PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन

PMC Pune Employees Workshop | पुणे महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या वतीने (PMC Employees Union) पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation Employees) सेवकांची कार्यशाळा रोकडोबा मंदिर कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, पुणे  येथे आज घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत विचारमंथन करण्यात आले. यावेळी पीएमसी एम्पलाॅईज युनियनच्या वतीने सेवकांना युनियनचा सभासद क्रमांक  देणेत आले. (PMC Pune Employees Workshop)
पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) सेवक पुणे शहराचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच समस्यांचे सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यातून निराकारण करतात. पुणे महानगरपालिकेची वाढती हद्द, रिक्त असलेली पदे यामुळे सेवकांना दैनंदिन कामे करताना ताणतणाव तसेच वैयक्तिक आरोग्यविषयक प्रश्न उद्भवतात. याकरिता या कार्यशाळेत करिअर कौन्सिलर तसेच थेरपिस्ट संध्या पाटील यांचे व्याख्यान ठेवले होते. (Pune Municipal Corporation Employees)
पुणे महानगरपालिकेतील सेवकांची रखडलेली पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना,  सेवकांच्या कालबद्ध बदल्या तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे या कार्यशाळेत अध्यक्ष बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) तसेच जनरल सेक्रेटरी बापू पवार यांनी आवाहन केले. (PMC Pune Employees)
या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane),  सचिन इथापे उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग (Deputy Commissioner Sachin Ithape),  उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam), मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री कैलास वाळेकर , सुरक्षा अधिकारी  राकेश विटकर (Security Officer Rakesh Vitkar),कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे तसेच इतर अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (PMC Employees Union)
अतिरिक्त आयुक्त  ढाकणे यांनी सेवकांच्या कार्यक्षमतेवर शहरीकरणामुळे तसेच कामकाजातील वाढता ताण तणावामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात याकरिता अशा कार्यशाळेचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे महत्त्व विषद केले. उपायुक्त  सचिन इथापे यांनी सेवकांच्या रखडलेल्या प्रश्नांविषयी सामान्य प्रशासन विभागाकडून तातडीने आढावा घेतला जाईल व सेवकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे सर्व सेवकांना आश्वस्त केले. (Pune  Corporation Employees)
या कार्यशाळेचे विशेष हे कि, आज पर्यंत कोणत्याही सेवकाला युनियन सभासद नंबर दिला गेला नव्हता, तो यामध्ये दिला गेला. याबाबत कर्मचारी युनियन आणि पदाधिकारी यांचे कौतुक होत आहे.
—–
News Title | PMC Pune Employees Workshop | Brainstorming in the workshop on questions of municipal employees

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी

| पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने (The Karbhari) हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासन आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. (PMC Pune Employees Promotion)

| महापालिकेने सरकार कडून मागवले होते मार्गदर्शन

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. (PMC Pune Marathi News)
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)
सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो विधी समितीच्या माध्यमातून मान्यतेसाठी मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेतल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे आता प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक  यांची पदोन्नती लवकरच होणार हे सिद्ध झाले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-

पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे महापालिकेतील  300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आम्ही उपायुक्त सचिन इथापे यांचे आभार व्यक्त करतो.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना 
पदोन्नती बाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहोत.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग. 
—–
News title |PMC Pune Employees Promotion | The way for the promotion of superintendent, deputy superintendent, administration officer is finally clear! | State Government’s approval of the amendment proposal of the Municipal Corporation

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत!

PMC Pune Bharti | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून नुकतीच 448 पदांची भरती करण्यात आली होती. यात  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक या हुद्यावर सरळसेवा भरती करून सेवकांना नियुक्त करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांनी 6 महिने उलटूनही महापालिकेच्या अटींची पूर्तता केलेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आता सामान्य प्रशासन विभागाने कडक पाऊल उचलले आहे. याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर सोपवली असून माहिती देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (PMC Pune Bharti)

नवनियुक्त  सेवकांची नेमणूक महानगरपालिका सेवाविनियमातील क्र. १० (अ) नुसार दोन वर्षासाठी परिविक्षाधीन पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यानुसार सेवकांना पुणे महानगरपालिकेकडे रुजू करून घेताना आज्ञापत्रात नमूद अटींच्या अधीन राहून रुजू करून घेतलेले असूनही सेवकांनी सहा महिने होऊनही अद्याप अटींची पूर्तता न केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे
वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation)

त्यामुळे संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सरळसेवेने भरती करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक हुद्यावरील सेवकांची म माहिती भरून द्यावयाची आहे. तसेच माहितीच्या अनुषंगाने सदर सेवकाच्या कागदपत्रांच्या प्रती संकलित करावयाच्या आहेत. तसेच परिविक्षाधीन कालावधीतील सहा महिन्याचे मूल्यमापन करून एकत्रितपणे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावयाचे आहे. १५ दिवसाच्या मुदतीत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावे. असे आदेश उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. (PMC Pune News)
—-/
News Title |PMC Pune Bharti | Pune Municipal Recruitment | Even after 6 months, the newly appointed employees have not fulfilled the conditions!

