Pune PMC News | पुणे महापालिकेच्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न | पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा आरोप

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न

| पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा आरोप

Pune – (The Karbhari News Service) – Pune PMC News |  पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) मागासवर्गीय अधिकाऱ्याला  एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून फसवणूक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप पुणे महापालिका कर्मचारी संघटनेच्या (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) वतीने करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करू नये. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (Rupesh Sonawane) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation News)

सोनवणे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या निवेदनानानुसार पुणे महानगरपालिकेच्या भवन विभागातील मागासवर्गीय अभियंता  सुशिल मोहिते यांचे
कार्यालयातील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये अज्ञान व्यक्तिने शिलबंद असलेला बॉक्स ठेवलेला होता. त्यावेळी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने व त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल रेकॉर्डिंग करून ड्रॉव्हरमधून बॉक्स बाहेर काढून स्वतःच तो उघडत त्यातील नोटांची बंडले बाहेर काढत सुशिल मोहिते (अभियंता) यांना दमदाटी करताना दिसून येत आहे. प्रत्यक्षात सुशिल मोहिते यांना बॉक्समध्ये नोटा होत्या हे माहितीही नव्हते. तसेच त्या नोटांवर माहिते यांच्या बोटांचे ठसे दिसून येत नाहीत. ती रेड अॅन्टीकरप्शेन यांचीही नव्हती.

सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे कि, यावरून लक्षात येते की, मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीव पुर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत  सुशिल मोहिते यांचेवर प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये.

The State Government should not accept the PMC administration’s proposal regarding the change in promotion of the post of PMC Assistant Commissioner

Categories
Breaking News PMC social पुणे

The State Government should not accept the PMC administration’s proposal regarding the change in promotion of the post of PMC Assistant Commissioner

 |  Due to the injustice being done to the clerical cadre, the demand for Backward Class Employees Association
 PMC Assistant Commissioner Promotion |  In Pune Municipal Corporation (PMC), some rights are being taken away from the employees working in the clerical cadre. The municipal administration (Pune PMC) is changing the mutual service rules (PMC service rules).  The right promotions of municipal employees are being stopped. Changes are being made in the service entry rules by deviating from the municipal rules. Also the proposal to change the promotion of the post of assistant commissioner has been sent to the state government. The Pune Mahanagarpalika Backward Class Employees Association (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) has objected to this.  This proposal should not be accepted and the administration officer should be promoted to the post of Assistant Commissioner, the president of the organization Rupesh Sonawane has demanded.(Pune Municipal Corporation Latest News)
 : Proposals in deviating from the rules put in place by the administration
 There are frequent changes in the eligibility and appointment method for the post of PMC Assistant Commissioner.  50% promotion of this post has been changed.  According to the prevailing system, 50% promotion was given on the basis of seniority.  But this was changed.  Accordingly, the employees in class 1, 2 and 3 through internal examination who hold the degree can also become Assistant Commissioner.  The proposal in this regard was recently approved by the PMC Pune General Body and this proposal was sent to the government.  But one more change has been made.  Now not only the degree holder but also the diploma holder will be able to become assistant commissioner by passing the examination.  However, it is seen that employees who aspire to become Assistant Municipal Commissioner (PMC Pune Assistant Commissioner) have been evicted from the clerical cadre.
 According to the Municipal Service Rules (PMC Pune Service Rules), the eligibility and appointment method for the post of Assistant Municipal Commissioner has been decided.  His chain was also made accordingly.  It consists of Superintendent, Administrative Officer, Assistant Commissioner, Deputy Commissioner and Additional Municipal Commissioner for the clerical cadre.  Whereas for technical posts, there are Branch Engineer, Deputy Engineer, Executive Engineer, Superintending Engineer and City Engineer.  (PMC pune news)
 : Change in promotion
 Accordingly, the prevailing mode of appointment to the post of Assistant Commissioner (Sports, Encroachment, Solid Waste Management, Superintendent of Local Body Tax, Property and Management, Taxation and Tax Collection) in Administrative Service Category-1 was 25% nomination, 50% promotion and 25% deputation.  50% promotions were also done from municipal employees on the basis of seniority.  But now the exam will be conducted for this.  What is special is that not only the degree, but the employee of any cadre holding a diploma will be able to become an assistant commissioner by passing the exam.  The administration has made this change in the service rules.  Therefore, employees who have worked in the clerical cadre for the past 20-25 years and have good experience in administrative work are getting evicted due to this rule.  Each cadre is assigned a chain.  But during the change, the chain of writing staff has been changed.  (Pune Municipal Corporation)
 While changing only 50% promotion of Clerk Cadre : Administrative Service is being changed.  An employee from any chain can come in this cadre and become Assistant Commissioner.  But the staff of the writing staff cannot go elsewhere.  (Pmc Pune Marathi News)
 – Syllabus inconsistent from administration
 The administration had kept a subject paper to change the promotion.  But there was a discrepancy.  The subject paper states that technical posts cannot be promoted to non-technical cadre.  On the one hand it was said that and on the other hand it was said that an employee of any cadre can become an Assistant Commissioner by passing the exam.  This shows an inconsistency.  It is being said that this is an injustice to the writing staff.
 Because many employees have been in service for more than 15-20 years.  He has worked in many departments from tax collection, general administration.  According to seniority they should get the post of Assistant Commissioner.  But the ways of such employees to become class one are closed.  It is said that forcing him to take the exam again after doing so much work is illegal.  Basically the officer to be Assistant Commissioner must be very experienced.  A man with only 5 years of service will not be able to do justice to that post.  Therefore, it has been demanded to keep the same as before the promotion.

