Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे  आवाहन

| 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार

Computer Operator Promotion | PMC | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना संगणक ऑपरेटर पदासाठी पदोन्नती (Computer Operator Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी केले आहे. अर्ज घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट हा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. हे पद तांत्रिक सेवा श्रेणी 3 मधील आहे. (Computer Operator Promotion | PMC)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील “संगणक ऑपरेटर” या पदाच्या एकूण संख्येच्या ५०% जागा पुणे महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचा-यांमधून (Pune Municipal Corporation Employees) सेवाज्येष्ठता वगुणवत्ता या आधारे कर्मचा-यांमधून भरल्या जातात.  मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कार्यरत कर्मचा-यांमधून ज्या सेवकांची ३०.०६.२०२० किंवा तत्पूर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व ज्या सेवकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. अशा सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आस्थापना विभागाकडे ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत स्वत: येवून प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. (Pune Municipal Corporation News)

नामनिर्देशनाने विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. अशी पदोन्नतीची पात्रता आहे. तसेच यासाठी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. (PMC Pune Employees Promotion)

प्रशासनकडून सांगण्यात आले कि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील तृतीय / चतुर्थ श्रेणी संवर्गातील ज्या सेवकांची ३०.०६.२०२३ अखेर शेड्युलमान्य पदावर ३ वर्ष अखंडीत सेवा झाली आहे, अशा मनपातील  शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या व ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा सेवकांनी खातेप्रमुख यांचे शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून
आस्थापना विभाग कार्यालयाकडे १५.०८.२०२३ अखेर अर्ज सादर करावेत.  संबंधित सेवक विहित केलेल्या मुदतीमध्ये साक्षांकित कागदपत्रांसह खातेप्रमुख
यांचेमार्फत अर्ज सादर करणार नाहीत वा अपूर्ण अर्ज / कागदपत्रे सादर करतील त्यांचा “संगणक ऑपरेटर” या पदाच्या यादीमध्ये विचार केला जाणार नाही याची संबंधित सेवकांनी नोंद घ्यावी. असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
—-
News Title |PMC Pune Invitation to apply for promotion to the post of Computer Operator