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! 

 

| राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव 

 
PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला आहे. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Employees)

– सामान्य प्रशासन विभागाचे सर्क्युलर जारी

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत स कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department)
त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य
शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. (7th Pay Commission Update)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | The time-bound promotion of Pune municipal employees is suspended again!

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्वच पदाचा निकाल घोषित!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्वच पदाचा निकाल घोषित!

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदाचा निकाल याआधीच घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर काल रात्री बाकी सर्व पदांचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट (PMC Website) वर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti Results 2023)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक / फायरमन वर्ग-३ संवर्गातील रिक्त जागा भरणेसाठी जाहिरात ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार उपरोक्त पदाची २२/०६/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल याआधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. (PMC Pune Bharti Results 2023)
त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) वर्ग-१,वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी वर्ग-२, उप संचालक (प्राणी संग्रहालय ) ( उप उद्यान अधीक्षक (झू) वर्ग-२, पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग-२, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक वर्ग-३, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर वर्ग-३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) वर्ग-३, वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर वर्ग-३, मिश्रक / औषध निर्माता वर्ग-३, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वर्ग-३ या संवर्गाच्या रिक्त जागा भरणेसाठी ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
त्यानुसार या पदांच्या २२/०६/२०२३ व ०२/०७/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परीक्षेचा निकाल व कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुषंगाने कागदपत्रे तपासणीसाठी स्वतंत्ररीत्या वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

: या संकेतस्थळावर पहा निकाल

https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html
News Title | Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | Pune Municipal Corporation announced the results of all the posts in the recruitment process!

Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार

Categories
Breaking News PMC पुणे

Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे  आवाहन

| 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार

Computer Operator Promotion | PMC | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना संगणक ऑपरेटर पदासाठी पदोन्नती (Computer Operator Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी केले आहे. अर्ज घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट हा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. हे पद तांत्रिक सेवा श्रेणी 3 मधील आहे. (Computer Operator Promotion | PMC)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील “संगणक ऑपरेटर” या पदाच्या एकूण संख्येच्या ५०% जागा पुणे महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचा-यांमधून (Pune Municipal Corporation Employees) सेवाज्येष्ठता वगुणवत्ता या आधारे कर्मचा-यांमधून भरल्या जातात.  मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कार्यरत कर्मचा-यांमधून ज्या सेवकांची ३०.०६.२०२० किंवा तत्पूर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व ज्या सेवकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. अशा सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आस्थापना विभागाकडे ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत स्वत: येवून प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. (Pune Municipal Corporation News)

नामनिर्देशनाने विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. अशी पदोन्नतीची पात्रता आहे. तसेच यासाठी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. (PMC Pune Employees Promotion)

प्रशासनकडून सांगण्यात आले कि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील तृतीय / चतुर्थ श्रेणी संवर्गातील ज्या सेवकांची ३०.०६.२०२३ अखेर शेड्युलमान्य पदावर ३ वर्ष अखंडीत सेवा झाली आहे, अशा मनपातील  शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या व ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा सेवकांनी खातेप्रमुख यांचे शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून
आस्थापना विभाग कार्यालयाकडे १५.०८.२०२३ अखेर अर्ज सादर करावेत.  संबंधित सेवक विहित केलेल्या मुदतीमध्ये साक्षांकित कागदपत्रांसह खातेप्रमुख
यांचेमार्फत अर्ज सादर करणार नाहीत वा अपूर्ण अर्ज / कागदपत्रे सादर करतील त्यांचा “संगणक ऑपरेटर” या पदाच्या यादीमध्ये विचार केला जाणार नाही याची संबंधित सेवकांनी नोंद घ्यावी. असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
—-
News Title |PMC Pune Invitation to apply for promotion to the post of Computer Operator

PMC Pune Bharti Exam 2023 | पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी दिली परीक्षा! 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

PMC Pune Bharti Exam 2023 | पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी दिली परीक्षा!

