Prasanna Jagtap | विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार? | माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार?

| माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल

सिंहगड रोड परिसरातील विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवर गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील विविध वयोगटातील नागरिक तिन्ही ऋतूत व्यायामासाठी येत असतात. त्या ट्रॅकवर गेले दोन ते अडीच वर्षांत अतिशय मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली दिसत आहेत. याकडे लक्ष देऊन ही झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार आहेत. असा सवाल माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी केला आहे.

जगताप म्हणाले, कारण वेळोवेळी सांगून देखील उद्यान विभाग किंवा आरोग्य विभागाने या झाडाझुडपांची छाटणी करून हा ट्रॅकची स्वच्छता केलेली नाही.

तरी या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याची स्वच्छता करून हा ट्रॅक परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

यासंदर्भात ॲड.प्रसन्न जगताप यांनी वेळोवेळी वॉर्ड ऑफिसर यांना भेटून त्यांना सांगितले आहे तरी सुद्धा अजून पर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही.

मुंबई सारख्या ठिकाणी गोवर सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपल्या भागातील नागरिकांना देखील त्याचा सामना करावा लागू शकतो. या ट्रॅकवरील काटेरी झुडपांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

आज प्रसन्न जगताप यांनी प्रत्यक्ष या ट्रॅकवर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच याठिकाणी असलेले दिवे देखील लवकरात लवकर बदलण्यात यावेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.