PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी | रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी |  रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

PMC Chief Labour Officer | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी पदावरील अधिकारी अरुण खिलारी हे 31 ऑक्टोबर रोजी वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. या अधिकाऱ्याची नियुक्ती पदोन्नतीने सेवाजेष्ठता नुसार पदोन्नती निवड समितीने मार्फत डि.पी.सी (DPC) होऊन झालेली आहे. यावेळी प्रतीक्षा यादीवरती जे उमेदवार निवड झालेले असतील, त्या निवडलेल्या अधिकाऱ्याची  मुख्य कामगार अधिकारी पदी नियुक्ती करावी. अशी मागणी पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (PMC Pune News)
शेलार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवाचे वर्गीकरण) नियम २०१४ यामध्ये कामगार विभाग हा प्रशासकिय सेवा या विभगात दर्शविला असून मुख्य कामगार अधिकारी (सल्लागार कामगारया पदासाठी पदोन्नती व प्रतिनियुक्ती नमूद केलेली आहे. माझी नियुक्ती सरळ सेवेने अभियांत्रिकी सर्वगातून मुख्य सुरक्षा अधिकारी (वर्ग १) पदी सन २००९ रोजी झालेली असून प्रतिनियुक्ती नेमणूक पद्धती नुसार मला मुख्य कामगार अधिकारी काम करणेची संधी मिळणेस विनंती आहे. सामान्य प्रशासन विभागकडे मी अर्ज करून कार्यकारी पदी काम करणेसाठी विनंती केलेली आहे. त्यानुसार विचार केला जावा. असे शेलार यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
याआधी देखील शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.  पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) सेवानिवृत्त (Retire) झाले आहेत. हे पद पदोन्नती (Promotion) ने भरले जाणार आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) यांची पदोन्नती समितीने शिफारस देखील केली आहे. मात्र या पदासाठी आपण पात्र आहोत, असा दावा पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी केला आहे. शिवाय या पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pune Municipal Corporation)
 रमेश शेलार यांनी पत्रात म्हटले होते कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो. आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेही पदावर काम करण्याची संधी मला देण्यात यावी. (PMC Labour Welfare Department)
दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. तसेच आता शेलार यांनी प्रतीक्षा यादीचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच शेलार यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (Ramesh Shelar News)

——-

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न

| महापालिका कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर 5 पदावर पदोन्नती बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे. या पदांवर पदोन्नती देण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) आज आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. जवळपास 80-90 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना नवीन पदाबाबत आदेश काढले जातील. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. अधीक्षक, प्रशासन अधिकारी सह या बैठकीत, विभागीय अतिक्रमण निरीक्षक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती देण्यात आली. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली गेली. तसेच विभागीय अतिक्रमण निरीक्षक पदावर देखील पदोन्नती देण्यात आली.  असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

 पदोन्नती समितीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक

2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी

3. विभागीय अतिक्रमण निरीक्षक

4. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक

5. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)

—-

विविध पदांच्या पदोन्नतीसाठी आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर कर्मचाऱ्यांना बढती मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समितीतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आता लवकरच पदस्थापना करून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जावीत.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

—–