PMC Assistant Commissioner Promotion | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीतील बदलाबाबत प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करू नये 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Assistant Commissioner Promotion | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीतील बदलाबाबत प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करू नये

|  लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याने मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी

PMC Assistant Commissioner Promotion | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune PMC) परस्पर सेवा नियमावलीत (PMC service rules) बदल  केले जात आहेत. यामुळे या संवर्गातील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पदोन्नत्या रखडवल्या जात आहेत. महापालिका नियमावली ला डावलत सेवा प्रवेश नियमावलीत बदल केले जात आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीमध्ये बदल करण्याचा जो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) आक्षेप घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य करू नये आणि प्रशासन अधिकारी यांनाच सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (Rupesh Sonawane) यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation Latest News)
: प्रशासनाकडून ठेवले गेले नियमावलीला डावलून  प्रस्ताव 
महापालिकेच्या सहायक महापालिका (PMC Assistant commissioner) आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला गेला आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्तपदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकीसंवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)
पदोन्नती मध्ये बदल 

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यकआयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नतीही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News)

प्रशासनाकडून विषयपत्र विसंगत 
प्रशासनाने पदोन्नतीत बदल करण्याचे विषयपत्र ठेवले होते.  मात्र त्यात विसंगती दिसून आली.  विषयपत्रात म्हटले आहे कि तांत्रिक पदांना अतांत्रिक संवर्गात पदोन्नती देता येणार नाही. एकीकडे असे म्हणायचे आणि दुसरीकडे कुठल्याही संवर्गातील कर्मचारी हा परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकतो, असे म्हणायचे. यात विसंगती दिसून येते. हा लेखनिकी संवर्गावर अन्याय असल्याचे सांगितले जात आहे.
कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांची सेवा 15- 20 वर्षाहून अधिक काळ झाली आहे. त्यांनी कर संकलन, सामान्य प्रशासन पासून बऱ्याच खात्यात काम केले आहे. सेवा ज्येष्ठेतेनुसार त्यांना सहायक आयुक्त पद मिळायला हवे आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांचे क्लास वन होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. एवढे काम करून पुन्हा त्याला परीक्षा देण्यासाठी मजबूर करणे, हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहे. मुळात सहायक आयुक्तहोणार अधिकारी हा खूप अनुभवी असणे, आवश्यक आहे. फक्त 5 वर्ष सेवा झालेला माणूस त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे पदोन्नतीपूर्वीसारखीच ठेवण्याची मागणी केली आहे.
मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या केल्या आहेत मागण्या 
1. पुणे महापालिका आस्थापानेवरील सहाय्यक आयुक्त श्रेणी 1 या पदाच्या सेवा नियम प्रवेश नियमामध्ये सुधारणा करून 50% पदोन्नतीची पदे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा अशा सर्व संवर्गातून निवड करण्याचा/ नामनिर्देशन करण्याचा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव सरकारने मान्य करू नये.
2. सहाय्यक आयुक्त पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे आमची मागणी आहे कि, सध्या कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त श्रेणी 1 पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये देण्यात आलेली नामनिर्देशन 25% नेमणुकीची पद्धत रद्द करून प्रशासन अधिकारी पदावरून पदोन्नती 75% व 25% प्रतिनियुक्ती असे प्रमाण मंजूर करून मिळावे.
3. प्रशासन अधिकारी पदावरील सेवकांना 3 वर्ष सेवा ही अट शिथिल करून पदोन्नती देण्यात यावी.

PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!

| वरिष्ठ लिपिक ला आता उपअधीक्षक चा दर्जा आणि अधिक्षकप्रमाणे मिळणार वेतन

| पिंपरी चिंचवड महापालिका प्रमाणे मिळणार पे मॅट्रिक्स

PMC Pune Employees | Pay Matrix |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशासन अधिकारी, अधिक्षक या पदावर पदोन्नती (PMC Employees Promotion) देण्यात आली आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेने प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह 5 पदांना अजून एक सुखद धक्का दिला आहे. प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह 5 पदांच्या पे मॅट्रिक्स (Pay Matrix) मध्ये वाढ होणार आहे अर्थातच  या लोकांचे वेतन वाढणार आहे. प्रशासन अधिकारी पदास S 16 पे मॅट्रिक्स तर अधिक्षक पदास S 15 पे मॅट्रिक्स लागू केले जाणार आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिक ला आता उपअधीक्षक चा दर्जा मिळणार असून आणि अधिक्षकप्रमाणे वेतन म्हणजेच S 14 पे मॅट्रिक्स मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला आहे. दरम्यान याबाबतची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (Rupesh Sonawane) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मान्यताप्राप्त सेवाप्रवेश नियमानुसार प्रशासकीय सेवा लेखनिकी संवर्गातील पदोन्नतीची शिडी व मंजूर पदे ही खालीलप्रमाणे आहे.

उप आयुक्त (मंजूर पदे-१८)

सहाय्यक आयुक्त (मंजूर पदे-२२)

प्रशासन अधिकारी (मंजूर पदे-७९)

अधिक्षक (मंजूर पदे-८०)उप अधिक्षक (मंजूर पदे-२१४)

वरिष्ठ लिपिक (मंजूर पदे-४८६)

लिपिक टंकलेखक (मंजूर पदे-१४३२)
या पदोन्नती  शिडीचे अवलोकन केले असता, प्रशासकीय सेवेत गतिमानता आणणेसाठी व प्रकरणातील विलंब टाळणेसाठी पदोन्नती शिडीमधील काही पदे वरच्या पदामध्ये वर्ग करून पदोन्नती शिडी कमी करणे आवश्यक आहे. तसेच सदयस्थितीत लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर ३० ते ३५ वर्षसेवा करुन केवळ उपअधिक्षक किंवा अधिक्षक या पदावर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सेवकांना वर्ग-३ च्या पदावर नियुक्ती व वर्ग-३ च्या पदावर सेवानिवृत्ती स्विकारावी लागत आहे. परिणामी एवढया प्रदिर्घ सेवेनंतर देखील सेवकांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही. (PMC Pune News)

विविध प्रशासकीय विभागात “लिपिक” या गट-क मधील सर्वात निम्न पदावर नियुक्ती झाल्याअंती
प्रशासकीय विभागनिहाय वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठीच्या साखळीचे स्तर भिन्न भिन्न असल्यामुळे नियुक्तीनंतर वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्यामध्ये समानता राहत नाही. यास्तव शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गास पदोन्नतीचे समान टप्पे निर्माण करावेत, याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २३ मे २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी कमी करणेविषयी प्रस्ताव पाठविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर शासन परिपत्रकात खालीलप्रमाणे बाब नमूद केलेली आहे. (Pune Municipal Corporation Employees)