PMC Pune Bharti Exam 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने ३२० पदासाठी भरती प्रक्रिया (PMC Recuitment) राबवण्यात येत आहे. त्यानुसार यातील ६ पदासाठी आज म्हणजे २२ जूनला परीक्षा (PMC Bharti exam) झाली. पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर अशा ५ शहरात परीक्षा झाली.  पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी  परीक्षा दिली. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (PMC Pune Bharti Exam 2023)

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ पदांची परीक्षा ही २२ जून ला झाली.  तर काही पदांची परीक्षा ही २ जुलै ला होणार आहे. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जात आहे.  या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून ३७ परीक्षा केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. ५ शहरात ७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही परीक्षा घेतली. सकाळच्या सत्रात २३६३ उमेदवार होते. त्यापैकी १७१२ उमेदवारांनी म्हणजे ७२% उमेदवारांनी परीक्षा दिली.  तर दुपारच्या सत्रात ३४३३ उमेदवार होते. त्यापैकी २७७१ उमेदवारांनी म्हणजे ८०% उमेदवारांनी परीक्षा दिली.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

प्रवेश न दिलेल्या उमेदवारांबाबत मनपाचा खुलासा 

उमेदवारांनी कॉल लेटर वर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान 15 मिनिटे आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. रिपोर्टिंगची वेळ सकाळी 07:30 , परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या एक तास आधी आहे कारण ही वेळ उमेदवारांना प्रवेश देणे, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे, कॉल लेटरवर स्वाक्षरी आणि शिक्का मारणे इ. परीक्षेपूर्वीच्या प्रक्रियेचा विचार करता, परीक्षा सुरू होण्यास उशीर न करता सर्व पूर्वपरीक्षेच्या क्रिया पूर्ण करण्यासाठी गेट बंद करण्याची वेळ (परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 15 मिनिटे) पाळली जाते. त्यामुळे, गेट बंद झाल्यानंतर येणार्‍या उमेदवारांना परीक्षेसाठी परवानगी नाही. तरीही ८:१५ पर्यंत येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला गेला.


News Title |PMC Pune Bharti Exam 2023 | 72% in the first session and 80% in the second session!

Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | पुणे महापालिका भरती परीक्षा | उद्या ५ शहरात होणार परीक्षा 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | पुणे महापालिका भरती परीक्षा | उद्या ५ शहरात होणार परीक्षा 

| ६ पदांसाठी दोन सत्रात होणार परीक्षा

Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने ३२० पदासाठी भरती प्रक्रिया (PMC Recuitment) राबवण्यात येत आहे. त्यानुसार यातील ६ पदासाठी उद्या म्हणजे २२ जूनला परीक्षा (PMC Bharti exam) होणार आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर अशा ५ शहरात परीक्षा होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.  अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023)

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार काही पदांची परीक्षा ही २२ जून ला होणार आहे. तर काही पदांची परीक्षा ही २ जुलै ला होणार आहे. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जात आहे.  त्यासाठीचे परीक्षा केंद्राची तयारी iBPS संस्थेकडून पूर्ण झाली आहे. या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून ३७ परीक्षा केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. पुण्यात तीन परीक्षा केंद्र असतील. दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात २३६३ उमेदवार आहेत. तर दुपारच्या सत्रात ३४३३ उमेदवार आहेत.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

२२ जून ला या पदांच्या परीक्षा होतील

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) 
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी 
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय)

४) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 
५ ) अग्निशामक विमोचक / फायरमन

६) कनिष्ठ अभियंता (विद्युत)


News Title | Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | Pune Municipal Recruitment Exam | Exam will be held tomorrow in 5 cities

Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्गी लावणार

|आमदार सुनिल टिंगरे यांना महापालिकेचे लेखी आश्वासन

| लाक्षणिक उपोषण घेतले मागे

पुणे |वडगाव शेरी मतदार संघातील  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. पुढील आठवड्यापासूनच त्यावर कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार सुनिल टिंगरे यांना दिले. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.


वडगाव शेरी मतदारसंघात नगर रस्ता, पोरवाल रस्ता वाहतूक कोंडी, रखडलेले रस्ते, खराडी, शास्त्रीनगर, विश्रांतवाडी येथील रखडलेले उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न इत्यादी प्रलंबित प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे आमदार सुनिल टिंगरे यांनी या प्रलंबित प्रश्नांसाठी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिका भवनासमोर गुरुवारी सकाळ दहा पासून उपोषण सुरू केले होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह माजी नगरसेवक महेंद्र पठारे, अविनाश साळवे, उषा कळमकर, मीनल सरवदे, शितल सावंत, अ‍ॅड. रुपाली ठोंबरे पाटील, सतिश म्हस्के, महिला शहराध्यक्ष मृणाली वाणी, राकेश कामठे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, मतदारसंघाचे अध्यक्ष नाना नलावडे, महिला अध्यक्षा नीता गलांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान आमदार टिंगरे यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांच्यासह शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सांगितले. मात्र, आपण मांडलेले प्रश्न नक्की किती कालावधीत सोडविणार यासंदर्भात प्रशासनाने लेखी द्यावे अशी भुमिका घेतली. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपायुक्त सचिन इथापे व शहराध्यक्ष जगताप यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन आमदार टिंगरे यांनी उपोषण मागे घेतले.
—————–