PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप! | दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप!

| दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण

PMC Employees Union | दिवाळी वसुबारसचे (Diwali Vasubaras) औचित्य साधून पुणे महानगरपालिका पी एम सी एम्प्लॉईस युनियन (PMC Employees Union) यांचे तर्फे पुणे महानगरपालिकेची दिव्यांग व मतिमंद शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना तसेच पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा वर्गात नुकतेच कार्यरत असणारे तृतीयपंथीय सेवक यांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्यात येऊन त्या सर्वांना युनियन तर्फे फराळ वाटप करण्यात आले. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

वसूबारस निमित्त पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालय  येथील हिरवळीवर गो पूजन करण्यात आले. या निमित्ताने  पुणे महानगरपालिकेतील सर्व सेवक अधिकारी यांना गो पूजन करण्याकरिता अ.भा. कृषी गोसेवा संघचे प्रमुख  मिलिंद एकबोटे, गोरक्ष श्री वैभव बहिरट पाटील यांच्यातर्फे गाय वासरू चे  व्यवस्था करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेचे अति. महापालिका आयुक्त ढाकणे, उल्का कळसकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, केरुरे मॅडम यांच्या हस्ते गो- पूजन करण्यात आले.

ह्या नेत्र दीपक कार्यक्रमास महानगरपालिकेचे शेकडो अधिकारी सेवक सेविका उपस्थित होते, कार्यक्रमास  कसबा पेठ विधानसभाचे माननीय आमदार श्री रवींद्र भाऊ  धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष श्री दीपकजी मानकर, मा. नगरसेवक योगेश भाऊ ससाने, पुणे महानगरपालिका सेवक गणपती उत्सव प्रमुख श्री अशोकजी नटे, पुणे महानगरपालिका , मतिमंद- दिव्यांग शाळाचे प्रमुख सौ. काळे, सौ. जोगळेकर यांच्या सह  अनेक सामाजिक कार्यकर्ते, महानगरपालिकाचे विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास  विशेष विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक तसेच तृतीयपंथीय सेवक यांचे सर्व सहकारीही आवर्जून उपस्थित होते, दिवाळी निमित्ताने पीएमसी एम्प्लॉईज युनियन मार्फत हा आगळावेगळा दिवाळी फराळाचा राबविण्यात आलेल्या कार्यक्रमास सर्व लहान विशेष मुलं, त्यांचे पालक. शिक्षक व तृतीयपंथीय यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते. उपरोक्त कार्यक्रम पी.एम.सी एम्पलॉइज युनियन याच तर्फे आयोजित करण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष श्री बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी श्री बापूसाहेब पवार महिला कार्याध्यक्ष सौ पूजा देशमुख, सौ. वंदना साळवी तसेच उपाध्यक्ष श्री. गिरीश बहिरट, श्री दीपक घोडके, श्री.विशाल ठोंबरे, श्री गणेश मांजरे, श्री. चेतन गरुड, श्री. रघुदनदन भुजबळ, श्री अजित गराळे , रोहिणी पवार , सुरेखा खेडॆकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.  पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी श्री. राकेश विटकर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, आदरणीय अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या युनियनचे अध्यक्ष श्री. बजरंग पोखरकर यांनी सर्वांचे आभार मानुन सर्वाना दिपावालीच्या हार्दीक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची समारोप करण्यात आला.

PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या

| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

PMC Employees Suspension | महापालिका कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करतांना प्रशासनाने काळजी पुर्वक दक्षता घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक महिन्याला आमचे सेवक निलंबीत करत राहिला तर PMC मध्ये कर्मचाऱ्याना  काम करणे अडचणीचे होईल. निलंबन हा पर्याय नसुन तेथील सिस्टीम सुधारली गेली पाहिजे. त्यामुळे निलंबन करण्याआधी प्रशासनाने प्राथमिक सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर (PMC Employees Union) यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाने नुकतेच काही खात्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. या कर्मचाऱ्यांचे निलंबन माघारी घेण्यात आले आहे. याबद्दल अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, कुणाल खेमणार  खेमणार, उपआयुक्त सचिन इथापे, खातेप्रमुख माधव जगताप यांनी केलेल्या सहकार्य बद्दल त्यांचे आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले आहेत. याबाबत पोखरकर यांनी सांगितले कि, परंतु इथून पुढे सेवकांवर अशा प्रकारे निलंबनाची कार्यवाही करतांना प्रशासनाने काळजी पुर्वक दक्षता घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक महिन्याला आमचे सेवक निलंबीत करत राहिला तर pmc मध्ये कर्मचारी याना काम करणे अडचणीचे होईल. निलंबन हा पर्याय नसुन तेथील सिस्टीम सुधारली गेली पाहिजे. आज शिक्षण मंडळ असेल किंवा इतर कोणतेही खाते असेल व्यवस्थित इंटरनेट उपलब्ध होत नाही , कॉम्पुटर चा तुटवडा , टेंशनरी मिळत नाही , सॉप्टवेअर चांगल्या दर्जाची नाहीत , पेपर रिम उपलब्ध नाहीत, सेवकांना बसायला जागा नाही. या गोष्टीकडे प्रामुख्याने आयुक्त यांनी लक्ष दिल पाहिजे. सेवकांना  चांगल्या सुविधा दिल्या तर खात्री शीर सांगतो या पुढे pmc मध्ये एकही सेवक निलंबित होणार नाही. प्रशासनाने प्राथमिक सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. असे ही पोखरकर म्हणाले.

PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion |  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

| महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नती (Time Bound Promotion Proposal) महापालिका आयुक्त यांच्याकडून चांगला दिलासा देण्यात आला आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. राज्य सरकारच्या अधीन राहून पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नसणार आहे. विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हा चांगलाच दिलासा मानला जात आहे.
 (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले याबाबतचे सर्क्युलर देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे कि, तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करताना पदोन्नती समितीची अंतिम मान्यता घेण्यात येत होती. मात्र आता सादर होणाऱ्या प्रस्तावना अंतिम मंजुरीचे अधिकारी संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे पदोन्नती चा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय याचा फायदा सेवानिवृत्त सेवकांना देखील होणार आहे. कारण यामुळे त्यांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लवकर मार्गी लागणार आहेत.
याबाबत पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे उदय भट, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर तसेच महापालिका मागासवसर्गीय संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.
——
कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी झाले आहे. हा कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा आहे. याबाबत प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र आता तात्काळ प्रक्रिया सुरु करून पदोन्नती द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन. 
——–
———
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Important news for employees There is no need to submit a proposal before the promotion committee for time-bound promotion! | Final approval authority to Head of Department

PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन

PMC Pune Employees Workshop | पुणे महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या वतीने (PMC Employees Union) पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation Employees) सेवकांची कार्यशाळा रोकडोबा मंदिर कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, पुणे  येथे आज घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत विचारमंथन करण्यात आले. यावेळी पीएमसी एम्पलाॅईज युनियनच्या वतीने सेवकांना युनियनचा सभासद क्रमांक  देणेत आले. (PMC Pune Employees Workshop)
पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) सेवक पुणे शहराचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच समस्यांचे सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यातून निराकारण करतात. पुणे महानगरपालिकेची वाढती हद्द, रिक्त असलेली पदे यामुळे सेवकांना दैनंदिन कामे करताना ताणतणाव तसेच वैयक्तिक आरोग्यविषयक प्रश्न उद्भवतात. याकरिता या कार्यशाळेत करिअर कौन्सिलर तसेच थेरपिस्ट संध्या पाटील यांचे व्याख्यान ठेवले होते. (Pune Municipal Corporation Employees)
पुणे महानगरपालिकेतील सेवकांची रखडलेली पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना,  सेवकांच्या कालबद्ध बदल्या तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे या कार्यशाळेत अध्यक्ष बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) तसेच जनरल सेक्रेटरी बापू पवार यांनी आवाहन केले. (PMC Pune Employees)
या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane),  सचिन इथापे उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग (Deputy Commissioner Sachin Ithape),  उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam), मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री कैलास वाळेकर , सुरक्षा अधिकारी  राकेश विटकर (Security Officer Rakesh Vitkar),कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे तसेच इतर अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (PMC Employees Union)
अतिरिक्त आयुक्त  ढाकणे यांनी सेवकांच्या कार्यक्षमतेवर शहरीकरणामुळे तसेच कामकाजातील वाढता ताण तणावामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात याकरिता अशा कार्यशाळेचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे महत्त्व विषद केले. उपायुक्त  सचिन इथापे यांनी सेवकांच्या रखडलेल्या प्रश्नांविषयी सामान्य प्रशासन विभागाकडून तातडीने आढावा घेतला जाईल व सेवकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे सर्व सेवकांना आश्वस्त केले. (Pune  Corporation Employees)
या कार्यशाळेचे विशेष हे कि, आज पर्यंत कोणत्याही सेवकाला युनियन सभासद नंबर दिला गेला नव्हता, तो यामध्ये दिला गेला. याबाबत कर्मचारी युनियन आणि पदाधिकारी यांचे कौतुक होत आहे.
—–
News Title | PMC Pune Employees Workshop | Brainstorming in the workshop on questions of municipal employees

PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी उद्या कार्यशाळा | प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त राहणार उपस्थित

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी उद्या कार्यशाळा | प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त राहणार उपस्थित

PMC Pune Employees | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी म्हणजे उद्या कार्यशाळेचे (Workshop) आयोजन करण्यात आले आहे. पीएमसी एम्प्लॉईज युनियन (PMC Employees Union) च्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर करियर कौन्सिलर संध्या पाटील (Career Councillor Sandhya Patil) या मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) यांनी दिली. (PMC Pune Employees)
उद्या दुपारी 12 ते 3 या कालावधीत रोकडोबा मंदिर देवस्थान हॉल, शिवाजीनगर गावठाण येथे ही कार्यशाळा होईल. यामध्ये कार्यालयीन कामकाजविषयक आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. संध्या पाटील याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष पोखरकर यांनी महापालिका सेवकांना केले आहे. (PMC Pune)
——
News Title | PMC Pune Employees | Workshop tomorrow for Pune municipal employees Municipal Commissioner will be present as the chief guest

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत. यावरून कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (PMC Pune Employees | Sharad Pawar)
पुणे महापालिका कर्मचारी (Pune Municipal Corporation Employees) प्रशासनाच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करत आहेत. याला कारण म्हणजे प्रशासनाचा उदासीनपणा. कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या, कालबद्ध पदोन्नती, सहायक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत बदल करणे, लेखनिकी संवर्गावर अन्याय करणे, अशा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. याबाबत कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांची मोदीबाग या ठिकाणी बजरंग पोखरकर – अद्यक्ष पीएमसी एम्प्लॉईज पुणे महानगरपालिका (PMC Employees Union) व राजु ढाकणे जॉईंट सेक्रेटरी यांनी भेट घेऊन पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच जुनी पेंशन योजना लागु करा, अशी मागणी देखील केली. शरद पवार कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. (Pune Municipal Corporation News)
—–/
News Title | PMC Pune Employees | Sharad Pawar Complaints of Pune Municipal employees’ problems directly to Sharad Pawar!

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर तर जनरल सेक्रेटरी पदी बापू पवार यांची बहुमताने निवड

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर तर जनरल सेक्रेटरी पदी बापू पवार यांची बहुमताने निवड

PMC Employees Union | पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी एम्पलाॅईज युनियनचे अध्यक्षपदी  बजरंग पोखरकर (President Bajrang Pokharkar) तर जनरल सेक्रेटरी म्हणून  बापू पवार (General Secretary Bapu Pawar) यांची युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने निवड करण्यात आली. (PMC Employees Union)
कार्याध्यक्ष म्हणून  वैशाली कुंभार यांची तर महिला कार्याध्यक्ष म्हणून  वंदना साळवे यांची निवड करणेत आली. खजिनदार पदी दिपक घोडके व  अविनाश गवळी काम पाहणार आहेत. मावळते अध्यक्ष प्रदीप महाडिक व जनरल सेक्रेटरी  आशिष चव्हाण यांनी तरुण तसेच कार्यकारीणीतील नवीन सहकाऱ्यांना मार्गदर्शन तसेच सल्लागाराची भूमिका बजावणार आहोत अशी भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली. (Pune Municipal Corporation Employees)
अध्यक्ष  पोखरकर व जनरल सेक्रेटरी पवार यांनी या पुढील काळात सेवकांचे असणारे प्रश्न मार्गी लावून सेवकांचा विश्वास संपादन करू. तसेच सेवकांनीही नवीन कार्यकारीणीला सेवकांचे प्रश्ना संदर्भात तसेच युनियनच्या प्रत्येक कार्यक्रमात पाठिंबा देऊन पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवावे असे सर्व सेवकांना आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील सेवक उपस्थित होते.  राजू ढाकणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.  तसेच सूत्रसंचालनाचे काम पाहिले.माजी कार्याध्यक्ष  भास्कर महाडिक यांनी समारोप करून सभेची सांगता झाली. (PMC Pune Employees)
——-
News Title | PMC Employees Union | Bajrang Pokharkar was elected as President of PMC Employees Union and Bapu Pawar as General Secretary.