PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी | रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी |  रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

PMC Chief Labour Officer | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी पदावरील अधिकारी अरुण खिलारी हे 31 ऑक्टोबर रोजी वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. या अधिकाऱ्याची नियुक्ती पदोन्नतीने सेवाजेष्ठता नुसार पदोन्नती निवड समितीने मार्फत डि.पी.सी (DPC) होऊन झालेली आहे. यावेळी प्रतीक्षा यादीवरती जे उमेदवार निवड झालेले असतील, त्या निवडलेल्या अधिकाऱ्याची  मुख्य कामगार अधिकारी पदी नियुक्ती करावी. अशी मागणी पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (PMC Pune News)
शेलार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवाचे वर्गीकरण) नियम २०१४ यामध्ये कामगार विभाग हा प्रशासकिय सेवा या विभगात दर्शविला असून मुख्य कामगार अधिकारी (सल्लागार कामगारया पदासाठी पदोन्नती व प्रतिनियुक्ती नमूद केलेली आहे. माझी नियुक्ती सरळ सेवेने अभियांत्रिकी सर्वगातून मुख्य सुरक्षा अधिकारी (वर्ग १) पदी सन २००९ रोजी झालेली असून प्रतिनियुक्ती नेमणूक पद्धती नुसार मला मुख्य कामगार अधिकारी काम करणेची संधी मिळणेस विनंती आहे. सामान्य प्रशासन विभागकडे मी अर्ज करून कार्यकारी पदी काम करणेसाठी विनंती केलेली आहे. त्यानुसार विचार केला जावा. असे शेलार यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
याआधी देखील शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.  पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) सेवानिवृत्त (Retire) झाले आहेत. हे पद पदोन्नती (Promotion) ने भरले जाणार आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) यांची पदोन्नती समितीने शिफारस देखील केली आहे. मात्र या पदासाठी आपण पात्र आहोत, असा दावा पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी केला आहे. शिवाय या पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pune Municipal Corporation)
 रमेश शेलार यांनी पत्रात म्हटले होते कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो. आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेही पदावर काम करण्याची संधी मला देण्यात यावी. (PMC Labour Welfare Department)
दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. तसेच आता शेलार यांनी प्रतीक्षा यादीचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच शेलार यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (Ramesh Shelar News)

——-

PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

 
 
PMC Officers Retirement | पुणे महापालिकेत  (Pune Municipal Corporation) तीन दशक काम करणारे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (PMC Chief Engineer V G Kulkarni) , मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) हे महापालिका सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. महापालिकेत नम्रता पूर्वक काम कसे करावे, याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. त्यांच्या कामाची नोंद महापालिकेच्या इतिहासात नेहमी घेतली जाईल. (PMC Pune) 
व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. शिपाई ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांमध्ये ते एक नम्र अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.  (Pune PMC News)
 
अरुण खिलारी यांनी कामगार अधिकारी म्हणून खूप काळ काम पाहिले. त्यांच्याकडे या कामासोबतच क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. खिलारी हे महापालिकेत 1987 साली रेडिओग्राफर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी food inspector म्हणून 5 वर्ष काम पाहिले. कामगार कल्याण विभागात ते 2003 साली रुजू झाले. 2 वर्ष त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात देखील काम पाहिले. प्रत्येक काम तंतोतंत आणि चोख करण्यावर त्यांचा भर होता.

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर काम करण्यास संधी देण्याची रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर काम करण्यास संधी देण्याची रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

PMC Chief Labour Officer | पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) उद्या सेवानिवृत्त (Retire) होत आहेत. हे पद पदोन्नती (Promotion) ने भरले जाणार आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) यांची पदोन्नती समितीने शिफारस देखील केली आहे. मात्र या पदासाठी आपण पात्र आहोत, असा दावा पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी केला आहे. शिवाय या पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. शेलार यांच्या मागणीवर आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Pune Municipal Corporation)

शेलार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, मुख्य कामगार अधिकारी हे पदनाम पुणे महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली ६ ऑगस्ट २०१४ रोजी मान्य झाले. त्या पदी पालिकेतील सल्लागार कामगार या पदावरती सरळसेवेने भरती
झालेले सेवक शिवाजी दौंडकर हे कार्यरत होते. ते वयोपरत्वे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. नंतर ०६ जून २०२३ पदोन्नतीने  अरुण खिलारी यांची मुख्य कामगार अधिकारी निवड झाली. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजे उद्या खिलारी सुद्धा सेवानिवृत्त होत आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा पदोन्नतीने हे पद भरले जात आहे. वास्तविक सेवा प्रवेश नियमावली २०१४ मध्ये पदोन्नतीने अशी विभागणी दाखविली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती अशा पद्धतीने हे पद भरले जाऊ शकते. प्रति नियुक्तीसाठी शासन सेवेतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील समकक्ष पद मागील 5 वर्षांपासून धारण करणारा अधिकारी यासाठी पात्र ठरू शकतो. त्याचाच आधार घेऊन शेलार यांनी ही मागणी केली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती देताना प्रशासनाने माझ्या नावाचा विचार करायला हवा होता. माझे हक्क हिरावले जाऊ नयेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे. (PMC Pune) 

 रमेश शेलार यांनी पुढे म्हटले आहे कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो. आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेहीपदावरती काम करण्याची संधी मला देण्यात यावी. (PMC Labour Welfare Department)

दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान शेलार यांनी नुकताच महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला होता.  तशी मागणी देखील प्रशासनाकडे केली होती. (Ramesh Shelar News)

——-