“संवर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टीने तसेच पदोन्नतीच्या उचित संधी मिळण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांची कामकाजाची, मनुष्यबळाची आणि प्रशासकीय संरचनेची गरज विचारात घेऊन स्वतंत्रपणे अभ्यासाअंती व सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनिमय करून गट क मधील संवर्ग संख्या/पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत विचार करणे उचित होईल, असे शासनाने गठीत केलेल्या समितीचे मत आहे.” त्यानुसार गट-क (म्हणजेच वर्ग-३) मधील काही पदे वरच्या संवर्गात समाविष्ट करणे शक्य आहे.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडील लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर खालीलप्रमाणे :-पुणे महापालिका   (अ दर्जा)

प्रशासन अधिकारी   – S 15
अधिक्षक.    -S 14
उप अधिक्षक. – S 13
वरिष्ठ लिपिक – S 10
लिपिक टंकलेखक – S 6

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (‘ब’ दर्जा)

प्रशासन अधिकारी – S 16
कार्यालयीन अधिक्षक – S 15
मुख्य लिपिक – S 14
लिपिक टंकलेखक – S 6

वरील तक्त्याचे अवलोकन केले असता, पुणे महानगरपालिकेची लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडीप्रमाणे करणे शक्य आहे.
1.  पुणे महानगरपालिकेकडील “वरिष्ठ लिपिक” (४८६ पदे) हे पद “उप अधिक्षक” (२१४ पदे) या पदामध्ये
विलीन करुन त्याचे पदनाम “मुख्य लिपिक” (७०० पदे) (पे मेट्रीक्स S-14) करणे उचित होईल.
2.  “अधिक्षक” या पदाचे पदनाम “कार्यालयीन अधिक्षक” करुन पे मेट्रीक्स S-15 लागू करणे उचित होईल.
3. “प्रशासन अधिकारी या पदास पे मेट्रीक्स S-16 लागू करणे उचित होईल.
त्यानुसार पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियमामध्ये उपरोक्त प्रमाणे बदल करून मिळावे. अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. महापालिकेच्या या भूमिकेने मात्र कर्मचारी वर्ग भलताच खुश झाला आहे.
पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने याबाबत प्रशासनाकडे मागणी केली. शिवाय वारंवार पाठपुरावा केला. त्याला आता महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. विशषेत: आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांचे आम्ही विशेष आभार मानतो.
रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना.
——-

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न

| महापालिका कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर 5 पदावर पदोन्नती बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे. या पदांवर पदोन्नती देण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) आज आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. जवळपास 80-90 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना नवीन पदाबाबत आदेश काढले जातील. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. अधीक्षक, प्रशासन अधिकारी सह या बैठकीत, विभागीय अतिक्रमण निरीक्षक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती देण्यात आली. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली गेली. तसेच विभागीय अतिक्रमण निरीक्षक पदावर देखील पदोन्नती देण्यात आली.  असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

 पदोन्नती समितीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक

2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी

3. विभागीय अतिक्रमण निरीक्षक

4. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक

5. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)

—-

विविध पदांच्या पदोन्नतीसाठी आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर कर्मचाऱ्यांना बढती मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समितीतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आता लवकरच पदस्थापना करून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जावीत.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

—–

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

| पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने (The Karbhari) हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासन आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. (PMC Pune Employees Promotion)

| महापालिकेने सरकार कडून मागवले होते मार्गदर्शन

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. (PMC Pune Marathi News)
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)
सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो विधी समितीच्या माध्यमातून मान्यतेसाठी मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेतल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे आता प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक  यांची पदोन्नती लवकरच होणार हे सिद्ध झाले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-

पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे महापालिकेतील  300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आम्ही उपायुक्त सचिन इथापे यांचे आभार व्यक्त करतो.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना 
पदोन्नती बाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहोत.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग. 
—–
News title |PMC Pune Employees Promotion | The way for the promotion of superintendent, deputy superintendent, administration officer is finally clear! | State Government’s approval of the amendment proposal of the Municipal Corporation

Pune Municipal Secretary Department | पुणे महापालिका नगरसचिव विभागातील उपनगरसचिव सह 8 पदे ‘प्रमोशन’ च्या प्रतिक्षेत! | नगरसचिव पद देखील 3 वर्षांपासून रिक्तच!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Secretary Department | पुणे महापालिका नगरसचिव विभागातील उपनगरसचिव सह 8 पदे ‘प्रमोशन’ च्या प्रतिक्षेत! | नगरसचिव पद देखील 3 वर्षांपासून रिक्तच!

| बढती प्रक्रिया सुरु करण्याची मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी

Pune Municipal Secretary Department  | पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव विभागाकडील  (Pune Municipal Secretary Department) उपनगरसचिव (Deputy Municipal Secretary) या बढतीच्या पदासह इतर 8 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची बढती प्रक्रियाच (Promotion) होऊ न शकल्याने ही पदे 3 ते 9 वर्षांपासून रिक्तच आहेत. या पदांना सेवाप्रवेश नियमावली २०१४ मध्ये मान्यता मिळाली असून अद्यापही भरती झालेली नाही. त्यामुळे अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. दरम्यान रिक्त पदांची बढती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Municipal Secretary Department)

 

याबाबत संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (President Rupesh Sonawane) यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार  राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफिसर) हे एकाकी पद वगळता कार्यालयात सचिव, अध्यक्ष, स्थायी समिती हुद्याव्यतिरिक्त फक्त सर्व लखेनिकी संवर्गाची पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांबाबत काहीना तीन- तीन रिक्त पदांचा पदभार आहे. तर काही पदावर मनपा आस्थापनेवरील अन्य खात्यातील सेवक वर्षानुवर्षे काम करीत आहेत. (Pune Municipal Corporation)
उपनगरसचिव हे पद बढतीचे पद आहे. या कार्यायातील ज्येष्ठ सेवकामधून बढती देणे आवश्यक आहे. तरी उपनगरसचिव पदाची खोतनिहाय बढती समिती ( D.P.C.) मध्ये सेवाज्येष्ठ सेवकांची माहिती दिली होती. उपनगरसचिव पदाची खोतनिहाय बढती समिती ( D.P.C.) सन २०२० या वर्षी घेण्यची आली होती. परंतु तांत्रिक अडचण दाखवून या पदावर सेवाज्येष्ठ सेवकाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे बढती साखळीतील सर्वच पदे रिक्त आहेत. (PMC Pune Employees promotion)

सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे कि महापालिका आयुक्त यांनी सेवाज्येष्ठ सेवकास उपनगरसचिव पदाचा प्रभारी पदभार देण्यास व नियमानुसार बढती प्रक्रिया सुरू करणेस महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे. परंतु ४ महिने झाले तरी अद्यापही पदभार किंवा बढती प्रक्रिया सुरू न केल्याने सेवाज्येष्ठ सेवकांवर अन्याय होत आहे. तसेच खात्याचीही प्रशासकीय अडचण होत आहे. त्यामुळे  उपनगरसचिव पदाची बढती प्रक्रिया सुरू केल्यास साखळीतील सर्व रिक्त पद भरणे सोयीचे होईल व सर्व सेवाज्येष्ठ सेवकांना योग्य तो न्याय मिळेल. अशी मागणी सोनवणे यांनी पत्राद्वारे केली आहे. (PMC Pune News)

अशी आहेत रिक्त पदे

हुद्दा                              रिक्त कालावधी 
नगरसचिव.      -.           3 वर्ष
उपनगरसचिव.    -.          3 वर्ष
महापौर यांचे सचिव. -.      6 वर्ष
उपमहापौर यांचे सचिव -.    5 वर्ष
समारंभ प्रमुख.             -.     9 वर्ष
अति. कार्यालय अधिक्षक. -.  1 महिना
सभागृह नेते – सचिव.         –    6 वर्ष
विरोधी पक्षनेते – सचिव.      -.   6 वर्ष
ज्येष्ठ समिती लेखनिक – २ पदे – 3 वर्ष
—-
News Title | Pune Municipal Secretary Department | 8 posts with Sub-Secretary in Pune Municipal Municipal Corporation are waiting for ‘promotion’! | The post of Municipal Secretary has also been vacant for 3 years!