांनी गेल्या अंदाजपत्रकात ही संकल्पना सुचवली होती. त्यानुसार शहरात 25 VIP रस्ते तयार करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात यातील जवळपास 20 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. याचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे.
– व्ही.जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका.
VIP रस्त्यांसाठी अंदाजपत्रकात 12 कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्येक रस्त्यावर 35-40 लाख खर्च करण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. बाकी रस्त्यांची कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील.